भीती, न्यूनगंडाचा फास आणि होमिओपॅथी / Fear, the Trap of Inferiority Complex, and Homeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneOctober 29, 2025 Anxiety Female Problems General Information Geriatric Problems Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatric Problem Psychiatry Sexual Problems Sleep Disorders Uncategorized

भीती, न्यूनगंडाचा फास आणि होमिओपॅथी

व्यक्तिमत्व विकारातील वर्गीकरणांमध्ये तीन समूह केलेले आहेत त्यातील ‘क्लस्टर ए’ मध्ये विचित्र आणि विक्षिप्त लक्षणांचा समूह आहे.

‘क्लस्टर बी’ मध्ये अति नाटकीय अति भावनिक अशी लक्षणे दिसून येतात.तसेच या समूहातील व्यक्तिमत्व विकार असणाऱ्या व्यक्तींचे वर्तन नेहमीच अनिश्चित असं असतं.

‘क्लस्टर सी’ मधील व्यक्तींमध्ये प्रामुख्याने ‘भीती वाटणं’ आणि ‘चिंताक्रांत वर्तन’ ही लक्षणे दिसून येतात.

खरं तर भीती अगदी लहानपणापासून केव्हा ना केव्हातरी अनुभवावी लागणारी भावना आहे, आणि सामान्यतः ती अनेक भावनांपैकी एक असते. या व्यक्तिमत्व विकारांमध्ये मात्र भीती हीच प्रमुख भावना होऊन जाते. पाठीवर पान पडल्यावर आकाश पडलं, असं वाटणाऱ्या सशाची गोष्ट आपल्याला आठवत असेलच. अचानक पान पाठीवर पडल्यावर दचकणं अगदीच समजू शकतो, पण पानाचं दचकवण्याचं खरं मूल्य विसरून त्याला अवास्तव मोठ्ठ करून स्वतःच मानसिक स्वास्थ्य बिघडवणं हे निश्चितच धोक्याचं आहे.

अशा ‘क्लस्टर सी’ मधील तीन पैकी पहिला प्रकार आहे, ‘ॲव्हॉइडन्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ (AVPD).

या व्यक्तिमत्व विकाराच्या नावातच ‘टाळणे’ अधोरेखित आहे. काय टाळतात या व्यक्तिमत्व विकाराने पीडित माणसे?

माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि अशी माणसे समाजात मिसळायलाच घाबरतात आणि त्यामुळे ते समाजाशी संपर्क टाळतात.

हे वाचल्यावर आपल्या मनात पटकन विचार येऊ शकतो की, अरे, असं तर मलाही बऱ्याच वेळ वाटतं. पण असं नुसतं वाटणं आणि व्यक्तिमत्व विकार असणं यात एक महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे आपल्या वर्तनाचा.

स्वतःला किंवा समाजाला धोका असेल तर तो विकार असतो. शिवाय वयाची 18 वर्षे पूर्ण असणं आणि सात लक्षणांपैकी किमान पाच लक्षणे ठळकपणे दिसणं हे निकष तर आहेतच.

‘चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक’ मध्ये आलेला सुरेश नावाचा रुग्ण त्याची विवंचना मी आपणांसमोर मांडत आहे.

सुरेश 32 वर्षाचा तरुण एका कंपनीत काम करायचा. अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याला व्यवस्थापनाच्या पदवीनंतर लगेच नोकरी मिळाली. खरंतर त्याची या विषयातील प्रगती बघून त्याच्या शिक्षकांनी त्याला प्राध्यापक होण्यासाठी सुचवलं होतं. पण त्याला लोकांशी प्रत्यक्ष संपर्क येईल असा कोणताच व्यवसाय निवडायचा नव्हता. त्याला वाटायचं लोक आपल्याला काही बोलले किंवा त्यांनी आपल्यावर टीका केली तर? त्याला या गोष्टींची इतकी चिंता वाटायची की त्यासाठी त्याने चांगली संधी असलेली आणि त्यासाठी तो पात्र असताना सुद्धा प्राध्यापकाची नोकरी सोडून तुलनेने कमी पगार असलेली कंपनीतली नोकरी स्वीकारली होती. या नव्या कंपनीत कार्यालयाच्या एका कोपऱ्यात त्याचं टेबल होतं. जिथे बसून तो इतरांच्या गप्पा, चेष्टा-मस्करी सगळं बघायचा. पण प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये सामील व्हायचा प्रयत्न करायचा नाही. त्याच्याच कंपनीत काम करणारा मंदार मात्र उत्साहाचा झरा होता. तो आला की ऑफिसमधील वातावरणात चैतन्य यायचं. मंदारनेच सुरेशला ‘एकलकोंडा’ नाव दिलं होतं. कार्यालयात सगळेच तरुण असल्यामुळे ट्रेकिंगला जाणं, एकत्र जेवायला जाणं असे बरेच कार्यक्रम ठरायचे. पण सुरेश कुठेही जायचा नाही. त्याला वाटायचं, तिथे गेले की मंदार त्याला चिडवायला सुरुवात करेल आणि मंदारचं बघून सगळे तसेच करतील. या एका बाजूला या विचारांमुळे सुरेश सगळ्यांबरोबर जायचा नाही तर दुसऱ्या बाजूला आपण सगळ्यांसारखे मजा करावी, सगळ्यांशी मैत्री करावी अशी ओढ ही त्याला वाटायची. पण रोज त्यांच्यामध्ये सहभागी व्हायचं ठरवूनही त्याला ते जमायचं नाही. त्याची कामातली प्रगती मात्र वाखाणण्याजोगी होती आणि त्यामुळे त्याला पदोन्नती देऊन मॅनेजर होण्याची संधी दिली होती. पण मॅनेजरला अनेक लोकांशी बोलावं लागेल आणि तिथं आपलं काही चुकलं तर किती लाजिरवाणं ठरेल या विचारानं त्यानं ती संधी नाकारली होती.

सुरेशसारख्या या व्यक्तिमत्व विकाराच्या व्यक्ती जिथे गेल्यावर टीका होऊ शकते किंवा त्यांची चेष्टा होऊ शकते अशा ठिकाणी जाण टाळतात. मात्र ज्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांच्या गटांमध्ये त्यांना त्यांच्या संवेदनशीलतेला समजून घेतलं जाईल अशा ठिकाणी ते मोकळेपणाने जातात. अर्थात अशा ठिकाणी जातानाही टीका होण्याच्या भीतीला पूर्णविराम नाही तर केवळ स्वल्पविराम मिळतो. आणि अशा कार्यक्रमात गेल्यावर चुकून जरी त्यांच्या मनातली भीती खरी ठरली आणि त्यांना कोणी काही बोललं तर ते कायमस्वरूपी त्या लोकांवर, मग ते नातेवाईक असो किंवा मित्र की कामाचं ठिकाण,ते फुली मारून टाकतात. अशा फुल्यांमुळे आयुष्यात कितीतरी गैरसोयी होतात, हे त्यांना चालतं, पण टीका किंवा चेष्टा व्हायची भीती त्यांना सहन होत नाही.

कामावर या लोकांची काय परिस्थिती होते पाहिल्यावर असे वाटू शकतं की, त्यांच्यात आत्मविश्वास कमी असू शकेल म्हणून बाहेरच्या जगात ते असं सगळ्यांपासून अलिप्त, घाबरणारे आणि चिंताक्रांत असू शकतील. पण दिसायला देखणा, हुशार, व्यवस्थित उत्पन्न असणारा सुरेश वयाच्या बत्तीशीपर्यंत जोडीदारांशिवाय राहिला असेल का ? आश्चर्य वाटेल पण इतक्या वर्षात तो कधी कोणत्याही मुलीच्या नातेसंबंधात अडकला नव्हता. असं नव्हतं की, त्याला कोणाचं आकर्षणच वाटलं नव्हतं, पण त्या मुलीशी जाऊन बोलणं हे त्याच्यासाठी माउंट एव्हरेस्टवर चढण्या एवढं अवघड काम होतं.

त्याच्याच घराच्या बाजूला स्मिता ही 28 वर्षाची तरुणी राहायची. त्याला स्मिता मनापासून आवडायची. अर्थातच त्यानं हे कोणालाच सांगितलं नव्हतं. त्यानं मनातल्या मनात तिला खूपदा प्रपोज केलं होतं. पण प्रत्यक्षात तो त्या तयारीने गेला की त्याला घाम फुटायचा, चक्कर यायची, तोंडाला कोरड पडायची आणि मग तो काही न बोलता परत यायचा. त्याला नेहमी वाटायचे की, तू काहीतरी चुकीचे बोलला आणि ती हसली तर कायमची नामुष्की ओढवेल. ती नाही म्हणाली तर काय? हे ही विचार वरवर बघता साधारणच वाटतात. पण कधी ना कधी या विचारातून बाकीचे लोक बाहेर पडतात. ती ‘हो’ म्हणेल या आशेने मागणी घालतात.

  पण या व्यक्तिमत्व विकाराच्या व्यक्ती मात्र या विचारांना घट्ट चिकटून बसतात. त्यांचं आयुष्यभराचं नुकसान होतंय हे लक्षात आल्यावरसुद्धा ते स्वतःला या विचारांमधून बाहेर काढू शकत नाहीत. आपण नकार पचवूच शकत नाही हे त्यांच्या मनात खूप पक्कं असतं. मुळात या लोकांचा आत्मविश्वास कमी असल्यामुळे आपल्याला नकार मिळायची शक्यता जास्त आहे, असं गृहीत धरून चालतात. सुरेशसुद्धा स्मिताशी कधीच आपल्या मनातलं सांगू शकला नाही.

हे फक्त नातेसंबंधांच्या बाबतीतच नाही तर कुठेही गेलं तरी या लोकांना अशीच भीती वाटत राहते. खरंतर चार चौघात गेल्यावर प्रत्येकाची वेगवेगळी मतं असणार आणि ते ती बोलूनही दाखवणार. पण ही मतं जर ‘ॲव्हॉइडन्ट‘ व्यक्तिमत्व विकाराच्या लोकांच्या विरोधी असतील किंवा त्यांच्या मताशी मिळतील नसतील, तर हे लोक प्रचंड अस्वस्थ होतात. जगाची ही रीत आहे, त्यात सामाजिक माध्यमं तर एखाद्याला डोक्यावर चढवण्यात आणि त्यांना नाकारण्यातही एकदम अग्रेसर असतात. चित्रपट, कलाकार, राजकारणी लोक, खेळाडू या सगळ्यांना या नकाराचा सामना करावा लागतो आणि परत जोमाने कामाला लागावं लागतं. त्यांना या नकाराकडं दुर्लक्ष करायला जमवावंच लागते.

सुरेश च्या बाबतीत एकदा असंच झालं. कार्यालयात एका मीटिंगमध्ये त्याच्या बॉसने त्याने केलेल्या कामातील एक चूक सगळ्यांसमोर सांगितली आणि त्याच्याकडून एक प्रोजेक्ट काढून त्याला दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये टाकलं. अशी वागणूक मिळणं हे त्यांच्या दृष्टीने प्रचंड लाजिरवाणं होतं. त्याला त्या कार्यालयात परत पाय ठेवून सुद्धा इतका अवघड वाटायला लागलं की, त्याने तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला. भीती किंवा लाजिरवाणं वाटणं यांचा आयुष्यातल्या काही मोठ्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो.

या व्यक्तीमत्व विकाराचं आणखी एक लक्षण म्हणजे हे लोक घरातील किंवा कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या घेणं टाळत राहतात. त्यांच्यातील न्यूनगंड त्यांना या जबाबदाऱ्या घेण्यापासून मागे खेचतात. नवीन लोकांशी जुळवून घेणं ही त्यांना प्रचंड अवघड जातं. न्यूनगंड आहे म्हणून लोकांमध्ये जायचं नाही आणि लोकांमध्ये गेले नाही म्हणून भीतीच्या आणि लाजिरवाणं वाटण्याच्या भावना अधिक पक्क्या होत जाणं, अशा विचित्र चक्रात हे लोक अडकून पडतात.

शेवटचे जे लक्षण आहे ते म्हणजे नवीन काम सुरू करताना कोणताही धोका न पत्करणं. आपण एखाद्या साहसी खेळात भाग घेताना गृहीत धरतो की, आपल्याला हे जमलं तर आपलं कौतुक होईल किंवा आपल्याला कदाचित जमणार ही नाही. पण आनंदासाठी करून तर बघूया. इथं हे लोक नेमकं स्वतःला असं सांगतात की, ‘तुला हे जमणार नाही आणि तरीही करायला गेलास तर तुझं हसू होईल’, असा आवाज ‘आतून’ आला की त्यांना मिळणारी संधी घालवली म्हणून समजायचं.

कित्येकदा ‘सोशल अँक्झायटी डिसऑर्डर’ (SAD) आणि ॲव्हॉइडन्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ (APAD) सारखंच वाटू शकतं. पण प्रत्यक्ष यामध्ये फरक आहे. ‘एसएडी’ मध्ये एखाद्या विशिष्ट परिस्थितीची चिंता, भीती वाटते. मात्र ‘एपीएडी’ मध्य मात्र सर्वच परिस्थितीत चिंता आणि भीती जाणवते. दोन्ही आजारांमध्ये लोकांच्या टिकेची भीती वाटते पण ‘एसएडी’ मध्ये न्यूनगंड असेलच असं नाही, तिथे आत्मसन्मान टिकून असतो.‘एपीएडी’ मध्ये मात्र न्यूनगंड खूप ठळकपणे दिसून येतो.

इतर व्यक्तिमत्व विकारांप्रमाणेच इथेही होमिओपॅथिक उपचारांची खूप चांगली मदत होते. सुरेशला होमिओपॅथिक उपचारांमुळे खूप चांगला फायदा झाला त्याची भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढला. तो समाजातील व्यक्तींची जुळवून घ्यायला लागला, अलिप्त राहणे बंद झाले आणि नवीन नातेसंबंध प्रस्थापित करताना जी भीती वाटत होती ती पूर्णपणे नाहीशी झाली.

शेवटी या व्यक्तिमत्व विकाराच्या व्यक्तींनी आपल्या भीतीला एवढंच सांगणं गरजेचं आहे की,’मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिशही ना करे ये तो गलत बात हैl’

होमिओपॅथिक उपचाराने भीती आणि न्यूनगंड यामुळे लाजिरवाणा होण्याचा स्वभाव हे या व्यक्तिमत्व विकाराचे लक्षण असते ते कमी होऊन लोकांमध्ये मिसळणे, लोकांशी संपर्क ठेवणे किंवा नवीन नातेसंबंध प्रस्थापित करणे इत्यादीसाठी घाबरणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्वांमध्ये लक्षणीय बदल होतो.

 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद

कृपया पुढील लेख वाचा  —-

—————————————————————————

Fear, the Trap of Inferiority Complex, and Homeopathy

 

In the classification of personality disorders, three clusters are described.

Cluster A includes people with odd or eccentric traits.

Cluster B involves individuals who are dramatic, overly emotional, and unpredictable.

Cluster C is characterized mainly by fear and anxious behavior.

Fear, in fact, is a universal emotion experienced by everyone at some point since childhood. Normally, it is just one of many emotions. But in these personality disorders, fear itself becomes the dominant and overwhelming emotion.

You may recall the story of the rabbit who panicked, thinking the sky had fallen when merely a leaf had dropped on its back. Being startled by a leaf falling is understandable—but when someone magnifies such a small startle into a catastrophic belief, ignoring its real value, it becomes dangerous to mental health.

Among the Cluster C disorders, the first type is Avoidant Personality Disorder (AVPD).

The name itself highlights avoidance. What do such individuals avoid?

Humans are social beings, yet these people fear mingling with others. They avoid contact with society.

On reading this, one might quickly think, “I too sometimes feel this way.” But there is a significant difference between simply feeling like that and actually having a personality disorder. The key distinction is: if one’s behavior causes harm to themselves or society, it becomes a disorder.

Additional diagnostic criteria include being over 18 years of age and meeting at least five out of seven core symptoms.

At Chaitanya Homeopathic Clinic, I had a patient named Suresh, whose struggle I would like to share.

Suresh, a 32-year-old young man, worked in a company. Being academically bright, he got a job immediately after completing his management degree. In fact, his teachers had advised him to become a professor, considering his progress in the subject. But he refused to choose any profession that required direct contact with people. He feared, “What if people criticize me? What if I say something wrong?”

This constant anxiety made him reject the prestigious and well-suited academic opportunity. Instead, he chose a company job with a comparatively lower salary. In that office, his desk was tucked away in a corner, from where he silently observed others chatting, joking, and socializing—but never tried to join in.

In the same company, his colleague Mandar was full of energy, always bringing liveliness to the office. Mandar nicknamed Suresh “loner”. The office often organized group activities like trekking or dining out, but Suresh never participated. His fear was: “If I go, Mandar will tease me and others will follow.”

Thus, he avoided such situations, but at the same time longed to enjoy like everyone else, to make friends. Each day he resolved to join them, but could never gather the courage.

Despite this, his work performance was excellent, earning him a promotion opportunity to become a manager. But he declined, thinking: “A manager must talk to many people. If I make mistakes, it will be humiliating.”

This is typical of people with AVPD—they avoid situations where they might face criticism or ridicule. However, in close circles of family or trusted friends, they feel somewhat freer. Even then, the fear of criticism does not vanish completely—it only pauses temporarily. And if, by chance, their fear comes true and someone does criticize them, they permanently cut off that person—whether it’s a relative, a friend, or a workplace. These cut-offs cause significant life difficulties, but they prefer that over facing ridicule.

Looking at their work life, one might assume they lack confidence and that’s why they appear aloof, fearful, and anxious. But how surprising it is that despite being good-looking, intelligent, and financially stable, Suresh remained unmarried till the age of 32!

It wasn’t that he never felt attracted to anyone. He deeply admired Smita, a 28-year-old girl living next door. He often imagined proposing to her in his mind. But whenever he actually prepared to do so, he would sweat, feel dizzy, his mouth would dry up—and he would return without saying a word. His fear: “What if I say something wrong and she laughs? What if she says no? How humiliating!”

Such thoughts may sound ordinary because most people experience them occasionally—but they move past them, gather courage, and propose, hoping for a yes. But AVPD individuals remain trapped in these fears for life. Even when they realize that clinging to such thoughts is destroying their life, they still cannot break free. They strongly believe, “I cannot handle rejection.” Their low self-confidence makes them assume rejection is inevitable.

Thus, Suresh never expressed his feelings to Smita.

And this difficulty was not limited to relationships. In any setting, they experience the same fear. In social gatherings, differing opinions are normal—but when opinions clash with theirs, they become highly distressed. Today’s world, especially social media, is quick to glorify or humiliate people. Celebrities, politicians, or sportspersons face rejection publicly but continue their work. They learn to ignore criticism.

But not Suresh. Once, in an office meeting, his boss pointed out his mistake in front of everyone and reassigned his project. For him, this was unbearably humiliating. He found it so difficult to return to that workplace that he abruptly resigned. Thus, fear and shame can influence even major life decisions.

Another characteristic of AVPD is avoiding new responsibilities at home or work. Their inferiority complex prevents them from stepping forward. Difficulty in adapting to new people makes them more withdrawn. The inferiority leads them to avoid people, and avoiding people strengthens their fear and shame—creating a vicious cycle.

One more symptom is their refusal to take risks in starting anything new. For example, when joining an adventure sport, most people think: “If I succeed, it’ll be fun; if not, no problem—at least I tried.” But AVPD individuals tell themselves: “You will fail, and if you try, you’ll be mocked.” This inner voice makes them lose opportunities.

Often, AVPD can resemble Social Anxiety Disorder (SAD). But there is a difference: SAD involves anxiety in specific situations, while AVPD involves anxiety in almost all situations. Both fear criticism, but in SAD, self-esteem may remain intact, whereas in AVPD, inferiority complex is very prominent.

Like other personality disorders, Homeopathic treatment provides excellent help here too. With Homeopathic Medicines, Suresh experienced significant improvement—his fear reduced, self-confidence grew, he began to engage with people, overcame isolation, and even formed new relationships without fear.

In the end, people suffering from this disorder need to remind themselves:   “Whether or not we achieve our destination is a matter of fate, but not even trying—that is truly wrong.”
With Homeopathic treatment, the fear, inferiority, and shameful withdrawal seen in such personalities can be reduced significantly, helping them connect with others, build relationships, and live fuller lives.

 

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-