भान हरवलेल्यांच्या भानावर होमिओपॅथी !! / Homeopathy on Consciousness of the Unconscious !!

By Dr. Ajay Hanmane
September 8, 2025 Anxiety Bone Diseases Ear Problems Female Problems General Information Geriatric Problems Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry Sleep Disorders
भान हरवलेल्यांच्या भानावर होमिओपॅथी !!
हिरवं पान पिकत विकत जाणं हा सृष्टीचा नियम. वृद्धत्व हा काय आजार नव्हे, ती शरीराच्या पेशी पिकत जाण्याची प्रक्रिया. मात्र बुद्धीशी संबंधित मेंदूच्या चेतापेशींचा तुलनेने कमी वयात आणि वेगाने ऱ्हास होत जाणं हा विकार. कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये वादळे घेऊन येणारं एक स्थित्यंतर.
ते झेलता येणे हे सगळ्यांना जमणं कठीण, कारण वागणूक कोठे संपते आणि विकार कुठे सुरू होतो याची सीमारेषा अगदी पुसट असते.
सरिताताई मेंदू तज्ञ, मानसोपचार तज्ञ यांच्याकडून उपचार घेऊन होमिओपॅथिक उपचार घेण्यासाठी ‘चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक ‘मध्ये आल्या होत्या.
जेव्हा त्या क्लिनिकमध्ये आल्या तशा त्या वृद्ध दिसत नव्हत्या. सोबत त्यांचे पती, मुलगा, सून देखील आले होते. आल्या आल्या त्यांच्या पतीने सांगितले की, ‘हिच्या लक्षात आजकाल राहत नाही आणि होमिओपॅथीमध्ये याच्यावर चांगल्या प्रकारे उपचार होतात असे वाचण्यात आले आहे आणि आमचे शेजारी जे तुमचे बरेच वर्षापासूनची पेशंट आहेत, त्यांच्या आग्रहावरून आम्ही आलो आहोत.
मध्यम बांधा, व्यवस्थित नेसलेली बारीक लाल काठाची, पांढरी सुती साडी, नुकतेच डाय करणं सोडून दिलेले, चापून बांधलेले काळे-पांढरे-करडे केस, सुरकुतल्या उजळ चेहऱ्यावर मात्र ठाम भाव. उपप्राचार्य पदावरून निवृत्त झालेल्या आहेत, हे केस घेताना लक्षात आलं.
त्यांच्या तक्रारीबद्दल विचारलं, तेव्हा ” त्यांनी त्यांच्या विस्मरणाबद्दल खुलासा केला. हल्ली जरा विसरायला होतं खरं. म्हणजे रस्त्यात कोणी माणूस भेटला तर लगेच आठवत नाही त्याचं नाव. अडखळायला होतं. मग चांगलं नाही वाटत, मला आणि समोरच्यालाही !परवा माझ्या आतेबहिणीचे नावही विसरले. तिच्या हातच्या सांबारवड्या इतक्या खाल्ल्या असतील जेव्हा मी नागपूरला गेले होते तेव्हा, तरी तिचं मी नाव विसरले. मी माणसांची, वस्तूंची, ठिकाणांची नावं विसरायला लागली आहे.” अशा नरमाईच्या सुरात त्या बोलत होत्या.
त्यांनी मला विचारलं, “डॉक्टर, स्मरण-विस्मरणाचा कसला खेळ आहे हा ?”
वृद्धावस्थेत नव्या गोष्टींची नोंद होणं कमी होत जातं. त्याचं एक कारण म्हणजे आपली आठवणींची डिस्क पूर्ण भरलेली असते. आयुष्यात घडलेल्या असंख्य घटनांच्या जंत्रीनं मेंदूचं कपाट पूर्ण भरून जातं. आपल्या आठवणींची लक्षात राहण्याची राहण्यासाठी, मेंदूत जागा मिळविण्यासाठी एकमेकात स्पर्धा असते ! या स्पर्धेत तीव्र भावनिक आठवणी अधिक जागा मिळवतात.
” मला स्मरणशक्ती अचानक दगा द्यायला लागली आहे. हा वयाचा भाग आहे, की अजून काही ? “असं सरिताताईंनी विचारलं.
एम.सी.आय.- माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे मेंदूचा सौम्य ऱ्हास. साठी पार केलेल्या अनेक जणांना याचा असा अनुभव येतो, म्हणजे ही “डिमेन्शियाची ” सुरुवात असू शकते.
त्यांना मी सकाळची चालायला जाण्याची फेरी चुकवायची नाही, आवडत असल्यास योगासन करत राहणे, फळ, पालेभाज्या, दही खाणं, आहारात घेणे. पण आहार मोजका असू द्या. जितकं कमी जेवण तितकं अधिक जगाल. शब्दकोडे सोडवत जा. नवनवीन विषयांची पुस्तक आवर्जून वाचत जा. फिरायला जाताना रोज वेगवेगळ्या रस्त्यांना जावा. गाण्याच्या भेंड्या लावा, आप्त मित्रांना भेटत राहा. अशा महत्त्वाच्या टिप्स देऊन त्यांच्या पर्सनॅलिटी आणि स्वभाव गुणधर्मानुसार होमिओपॅथिक औषध उपचार सुरू केले.
बरेच महिने ट्रीटमेंट सुरू ठेवल्यानंतर त्यांच्यात बराच फरक पडला होता. पण पुन्हा दोन वर्ष होमिओपॅथिक उपचार घेणे त्यांनी थांबवलं, कारण होमिओपॅथिक उपचाराने चांगली प्रगती झाली होती.
एके दिवशी पुन्हा त्यांची सून त्यांना घेऊन होमिओपॅथिक औषधोपचार सुरू करण्यासाठी ‘चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक ‘ मध्ये आल्या.
सरिताताईंचा चेहरा विस्कटल्यासारखा आणि डोळ्यात दुखरा भाव स्पष्टपणे दिसत होता. डॉक्टर तुमच्या सल्ल्याने बरेच दिवस आईंच्या तब्येतीमध्ये फरक पडला होता. मात्र अलीकडेच पाय घसरल्यामुळे हेअर लाईन फ्रॅक्चर झालं. चालणं-फिरणं बंद झालं. चिंता करायला लागल्या. तशात पुन्हा विस्मरण वाढलं आहे. हल्ली तर त्या आपण चहा घेतलाय, जेवलोय, हेही विसरतात. पुन्हा पुन्हा मागतात. इतकं कानकोंड्यासारखं होतं.
परवा तर माझी नणंद अमेरिकेहून आली होती. दुपारचे दोन वाजले होते. मी सासूबाईंना बाराच्या सुमारास जेवण दिल, पण जेवलेलं त्या विसरल्या आणि थोड्यावेळाने मुलीला (नणंद) पाहून म्हणाल्या, “बघ,मला अजून कोणी जेवणच दिलं नाही.” नणंद माझ्याकडे पाहायला लागल्या आणि मी सासूबाईंकडे पाहायला लागले. त्यांचा मोठा गैरसमज झाला.
पण तिने पुढच्या काही दिवसात स्वतः सगळं पाहिलं. काय करणार ! गैरसमज होतात अशा आजारामुळे आणि कुटुंबात-नात्यांमध्ये ताण निर्माण होतो. जेव्हा हे सांगत असताना सरिताताईंचं लक्ष नव्हतं. त्या आपल्याच विश्वात होत्या.
सरिताताईंना, “अल्झायमर्स डिमेन्शिया “ झाला होता.
स्मृतिभ्रंश हा आजाराच असा आहे, ज्यात सुरुवातीला बुद्धीचा, मग स्मरणशक्तीचा ऱ्हास व्हायला लागतो. जेवलेला जेवल्याचं विसरतो. त्यात रुग्णाचा दोष नसतो. मागच्या वेळेस ते लवकर आल्यामुळे त्या आजाराची गती होमिओपॅथिक औषधाने काही वर्ष रोखून धरता येणे शक्य झालं, पण आता मात्र सरिताताईंना आजाराने गाठलं होतं.
त्यांची परत एकदा संपूर्ण माहिती घेऊन पुन्हा एकदा उपचार सुरू केले. त्यांच्या पतीने विचारले की, माझी मुलगी त्यांना अमेरिकेला घेऊन जायचं म्हणते. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे नको म्हणून सांगितले, कारण अशा रुग्णांचे सभोवताल अचानक बदलू नये. त्यांचा आपल्या परिसराशी एक अनुबंध असतो. त्याच्या आधारे शक्ती क्षीण झालेला मेंदू आपल्या परिसरसापेक्ष अस्तित्वाचं भान टिकवून असतो. तो आधार काढून घेऊ नका. म्हणून त्यांना मुलीकडे पाठवू नका असा सल्ला दिला.
सरिताताईंना होमिओपॅथिक उपचाराने हळूहळू बराच फरक पडला. दरम्यान काही महिन्यानंतर एका होम व्हिजिटवरून येताना त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. त्यांच्या आग्रहाखातर सरिताताईंची तब्येत आणि सुनेन त्यांची घेतलेली काळजी पाहण्याचा योग आला.
सुबक नेटकी खोली, बसक्या दिवाणावर एक स्वच्छ फुलाफुलांची बेडशीट टाकलेली, सरिताताई त्यावर एक तलम चादर पांघरूण शांत पहुडलेल्या. बाजूच्या स्टुलावर फक्त एका ताज्या निशिगंधाची दांडी असलेली नाजूक फुलदाणी. उदबत्तीचा दरवळ. खिडकीला तलम पडदे तरी भरपूर प्रकाश. समोर भिंतीवर ठळक तारखांचं कालनिर्णय, वर एक स्पष्ट तास-मिनिटं वेळ दाखवणारं घड्याळ. कोपऱ्यातल्या मुठी एवढ्या ध्वनीवर्धकातून संतूरचं मंद संगीत, आसंमतात विरघळत होतं.
त्यांची नीट घेतलेली काळजी आणि स्वच्छ खोली पाहून आपसूकच माझ्या तोंडातून उत्स्फूर्तपणे, “वाह वा ! असे शब्द बाहेर पडले.
डिमेन्शिया रुग्णाची इतकी चांगली बडदास्त ठेवलेली मी कधीच पाहिले नव्हते. त्यांच्या सूनबाई रोज त्यांना नवा स्वच्छ गाऊन घालणे, चादर बदलणे, स्वतः तिला खाऊ घालणे, वर्तमानपत्रातल्या ठळक बातम्या वाचून दाखवणे (त्यांना कितपत कळत होतं माहित नाही) पण रुग्णाची एवढी “परफेक्ट “ काळजी घेतल्यावर रुग्णामध्ये निश्चितच फरक पडणार !
स्मृतिभ्रंश- स्मरणशक्तीचा हळूहळू ऱ्हास करणारा आणि एका वळणावर रुग्णाला स्वतःच्या अस्तित्वाचे भान ही विसरायला लावणारा आजार.
मात्र घरातील नाती जितकी मजबूत विणलेली, तितका अशा आजारात रुग्णाची काळजी घेण्याचा भाग कमी कटकटीचा.
नात्यातल्या ओलाव्याचं भान लहानांना असेल, तर भान हरवलेल्या ज्येष्ठांची वाटचाल होमिओपॅथिक औषधाबरोबर नक्कीच सोपी होऊ शकते.
सरिताताईंच्या कुटुंबाचा होमिओपॅथिक औषधोपचाराचा अनुभव हा असाच होता. आत्तापर्यंत निर्विकार वाटणाऱ्या सरिताताईंच्या चेहऱ्यावरही गप्पा मारतामारता हलकंच स्मित तरळलं. त्यांनी आपला कृश हात उचलून माझ्या हातात हात दिला. संतूरमधून गारवा बरसावा त्याप्रमाणे ही पेशंटच्या समाधानाची पोच पावती ……आयुष्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरला अजून काय हवं ?…..
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —–
———————————————————–
Homeopathy on Consciousness of the Unconscious !!
It is the law of creation that green leaves are ripe and sold. Aging is not a disease, it is a process of aging of body cells. However, this disorder is characterized by rapid degeneration of brain neurons related to intelligence at a relatively young age. A transition that brings storms in family relationships.
It’s hard for everyone to come to grips with, because the line between where the behavior ends and the disorder begins is very blurred.
Sarita came to ‘Chaitanya Homoeopathic Clinic’ for Homoeopathic Treatment after being treated by neurologists and psychiatrists.
She did not look as old as when she came to the clinic. Her husband, son, daughter-in-law also came with her. On arrival her husband said, ‘It is not noticed these days and it has been read that it is well treated in Homoeopathy and we have come at the insistence of our neighbors who have been your patients for many years.”
Medium build, well-worn fine red border, white cotton saree, recently given up dyeing, black-white-grey hair tied back, wrinkled bright face but firm expression. It was noticed while taking the case that he has retired from the post of Vice Principal.
When asked about his complaint, “he disclosed about his forgetfulness. It was true that he was a bit forgetful. That is, if he met a person on the road, he would not immediately remember his name. He would stumble. Then it did not feel good, me and the other person too ! The other day, I also forgot the name of my step-sister.
I must have eaten so much Sambarwadya when I went to Nagpur, but I forgot her name. I am starting to forget the names of people, things, places.”
She was speaking in such gentle tone. He asked me, “Doctor, what kind of memory-forgetting game is this?”
In old age, the recording of new things becomes less. One reason is that our memory disk is full. The closet of the brain is completely filled with the mechanism of numerous events that happened in life. In order to remember our memories, there is a competition with each other to get space in the brain ! Strong emotional memories gain more space in this competition.
“My memory has suddenly begun to betray me. Is it part of age or something else?” Saritatai asked.
MCI – Mild Cognitive Impairment means mild deterioration of the Brain. Many people who have passed on experience this, meaning it can be the beginning of “Dementia”.
She should not miss her morning walk, do yoga if I like, eat fruits, green vegetables, curd in her diet. But let the diet be small. The less you eat, the more you live. Solve the crossword puzzle. Keep reading books on new topics. Take different roads every day while going for a walk. Keep singing songs, keep meeting friends. By giving such important tips Homoeopathic Medicines was started according to their Personality and Temperament traits.
After several months of continued Homoeopathic treatment, there was a significant difference in them. But again he stopped taking Homoeopathic Treatment for two years, because Homoeopathic treatment had made good progress.
One day again his daughter-in-law took him to ‘Chaitanya Homoeopathic Clinic’ to start Homoeopathic Medicine.
Saritatai’s face was broken and pain was clearly visible in her eyes. Doctor your advice made a difference in mothers health for many days. But recently a hairline fracture occurred due to a fall. Walking stopped. Started to worry. Thus the forgetfulness has increased again. Nowadays they even forget that they have taken tea and eaten. They ask again and again. It was like so much.
The other day, my SIL came from America. It was two o’clock in the afternoon. I gave my mother-in-law food around twelve o’clock, but she forgot what she had eaten and after a while saw the girl (Nanand-SIL) and said, “Look, no one has given me food yet.” Nananda-SIL started looking at me and I started looking at my mother-in-law. They had a big misunderstanding. But she saw everything for herself in the next few days. What will you do ! Diseases that lead to misunderstandings and stress in families and relationships. Sarita was not paying attention while saying this. They were in their own world.
Saritatai had “Alzheimer’s Dementia”.
Dementia is a disease that starts with the loss of intelligence and then memory. He who eats forgets to eat. It is not the patient’s fault. In the past, because it came early, it was possible to arrest the progress of the disease with Homoeopathic medicine for a few years, but now Saritatai was overtaken by the disease.
He once again started the Homoeopathic Treatment after taking complete information about them. Her husband asked that my daughter wants to take them to America.
Then I clearly told them NO, because such patients should not change their environment suddenly. They have a bond with their environment. Based on this, the brain, which has lost its power, maintains its sense of existence relative to its surroundings. Don’t take away that support. So advised not to send them to the girl.
Homoeopathic treatment gradually made a lot of difference to Saritatai.
Meanwhile, after a few months, while coming from a home visit, there was an opportunity to go to his home. Due to his insistence, Saritatai’s health and care taken by Sunen came to be seen.
A neat and tidy room, a clean floral bed sheet was placed on the divan, and Sarita lay quietly on it covered with a talam chadar. A delicate vase with only a fresh Nisigandha stalk on the side stool. incense sticks. A lot of light even though the window has low curtains. Bold date chronograph on front wall, above a clear hour-minute clock. The soft music of the santoor was pouring out of the loudspeakers in the corner.
Seeing their well taken care of and clean room, the words spontaneously came out of my mouth, “Wow!
I have never seen a dementia patient so well cared for. Her daughter-in-law would dress her in a new clean gown everyday, change the sheets, feed her herself, read out the headlines in the newspaper (how much she knew) but taking such “perfect” care of the patient would definitely make a difference in the patient !
Dementia- A disease that causes gradual loss of memory and at one point makes the patient forget about his own existence.
However, the stronger the relationship in the family, the less rigorous is the part of caring for the patient in such an illness.
If the children are aware of the dampness in the relationship, then the elderly who have lost consciousness can certainly be eased with Homoeopathic Medicine.
Such was Saritatai’s family’s experience with Homoeopathic Medicine. Even Saritatai’s face, who seemed to be calm till now, got a slight smile while chatting. She raised her thin hand and shook my hand. This acknowledgment of the patient’s satisfaction is like raining dew from a santoor……what more does a Homoeopathic Doctor want in life?…..
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.
Please Read Next Article-