भीती- नकोशी – हवीशी ! होमिओपॅथी त्याच्या पाठीशी !! / Fear – Do not Want – Want ! Homoeopathy is Always Supportive !!

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneAugust 15, 2025 Anxiety Children Problems Children's Illness Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry

भीती – नकोशी – हवीशी !  होमिओपॅथी त्याच्या पाठीशी !!

     माझ्या एका जुन्या पेशंटने भीती मनामध्ये कशी निर्माण झाली याबद्दलची माहिती   सांगितली. जेव्हा ते एका नातेवाईकांच्या लग्नानिमित्ताने दिल्लीला गेले होते, तेव्हा दिल्ली शहर पाहायचं म्हणून मेट्रो स्टेशनपाशी गेले. तिथल्या ‘एस्कलेटर’ वरून स्टेशनवर जायचं होतं. पण हे दाखवण्याच्या फुशारकीन तिने सर्वात आधी पाय टाकला आणि नेमका तिच्या साडीचा पदर त्यात अडकला आणि ते मशीन तिला खेचू लागलं. ती जोरजोरात ओरडू लागली. वर ही जाता येईना आणि खाली उतरता येईना. क्षणभराचा प्रसंग असेल…..तेव्हा तिच्या नवऱ्याने अक्षरशः उचलून खाली ठेवलं. त्यानंतर ‘एस्कलेटर’ची तिच्या मनात प्रचंड भीती बसली.
 ती काढून टाकण्याचा तिने अनेकदा प्रयत्न केला. ‘काय होते बघू……जमवायचंच आज! ‘ पण ती गोष्ट करायला गेली की पाय जडसे होऊन जायचे, छाती धडधडायचे, घाम फुटायचा. नवरा आणि मुलांनी तिची भीती काढण्यासाठी खूप प्रयत्न केले;  पण तिचा पायच उचलायचा नाही. ते फिरायला गेले की लिफ्ट असेल तर ती जिने चढून-उतरून जायची.पण तेही तोही पर्याय नसेल तर ती खालीच बसून राहायची.
       तिच्या नवऱ्याने दोन महिने आधी युरोपच्या प्रवासाला जायचं आहे आणि तेथे एस्कलेटर वरूनच जावं लागेल असं सांगितल्यामुळे ती एस्कलेटरच्या भीतीपासून  पूर्णपणे बरी होण्यासाठी  होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेण्याचे ठरवले. त्यासाठी ती ‘चैतन्य होमिओपॅथीक क्लिनिकमध्ये ‘  आली.
     होमिओपॅथीक उपचाराच्या काही दिवसानंतरच तिच्यामध्ये आत्मविश्वास वाढत आहे हे जाणवायला लागलं आणि तिच्या मनातील भीती देखील कमी होत चालली आहे तिला जाणवू लागलं.
       अखेर तो दिवस उजाडला आणि टूर गाईडने त्यांना एक तास  आधी सांगितलं, “आज एस्कलेटरवरून आपण जाणार आहोत. इथून परत येणार नाही.” तेव्हा तिला थोडंसं धडधडायला लागलं, पण धाडस करून ती त्या एस्कलेटरवरून तिने प्रवास केला. तिच्या दृष्टीने तो अत्यंत आनंदाचा क्षण होता आणि होमिओपॅथीची उपचार पद्धती तिला लागू पडली आहे हे तिला त्यावेळेला पटलं !
       भीतीची भावना संपल्यानंतर आपल्याला भीती वाटली होती याची आज जरी आठवण झाली आली तरी तिला हास्यास्पद वाटतं.
    भय ही भावना खूप वैयक्तिक आहे, व्यक्तिनिष्ठही आहे. ‘मला कधी आनंद झाला नाही’  किंवा ‘मी कोणत्याही गोष्टीचं कधी दुःख केलं नाही’  असं म्हणणाऱ्या व्यक्ती आपणाला भेटू शकतील कदाचित, पण भीतीची भावना कधीच अनुभवली नाही असं कोणी भेटणार नाही.
     भीतीच्या भावनेने आपला ताबा घेतला की त्यातून सुटका होत नाही. खूप असहाय वाटतं. पण इतरांना आपलं भयही कळत नाही. या व्यक्तीला एवढी साधी गोष्ट करता येत नाही, याचे इतरांना वाटणारं आश्चर्य आपल्याला अधिकच दुबळ करून टाकतं.
           प्रत्येकाला भय वाटतं. पण कोणाला कशाचं भय वाटेल हे सांगता येत नाही. कोणाला अंधाराचं, तर कोणाला गर्दीचे भय वाटतं. भय आणि गरज परस्परावंवर अवलंबून आहेत.
    वाहन चालवणं ही अत्यावश्य गरज झाली, की ती भीतीवर मात करते.
स्त्रियांचं वाहन चालवण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. त्यात एक कारण भय आहेच, पण त्यांच्यासाठी ते कदाचित अत्यावश्यक नसणं हेही आहे. अपघाताच्या रोज करणाऱ्या भयानक बातम्या असोत किंवा जवळच्या परिचित माणसांचं होणारं अकस्मित निधन. हे इतकं धक्कादायक असतं, की मनात अपघाताबद्दल  भीतीच निर्माण होते.
      आपल्या घरातलं कोणी कामासाठी बाहेर पडलं आणि परत येण्याची वेळ टळून गेली की भीती हळूहळू मनाचं कब्जा घेऊ लागते. तिला बाजूला सारण्याचा, मनाची समजूत घालण्याचा आपण कसोशीनं प्रयत्न करतो. पण वेळ सरत जातो तशी भीती वाढत जाते. एखादं संगीत टिपेला पोहोचते तशी भीती उच्चांक गाठते आणि उग्ररूपही धारण करते.
      भीतीच्या भावनेमुळे जाणीवा सावध होतात. विचारांचा वेग वाढतो. ‘फाईट की फ्लाइट ‘ हा निर्णय तात्काळ होतो. भीती माणसाला धोक्यापासून पळून जायचं, थांबायचं की लढायचं या निर्णयासाठी तयार करते. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते.
      भीतीला आपण टाळतो. तिच्यापासून दूर पळतो, तसे भीतीला जवळही करतो. भीतीची अनुभूती घ्यायला आपल्याला खूप आवडते. त्याचमुळेच स्कूबा डायव्हिंग, पॅराग्लाइडिंग, रिव्हर राफ्टिंग अशा गोष्टींमधून लोक थरार अनुभवतात. वाटलेल्या अनामिक भीतीच वर्णन करतात. पोटात खड्डा पडल्याचं सांगतात. पण पुन्हा पुन्हा तो अनुभव घेतात. या भीतीत हवीहवीशी वाटणारी अनुभूती असते.
      भीतीचं खरं कारण बाह्य जगात नसून अंतर्मनात दडलेला एक विचार आहे. भीतीपोटी माणूस अनाठायी धाडस करत नाही. पण भीतीवर काबू मिळवायचा असेल तर त्या व्यक्तीला हळूहळू सामोर जाणं, तोंड देणं, हाच उपाय आहे, हे ही अनेक प्रसंगातून शिकलेल्या व्यक्ती ठामपणे सांगतात आणि त्याच्यामध्ये होमिओपॅथिक उपचारांची जोड दिल्यास भीती पूर्णपणे नाहीशी होऊ शकते.
   भीतीचा अटॅक मधून मुक्त झालेल्या एका पेशंटचा अनुभव सांगतो. तिला काही कारणास्तव भीतीचा अटॅक आला होता. पॅनिक झाली होती ती. भीती वाटू लागली की वारंवार फोन करायची.
   तिचं वर्णन सखोल करायची. ‘दार वाजले तरी भीती वाटते. दार उघडायची भीती वाटते. छातीवर कोणीतरी दगड ठेवल्यासारख वाटतं, गुदमरायला होतंय. पण असे किती दिवस चालणार ‘ ?
   तिची मुलगी बंगलोरला शिकायला गेली होती. नवरा सहा महिने कंपनीच्या कामासाठी पर राज्यात गेला होता. त्यांची काळजी, एकटं राहण्याची भीती. या साऱ्या भावनांचा ताण तिला आला होता. हे सारं अशा रूपात बाहेर पडत होतं.
   रोज सकाळी भीतीने पकड घेतली की, ती दवाखान्यात फोन करायची. बराच वेळ संवाद चालायचा. होमिओपॅथिक औषधोपचार सुरू केल्यानंतर हळूहळू स्वतः तिच्यामध्ये बदल होत गेले. स्वतःला सावरता आलं आणि काही आठवड्यातच तिने भीतीवरती मात केली.
     आज घरामध्ये कोणी नसलं किंवा घरातील व्यक्ती येण्यास उशीर झाला तरी त्यातून निर्माण होणाऱ्या भीतीवर तिने मात केली आहे.ती आज आनंददायी  आणि इतरांप्रमाणे नॉर्मल आयुष्य जगत आहे.
     भावनेला वेळेत ओळखणं खूप आवश्यक आहे. एखाद्या वेळी भीती आपल्या नियंत्रणात राहिली नाही तर तात्पुरत्या काळापुरती होमिओपॅथिक उपचार घेतल्यानेही व्यक्ती पूर्व पदाला येते. पण या पर्यायाचा स्वीकार करण्याची लोकांची अनेकदा तयारी नसते.
     भीतीवर स्वार व्हायचं असेल तर तिला सामोर जाणं महत्त्वाचं आहे. भीतीच्या भावनेवर काबू मिळवला नाही तर भीती आपल्या प्रगतीत अडसर बनते, ही पुष्कळदा अनाठयी असते.
     भीतीची उगम स्थान अनेक रूपही अनेक पण तिचा अनुभव नेहमीच नकोस असतो असं म्हणता येणार नाही. अनेकदा ती हवीशी ही असते. थरार अनुभवण्यासाठीच नव्हे तर आयुष्यातले मोठे आणि कायम लक्षात राहणारे धडे शिकविण्यासाठीही !
    भीतीसाठीचे अनेक घटक आपल्याच आयुष्यात, आपल्याच लोकांमध्ये असतात. नोकरी व्यवसायात आज जीवघेणी स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेशी मुकाबला करू शकलो नाही तर भीती वाटत राहते. काहींना अपयशाची भीती वाटत राहते. एकटेपणाच्या भीतीतून अनेक व्यक्ती मनोरुग्ण झाल्याचं,आत्महत्येला प्रवृत्त झाल्याचे आपण सातत्याने ऐकतो.
    मृत्यू विषयी कल्पनेचे खेळ करत व्यक्तीच्या आहारी जाते,पण मृत्यू ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपल्याला मृत्यू हवा म्हणून तो येणार नाही किंवा नको म्हटला तरी येणार थांबणार नाही, हे माहीत असताना आपण आपला आयुष्य चिंताग्रस्त का करायचं ? हे साध अध्यात्म या भीतीवर मात करू शकतं.
    भीती माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन कप्पे तयार करते. व्यक्तीच्या एका मनात एक असतं आणि ती व्यक्त काहीतरी वेगळेचं करते. एक द्वंद्व, दुभंग व्यक्तीमत्व तयार होतं. जे सांगता येत नाही, दाखवता येत नाही. त्यातूनही शारीरिक लक्षण दिसू शकतात. छाती धडधड, घशाला कोरड, पोटात दुखणं, डोकं दुखणं, छातीवर ओझं ठेवल्यासारखं वाटणं वगैरे वगैरे. या साऱ्यांचे भय आणि दडपण व्यक्तीच्या प्रगतीत अडसर बनतं.
माणूस माणसालाच घाबरतो. मी असं बोललो, तर काय परिणाम होईल ?….
   मी असा वागलो, तर मला काय ऐकावं लागेल…….ही अनामिक भीती असते. वरिष्ठांशी बोलताना येणारं भय तर सार्वत्रिक आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा, लिंग  वर्ग, जात यांना वरच्या पायरीवर असणाऱ्या माणसांचे भय वाटतं. त्यामुळे संवादात दरी तयार होते.
    मनातील भीतीची भावना घालवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ती एक संथ प्रक्रिया आहे. सातत्यपूर्ण ही प्रक्रिया करत आपण निर्भय होऊ शकतो. होमिओपॅथिक औषधांबरोबरच नियमित ध्यान आणि योग याचा शरीर आणि मन शांत व समतोल ठेवण्यासाठी उपयोग होतो.
   आज भावनांवर मात करण्याचे फंडे सांगणाऱ्या पुस्तिका, काही मिनिटांचे व्हिडिओ, पॉझिटिव्ह थिंकिंगचे कार्यक्रम ऑनलाईन व्याख्यानं, अनेक गुरूंचे सत्संग यांचा भडीमार चालू आहे. रस्ता चुकलेला माणूस या साऱ्यात आधार शोधतो, पण अनेकदा त्याला तो मिळत नाही, कारण यामध्ये बऱ्याचदा काही विचार नसतो, उपाय नसतो, फक्त आकलन न होणारी ‘थिअरी’ असते.
    भीती घालवायची असेल तर उपाय आपल्यातच आहे. सकारात्मक नाही तर स्वीकारत्मक होण्याची गरज आहे. होमिओपॅथिक औषधांची जोड दिल्यास भूतकाळाला गाडणं, भविष्यकाळात न रमणं, वर्तमानात जगणं शक्य होतं. स्वतःचा सरसकट स्वीकार केला जातो. त्याच बरोबर क्षमाशीलतेची वृत्ती ठेवण्याची मानसिकता वाढीस लागते. हा कठीण प्रवास होमिओपॅथिक औषधांमुळे सहज शक्य होतो.
‘भय इथले संपले आहे’  हे होमिओपॅथिक उपचार घेणारी व्यक्ती आपसूकच म्हणते !

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

——————————————————

Fear – do not want – Want ! Homoeopathy is Always Supportive !!

    An old patient of mine shared information about how fear is created in the Mind. When she went to Delhi for a relative’s wedding, she went to the Metro station to see the city of Delhi. We had to go to the station from the escalator there. But proud to show it, she stepped foot first and the very layer of her saree got caught in it and the machine started pulling her. She started screaming loudly. Can’t go up and can’t go down. It would be a momentary incident…..then her husband literally picked her up and put her down.
    After that, she was very afraid of escalators. She tried many times to remove it. ‘Let’s see what happens……have to gather today! ‘ But when she went to do that thing, her legs would become heavy, her chest would throb, she would sweat. Husband and children tried hard to allay her fears; But she does not want to lift her leg.
    If they went for a Trip, if there was an elevator, she would go up and down the stairs, but if that was not an option, she would sit down.
    Her husband told her that he was going to travel to Europe two months ago and that he would have to take escalators, so she decided to take Homoeopathic Treatment to completely cure her fear of escalators. For that she came to ‘ Chaitanya Homoeopathic Clinic ‘.
   After a few days of  Homoeopathic treatment, she began to feel that her confidence was increasing and her fear was also diminishing.
    Finally the day dawned and the tour guide told them an hour earlier, “Today we are going down the escalator. There is no coming back.” She was a little nervous then, but bravely she traveled on that escalator. It was a moment of great joy for her and it was then that she realized that Homoeopathic treatment had worked for her !

 

   Even if we remember today that we were afraid after the feeling of fear is gone, it seems ridiculous.
    Fear is a very personal emotion, even subjective. You may meet people who say ‘I have never been happy ‘ or ‘I have never been sad about anything’, but you will never meet someone who has never experienced Fear.
  Once the feeling of fear takes hold, there is no escape from it. It feels so unhelpful. But others don’t even know their Fear. The astonishment of others that this person cannot do such a simple thing only weakens us.
   Everyone feels Fear. But one cannot say what one will be afraid of. Some are afraid of darkness, some are afraid of crowds. Fear and need are interdependent.
   Driving becomes such a necessity that it overcomes Fear. The proportion of women driving is very low. One reason is Fear, but it may not be essential to them. Whether it is the daily horrific news of an accident or the sudden death of a close acquaintance. It is so shocking that the fear of an accident arises in the Mind.
   When someone in our family goes out for work and the time to return is missed, Fear gradually takes over the Mind. We try hard to move her aside, to understand her Mind. But as time goes by, the Fear increases. Just as a musical note reaches its climax, the Fear reaches a peak and takes on a ferocious form.
    The sense of Fear makes the consciousness wary. Speed ​​of thinking increases. The decision of ‘Fight or Flight’ is instantaneous. Fear prepares a person to decide whether to run away from danger, to stay or fight. This ability exists in every person.
    We avoid Fear. Runs away from her, so does Fear. We love to feel Fear. That is why people feel the thrill of things like scuba diving, paragliding, river rafting. Describes only the anonymous Fears felt. It is said that there is a pit in the stomach. But they experience it again and again. There is a feeling of wanting in this Fear.
     The real cause of fear is not in the external world but in a thought hidden within. Fear does not make a man bold. But if one wants to overcome the Fear, the solution is to face the person gradually, these learned persons insist that, and adding Homoeopathic treatment to it, the Fear can disappear completely.
    Tells the experience of a patient who recovered from a Panic attack. She had a panic attack for some reason. She was panicked. When he got scared, he used to call repeatedly.
    Her description should be detailed. Even if the door knocks, I feel fear. Afraid to open the door. Feels like someone has placed a stone on the chest, suffocating. But how long will this last ?
    Her daughter had gone to Bangalore to study. The husband had gone to a another state for company work for six months. Their worry, fear of being alone. She was overwhelmed by all these emotions. It all came out like this.
Every morning when fear gripped her, she would call the hospital. The conversation went on for a long time.
    After starting Homeopathic medicine, she gradually changed herself. She recovered and overcame her Fear within a few weeks. Today she has overcome the Fear of no one in the house or if the person in the house comes late. Today she is living a pleasant and normal life like others.
    It is very important to recognize the Emotion in time. At some point the Fear is not under control and even temporary Homoeopathic treatment can help a person recover. But people are often not ready to accept this option.
    If you want to overcome Fear, it is important to face it. If you not overcome Fear then, Fear becomes an obstacle to our progress, which is often impractical.
   The place of origin of Fear is many forms but it cannot be said that its experience is always unwanted. Often it is desired. Not only to experience the thrill, but also to teach the big and memorable lessons of life !
    Many factors for fear are in our own lives, in our own people. There is fierce competition in the job market today. If we are not able to compete with this competition, we feel Fear. Some Fear failure. We constantly hear that many people become psychotic and commit suicide due to the Fear of loneliness.
     People play with the idea of ​​death, but death is a line on a black stone. Why should we make our life anxious when we know that death will not come because we want it or will not stop coming even if we say no? This simple spirituality can overcome this fear.
     Fear creates two compartments of a person’s personality. A person has one Mind and expresses something else. A duality, a split personality is created. What cannot be said, cannot be shown. It can also cause physical symptoms. Chest palpitation, dry throat, abdominal pain, headache, feeling like a burden is placed on the chest, etc. The Fear and pressure of all these become obstacles in the progress of a person.
    Man is afraid of man. If I say this, what will be the result ?
If I act like this, what will I have to hear…….this is anonymous fear. Fear of talking to seniors is universal. Position, money, prestige, gender class, caste fear the people who are at the top. This creates a gap in communication.
    It is necessary to try to remove the feeling of Fear from the Mind. It is a slow process. By doing this process consistently, we can become Fearless. Along with Homoeopathic medicines, regular meditation and yoga are used to keep the Body and Mind calm and balanced.
   Today there is a bombardment of manuals, few minute videos, online lectures on positive thinking programs, satsangs (सत्संग) of many Gurus on how to overcome Emotions. A person who has lost his way looks for support in all this, but often does not find it, because there is often no thought, no solution, only an incomprehensible ‘Theory’.
    If we want to overcome Fear, the solution lies within us. There is a need to be receptive, not positive. If you add Homoeopathic Treatment, it is possible to bury the past, not to worry about the future, to live in the present. One’s self is accepted. At the same time, the Mindset of having an attitude of forgiveness grows. Homoeopathic Medicines make this difficult journey easy.
    The person taking Homeopathic Treatment says that ‘FEAR IS GONE’ (‘भय इथले संपले आहे’ ) !!!

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123 / 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article

Back To Top