‘फोमो चं उत्तर ‘जोमो’ आणि होमिओपॅथी / ‘FOMO’s Answer to ‘JOMO’s’ & Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneAugust 22, 2025 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry

 

  ‘ फोमो ‘ चं उत्तर ‘ जोमो ‘ आणि होमिओपॅथी

    आपण हल्ली दोन जगात जगत आहोत. वास्तव आणि आभासी जग.
     वास्तव जगात पदोपदी एकटेपणाला कारणीभूत अस ठरणारे घटक उपस्थित आहेतच. पण आभासी जगात ही असं काही आहे का, त्याच्यामुळे एकटे ण येऊ शकते ?
   मृणाली आणि समीर यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच बाळाची चाहूल लागली. त्या दोघांची खरंतर मानसिक तयारी नव्हती. त्यांना भरपूर फिरायचं होतं, एकमेकांबरोबर वेळ घालवायचा होता. पण बाळाच्या चाहूलीनंतर घरात आलेली आनंदाची वाट बघता त्यांनी बाळाला या जगात आणण्याचे ठरवलं. मृणालीला आठवा महिना लागला आणि नेमकं त्याच महिन्यात शाळेतल्या तिच्या वर्गाचं ‘रियुनियन’ आलं.
   एवढ्या अवघडलेल्या अवस्थेत तिला घरातलं कोणीच तिथे जाऊ देणार नव्हतं. जस जसा  ‘रियुनियन’चा दिवस जवळ येत गेला, तसतशी त्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वरती चिवचिव वाढत चालली होती. कोणत्या रंगाची ‘थीम’, ‘कसला ड्रेस’, सांस्कृतीक कार्यक्रमाची चर्चा, छोटी-मोठी गोड भांडणं, वाद विवाद, आठवणी, चिडवाचिडवी…… मृणाली घरी बसून सगळं अस्वस्थपणे वाचत असायची. रात्री नवरा घरी आला की, ती या ना त्या निमित्ताने त्याच्यावर चिडचिड करायची.
    तिच्या मनात यायचं, या सगळ्या जणी मिळून किती मजा करतील …. परत कधी होईल ‘रियुनियन’?…. यावेळी इतक्या महत्प्रयासााने शाळेतल्या सगळ्यांनी एकत्र वेळ काढला होता.तिचा खास मैत्रिणींचा ग्रुप आपण होऊन तिची अवस्था समजून घेत होता. पण कोणीच तिला ‘ ये ना  गं तू पण ! ‘असा लाडिक आग्रह करत नव्हत्या. तिला वाटून जायचं की, “कशाला आपण आत्ताच प्रेग्नेंट आहोत! ” वरचेवर ग्रुप चेक करायचा, फोटो बघायचे  कोणी आपल्याबद्दल काही बोलते का ते तपासायचं आणि मग निराश होऊन एकटं, रडवेल बसून राहायचं, असं चाललं होतं मृणालीच. इन – मीन दहा-पंधरा पंधरा मिनिटे जायचे की हे चक्र परत सुरू व्हायचं.
   मृणालीच्या स्थितीला एक प्रकारे ‘ सामाजिक चिंता ‘ (Social Anxiety) म्हणता येईल. पण हल्लीच्या भाषेत त्याला ‘फोमो ‘ (फियर ऑफ मिसिंग आऊट – Fear of Missing out)  म्हणतात. या ‘फोमो’ चा आणि एकटेपणाचा जवळचा सहसंबंध आहे.
     दुसऱ्यांना जे मिळतंय,  दुसऱ्याच्या आयुष्याचे चाललंय, ते काहीतरी खूप उत्साहवर्धक (एक्सायटिंग -Exciting) चालू आहे, पण मी तिथे नाही आहे.मला हे एक मिळत नाही आहे…. अशा सगळ्या भावनांचा अनुभव यात येतो.
    ‘फोमो’ला आधुनिक समाजमाध्यमं सगळ्यात जास्त कारणीभूत आहेत. सोशल मीडियावर सतत कोणी ना कोणी, काही ना काहीतरी पोस्ट करत असतं.त्या पोस्ट बघितल्या की ‘फोमो’ ची  आणखीन तीव्र होते. एरवी कुणाच्या आयुष्यात काय चाललंय, हे पूर्वी फक्त आपल्या परीघातल्या लोकांच्या बाबतीत आपल्याला कळायचं. आता तर इथे भारतातल्या खेड्यातल्या माणसालाही अमेरिकेतलं ‘ डिस्नी वर्ल्ड’  पाहायला मिळतं.
    पण, “आपल्याला वाटतं लोक किती एन्जॉय करत आहेत बाहेर ! आपल्या आयुष्यात असं काहीच घडत नाही आहे.”
    अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असलेली वृंदा माझ्याकडे  ” चैतन्य क्लिनिक मध्ये’ होमिओपॅथिक  ट्रीटमेंट साठी आली होती. तिने सुरुवातीलाच सांगून टाकलं की, “मी तुमच्यासमोर न लाजता सगळं खरं सांगून टाकणार आहे.”ती वर्गातली सगळ्या टॉप रॅंकची मुलगी होती. अभ्यास करायचा, गुण मिळवायचे, यातच तिथे आत्तापर्यंत सुख होतं. शाळेत कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत हे चाललं.
     नंतर मात्र तिला सगळ्यांना बघून असं वाटायला लागलं की, आपण अभ्यासाच्या नादात काहीच एन्जॉय केलं नाही. सगळेजण पार्टीला चालले की,  ती सवयीने नाही म्हणायची. पण ‘इन्स्टा ‘ वर त्यांचे एक से एक रिल्स, फोटो यायचे. तिला हे सगळं बघून खूप अस्वस्थ वाटायचं, की आपण कोणत्याच ग्रुपमध्ये नाही. फक्त अभ्यास करायचा, या नादात ही तरुण वयातली ‘एन्जॉयमेंट ‘  राहूनच जात आहे. सगळेजण नाही का अभ्यास करत?….ते ही मजा घेऊनी अभ्यास करतातच की ! मग मीच एकटी इथे का आहे ?
    या अवस्थेत तिच्या हृदयाची ठोके वाढायचे, घाम यायचा. खूप एकटं वाटून रडू यायचे. या परिस्थितीत अभ्यास तरी होईल का ?……ना धड अभ्यास्  ना धड मजा. तिची ‘फोमो’  तिला फक्त एकटेपणा देऊन जात होती.
    याच्यात न लाजता सांगायची गोष्ट अशी होती की,  ‘तिला वाटायचं रस्त्यात या सगळ्यांची गाडी बंद पडावी, त्यांना पैसे कमी पडावेत, काहीतरी व्हावं आणि त्यांची पार्टी रद्द व्हावी. ‘फोमो ‘  शिवाय या भावनेची तिला खूप लाज वाटत होती. आपल्याला मिळत नसेल, तर कुणालाच मिळू नये’, हा तिच्या मनातला विचार तिच्याच नजरेतून तिला खाली उतरवत होता. तिने हे सगळं प्रामाणिकपणे मान्य केलं म्हणून, नाही तर इतरांनाही ‘फोमो’  मध्ये अशाच प्रकारच्या भावना येत असतात, पण मोकळ्या मानाने त्या स्वीकारतीलच असं नाही.
   बाजारपेठही आता पूर्वीसारखी सरळसाधी राहिलेली नाही आहे. कित्येक देशी-विदेशी  वस्तुंनी नटलेली आहे; म्हणण्यापेक्षा लबडलेली आहे ! अनेकांच्या हातात पैसा खुळखुळतोय. त्यामुळे रोज कोणी ना कोणीतरी, काही ना काही नवीन टुमणं काढतं. मुख्य म्हणजे जास्तीत जास्त पिक्सेलचे कॅमेरे आहेत, ते काढलेले फोटो टाकायला सोशल मीडिया आहे. त्यातल्या त्यात हे सगळं करायला प्रत्यक्षपणे पैसा खिशातून जातोय का ? (अप्रत्यक्षपणे जातो हे मात्र नक्की).  मग करा बिनधास्त फोटो  पोस्ट !
   बालीला हनिमूनला गेलेल्या जोडप्याचे फोटो पाहिले की, महाबळेश्वरला गेलेल्या जोडप्याला फोमो’ येतो.
  • आपण एकटेच फक्त भारताहनिमूनला गेलो नाही का ?…
  • आपण आयुष्यभरासाठी काहीतरी गमावतोय का ?
  • सगळे भेटतील, याविषयी बोलतील, तेव्हा आपल्याला एकटे वाटेल का ? आपण त्यांच्याशी जोडले जाऊ शकणार नाही का ?
  • आणि इथे समाजाशी जोडले न जाण्याची भावनाच एकटेपणा,उदासपण देऊन जाते. उद्या बाली सोडून कुणीतरी भारतातल्या एखाद्या खेड्यात टुमदार रिसॉर्ट मध्ये हनिमूनला जाईल.
  • तुम्हाला परत वाटेल, “अरे, हे खेड्यातलं वातावरण, गावरान मेवा, निसर्ग मी हे सगळं मी “मिस”  केलं का ? ”  कशाकशाच्या पाठी धावायचं ?
    एखाद्या लहान मुलांना मस्ती केल्यावर त्याची आई त्याला शिक्षा म्हणून खाली खेळायला जाऊ देत नाही. तो   बापडा वरून गॅलरीतून खालच्या मैदानात चाललेली मित्रांची मॅच बघत बसतो. त्यालाही हेच वाटतं, ‘आपण एकटे पडतोय का ?  सगळे मजा करत आहेत. आपण आजच्या खेळाला मुकलोय का ? तो सतरादा गॅलरीत फेऱ्या मारतो, तसंच काहीसं आपल्यातलं मूल ‘फोमो’ मध्ये करत असतं.                                                     आपण सतरादा सोशल मीडिया चेक करतो. दुसऱ्यांचा आनंद पाहून स्वतःचा हिरीमोड करून घेतो. मला हे पाहिजे असा वेढा हट्ट करत राहतो. या ‘फोमो’ मुळे एकटेपणा, अस्वस्थता येऊ द्यायची नसेल, तर आई मुलाला काय सांगेल?
  •    ” 100 वेळा गॅलरीतून वाकून बघू नकोस वाईट वाटत असेल तर !
  • “अगदी तसंच आपल्याला सारखं सारखं सोशल मीडिया उघडून पाहणं बंद करायचं आहे.
   ‘ इतरांना जे मिळते ते आपल्याकडे नाही आहे ‘, ही भावना सोशल मीडियात अति गुंतणाऱ्या बहुतेकांना जाणवते. प्रथम वाईट वाटणं, मग बाजूला पडल्यासारखं वाटणं आणि मग गडद होणारा एकटेपणा, असा प्रवास काहींच्या बाबतीत दिसतो.
    इतरांना मिळालेलं सगळं तुम्हाला मिळेलच असं नाही, हे वास्तव स्वीकारल्यावर गोड बातमी अशी असू शकते की, त्यांना न मिळालेलं काहीतरी वेगळे तुम्हाला मिळालेलं असेल. पण सोशल मीडियात वाकून बघण्याच्या नादात आपण ते बघतच नाही !

    तरुणाईच्या भाषेत ‘ फियर ऑफ मिसिंग आऊटला’ उत्तर देणारा ‘ जॉय ऑफ मिसिंग आऊट’ – “जोमो”  ही आहे. “जोमो” आपल्याला इथे आणि आत्ता – (हियर अँड नाऊ) राहायला शिकवतो. थोडक्यात वर्तमान काळात राहायला शिकवतो. “जोमो” मध्ये ना भूतकाळातल्या गोष्टींचा पश्चाताप असतो, ना भविष्यकाळातल्या काळजी असतात. या क्षणाला जे मिळतंय, त्यात आनंद मानण्यात सुख असतं, जे होमिओपॅथिक ट्रीटमेंट मुळे सहज शक्य आहे.

   अशाच ‘फोमो’ मध्ये अडकलेली माझी एक पेशंट (होमिओपॅथिक उपचारानंतर) काही दिवसांच्या आजारपणातून  बाहेर आलेली,  तिने  खूप आधिच शाळेतल्या मैत्रींणबरोबर चित्रपटाला जायचं ठरवलेलं होतं. पण नुकत्याच येऊन गेलेल्या आजारपणामुळे तिला  होमिओपॅथिक डॉक्टरने काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण अशा स्थितीत तिला ‘फोमो ‘  होईल असं घरच्यांना वाटत होतं. पण तसं झालं नाही.
   तिला सध्या सकाळची लवकर उठायची घाई नव्हती. सगळं काही बसल्या जागेवर मिळत होतं. अल्लाउद्दीनचा चिराग मिळाल्यावर जसं मिळतं तसं, अगदी अशा प्रकारे मिळत होतं ! त्यामुळे तिला ‘फोमो’ नाही तर ‘जोमो ‘ आला होता. चित्रपटाला जाऊ नंतर कधी तरी  पण असा आराम परत मिळेल का सहजासाजी ? म्हणून खुश होतीती ती !
      होमिओपॅथिक औषधामुळे अशा प्रकारे मनाला वळण लावता येऊ शकतं.  ‘फोमो’ हा वरवर साधा दिसत असलेला विषय युवा वर्गाच्या बरोबरीनं अतिप्रमाणात सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकाच्या एकटेपणाला आणि अस्वस्थ अस्वस्थतेला कारणीभूत ठरत आहे.
    त्यामुळे वेळीच ” सावध…..ऐका पुढल्या हाका ! नाहीतर होमिओपॅथीची साथ घ्या.” जी तुमच्या मनाला थोडं वळण लावेल,  त्यामुळे तुम्ही ‘फोमो’ मध्ये न रहाता ‘जोमो‘ मध्ये राहाल.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद

कृपया पुढील लेख वाचा  —

—————————————————————————–

‘FOMO’s  Answer to  ‘JOMO’s’  & Homoeopathy

 We currently live in two worlds. Real and Virtual World.
    In the real world, there are many factors that cause loneliness. But is it something in the virtual world that can lead to loneliness?
    Before the marriage of Mrinali and Sameer completed a year, they started expecting a baby. Both of them were not really Mentally prepared. They wanted to travel a lot, spend time with each other. But waiting for the happiness that came in the house after the baby’s birth, they decided to bring the baby into this world.
    It took Mrinali the eighth month and exactly that month her class ‘Reunion’ at school came. No one in the house would allow her to go there in such a difficult condition. As the day of ‘Reunion’ drew closer, the chatter on their WhatsApp group was increasing. What color ‘theme’, ‘what dress’, discussion of cultural events, small and big sweet quarrels, disputes, memories, chidwachidvi…
    Mrinali used to sit at home and read everything restlessly. When her husband came home at night, she used to get angry with him for one reason or another. It came to her Mind, how much fun all these people will have together…. When will the ‘Reunion’ happen again?…. This time, everyone in the school had spent so much time together. Her special group of friends were understanding her situation. But no one told her, ‘You too join ! (लाडिक)was not insisting. She used to think, “Why am I pregnant now !”
     She would check the group above, look at the photos, check if anyone is saying anything about her, and then sit alone and cry in frustration. In-mean ten-fifteen minutes would pass before this cycle would start again.
   Mrinali’s condition can be called Social Anxiety in a way. But in today’s language it is called ‘Fomo’ (Fear of Missing out). This ‘Fomo’ is closely related to loneliness.
   What other people are getting, other people’s lives are going on, something very exciting is going on, but I’m not there. I’m not getting this one….
    Modern social media is the biggest contributor to ‘Fomo’. Someone  is constantly posting something or the other on social media. When you see those posts, the ‘Fomo’ becomes more intense. Previously, we used to know what was going on in someone’s life only in the case of people close to us. Now even a villager in India can see the ‘Disney World’ of America.

   But, “We think people are enjoying themselves outside! Nothing like this is happening in our life.”

    Brinda, a final year engineering student, came to me for Homoeopathic Treatment at “Chaitanya Clinic”. She said at the very beginning, “I am going to tell you the truth without being shy.”
    She was the top-ranking girl in the class. It was happy till now. But after seeing everyone, she felt like she didn’t enjoy the party. She used to feel very uncomfortable seeing all this, that we are not in any group, this is the ‘Enjoyment’ of the youth. Why don’t they study ? Why am I the only one here ? Her heart beat would rise, she would cry in this situation Loneliness was giving away.
    The unabashed thing to say about it was that, ‘She wanted all these cars to break down on the road, they would lose money, something would happen and their party would be cancelled. She was very ashamed of this feeling without ‘Fomo’. If we don’t get it, no one should get it’, this thought in her mind was bringing her down from her own eyes.
   Because she admits it all honestly, not because others feel the same way about ‘Fomo’, but they don’t necessarily accept it with open arms.
   The market is also not as straightforward as it used to be. It is studded with many domestic and foreign objects; Rather than saying it is lame ! Money is loose in the hands of many people. Therefore, every day someone or someone, something or the other creates new Themes.
  The main thing is that there are cameras with maximum pixels, social media to post the photos taken. Is money actually going out of pocket to do all this? (It goes indirectly though for sure). Then post a photo without compromise !
  After seeing the photos of the couple who went to Bali for their honeymoon, the couple who went to Mahabaleshwar gets ‘Fomo’.
  • Aren’t we the only ones who went on honeymoon in India?…
  • Are we missing out on something for life ?
  • When everyone will meet and talk about this, will we feel alone ?
  • Can’t you connect with them ?
  • And here the feeling of not being connected with society leads to LONELINESS & NERVOUSNESS. Tomorrow someone will leave Bali and go to a village in India for their honeymoon at Tumdar Resort.
  • You will think back, “Oh, did I “miss” this village atmosphere, Gavran Mewa, nature? ” What to run behind?
     When a little boy has fun, his mother does not let him go downstairs to play as punishment. He sits watching the match of his friends in the ground below from the gallery helplessly (Bapda). He also feels the same, ‘Are we getting lonely ? Everyone is having fun. Did you miss today’s game ? He wanders around the Gallery restlessly, just like the child in us does in ‘Fomo’.
    We check social media Multiple times. He makes himself a hero by seeing the happiness of others. The siege keeps insisting that I want this.
  •   If you don’t want to let this ‘Fomo’. lead to loneliness, restlessness, what will a mother tell her child ?
  •   “Don’t scroll through the gallery 100 times if you feel bad ! “Similarly, we need to stop scrolling through social media.
  ‘We don’t have what others get’ is the feeling felt by most of those who engage heavily in social media. For some, it’s a journey of first feeling bad, then feeling left out, and then a deepening loneliness.
   Accepting the fact that you won’t get everything others have, the good news may be that you’ve got something different that they haven’t. But we don’t see it in social media!

  In the language of youth, the answer to ‘Fear of Missing Out’ is ‘ Joy of Missing Out’ – ” Jomo “. ” Jomo “ teaches us to live here and now. In short, it teaches to live in the present.

  “Jomo” has neither regrets about the past nor worries about the future. There is joy in enjoying what the moment brings, which is easily possible with Homoeopathic Treatment.

   One of my patients (After Homoeopathic Treatment) who was stuck in similar ‘Fomo’ after a few days of illness, had planed to go to the cinema with her school friend a long time ago.
    But due to a recent illness, she was advised by a Homoeopathic Doctor to rest for a few days. But the family thought that she would become ‘Fomo’ in such a situation. But it didn’t happen.
   She was in no hurry to get up early in the morning right now. Everything was available at the sitting place. Allauddin’s lamp was received just like this ! So she got not ‘Fomo’ but ‘Jomo’. After going to a movie, will you get this kind of relief easily ? So she was happy !
    Homoeopathic Medicine can turn the Mind in this way. The seemingly simple topic of ‘ Fomo ‘ is contributing to the Loneliness and Uneasiness of everyone who overuses social media alongside the youth.
   So at the right time, “Be careful….. listen to the next calls ! Otherwise, take the help of Homoeopathy.” Which will give your Mind a little twist, so you will be in ‘Jomo’ instead of ‘Fomo’.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123 / 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-