मासिक पाळीचे अकाली आणि उशिरा येणे आणि होमिओपॅथी! / Early or Delayed Menstruation and Homeopathy !

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneOctober 16, 2025 Academic Problems Anxiety Behaviour problems Bone Diseases Children Problems Children's Illness Female Problems General Information Geriatric Problems Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry Sexual Problems

मासिक पाळीचे अकाली आणि उशिरा येणे आणि होमिओपॅथी !

वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं ?

सीताबाईला चाफेकळीला न्हाणं आलं…..l

पहिल्यांदा न्हाणं आलं, सासू करते सोहळा ll “

मराठी चित्रपटाच्या पडद्यावर आपल्याला जुना वाडा दिसतो. वाड्यात छोटासा समारंभ चालू आहे. नवीन लुगडं नेसलेल्या बायकांची लगबग सुरू आहे. मध्येच फुलांनी सजवलेला एक छानसा झोपाळा आहे आणि त्या झोपाळ्यावर नुकतीच ऋतुचक्र सुरू झालेली (बोली भाषेत न्हाणं आलेली) सीताबाई आपल्याला दिसते. तिला नवीन लुगडं नेसवलंय, तिचं कोडकौतुक सुरू आहे. ‘ऋतूप्राप्तीचा’ सोहळा इथं सुरू आहे.

   ‘ऋतुप्राप्ती ‘ म्हणजे मासिक पाळी सुरू होणं .बालपणातून स्त्रीत्वाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गातील पुढचं पाऊल. देशोदेशींच्या संस्कृतीमध्ये या घटनेचा सोहळा साजरा केला जातो. दक्षिण भारतात ‘ ऋतूशुद्धी ‘ किंवा ‘ऋतूकला ‘ संस्कार साजरा करतात. ‘ऋतूप्राप्ती ‘ झालेल्या मुलीला साडी, दागिने भेटवस्तू, मिठाई दिली जाते. पूजा केली जाते. आसाममध्ये ‘तुलोनी बिया ‘ओडिसामध्ये. ‘रजा ‘ यासारखे समारंभ साजरे केले जातात. जपानमध्ये लाल तांदळापासून खास पदार्थ करून हा सोहळा साजरा करतात तर उत्तर अमेरिकेतील ‘अपाची ‘ या जमातीत सूर्यनृत्य केलं जातं .

मासिक पाळी सुरू होणं हे जनन संस्थेच्या वाढीचे लक्षण. मुलीचं प्रजननक्षम होण्याकडे पडलेलं एक पाऊल. बहुतांश संस्कृतीमध्ये वंशवृद्धीला अनन्य साधारण महत्त्व आहे. ‘ऋतूप्राप्ती ‘ किंवा मासिक पाळी सुरू होणं हा मातृत्वासाठी स्त्री सक्षम होत आहे हे दर्शवणारा एक टप्पा. आणि म्हणूनच अनेक ठिकाणी ‘ऋतुचक्र ‘ सुरू होण्याचा एक सोहळा साजरा केला जातो. पौगोंडावस्था हा मुलीच्या आयुष्यातील एक आनंदाचा, परिपक्वतेचा काळ असला, तरी कधी कधी तो चिंतेचाही विषय होऊ शकतो.

  ‘चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक ‘ मध्ये नववीत शिकणारी नेहा, ही एक हुशार चुन चुणचुणीत मुलगी, अभ्यासात चांगले गुण मिळवणारी, खेळात ही पारंगत असणारी स्वभावाने मुलत: थोडीशी शांत आणि अबोल असणाऱ्या नेहाला तिचे पालक उपचारासाठी घेऊन आले होते. आजकाल मात्र नेहाच्या स्वभावात खूप बदल जाणवत होता. स्वभाव चिडचिडा झाला होता. सतत रागवायची, आदळपट करायची. यावर्षी परीक्षेतही कमी गुण पडले होते. त्यावेळी तिचे बाबा तिला खूप ओरडले होते. आता अभ्यासाविषयी काही बोलायला गेलं तर रडायची, दार बंद करून एकटीच खोलीत बसून राहायची. मैत्रिणींच्या पण फारशी रमत नव्हती. आईला तिची काळजी वाटायला लागली होती.

पौगोंडावस्थेच्या काळात नेहाप्रमाणेच काही मुलींना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागतं. नैराश्य येतं. चिडचिडेपणा वाढतो, मानसिक संतुलन व वर्तणुकीच्या समस्या निर्माण होतात. मन एकाग्र होत नाही. संप्रेरकांमधलं असंतुलन, अनुवंशिकता, याचबरोबरच घरातले ताणतणाव, आई-वडिलांबरोबर संवाद नसणं, या गोष्टीही मानसिक समस्यांसाठी जबाबदार असतात.

अभ्यासात, खेळात उत्तम कामगिरी करण्याचा दबावही या मुला- मुलींवर असतो. पालक,मित्र- मैत्रिणींबरोबर भावनिक जवळीक नसल्यास या मुलींना कुठे व्यक्तच होता येत नाही. यामुळे त्यांचा एकाकीपणा वाढतो. अशा वेळेस व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढू शकतं. मुली लैंगिक प्रलोभनांना बळी पडू शकतात. नैराश्यामुळे आत्महत्येचे विचारही त्यांच्या मनात डोकावू शकतात.

     होमिओपॅथिक औषधे सुरू केल्यानंतर नेहाला काही आठवड्यातच सकारात्मक बदल जाणवू लागले. तिची चिडचिड कमी झाली, एकाग्रता वाढीस लागली. मैत्रिणीच्या ती रमू लागली. तिच्या वर्तणुकीत सकारात्मक झालेला बदल तिच्या आई-वडिलांची काळजी कमी होण्यास कारणीभूत ठरला.

मानसिक समस्या टाळण्यासाठी या वयातील मुला- मुलींना समजून घ्यायला हवं. त्यांच्यावर दबाव न टाकता, सक्ती न करता त्यांच्याशी संवाद साधायला हवा. अशा वेळी पाल्य व पालक दोघांचाही समुपदेशन महत्त्वाचं आहे. मानसिक समस्यांसाठी व्यायाम, ध्यानधारणेचाही चांगला फायदा होतो. मुलींनी त्यांच्या भावना व्यक्त होण्यासाठी लिखाण करणं, छंद जोपासणे उपयोगी पडतं. आपल्या मुलीला मानसिक त्रास होत असल्याचे लक्षात आल्यास मानसोपचार तज्ज्ञांबरोबरच होमिओपॅथिक तज्ञांचा सल्ला घेऊन होमिओपॅथिक औषधोपचार सुरू करायला हवेत.

वयात येणाऱ्या मुलींमध्ये हल्ली लठ्ठपणाचे प्रमाण वाढू लागलं आहे. ‘चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक ‘ मध्ये आलेली पंधरा वर्षाची मीता, जिचं वजन 80 किलो होतं. गेल्या दोन वर्षात वीस ते पंचवीस किलो वजन वाढलं होतं. दहावीत असल्यामुळे तिला व्यायामाला वेळच मिळत नाही. शाळा, क्लास यातच सगळा दिवस संपून जात असे. चांगला अभ्यास करावा म्हणून आई छान छान पदार्थ करून खायला घालत असे, आणि आता वाढलेल्या वजनामुळे मासिक पाळी खूप अनियमित झाली होती. व्यायामाचा अभाव व चुकीचा आहार हे लठ्ठपणाचे प्रमुख कारण होतं, तरी कधी कधी अनुवंशिकता आणि संप्रेरकांमधील असंतुलनसुद्धा वजन वाढण्यासाठी कारणीभूत असतं. अति उष्मांकाचा आहार, बाहेरील खाद्यपदार्थ, जंक फूड यामुळे वजन वाढतं. या वयातील लठ्ठपणा पुढील आयुष्यातील अनेक आजारांसाठी कारणीभूत असतो. म्हणूनच नियमित व्यायाम व योग्य आहार घेऊन वाढीवर नियंत्रण ठेवावं.

    मिताला होमिओपॅथिक औषधांबरोबरच अति उष्मांकाचा आहार, जंक फुड वरती पूर्णतः संयम व नियमित व व्यायाम तसेच योग्य आहारामुळे वजन वाढीवर नियंत्रण येऊन, तिची संप्रेरकं संतुलित होऊन तिची मासिक पाळी नियमित होण्यास मदत झाली.

शरीरयष्टी खूप बारीक राहावी यासाठी कधी कधी चुकीचा आहार घेतला जातो. तर काही वेळा जेवणच टाळलं जातं याला ‘अग्निमांद्य ‘(ॲनोरेक्झिया) म्हटलं जात. हा एक गंभीर मानसिक आजारा असून यात कुपोषण व अनेक आरोग्य समस्यांची शक्यता असल्याने वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तातडीने हा मानसिक आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी होमिओपॅथिक औषधे सुरू करणे महत्त्वाचे आहे.

सात वर्षांच्या सनाला घेऊन तिची आई आणि आजी ‘ चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक ‘ मध्ये आल्या होत्या सणाला अचानक मासिक पाळी सुरू झाल्याने त्या बिचार्‍या गांगरल्या होत्या. ती लहानपणापासूनच गुटगुटीत असल्यामुळे तिच्या स्तनांची होणारी वाढ, शरीरात होणारे बदल त्यांच्या लक्षातच आले नव्हते. इयत्ता दुसरीत शिकणारी ती छोटी मुलगी मासिक पाळी, पौगंडावस्था याविषयीची माहिती समजण्याइतकी काही मोठी झाली नव्हती. अकाली येणारी पौगंडावस्था म्हणजे नक्की काय ?

पौगंडावस्थेचं सर्वसाधारण वय आहे, 8 ते 16 वर्ष, तर मासिक पाळी सुरू होण्याचं वय आहे 10 ते 16 वर्ष . पौगंडावस्थावस्थेची चिन्हे वयाच्या सातव्या वर्ष आधीच दिसू लागल्यास किंवा मासिक पाळी दहा वर्षांच्या आत आल्यास त्याला ‘अकाली पौगंडावस्था ‘ म्हटलं जातं. खूप लहान वयात पौगंडावस्था सुरू होण्याचे अनेक तोटे आहेत. यातील सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे उंची न वाढणं, मुलींमध्ये हाडाची वाढ कमी होते व उंची वाढण्यावर बंधन येत. मुली बुटक्या राहतात.

   लहान वयातील या मुली बौद्धिकदृष्ट्या ही अपरिपक्व असतात. पौगंडावस्थेत घडणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांविषयी त्यांना फारशी माहिती नसते. स्वतःच्या शरीरात घडणाऱ्या बदलांची त्यांना अनेकदा लाज वाटते. मित्र-मैत्रिणीबरोबर जायला त्या घाबरतात. मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता ठेवणं, काळजी घेणं त्यांना जमत नाही. त्यासाठी त्यांना मदत घ्यावी लागते. या लहान मुली लैंगिक शोषणाला ही बळी पडू शकतात. पौगंडावस्था लवकर सुरू होण्याची अनेक कारण आहेत. बदलती जीवनशैली, स्थूलपणा ही त्याची सर्वसाधारण कारणं. मेंदूचे विकार, अपघातात मेंदूला झालेली इजा, ट्यूमर यासारख्या गंभीर कारणांमुळे ही अकाली पौगंडावस्था येऊ शकते.
    अकाली पौगंडावस्था, टाळण्यासाठी रोजच्या आयुष्यात आपल्याला काही उपाययोजना करता येऊ शकतात. अन्नपदार्थांच्या भेसळीमुळे शरीरात जाणारी रसायनं, अतिमांसाहार व दुग्धजन्य पदार्थातून मिळणारे संप्रेरकं यावर नीट लक्ष द्यायला हवं असे पदार्थ खाणं टाळायला हवेत. संतुलित आहार व नियमित व्यायाम करून लठ्ठपणा कमी करावा. अकाली पौगंडावस्था आल्याची लक्षणे दिसल्यास मुलींच्या रक्तातील संप्रेरकांची पातळी तपासली जाते. हाडांची क्ष -किरण तपासणी करून हाडांचे वय बघितलं जातं. यासाठी उपलब्ध असलेले उपचार, त्यांचे फायदे व तोटे याविषयी मार्गदर्शन करून अकाली सुरू असलेली पौगंडावस्था पुढे ढकलता येते. यामध्ये होमिओपॅथिक औषधांचा बराच फायदा मिळतो

आता पुढील उदाहरण पाहू या – कोल्हापूरजवळील एका खेड्यातून 21 वर्षाच्या सुमनला तिथे आई-वडील ‘ चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक ‘ मध्ये घेऊन आले होते. सुमनचं ते लग्न ठरवत होते. काय कारणाने आला आहात ? असे विचारल्यावर तिची आई दबक्या आवाजात सांगू लागली, सुमनच लग्न ठरलं होतं पण तिची मासिक पाळी अजूनपर्यंत आलेलीच नाही. समाजाच्या भीतीने त्यांनी आजपर्यंत हे कोणाला सांगितलं नव्हतं, किंवा वैद्यकीय तज्ञांकडे ते तिला घेऊन गेले नव्हते.

    पौगंडावस्थेची लक्षणे तेराव्या वर्षापर्यंत न दिसल्यास आणि मासिक पाळी वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत सुरू न झाल्यास किंवा स्तनांची वाढ झाल्यानंतर चार वर्षात मासिक पाळी न आल्यास वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा, तो त्यांनी घेतला नव्हता.

पौगंडावस्था उशिरा का येते किंवा ही लक्षणे का दिसत नाही, त्याला अनेक कारणे आहेत. कुपोषण, अनुवंशिकता गुणसूत्र दोष, जननसंस्थेचे आजार, रेडिएशन ही त्याची काही कारणे आहेत. पौगंड अवस्थेची लक्षणे वेळेवर न दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेणे का महत्त्वाचा आहे हे आपण मीराच्या उदाहरणावरून बघू.

तेरा वर्षाची ही मीरा आईसोबत ‘ चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये ‘ आली. तिची उंची छान होती. वयानुरूप शारीरिक बदल ही तिच्यात दिसत होते. मासिक पाळी मात्र अजून सुरू झाली नव्हती. गेले सहा महिने मीरा महिन्यातील पाच ते सहा दिवस पोटात दुखण्याची सतत तक्रार करत होती. पोटदुखीची तीव्रता हळूहळू वाढत होती. कालच तिला पोटात गाठ जाणवली.

तपासणी दरम्यान व सोनोग्राफी करताना असं लक्षात आलं की, योनिमार्गावर असलेल्या पडद्याला (हायमेन) नेहमी असते तसे छिद्र नव्हते. त्यामुळे मासिक पाळीचा रक्तस्त्राव योनीमार्गात साठवून गाठ निर्माण झाली होती. एका छोट्याशा शस्त्रक्रियेने हायमेनला छेद देऊन अडथळा दूर करण्यात आला व मिराची मासिक पाळी नियमित झाली.

    पौगंडावस्था वेळेत सुरु न झाल्याने त्याचे अनेक शारीरिक व भावनिक परिणाम होतात. मुलींच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते. समाजात हिणवले जाण्याची भीती वाटते. एकाकीपणा व नैराश्य येऊ शकतं. पौगंडावस्थेची लक्षणे वेळेत सुरु न झाल्यास कारण शोधणं महत्त्वाचं असतं. यासाठी गुणसूत्र तपासणी, रक्तातील संप्रेरकांची पातळी, सोनोग्राफी, स्कॅन केले जातात व कारण शोधून उपाययोजना करण्यात येते.
    वयात येतानाचा हा काळ म्हणजे मुलींच्या आयुष्यातील एक अतिशय नाजूक काळ. या नाजूक काळातल्या शारीरिक व मानसिक बदलांना तिने विनासायास स्वीकारणं खूप महत्त्वाच असतं, यासाठी होमिओपॅथिक औषधे निश्चितपणे मदत करतात. एक अवखळ, अल्लड बालिकेचं एका निरोगी, प्रसन्न तरुणीत होणारे रूपांतर होमिओपॅथीच्या औषधोपचारांनी सहज शक्य आहे.

 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद

कृपया पुढील लेख वाचा  —

———————————————————————————-

Early or Delayed Menstruation and Homeopathy !

“The wedding drums are playing — what has happened in the mansion?

Sitabai has received her first menstruation, like the champak bud blossoming.

At her first menstruation, the mother-in-law performs the ceremony.”

    On the screen of a Marathi film, we see an old mansion. Inside, a small ceremony is taking place. Women dressed in new saris are busy with preparations. In the middle, a beautifully decorated swing with flowers is placed, and on it sits Sitabai, who has just entered her menstrual cycle (in colloquial terms, “first period”). She is adorned with a new sari and is being celebrated by her family. This is the ritual of Rituprapati (‘ऋतुप्राप्ती ‘)— the celebration of the first menstruation.

  Rituprapati  marks the beginning of menstruation, the step from childhood towards womanhood. Across cultures, this event is celebrated with ceremonies. In South India, it is observed as             Ritu Shuddhi or Ritukala Sanskar.  (‘ऋतूशुद्धी ‘ किंवा ‘ऋतूकला ‘) The girl is gifted saris, jewelry, sweets, and receives blessings through special rituals. In Assam, the event is called Tuloni Biya'(तुलोनी बिया ‘), in Odisha it is Raja (रजा ) , in Japan special dishes are made with red rice, while in the Apache tribe of North America, a traditional sun dance is performed.

    The onset of menstruation is a sign of reproductive maturity — an indication that the girl is stepping into fertility. In most cultures, the ability to bear children is of prime importance, and therefore, the beginning of the menstrual cycle is seen as a milestone worthy of celebration. Adolescence is often described as a joyful and maturing phase of life, yet at times it can also bring worries and challenges.

  At Chaitanya Homeopathic Clinic, Neha, a ninth-grade student, was brought in by her parents. She was a bright, lively girl, good at studies as well as sports, though by nature she was a little quiet and reserved. Recently, however, her personality had changed noticeably. She had become irritable, often losing her temper and throwing tantrums. Her academic performance had dropped, and when scolded by her father after her exams, she grew even more withdrawn. She would cry easily, lock herself in her room, and avoid interacting even with friends. Naturally, her mother grew deeply concerned.

       Just like Neha, many girls in adolescence face mental health challenges. Depression, irritability, emotional instability, and behavioral changes can arise. The mind becomes restless and lacks focus. The causes may include hormonal imbalance, genetic predisposition, family stress, or lack of healthy communication with parents. Academic and extracurricular pressures only add to the burden. Without emotional closeness to parents or friends, such girls feel unable to express themselves, leading to loneliness. In such vulnerable times, risks of addiction, falling prey to sexual temptations, or even suicidal thoughts can increase.

  After starting Homeopathic treatment, Neha began to notice positive changes within a few weeks. Her irritability reduced, concentration improved, and she started mingling again with friends. The positive shift in her behavior relieved much of her parents’ anxiety.

    To prevent such psychological issues, adolescents must be understood with empathy. Instead of applying pressure or strictness, parents should engage in open communication. Counseling for both parents and children is often beneficial. Exercise, yoga, and meditation also help in maintaining mental balance. Creative expression through writing or hobbies gives girls a healthy outlet for their emotions. If psychological distress is noticed, alongside psychiatric consultation, Homeopathic treatment should also be considered.

     Another growing issue among adolescent girls today is obesity. At Chaitanya Homeopathic Clinic, Meeta, a 15-year-old girl, came for consultation. She weighed 80 kg, having gained 20–25 kg over the last two years. Being in tenth grade, she had little time for exercise as her entire day was occupied with school and coaching classes. Her mother, wishing to provide her with nutritious food, would often prepare rich meals, but this had contributed to her weight gain. As a result, Meeta’s menstrual cycle had become highly irregular.

     While lack of exercise and poor diet are primary reasons for obesity, heredity and hormonal imbalances also play a role. High-calorie intake, junk food, and outside meals only worsen the problem.

   Obesity at a young age often becomes a cause for several illnesses later in life. Therefore, weight must be controlled with regular exercise and a proper diet.

   Along with Homeopathic medicines, Mita adopted a controlled lifestyle—avoiding high-calorie foods and junk food, maintaining a healthy diet, and exercising regularly. This helped her bring her weight under control, balance her hormones, and regulate her menstrual cycle.

    Sometimes, in an attempt to remain excessively slim, girls resort to wrong dietary habits. At times, they even skip meals completely. This condition is called Anorexia. It is a serious psychological illness that may cause malnutrition and multiple health problems. Hence, seeking medical advice is important. At the same time, starting Homeopathic treatment is essential for completely curing this psychological disorder.

   A mother and grandmother once brought seven-year-old Sana to Chaitanya Homeopathic Clinic. She had suddenly started menstruating, leaving the family shocked and anxious. Since Sana had always been chubby, the physical changes in her body, such as breast development, had gone unnoticed. She was still in the second grade and too young to understand menstruation or puberty.

    So, what exactly is precocious puberty ? Normally, puberty begins between the ages of 8 and 16, while menstruation usually starts between the ages of 10 and 16. If signs of puberty appear before the age of seven, or menstruation begins before the age of ten, it is called precocious puberty.

   There are many disadvantages of early puberty, the most serious being stunted growth. In girls, bone growth slows down, and height becomes restricted, often leaving them short.

   Girls who enter puberty too early are also emotionally immature. They have little knowledge about the physical and psychological changes happening within them. Often, they feel ashamed of their changing bodies and hesitate to mingle with friends. They may struggle with menstrual hygiene and need help to manage it. Such young girls are also at risk of sexual exploitation.

    The causes of early puberty are varied. The most common are lifestyle changes and obesity. In some cases, serious conditions such as brain disorders, head injuries, or tumors may also trigger it.

      To prevent precocious puberty, certain lifestyle measures can be adopted—avoiding adulterated food products, reducing excessive consumption of meat and dairy (which may contain hormones), maintaining a balanced diet, and exercising regularly to reduce obesity.
  If early puberty is suspected, doctors usually test hormone levels in the blood and take X-rays to assess bone age. Treatment options are available, and with proper guidance, puberty can be delayed. Homeopathic medicines are particularly beneficial in such cases.

   Now let us look at another example. A 21-year-old girl, Suman, from a village near Kolhapur, was brought to Chaitanya Homeopathic Clinic by her parents. They were preparing for her marriage. When asked about the reason for consultation, her mother hesitantly revealed that although Suman was engaged, she had never menstruated. Out of fear of social stigma, they had never shared this with anyone nor sought medical help.

     If signs of puberty are absent by the age of 13, if menstruation has not begun by the age of 16, or if it does not occur within four years of breast development, medical consultation is necessary. Unfortunately, Suman’s parents had ignored this.

    Delayed puberty can have multiple causes, such as malnutrition, genetic or chromosomal defects, reproductive system disorders, or even radiation exposure.

   The importance of timely medical consultation is illustrated through the case of Meera, a 13-year-old girl who came to Chaitanya Homeopathic Clinic with her mother. She had normal height and showed age-appropriate physical changes, but menstruation had not started. For the past six months, she had complained of abdominal pain for five to six days every month, with the intensity gradually increasing. Recently, she even noticed a lump in her abdomen.

   On examination and sonography, it was found that her hymen had no opening. As a result, menstrual blood had accumulated inside, forming a mass. A minor surgical procedure was performed to create an opening in the hymen, and her menstrual cycle became regular.

   Delayed puberty has both physical and emotional consequences. Girls may develop an inferiority complex, fear social rejection, and suffer from loneliness and depression. Identifying the cause of delayed puberty is crucial. Chromosomal studies, hormone level tests, sonography, and scans help in diagnosis, following which appropriate treatment can be given.

   Puberty is one of the most delicate transitions in a girl’s life. Accepting the physical and emotional changes with ease is very important, and Homeopathic medicines provide great support in this phase.

   With the help of Homeopathy, the transformation of a lively, carefree girl into a healthy, confident young woman becomes smooth and natural.

 

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-