मध्यंतरी “फेक “ पनीरचे प्रकरण गाजलं आणि उपाहारगृहात तसेच रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. अन्नपदार्थातील भेसळ व फसवणूक हा एक अक्षम्य गुन्हा आहे आणि त्यासाठी आपल्या कायद्यामध्ये शिक्षाही आहे. तरीही फसवणूक होतच असते आणि ती सध्या इतकी वाढली आहे की दूध, भाज्या, फळं, कोणतेही तयार खाद्यपदार्थ विकत घेताना मन साशंक होतं. एका अहवालानुसार भारतातील 25% अन्नपदार्थ बनावटी आहेत.
वर्ष 2008, चीनमधील एका घटनेने जगात खळबळ उडवली होती. तब्बल तीन लाख लहान मुलांमध्ये मूत्रपिंडाचे आजार दिसत होते. त्यांच्या मूत्रपिंडात खडे होत होते. 54,000 मुले इस्पितळात उपचार घेत होते आणि त्यात सहा बाळांचा मृत्यू झाला होता, कारण होते त्यांची दूध- पावडर. या दूध पावडर मध्ये ‘ मेलामाईन ‘ नावाचा रासायनिक पदार्थ मिसळला होता. कशासाठी? तर पूर्वी दुधातील (प्रोटीनचे) प्रथिनाचे प्रमाण नायट्रोजन किती आहे यावरून ठरत असे. ‘मेलामाईन ‘ नायट्रोजन वाढवतो, म्हणजे चाचणीमध्ये ही दूध पावडर प्रोटीनयुक्त आहे हे दाखवता येईल, असे हे गणित होतं. पण त्याचा गंभीर परिणाम या तीन लाख बालकांना भोगावे लागला.
वर्ष 2013 ‘हॉर्स मिट स्कॅन्डल ‘ हे जगातील सर्वात मोठे प्रकरण. बीफ पॅटीस मध्ये घोडे, डुक्कर, कांगारू आदी प्राण्यांचे मांस मिसळून एका ऑस्ट्रेलियाच्या कंपनीने ते युरोप, अमेरिका येथे विकले. तिथल्या प्रशासनाने डीएनए चाचणी केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. बारा देशातून हा अब्जावधी रुपयांचा माल परत मागून घेतला गेला आणि नष्ट केला गेला.
वर्ष 2025. कल्पनाही न करता येणारी अन्न भेसळ सिंगापूर प्रशासनाने उघडकीस आणली. चॉकलेट, फळांचे रस, न्यूट्रास्युटिकल्समध्ये प्रतिबंधित औषधी घटक आढळले. हे घटक लैंगिक क्षमता वाढवणारे, वेदनानाशिक अथवा पित्तरोधक होते. कल्पना करा,एका दहा वर्षाच्या बालकांनी हे चॉकलेट खाल्ले तर? …..
अन्नभेसळ ही जणू काही पूर्वापार चालत आलेली प्रथा झाली आहे. याची जागतिक वार्षिक उलाढाल अंदाजे 40 बिलियन डॉलरची आहे. अन्नभेसळ माहितीनुसार भेसळ आणि फसवणुकीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. यात दुग्धजन्य पदार्थ (जसे तूप, पनीर, चीज मावा), सागरी अन्न वा सी फुडआणि मसाले, तेल, चॉकलेट यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
पूर्वी भेसळीचे प्रकार म्हणजे दुधात पाणी टाकणे, केसर मध्ये झेंडूचे परागकण टाकणे, हापूस आंब्याच्या रसात केसर, पायरी आंबा मिसळणे. ‘ प्रीमियम ग्रेड’ असूनही त्यात त्याच पदार्थांमध्ये तुकडे टाकणे, ज्यामुळे त्यांचे वजन वाढेल अशी भेसळ असायची. हे चूक आहे यात शंकाच नाही पण याचा फक्त आपल्या खिशावर ताण पडत होता आरोग्यावर नाही. आता त्यात बदल झाला आहे भेसळीची व्याख्याच बदलली आहे.
भेसळ आणि फसवणुकीचे स्वरूप म्हणजे अन्नातून त्याचे सत्व काढणे, कमी करणे अथवा कमी दर्जाचे पदार्थ त्यात टाकणे. उदाहरणार्थ हळदीतून कर्क्युमिन (हळदीतील सत्व) काढणे, वापरलेल्या चहाची पूड विकणे, खाद्यतेलात कमी दर्जाचे तेल मिसळणे, रस्त्यावर मसाले विकणारे स्वस्त मसाले कसे काय देतात? याचा आपण कधी विचार करत नाही. त्या मसाल्यात ‘सत्व’च नसते, कृत्रिमरित्या अन्नपदार्थ आकर्षक बनवणे, लाल तिखटात ‘सुदान डाय’ (आरोग्याला धोकादायक रसायन), तांदळाला सुगंधित करणे, डाळींना चमक येण्यासाठी टालकम पावडर टाकणे, भाज्या हिरव्यागार टवटवीत, दिसण्यासाठी त्या कॉपर सल्फेट मध्ये बूचकळणे, साबुदाणा ब्लीच करणे, शिशे असलेले रंग पेस्ट्री केक या बेकरी पदार्थात टाकणे, कॉफी चिकटू नये म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईड टाकणे अशी अनेक उदाहरणे देता येतील.
पदार्थांच्या लेबलवर चुकीची माहिती देणे, आयातीच्या पदार्थांवर त्या देशाचे नाव नसणे, संपूर्ण घटक पदार्थांची यादी न देणे,हाय प्रोटीन, नो शुगर, ऑरगॅनिक असल्याचे दावे, ते पदार्थ तसे नसताना करणे. म्हणजे फ्रुट ज्यूसच्या लेबलवर आंब्याचा ज्यूस असे म्हटलेले असते, पण विचार करा खरंच दहा रुपयाला आंब्याचा रस असलेले पेय मिळेल का?
बनावटी पदार्थ अनेकदा आपण एकसारखी दिसणारी नावे, नीट न वाचल्यामुळे फसतो जसे की, BISLERI, AMUL या मूळ कंपनीच्या नावात फक्त एखाद्या अक्षराचा फरक केलेला असतो. त्यांच्यावरच्या समान डिझाईनमुळे आपला गोंधळ होतो आणि आपण बनावट वस्तू विकत घेतो. बनावटी पदार्थांचा बाजार भस्मासुरप्रमाणे फोफावत चालला आहे. याची यादी न संपणारी आहे.
भेसळ करणारे रोज नवीन क्लुप्त्या शोधून काढतात. माझ्याकडे एक जण तुपाच्या दोन बाटल्या घेऊन आला होता. एक तूप खरे आणि दुसरे खोटे होते. दाणेदार तुपाचा हलका सुगंध, लॅबोरेटरी मध्ये पाठविल्याशिवाय दोघांचा फरक समजणारच नव्हता, इतकी बेमालूम बनावट होती.
सध्या बाजारात पनीर, चीज आणि त्यांचे ANALOUGUE मिळतात. दोघांनाही कायद्यात मान्यता आहे पण अनालॉग हे दुग्धजन्य पदार्थ नाहीत. ग्राहकांना यातील फरक स्पष्ट समजावा म्हणून काढला FSSAI ॲनालॉग असलेल्या पदार्थांच्या लेबलवर लावायचे नियम तयार करते आहे.
आपण ग्राहक म्हणून कशाप्रकारे जागृत राहायला पाहिजे? –
* चटकदार रंगीबेरंगी गोष्टी पडताळून पहा.
* एखाद्या पदार्थाची किंमत वाजवीपेक्षा कमी जास्त झाल्यास वाटल्यास सतर्क होणे.
* पदार्थ वरील लेबल नीट वाचणे.
* केलेल्या दाव्यांना बळी पडू नका.
* तारीख, घटक, पोषक घटकांचा तक्ता नीट बघा.
* समाज माध्यमावरील सगळ्याच बातम्यांवर विश्वास ठेवू नका.
ही भेसळ फसवणूक थांबवायची असेल तर आपली नजर बहिरी ससाण्यासारखी नजर हवी आणि जर तुम्हाला फसवणूक होताना दिसली आणि ती फसवणूक तुम्ही निदर्शनास आणली नाही तर तुम्ही सुद्धा फसवणूक करणारे ठरता.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
—————————————————————————————-
Recently, the “Fake Paneer” controversy made headlines, once again raising questions about the quality of food served in restaurants and sold on the streets. Adulteration and fraud in food products is an inexcusable crime, and there are strict laws in place to punish it. Yet, adulteration continues—and today, it has become so rampant that we feel suspicious every time we buy milk, vegetables, fruits, or ready-to-eat foods. According to one report, 25% of food products in India are counterfeit.
In 2008, an incident in China shook the world. Around 300,000 children developed kidney disorders, with stones forming in their kidneys. Over 54,000 children were hospitalized, and six infants died. The cause? Their milk powder. It was found to be laced with a chemical called melamine. Why? In the past, the protein content in milk was measured based on nitrogen levels. Melamine artificially increases nitrogen, so the test would falsely indicate that the milk powder was rich in protein. But this “clever trick” caused a severe health crisis for those hundreds of thousands of children.
In 2013, the “Horse Meat Scandal” became one of the biggest global food fraud cases. Beef patties were found to be mixed with meat from horses, pigs, kangaroos, and other animals. An Australian company had sold these products to Europe and the USA. DNA testing by authorities revealed the fraud. Goods worth billions were recalled from 12 countries and destroyed.
Fast forward to 2025—Singaporean authorities uncovered an unimaginable type of food adulteration. Chocolates, fruit juices, and nutraceuticals were found to contain prohibited medicinal ingredients—substances with sexual performance-enhancing, painkiller, or anti-inflammatory effects. Imagine what could happen if a ten-year-old child consumed such chocolates!
Food adulteration seems almost like an ancient tradition now, with a global annual turnover of about 40 billion dollars. India ranks second in the world for adulteration and food fraud. Dairy products (such as ghee, paneer, cheese, and mawa), seafood, spices, oils, and chocolates are the most commonly affected items.
Earlier, adulteration meant simple acts like adding water to milk, mixing marigold pollen with saffron, or blending lower-grade mango pulp into premium varieties. While wrong, such practices usually only hurt our wallets, not our health. But things have changed—the very definition of adulteration has changed.
Food adulteration means deliberately adding inferior, cheap, or uncertified substances to food products, or altering them in some way. Food fraud means misleading customers by providing false information. The goal of both is the same—making money, regardless of the harm to public health.
Forms of adulteration and fraud include: removing the active components from food, diluting it, or replacing it with low-quality ingredients. For example, extracting curcumin (the active compound in turmeric), selling used tea powder, mixing inferior oils into edible oils, or selling spices with no real essence in them. To make foods look attractive, dangerous chemicals are used—Sudan dye in chili powder, copper sulfate to make vegetables appear fresh and green, talcum powder to give shine to pulses, bleaching sabudana, adding lead-based colors to pastries and cakes, or magnesium oxide in coffee to prevent clumping.
Fraud also happens through incorrect labeling—omitting the country of origin on imported products, hiding full ingredient lists, or falsely claiming “high protein,” “no sugar,” or “organic” when the product is not. For example, a fruit juice might claim to be mango juice—can you really get genuine mango juice for just ten rupees?
Counterfeit products often use names and packaging almost identical to popular brands, changing only one letter—like BISLERI or AMUL. Because of the similar design, customers get confused and unknowingly buy fakes. This market for counterfeit goods is growing rapidly, like a mythical demon (Bhasmasur), and the list of such products is endless.
Adulterators are constantly inventing new tricks. Once, a man brought me two bottles of ghee—one genuine and one fake. The grainy texture and mild aroma were identical. Without sending them to a laboratory, no one could tell the difference—the imitation was that perfect.
Currently, the market sells both paneer, cheese, and their “analogues.” The law recognizes both, but analogues are not dairy products. To help consumers understand the difference, the FSSAI is drafting rules requiring labels on products containing analogues.
As consumers, how can we stay alert?
If we want to stop adulteration and fraud, we must keep our eyes as sharp as a hawk’s. And if you witness such fraud but fail to report it, you too become complicit.
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.
Please Read Next Article —