उदासीनता व होमिओपॅथी / Depression and Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneApril 14, 2025 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry

                उदासीनता व होमिओपॅथी

किशोर एक शासकीय नोकरीत क्लार्क म्हणून कामावर होता. घरची परिस्थिती ठीक होती. परंतु सहा महिन्यांपासून त्याच्यामध्ये थोडासा बदल व्हायला सुरुवात झाली होती. कामात उत्साह कमी होत चालला होता. कोणतीही गोष्ट करायची म्हटले की, कंटाळा याचा, थकल्यासारखे वाटत होते. एकसारखी एक मरगळ जाणवायची. कुठल्याच कामात इंटरेस्ट वाटत नव्हता. आत्मविश्वास कमी झाला होता. ज्या गोष्टीपूर्वी एन्जॉय करत होता त्या कशातही त्याला आनंद वाटत नव्हता.  भविष्याबद्दलची त्याला चिंता वाटायला लागली होती. असेच राहिले तर कुटुंबाचे काय होईल ? किंवा मुलांकडे कोण पाहणार ? असेच विचार सतत त्याच्या मनात येत होते.
स्वतःला धीर देण्याचा कितीही प्रयत्न केला तरी नकारात्मक विचारत मनात घर करून असायचे.त्याची तीव्रता हळूहळू वाढत गेली होती. पत्नी व जवळच्या मित्राने  त्याला समजावून पण पाहिले फायदा झाला नाही.
त्याने 2 महिन्यांची पूर्ण रजा टाकली होती. घरी सतत झोपून असायचा किंवा अस्वस्थपणे फेऱ्या मारायचा. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तो स्वतःला जबाबदार धरायचा. पण निराशा कमी होण्याची जास्तच वाढत चालली होती. आपण यातून  बरे होणार नाही ही भावना त्याच्या मनात सतत घर करून राहिली होती. आता आपण काही करू शकत नाही. आपला  आता कुटुंबाला काही फायदा नाही, त्यापेक्षा मरून गेलेले बरे ! असे विचार  त्याच्या मनात येऊ लागले होते, तसे त्याने एकदा दोनदा बोलून दाखवल. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण पंधरा दिवसापूर्वी त्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पुढील उदाहरणावरून जाणवते की, किशोरला उदासीनतेचा तीव्र आजार झाला होता. वेळीच त्याच्याकडे लक्ष देऊन उपचार न केल्यामुळे ही गोष्ट आत्महत्येच्या प्रयत्नापर्यंत दिली होती.
उदासीनता किंवा डिप्रेशन (Depression)एक महत्त्वाचा पण दुर्लक्षिला जाणारा आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षण अंदाजानुसार  उदासीनता हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचा आजार असणार आहे.
उदासीनता किंवा नैराश्याची भावनाही त्यावेळच्या परिस्थितीनुसार किंवा घटनेला अनुसरून असते नंतर थोड्या वेळाने आपण पूर्ववत,नॉर्मल अवस्थेला येतो जेव्हा मित्रांशी गप्पा मारल्यावर किंवा इतरांशी गप्पा मारल्यावर किंवा एखादा सिनेमा पाहिल्यानंतर…..
परंतु उदासीनतेचा आजार झालेल्यांना नेहमीच काही कारणांशिवाय सतत उदास वाटायला लागतं. ही त्रासदायक  भावनिक स्थिती अनेक दिवस तशीच टिकून राहते. विचार बदलण्याचा प्रयत्न करूनही, वातावरण बदलून कामात मन जमण्याचा प्रयत्न करूनही, उदासीनतेची भावना टिकून राहते.
दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ जर असे उदास निराश वाटत असेल तर ती आजाराची उदासी असे समजायला हरकत नाही.

 

रुग्ण याला “उदास वाटणे, भयान वाटणे भणभण  वाटणे ” अशा शब्दात भावना मांडतात.
उदास वाटण्याबरोबर दोन प्रमुख  लक्षणे म्हणजे –
  • उत्साह कमी होणे अथवा  थकवा जाणवणे व
  •  कुठल्याही गोष्टीत रस, आनंद न जाणवणे,
  • थोडेसे काम केले तरी थकवा जाणवायला लागतो.

 

पूर्वीच्या गोष्टींमधून आपण आनंद घेऊ शकायचो त्या गोष्टी आता आनंद देईनाशा होतात.
एखादी आनंदाची बातमी समजली तरी, आनंद होत नाही. याला ” भावनांची जाणीव कमी झाली ” असे म्हणता येईल.
 या तीन पैकी दोन लक्षणे जर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ जाणवत असतील तर आपणास उदासीनतेचा आजार झालाय व डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे असे समजायला हरकत नाही.
  1. सततच्या उदास मनस्थितीमुळे, निरुत्साहीपणामुळे मनामध्ये नकारात्मक विचार घर करायला सुरुवात करतात.
  2. हा नकारात्मक दृष्टिकोन स्वतःबद्दल, परिस्थितीबद्दल, भविष्याबद्दल असतो. या नकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास ढासळतो व
  3.  मी काही कामाचा नाही,
  4. मी काही करू शकणार नाही,
  5.  मला कोणी समजून घेत नाही,
  6. माझे भविष्य अंध:कारमय आहे,
  7. पण जगायचे कशासाठी ?
  8. हा प्रश्न निर्माण होऊन आत्महत्येचा विचार यायला लागतात.
  9. नकारात्मक दृष्टिकोनाबरोबर सतत विचारात राहिल्यामुळे त्या व्यक्तीचे कामावरचे लक्ष कमी होते.
  10. अनेक गोष्टी विसरायला होतात.
  11. स्वतःबद्दलच्या नकारात्मक भावना निर्माण झाल्यामुळे रुग्ण कुठल्याही समस्येला स्वतःला जबाबदार समजायला लागतो.
  12. काही वेळा त्याच्या हातातून काही चूक झालेली असेल परंतु त्याच्याबद्दल जाणवणारी अपराधीपणाची भावना,  ही केलेल्या चुकीच्या तुलनेत अवास्तव असते.
  13. कधीकधी निराश होण्याच्या मन:स्थितीमुळे रुग्ण चिडचिडा होतो,
  14. छोट्या छोट्या गोष्टींनी त्याची चिडचिड व्हायला लागते,
  15. कुठलाही मोठा आवाज सहन होत नाही.
  16. एकटी राहावेस वाटते पूर्वी आवडणारी चर्चा  ही आता बिनकामाची किटकिट वाटायला लागते,
  17. कधी कधी रुग्णाला  सर्वांपासून तिथून दूर कुठेतरी निघून जावे असे वाटते,
  18. काही रुग्णांमध्ये भूक मंदावते,
  19. झोप कमी लागते,
  20. वजन कमी होते,
  21. डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, चक्कर येते.
अशी अनेक शारीरिक लक्षणे जाणवायला लागतात.
  • कधी कधी लहान लहान गोष्टींचाही पटकन राग येऊ लागतो. आपली काहीतरी चुकले असल्याची अपराधीपणाची भावना घर करून राहते.
  • आपल्या परिस्थितीची जाण अयोग्य होऊ लागते.
  • आपण दरिद्री झालो आहोत, आपल्याला लवकर देवाघरचे बोलावनं येणार आहे,
  • आपल्याला वाईटावर कोणीतरी आहे, लोकांचे आवाज येऊ लागतात,
  • आत्महत्या करण्याकडे प्रवृत्ती बळावते व हा मोठा धोका असतो.
  • नातेवाईक व त्यावर उपचार  करणाऱ्या डॉक्टरांनी याबद्दल दक्षता घेणे आवश्यक असते.

 

काही मनोविकारात खिन्नता कित्येक दिवस, महिने किंवा वर्षे टिकून राहते.
अशा व्यक्तींना दैनंदिन जीवनातील क्षुल्लक समस्या या मोठे संकट वाटतात.

 

एखादा खराब झालेला ग्रामोफोनच्या रेकॉर्ड सारख्या तोच तोच विचार पुन: पुन्हा येतो. ‘ जसा विचार तसा आचार ‘  तीच-तीच क्रिया परत घडली जाते. बुद्धी-परस्पर थांबवणे शक्य असते. परंतु जरा प्रयत्न शीथील झाला की लगेच तोच विचार आणि तोच आजार असे घडू लागते.
किशोरच्या आजारांमध्ये त्याच्या जीवनात काही ताणतणाव नसतानाही उदासिनता  निर्माण झाली होती. याला इंडो-जीनियस डिप्रेशन -(Endogenous Depression.) आतून निर्माण झालेले असे म्हणतात.  मेंदूतील रसायनांच्या प्रमाणात बदल होतो. त्यामुळे विचार व भावनांमध्ये बदल व्हायला लागतो. त्यामुळे सर्व चांगले असताना असे विचार करण्याची गरज काय ? हा प्रश्न फोल ठरतो.
किशोरला स्वतःला कळत होती की, काहीतरी चुकते आहे, परंतु त्याला आपल्या भावना व विचार नियंत्रित करता येत नव्हते.
एकदा नकारात्मक भावना मनात रुजली पण प्रयत्न करूनही व्यक्ती त्यापासून दूर जाऊ शकत नाही.
उदासीनतेच्या आजारात रुग्णाला समजावून सांगण्याचा फारसा फायदा होत नाही. त्यांना औषधोपचार केल्यानेच प्रतिसाद मिळतो.
किशोरने होमिओपॅथीक औषधे योग्य कालावधीत निरंतर घेतल्यामुळे त्याची उदासीनता पूर्णपणे नाहीशी झाली व तो आता  पूर्ववत आपले आयुष्य आनंदाने, समाधानाने जगत आहे. त्याचबरोबर आपली कामे व्यवस्थित सांभाळून करत आहे.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123,9404507723
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —


      Depression and Homoeopathy

Kishore was working as a clerk in a government job. The situation at home was fine. But since six months, a little change had started to happen in him. Enthusiasm at work was waning. When asked to do anything, he felt bored, tired. It felt like a death. He was not interested in any work. Confidence was low. He was not enjoying anything he used to enjoy before. He was worried about the future. What will happen to the family if it continues like this? Or who will look after the children? Such thoughts kept coming to his mind.
No matter how much he tried to calm himself down but kept asking negative thoughts. The intensity was gradually increasing. His wife and close friend tried to explain to him but to no avail. He had taken full leave of 2 months.
Constantly sleeping at home or pacing restlessly. He used to hold himself responsible for small and big things. But the desperation was becoming more and more abating. He had a constant feeling that he would not recover from this. There is nothing we can do now. We are no longer useful to the family, it is better to die.
Once or twice he would show that such thoughts were beginning to enter his mind. His wife tried to explain him then, but fifteen days ago he tried to commit suicide by taking sleeping pills.
The following example shows that the teenager was suffering from severe depression. Due to lack of timely attention and treatment, this matter led to suicide attempt.
Depression is an important but neglected disease. Depression will be the second most common disease  according to a World Health Organization survey.
The feeling of depression also depends on the situation or event at that time and then after a while we come back to the normal state when chatting with friends or chatting with others or watching a movie….
But those suffering from Depression often feel depressed all the time without any reason. This distressing emotional state persists for several days. Despite trying to change the mind, change the environment and concentrate on work, the feeling of depression persists.
If you feel depressed for more than two weeks, it can be considered illness depression.
Patients describe these feelings as “feeling sad, scared, confused”. (“उदास वाटणे, भयान वाटणे भणभण  वाटणे “)
Along with feeling depressed, the two main symptoms are-
  • Loss of enthusiasm or feeling tired
  • Lack of interest, pleasure in anything,
  • Even if you do a little work, you start feeling tired.
  • The things that we used to enjoy in the past are now destroyed.
Even when you hear a happy news, you are not happy. This can be called “diminished awareness of emotions”.
If two of these three symptoms are felt for more than two weeks, it is safe to assume that you have depression and need to consult a doctor.
Due to constant depressed mood, discouragement, negative thoughts start to enter the mind.
It is a negative attitude towards oneself, about the situation, about the future. These negative thoughts lead to low self-confidence and
  • I’m of no use,
  • I can’t do anything
  • nobody understands me
  • My future is dark,
  • But what to live for?
This question arises and thoughts of suicide start.
  • Constant thinking with a negative attitude makes the person lose focus on work.
  • Many things are forgotten.
  • Due to negative feelings about themselves, the patient starts to consider himself responsible for any problem.
  • At times he may have done something wrong but the guilt he feels towards him is inconsequential compared to the wrong done.
Sometimes the depressed mood makes the patient irritable,
  • Small things start to irritate him,
  • No loud noises are tolerated.
  • I want to be alone, the discussion that I used to like, now seems to be idle chatter,
  • Sometimes the patient wants to go somewhere far away from everyone.
  • Decreased appetite in some patients.
  • Sleep less,
  • Lose weight,
  • Headache, body ache, weakness, dizziness.
  • Many such physical symptoms begin to be felt.
  • Sometimes even the smallest things get angry quickly. The feeling of guilt that we have done something wrong remains at home.
  • The perception of our situation starts to become inaccurate.
  • He is poor, His death will come soon (लवकर देवाघरचे बोलावनं)
  • We’ve got somebody on the bad side, people’s voices start coming,
  • The tendency towards suicide increases and this is a great danger.
  • Relatives and treating Doctors need to be careful about this.

 

In some Psychoses, Depression persists for days, months, or years.
Such persons consider the trivial problems of daily life as big problems.
  1. Confidence is low.
  2. Feeling tired, constantly worrying about something.
  3. Some have physical complaints from head to toe.
  4. Headache,
  5. Back pain,
  6. Leg pain,
  7. Weight loss,
  8. Weakness in body relations,
  9. Loss of Appetite,
  10. Feeling tired all the time,
  11. He may have cancer,
  12. His body is riddled with indigestion,
  13. The delusions that you have an incurable heart disorder do not leave your head.
  14. When there is excess of Anxiety in this patient, the patient becomes restless, sit still, what will he take.
  15. Constantly moving the arms and legs, tending to pull the hair, similar leg movements.

Some patients suffer from Obsessive Compulsive Disorder.

Like a damaged gramophone record, the same thought repeats itself over and over again. ‘Like thought like behavior’ the same action is repeated. It is possible to stop the intellect-interaction. But as soon as the effort is relaxed, the same thought and the same disease start to occur.
Adolescent illnesses include depression even when there is no stress in his life was created This is called as Endogenous Depression. Changes in brain chemicals. Therefore, there is a change in thoughts and feelings. So what is the need to think like this when everything is good? This question is false.
Kishore himself knew that something was wrong, but he could not control his emotions and thoughts.
Once a negative feeling takes root in the Mind, a person cannot get rid of it even if he tries. Explaining to the patient in Depressive illness is of little use. They respond only to Medication.
Kishore’s continuous intake of Homoeopathic Medicines over a proper period of time &  completely cured his Depression and he is now living his life happily and contentedly. At the same time, he is doing his work properly.
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123, 9404507723
Sunday Closed.