कॅन्सर — कर्करोग आणि होमिओपॅथी / Cancer & Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneNovember 28, 2023 General Information Homeopathic and Cure

कॅन्सर —  कर्करोग आणि होमिओपॅथी

 

कॅन्सर अर्थात कर्करोग हा असाध्य रोग मानला जातो. त्यामुळे कॅन्सरचे निदान झालं की रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांनाही धडकीच भरते.
आता “घटिका भरली”, “आता संपलं सारं” अशीच धारणा होते.
कॅन्सर नेमका कसा होतो?
आपलं शरीर हे अब्जावधी पेशींच्या समुदायांनी बनलेलं आहे. पेशी आपापली कामे चोखपणे बजावत असतात. निसर्ग नियमानुसार या पेशींचा आपल्या शरीरात उत्पादन, कार्य, वाढ व नाश होत असतो. निर्माण झालेली प्रत्येक पेशी काम पूर्ण झाल्यावर नष्ट करून शरीरा बाहेर फेकली जाते.
काही कारणामुळे यात बिघाड झाला तर मात्र या पेशी शरीरातच राहतात आणि संख्येनेही वाढू लागतात. मग त्या पेशींना रक्त पुरवणाऱ्या वाहिन्याही निर्माण होतात. यातूनच गाठ निर्माण होते व त्या विशिष्ट शरीर संस्थेच्या कार्यात अडथळे येऊ लागतात.
इतर आजार आणि कर्करोग यात सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे, या पेशी रक्तवाहिन्या व इतर मार्गाद्वारे शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवात पसरू लागतात. यालाच “कॅन्सर पसरणं ”  म्हणतात (Cancer Metastasis –  कॅन्सर  मेटास्टीसिस ).
कॅन्सर पसरण्याच्या वेगावर प्रमाणावर तो कॅन्सर कुठल्या अवस्थेत आहे (स्टेजला आहे) याचे निदान केलं जातं.
कर्करोगाचे विविध प्रकार असतात. विविध प्रकारच्या कर्करोगांची संख्या भारतात  सतत वाढत आहे.
  • तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कर्करोग म्हणजेच अस्वच्छता, वारंवार प्रसूती,
  • ह्यूमन पॅपिलोमा( Human Papilloma) व्हायरस यामुळे  गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे.
  • मूत्राशयाचा कर्करोग,
  • चामडीचा कर्करोग,
  • पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग,
  • घशाचा कर्करोग,
  • अंडाशयाचा कर्करोग तर
  • स्त्रियांमध्ये स्तन कर्करोग
कर्करोग होण्यामध्ये विविध रासायनिक / भौतिक द्रव्य व गुणसूत्रे यांचा मोठा हात असतो.
   कर्करोगाची लक्षणे ही मुख्यतः तो शरीराच्या ज्या अवयवात किंवा संस्थेमध्ये उद्भवतो त्याच्याशी संबंधित असतात.तरीही काही लक्षणे सर्वसाधारणपणे आढळतात, ती अशी —

* (मार किंवा अपघाताशिवाय) गाठ किंवा सूज

*आवाज घोगरा होणे

* तोंड उघडताना किंवा गिळताना त्रास होणे

* खोकल्यातून, लघवीतून अथवा शौचातून रक्त पडणे, धाप लागणे.

*तोंडाला व त्वचेवरील जखम भरून न येणे.

*भूक मंदावणे, जेवल्यावर उलटी होणे.

*कावीळ पोट सुजणे.

* आलटुन पालटून बद्धकोष्ठ, अतिसार.

* वजन कमी होणे, थकवा /  कामानंतर शक्तिपात वाटणे  इ.

 

त्यात कर्करोगाचे लवकरात लवकर निदान होणे अतिशय आवश्यक असते.

कर्करोगाची   सर्वात महत्त्वाची चाचणी म्हणजे बायोप्सी (Biopsy). त्यासाठी एंडोस्कोपी, सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी याप्रमाणेच स्त्रियांच्या स्तनातील कॅन्सर साठी मेमोग्राफी ही तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

कॅन्सरवर मुख्यत्वे शस्त्रक्रिया, केमोथेरपी,रेडिओथेरपी द्वारे उपचार केले जातात.

केमोथेरेपीचे —

  1. केस गळणे,
  2. पूरळ / फोड येणे,
  3. पित्त होणे, थकवा येणे,
  4. रक्त कमी होणे,
  5. वेदना होणे

इत्यादी दुष्परिणाम संभवतात.

 

कर्करोगाबद्दल होमिओपॅथीचा   दृष्टिकोन असा आहे

 

सर्व अवयवांच्या कार्याचं संतुलन म्हणजे आरोग्य.

कर्करोग असो व अन्य कोणताही आजार असो, तो काही एका रात्रीत उद्भवत नसतो.

तो विविध टप्प्यातून हळूहळू  वाढत असतो. प्रत्येक टप्प्याला लक्षणे वेगवेगळी असतात.

एखाद्या अवयवात आजार असला तरी तो एकूण अस्वस्थ्याचा भाग असतो.

त्याचे मूळ कारण हे त्या अवयवात नसतं – प्रकृतीत असतं.

 

पूर्ण आरोग्य प्रदान करण्याच्या दृष्टीने होमिओपॅथी मध्ये लक्षण समूहांचा साकल्ल्याने विचार करून मूळ कारणांवर उपचार केले जातात तेही कुठल्याही  दुष्परिणामशिवाय.

 

होमिओपॅथिक उपचारांमुळे हताश रुग्णांना दिलासा मिळतो.

त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करून ते नॉर्मल, एवढेच नव्हे तर निश्चित,आनंदी आयुष्य जगू शकतील, असा यशस्वी प्रयत्न केला जातो.

ऍलोपॅथी सारख्या अत्यंत प्रगत वैद्यक शाखेला जे शक्य होत नाही ते, होमिओपॅथि  कसं करू शकणार ? अशी शंका बऱ्याच पेशंटच्या मनात येते.

पण होमिओपॅथी देखील तेवढीच प्रगत आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

होमिओपॅथीच्या उपचारांनी किमान 70 -80 टक्के रुग्णांवर समाधानकारक उपचार करता येतात.

 

प्रथम होमिओपॅथिक औषध सुरू केल्यानंतर कॅन्सर पेशंटच्या वेदना थांबवण्याचा प्रयत्न केला जातो.

त्यानंतर रेडिएशनमुळे त्यांच्या शरीराची झीज झालेली आहे, ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जातात– म्हणजे त्यांना व्यवस्थित भूक लागायला लागते, त्यांच्या अंगातील प्रतिकारशक्ती वाढत जाते,

त्यांच्या गाठी किंवा जखम असेल तर ती भरून यायला सुरू होते, हळूहळू, स्टेप बाय स्टेप त्यांच्या शरीराचे स्वास्थ्य सुधारत जातं.

 

पूर्ण विश्वासाने आणि नियमितपणे औषध सुरू ठेवली तर पॉझिटिव्ह रिझल्ट नक्कीच मिळतात.

 

होमिओपॅथिक औषधामुळे पेशंट जगणं सुसह्य करता येतं. बऱ्याचदा तपासण्याचे रिपोर्ट्स ठाम निष्कर्ष देणारे नसतात किंवा शंकास्पद असतात.

तेव्हा उपचारांविषयी निर्णय घेण्यासाठी होमिओपॅथीच्या पद्धतीमध्ये प्रत्येक रुग्णाचे जे सखोल विश्लेषण केले जातं, त्याचा फायदा होतो. हे विश्लेषण हाच पाया ठरतो आणि अगदी जीवन-मरण ठरवणारे निर्णयही या आधारे घेता येतात. 

 

डायग्नोसिस किंवा रोग निदान यालाही होमिओपॅथीमध्ये महत्त्व आहेच, पण विश्लेषणापेक्षा जास्त नाही.

 

होमिओपॅथीमध्ये निदान केले जात नाही हे अत्यंत चुकीच्या गैरसमज आहे.

 

नामांकित, स्पेशलिस्ट डॉक्टरांनी टेस्ट करून “आता आयुष्य थोडं शिल्लक राहिल आहे, त्यांना शक्य तितका आनंदात ठेवा” असं सांगणं आणि

होमिओपॅथीच्या वर्षभराच्या उपचारानंतर, कॅन्सरचा पसरणं थांबून तो स्थिर  होणं,  नंतर कमी कमी होत जाणं, साध्या आजारपणाचे सुद्धा कुठलेही लक्षण शिल्लक नसणं आणि पेशंटनं स्वतःच आनंदाने  जगत राहणं — या दोन गोष्टींमध्ये किती विरोधाभास आहे नाही! !

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  
कृपया पुढील लेख वाचा 
———————————————————

 

                Cancer & Homoeopathy
Cancer is considered an incurable disease. Therefore, the diagnosis of cancer is a shock to the patient and his relatives.
Now there was a feeling of “Ghatika Bharli”,”घटिका भरली”, “आता संपलं सारं”  “Now it’s all over”.
How exactly does cancer occur?
Our body is made up of billions of cells. Cells are doing their jobs perfectly.
According to the Law of Nature, these cells are produced, function, grow and destroy in our body. Every cell produced is destroyed and thrown out of the body after its work is done.
If due to some reason it malfunctions, however, these cells remain in the body and start increasing in number. Then the vessels that supply blood to those cells are also formed. This is what creates a Tumor and starts obstructing the functioning of that particular body organ.
The most important difference between other diseases and cancer is that these cells start spreading to other vital organs of the body through blood vessels and other routes. This is called “Cancer Metastasis”.
The stage of the cancer is determined by the rate at which the cancer spreads.
There are different types of cancer. The number of different types of cancer is constantly increasing in India.
  1. Ovarian cancer is significant due to tobacco use,
  2. oral cancer, unsanitary conditions, frequent childbirth, Human Papilloma Virus.
  3.  Bladder cancer,
  4. skin cancer,
  5. Prostate gland cancer in men,
  6. Throat cancer,
  7. Ovarian cancer and
  8. Breast cancer in women have a big hand in various chemical / physical substances and chromosomes.

Symptoms of cancer are mostly related to the organ or organ of the body in which it originates. However, some symptoms are common, such as —

* (without beating or accident) a lump or swelling

* Hoarseness of voice

* Difficulty opening the mouth or swallowing

* Bleeding from cough, urine or defecation, shortness of breath.

* Non-healing of mouth and skin wounds.

* Loss of appetite, vomiting after eating.

*Jaundice abdominal swelling.

* Alternating constipation, diarrhoea.

* Weight loss, tiredness / feeling shaky after work etc.

Early diagnosis of cancer is very important.

Biopsy is the most important test for cancer. For this, Mammography technology is available for breast cancer in women like Endoscopy, Cityscan, MRI, Sonography.

Cancer is mainly treated by Surgery, Chemotherapy, Radiotherapy.

Possible side effects of Chemotherapy include

  1. Hair loss,
  2. Swelling/blisters,
  3. Biliousness,
  4. Fatigue,
  5. Blood loss,
  6. Pain etc.
Homeopathic approach to cancer is—

Health is the balance of the functions of all the organs,

Be it cancer or any other disease, it doesn’t happen overnight.

It grows gradually through various stages.

Each stage has different symptoms. Even if there is a disease in an organ, it is part of the overall malaise.

Its Root Cause is not in that organ – it is in Nature.

In order to provide complete health, Homoeopathy treats the Root Causes by treating symptom clusters without any side effects.

Homoeopathic treatment brings relief to desperate patients.

A successful attempt is made to make their outlook on life positive so that they can live a normal, not just a normal, but a certain, happy life.

How can Homoeopathy do what a highly advanced medical branch like Allopathy cannot do? Such a doubt comes in the Mind of many patients.

But it must be remembered that  Homoeopathy is equally advanced.

At least 70 -80 percent of patients can be treated satisfactorily with Homoeopathic treatment.

First Homoeopathic medicine is tried to stop the pain of cancer patients.

After that, efforts are made to repair the radiation damage to their bodies – i.e. they start to eat properly, their immunity increases, their tumors or wounds, if any, begin to heal, gradually, step by step, their health improves. 

If the medicine is continued with full faith and regularly, positive results are sure to come.

Homeopathic medicine can make a patient’s life tolerable.

Oftentimes, when test reports are inconclusive or questionable, Homoeopathic practice benefits from a thorough analysis of each patient to make treatment decisions. This analysis is the foundation and even life and death decisions can be taken on this basis.

Diagnosis is also important in Homoeopathy, but not more than analysis.

It is a very common misconception that Homoeopathy does not make a diagnosis.

A reputable, specialist doctor tests and says, “There’s a little life left now, keep them as happy as possible,” and

After a year of Homoeopathic treatment, the cancer stops spreading and becomes stable, then shrinks, leaving no symptoms of even a simple disease, and the patient himself. Living happily — what a contrast between these two things !!!

Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed

 

Please Read Next Article–