दूर देशी……एकटेपणावर  आणि होमिओपॅथी / Overseas…… on Solitude & Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneAugust 29, 2025 Anxiety Asthma Children Problems Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry Uncategorized

 

दूर देशी……एकटेपणावर  आणि होमिओपॅथी

      लहान मुलांचे बालपण पालकांच्या मायेच्या छायेत मजेत जात असतं. मूल दहावीपर्यंत शिकतं आणि मग त्यांना, त्यांच्या कुटुंबाला आपल्या गावापेक्षा, बाहेरच्या गावातील, राज्याती़ल, तर कधी बाहेरच्या देशातील संधी खुणावायला लागतात. मग पुढे शिक्षण किंवा नोकरी या निमित्ताने त्या व्यक्तीला आपलं गाव, मित्रपरिवार, गोतावळा सोडून लांब जायची वेळ येते. संधी मिळण्याच्या आनंदा पाठी एकटेपणाची एक अदृश्य भीती लपलेली असते.
      अदृश्य शब्दातच सगळे येत खरं तर ! जी भीती प्रत्यक्ष दिसत नसते, पण तिचा अस्तित्व असतं. मग केवळ दिसत नाही आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल ? हे दूर जाणं, एकटेपणा कसा घेऊन येतं याविषयी या लेखांमध्ये सांगितलं आहे.
         सात-आठ जणांच्या एकत्र कुटुंबात वाढलेली रंजना अभ्यासात हुशार होती. घरात बाकी सगळे जण प्रौढ, ही एकटीच लाडके शेंडेफळ. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी शहरातल्या विद्यापीठात प्रवेश मिळाला, आता समवयस्कांबरोबर राहायला मिळणार, खूप मज्जा येणार, अशी मनोराज्य रंगवत रंजना होस्टेलमध्ये दाखल झाली. घर आठ ते दहा तास प्रवासाच्या अंतरावर राहीलं.
        सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपल्यावर मात्र तिची रूममेट तिच्याशी स्पर्धा करतेय, तिला फक्त एक स्पर्धक म्हणून बघते आहे, हे तिला जाणवायला लागलं. रंजनाच्या कॉलेजमधून दुसरं कोणीच इकडे आलं नव्हतं. रूममेटलाही तिच्या आधीच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी होत्याच, त्यामुळे तिला मैत्रीची गरज नव्हती. रंजनाचा कॉलेजमधला वेळ कसा बसा जायचा, पण होस्टेलवरची संध्याकाळ आणि रात्र तिच्यासाठी खूप मोठी असायची. घरात सतत सगळ्यांची सवय आणि इथे बोलायला अजिबात कोणी नाही. तिला प्रचंड एकटेपणा जाणवायचा.
          हळूहळू तिचं खाणं पिण्यातल लक्ष उडालं. कॉलेज बुडवून घरच्या फेऱ्या वाढल्या आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम तिच्या अभ्यासावर झाला. खरंतर नवीन प्रवेश घेऊन गेल्यावर कोणत्याही कॉलेजमध्ये काही मुलांना असं होऊ शकतं, पण कॉलेजचं पाच-सहा तास सोडता, बाकी सगळा वेळ घरच्यांचा आधार असतो. त्यामुळे एकटेपणा एकदम अंगावर येत नाही.
          पूर्वीच्या काळी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मुलांना जिल्ह्याचे ठिकाणी जावं लागायचं, पण घर सहज प्रवास करून जाण्याच्या अंतरावर असायचे. केवळ अत्यंत हुशार असलेली काहीच मंडळी स्कॉलरशिप वगैरे मिळून परदेशात जायची, पण ते अपवाद.
            आता पालकांकडे पैशांबरोबरच दुर्दम्य इच्छा महत्त्वकांक्षा आहेत. बँका एज्युकेशन लोनचे फलक घेऊन उभे राहिल्या आहेत तसे बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढलं आहे. मात्र त्याबरोबर एकटेपणा येणं चुकलेलं नाही. घरात लाडाकोडात वाढलेल्या मुलांना अचानक नातेसंबंधांमधले डावपेच, छक्के-पंजे कळतीलच असं नाही. कळाले तरी त्यानुसार त्यांचे वर्तन करता येईल असंही नाही. कोणावर पूर्ण विश्वास ठेवावा हे कळत नाही. अनोळखी असलेल्या लोकांबरोबर 24 तास एकत्र राहताना मनात अविश्वास घोळत राहतो. पर्यायानं शंभर मुलांच्या वस्तीगृहात किंवा चार जणांच्या फ्लॅटमध्ये ही काही जणांना एकटेपणा येतो.
अर्थात होस्टेलच्या दिवसातून आयुष्यभराचं मैत्री, गोड आठवणी मिळतात आणि हा अनुभव असणारे पुष्कळजण असतात. पण योग्य सोबती न मिळाल्याने होस्टेलच्या वाईट आठवणी घेऊन जाणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.
          गौरी आणि ओम दोघेही पुण्याजवळच्या एका गावात मोठे झाले. दोघांचं लग्न झालं आणि ओमला बंगलोरमध्ये एका चांगल्या नोकरीची संधी मिळाली. दोघे तिथे गेले. संधी किती चांगली असते तर गाव सोडून जाणं खरंतर दोघांच्या जीवावर आलं होतं. ओमला नोकरी ठिकाणी जमवून घेताना जड गेलं, पण त्याहीपेक्षा दिवसभर घरी बसून राहणं गौरीच्या अंगावर येत होतं.
        सकाळ कामात जायची, पण दुपार, संध्याकाळ कोणाशी बोलणं नाही ! तिला आधीपासूनच अधूनमधून अस्थमाचा त्रास व्हायचा. एके दिवशी नवरा ऑफिसमध्ये असताना तिला (अस्थमा) दम्याचा अटॅक आला. कोणाला हक्काने फोन करून ‘घरी जा ‘  असं सांगायची सोय नव्हती. त्याला घरी पोहोचायला किमान अर्धा-पाऊण तास लागणार होता. तो कसा बसा घरी पोहोचला, तोपर्यंत बायकोने दम्याचा अस्थमापंप घेऊन स्वतःला थोडं स्थिर केलं होतं. पण त्या प्रसंगांना दोघांच्या मनात भीती निर्माण केली.
        इथे आपल्याला काही झालं तर मदतीला पळत कोणी येणार नाही…..आपल्या जबाबदारीने परिस्थितीला सामोरे जावं लागेल. पण दर वेळेस आपण निभावून नेऊ शकू का ?…….मूळच्या गावी जाऊ, त्या ठिकाणी काही ना काहीतरी ओळख निघेल. आणि बहुतेक वेळा त्यातून मदत ही मिळून जाते.
      जेव्हा अशी मदत मिळते तेव्हा, “अरे, तू सदाशिवरावांचा नातू ना रे ? अगं, तू माझ्या मोठ्या बहिणीची मैत्रीण ना ग ?” अशा ओळखी निघतात. तेव्हा समोरच्या माणसाच्या तोंडूनही  ‘वा वा ! छान छान ! असा आनंददायी उद्गार निघतात. खरं पाहिला गेलं तर यात एवढा आनंद होण्यासारखं काय आहे !
        पण एक माणूस जोडला गेल्याचा आनंद असतो. ‘मला जास्त लोक लागत नाहीत किंवा सोसवत नाहीत’, ‘मला स्वतःतच रमायला आवडतं’, असं म्हणणाऱ्या लोकांनाही खरंच अशा ओळखी आणि त्यातून मिळणारा पाठिंबा हवा असतो.
          बँक,शाळा,कॉलेज,सरकारी कार्यालय या सगळ्यांपेक्षा हॉस्पिटलमध्ये लागणारी मदत महत्त्वाची असते. जो माणूस आजारी असतो, त्याच्याबरोबरच्या व्यक्तींनं आर्थिक बाजू सांभाळावी, की रुग्णाकडे बघावं ?…..
           लांब गावात राहणाऱ्या व्यक्त कुटुंबातल्या कितीतरी व्यक्तींना करोनाच्या दिवसांत याला तोंड द्यावं लागलं. त्याची भीती त्यांच्या मनात घर करून गेली. परक्या प्रदेशात आपल्याला मदत न मिळण्याची, एकटेपणाची भीती अनेकांना शेकडो मैल पायी प्रवास करून का होईना,पण घराकडे, गावाकडे घेऊन जात होती. तिथे जाऊन पैसा कमावून अवघड असेल कदाचित, पण काही ना काहीतरी उपाय निघेल….निदान आपण एकटं नसू ही भावना पक्की होती.
    संकटकाळी मदत मागायला, बोलावसं वाटलं तर, “शेअर” करायला कोणी असावं, ही सुप्त अपेक्षा प्रत्येकाच्या मनात असते. विशेषतः दूरच्या गावी, वा परदेशात स्थलांतरित होणाऱ्यांना, काही काळासाठी दूर राहायला जाणाऱ्यांना ही पोकळी, ते एकटेपणं खूप जाणवतं. अशा व्यक्तींना  होमिओपॅथिक उपचार पद्धती चांगल्या प्रकारे मदतगार ठरू शकते.
        भारतातल्या भारतात किमान नियम, कायदा याची माहिती असते. परदेशात माणसांच्या आधी परका देश, परका कायदा याचीच भीती असते. माझी एक पेशंट होमिओपॅथीच्या उपचारासाठी व समुपदेशनासाठी आलेली एक तरुण मुलगी तिचा अनुभव सांगत होती, की “परदेशात प्रत्येक जण एकमेकाला स्पर्धक म्हणून बघतो. जिथे आपलंच निभावलं जात नाही तिथे दुसऱ्याला काय मदत करणार? “
         देशातच, वस्तीगृहात नंबर लागल्यावर अनेक मुलांच्या आई-वडील त्यांना तिथे सोडायला जातात. लागणारं सामान खरेदी करून देतात. पण परदेशात नोकरी लागली  काय  किंवा शिक्षणासाठी जावं लागलं काय, तिथे व्यक्ती पूर्णपणे एकटी असते. तुमच्या अडचणींवर तुम्हाला उपाय शोधावे लागतात.
        या उदाहरणात सांगितलेल्या त्या  मुलीला घर मिळत नव्हतं. तेव्हा ती तात्पुरती काहीतरी सोय करायची, पण परत दहा-पंधरा दिवसांनी तिला 55 ते 60 किलो सामान हलवून दुसरीकडे न्यायची. असं ती दोन-तीन महिने करत होती. सामानाच्या हलवाहलवीत तिच्या मदतीला कोणीच नसायचं. या सगळ्या अनुभवात मनात आलेल्या एकटेपणासंबंधी ती होमिओपॅथिक औषध उपचार घेण्यासाठी आली होती.
       आमच्या शेजारच्या आजीचं पूर्ण आयुष्य एका वाड्यात गेलं. कोणीही तिला संसारातल्या काही अडचणी सांगितल्या तर ती म्हणायची, “कोणीतरी येईलच गं मदतीला ! निघेल काहीतरी उपाय.” कुठून आला असेल हा विश्वास तिच्याकडे ? असा  विचार माझ्या मनात नेहमी यायचा, पण तिने कायमची हक्काची  माणसं  ” मै हु ना !” म्हणत पुढे आलेली पाहिली होती. तीनंही त्यांच्यासाठी आयुष्यभर केलं होतं.
     पण नवीन काळात प्रदेशांच्या सीमा धूसर झाल्या आहेत. स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढलं आहे.  त्याचबरोबर माणसाच्या आतला एकटेपणा वाढला आहे.
      चाळ आणि वाडा संस्कृतीत कदाचित ‘ प्रायव्हसी ‘  मिळत नसेल, पण बाजूच्या घरात संकटाची चाहूल लागली तर पटकन दार, खिडक्या तरी बंद तरी व्हायचे नाहीत !
   आता फ्लॅट,  बंगला संस्कृतीमध्ये ‘आपण भलं आपलं कुटुंब भलं ‘ असं करताना आपण फक्त  आपल्या शेजाऱ्याला त्याच्या संकटात एकटं टाकत नसतो, तर आपण स्वतःच्या एकटेपणाची एक एक पायरी वर चढत असतो.
   अशा एकटी पडलेल्यांना, “माझं कुणीतरी ऐकून घेईल,” ही खात्री नसते व त्यामुळे आत्मविश्वास पूर्णपणे ढासळलेला असतो. अशा व्यक्तींना होमिओपॅथीक औषध उपचारामुळे एकटेपणाला पळवून लावायला निश्चितपणे मदत मिळू शकते.
  त्यांच्या मनातील एकटेपणाची पोकळी भरून काढायला होमिओपॅथीक उपचार पद्धतीचा निश्चितपणे उपयोग होतो आणि हे “विश्वचि माझे घर ” असा आत्मविश्वास नक्की येऊ शकतो.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123 /9404507723
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

—————————————————————————————-

Overseas…… on Solitude & Homoeopathy

       Children spend their childhood in the shadow of their parents. A child studies up to 10th standard and then they, their family start to see opportunities outside their village, state, and sometimes outside the country.
      Then it is time for that person to leave his village, family, friends and dive for the sake of education or job. Behind the joy of opportunity lurks an invisible fear of loneliness.         In fact, all come in invisible words !
  The fear which is not directly visible, but it exists. So how can it be ignored just because it is not visible ?                 This article talk about how this distance brings loneliness.
    Brought up in a joint family of seven-eight people, Ranjana was brilliant in studies. Everyone else in the house is an adult, this one is the beloved nut.
    Ranjana entered the hostel thinking that she got admission in a university in the city for post-graduation, now she will live with her peers, it will be a lot of fun. The house was eight to ten hours’ journey away.
   After the initial days of Excitement, however, she began to feel that her roommate was competing with her, seeing her as just a competitor. No one else from Ranjana’s college had come here. The roommate also had friends from her previous college, so she didn’t need a friend.
     Ranjana used to spend her time in college, but the evenings and nights at the hostel were too long for her. Everyone is used to being in the house all the time and there is absolutely no one to talk to here.
    She felt very lonely. Gradually her focus on eating and drinking got lost. Home visits increased by drowning the college and this indirectly affected her studies.
    In fact, some kids may experience this in any college after taking fresh admission, but except for five-six hours of college, the rest of the time is supported by family. Therefore, loneliness does not come immediately.
     Earlier, children had to go to district places for post graduation, but home was within easy travel distance. Only a few very intelligent people would go abroad with scholarships etc., but that is an exception. Now parents have money and grudging ambitions. The number of students going abroad for education has increased as banks have been standing with education loan boards. But with that comes loneliness.
    It is not possible for children who grow up in a loving home to suddenly know the  tricks of relationships. Even if they know, it is not possible to act accordingly. Don’t know who to trust completely. Staying with strangers for 24 hours creates a feeling of disbelief. Alternatively, in a dormitory of a hundred children or in a flat of four, some feel lonely.
    Of course, a hostel day brings lifelong friendships, sweet memories, and there are many who share this experience. But the number of people who leave with bad memories of hostels due to not finding a suitable companion is not less.
     Both Gauri and Om grew up in a village near Pune. The two got married and Om got a good job opportunity in Bangalore. Both went there. If the opportunity was good, leaving the village would have cost both of their lives. It was hard to get Om to the work place, but more than that Gauri was getting tired of sitting at home all day.
    He used to go to work in the morning, but no one to talk to in the afternoon and evening ! She already had occasional asthma attacks. One day, while her husband was in the office, she  had an asthma attack. There was no facility to call anyone and say ‘go home’. It would take him at least half an hour to reach home. By the time he somehow reached home, his wife had stabilized herself a bit with an asthma pump. But those events created fear in both of them.
     If something happens to us here, no one will come to help us…..we have to face the situation with our own responsibility. But will we be able to carry it every time?…….Go to the native village, there will be some kind of recognition in that place. And most of the time it helps.
     When such help comes, “Oh, you’re the grandson of Sadashivarao, aren’t you? Oh, you’re my elder sister’s friend, aren’t you?” Such identities emerge. Then from the mouth of the person in front of ‘wa wa! Nice nice! Such happy exclamations come out.
     If you see the truth, what is there to be so happy about this! But a man is happy to be added. Even people who say ‘I don’t need or tolerate many people’, ‘I like to enjoy myself’ really need such recognition and support.
    Help needed in hospital is more important than banks, schools, colleges, government offices. If a person is sick, should the people with him take care of the financial side, or should they look after the patient?…..
     Many people of the family living in the far village had to face this during the days of Corona. His fear entered their hearts. The fear of loneliness and lack of help in a foreign land drove many of them to their homes and villages even after traveling hundreds of miles on foot. It might be difficult to go there and earn money, but somehow there will be a solution….at least we were not alone, the feeling was sure.
    There is a latent expectation in everyone’s Mind that there should be someone to ask for help, to talk to, to “share” in times of crisis. Especially those who migrate to a distant village or abroad, those who go to live away for some time feel this emptiness, that loneliness a lot. Homoeopathic treatment can be very helpful for such persons.
    In India, there is minimum knowledge of rules and laws in India. Foreign people are afraid of foreign country and foreign law. One of my patients, a young girl who came for Homoeopathy Treatment and counselling, was sharing her experience, ” In foreign countries, everyone looks at each other as competitors. How can we help others when we are not being survive oneself ? “
   In India When the children got admission, many children’s parents go to leave them there. They buy the necessary goods. But whether one gets a job abroad or has to go for education, one is completely alone there. You have to find solutions to your problems.
    The girl mentioned in this example was not getting a house. Then she used to provide something temporarily, but after 10-15 days, she would move 55 to 60 kg of goods to another place. She was doing this for two-three months. There was no one to help her in moving the goods.
  She came for Homoeopathic  Treatment for the loneliness she felt in all these experiences.
    Our neighbor’s grandmother spent her entire life in a palace. If anyone told her about some of the problems in the world, she would say, “Someone will come to help ! There will be some solution.” Where did this belief come from? This thought always crossed my mind, but she always told the rightful people, “Mai hu na !” Had seen coming forward saying. All three had done it for him all his life.
  But in modern times the boundaries of the regions have become gray. The rate of migration has increased. At the same time, loneliness within man has increased.
    ‘Privacy’ may not be available in chala(चाळ) and vada(वाडा) culture, but if there is danger in the house next door, the door and windows do not want to be closed !
    Now, in the flat, Bangla culture, when we say ‘Aapan Bhala Apala Kutumb  Bhala’, (आपण भलं आपलं कुटुंब भलं ) we are not only leaving our neighbor alone in his plight, but we are climbing one step higher in our own loneliness.
   Such loners are not sure that “someone will listen to me,” and thus their self-confidence is completely undermined.
  Homoeopathic medicines can definitely help such persons to overcome loneliness.
  Homeopathic treatment is definitely helpful to fill the void of Loneliness in their Mind and the confidence that this “Universe is my Home” (“विश्वचि माझे घर “) can surely come.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123 /9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-