मधल्या पिढीचं ‘लटकणं’ आणि त्यावर होमिओपॅथिक उपचार / ‘Hanging’ of the Middle Generation and its Homoeopathic Treatment

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneMay 14, 2025 Female Problems Geriatric Problems Mental Health Uncategorized

मधल्या पिढीचं ‘लटकणं’ आणि त्यावर होमिओपॅथिक उपचार

प्रसंग एक –
 मी माझ्या एका मैत्रीणीकडे, सुषमाकडे तिला नात झाली म्हणून आंम्ही बघायला गेलो होतो. ती खूप दमलेली दिसत होती. तिच्या नातीला पाहिलं. तिच्याशी आंम्ही खेळलो. मग बाळाला भूक लागली म्हणून तिची आई तिला आत घेऊन गेली. तेवढ्यात सुषमा आमच्यासाठी कॉफी घेऊन आली, म्हणाली, मी या सासूबाईच्या अपेक्षांनी दमून गेले आहे. मला नात झाली. त्याच्या काही दिवस आधी माझी गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया झाली, तरी नातीचं सगळं काही ना काही मी करते आहे. मुलीचं बाळंतपण ही नीट करते आहे. अगदी आता मी आहे, त्याच वयाच्या माझ्या सासूबाई असताना त्यांचेही हेच ऑपरेशन झालं होतं…… तेव्हा मी त्यांचं सगळं काही करत होते. तेव्हा कधी थोडा वेळ माझ्या मुलीला म्हणजे त्यांच्या नातीला घ्या म्हटलं, तर म्हणायच्या, ” माझं आताच ऑपरेशन झाले आहे. मला नाही झेपत.” पण आजही मला काही त्रास होत असेल तर, ना त्या समजून घेत ना मुलगी. त्यांच्याशी कसं वागाव हेच कळत नाही !”
प्रसंग दोन –
आमचा मित्र अजित मला फोनवर सांगत होता,“अरे जरा माझ्या आईला समजावून सांग ना एकदा की, डायपर वापर म्हणून.आता 80 वर्षाची आहे ती. मला कळतंय की, तिला कधी कधी लघवीवर ताबा राहत नाही. पण मग डायपर घालावा ना……  कुठेही पटकन लघवी करते. मी तिचा मुलगा आहे म्हणून समजून घेतो. माझी बायको पूनम खूप समजूतदार आहे. माझी आई म्हणून ती काही बोलत नाही रे ! पण तिला हे सगळं सहन करावं लागतं. तिला कधी कधी खूप त्रास होतो. मग, थोडा वेळ आम्ही दोघं घराबाहेर जातो आणि सोसायटीच्या बागेत बसतो. परत घरी गेलो की, आईची पुनमच्या नावाने भुणभुण  सुरू होते, “काय सारखी मध्ये मध्ये भटकायला जातेस ? कुठे गायब होतेस ? मग त्यावर पूनमची चिडचिड; पण आईने डायपर वापरला तर कितीतरी प्रश्न सुटतील. आई काही केल्या ऐकत नाही……. प्लीज तू सांगून बघतोस का एकदा आईला. “
प्रसंग तीन-
 सकाळी चालण्याच्या वेळी दोन मैत्रिणी गप्पा मारत होत्या. एक मैत्रीण दुसरीला म्हणाली,“तुझं बरं ग बाई, तुझा मुलगा परदेशी राहतो. मुलगा नातवंड चार-आठ दिवस येतात. त्यांचं, नातवंडांचे कौतुक केलं, की मग तू मोकळी. माझा मुलगा असून अगदी आमच्या घराजवळच राहतात. सून तसं खूप काही करियर वगैरे करत नाही;  पण नातवाला सांभाळण्यासाठी  आम्हाला गृहीतच धरते……. कधी शाळेतून आणा, क्लासला सोडा…..कधी मुलांना पार्टीला जायचं झालं तर मुलगा अचानक फोन करून नातवाला राहायला पाठवतो. आमची एक नातेवाईक म्हणतात, या वयात तुम्ही परत आई बाबा झालायं असंच वाटतं ! तुम्ही जबाबदाऱ्या कमी करायच्या ऐवजी वाढवतायच  की ! “
प्रसंग  चार –
माझ्या माझा वृत्तपत्रातला एक लेख वाचून माझ्या कॉलेजमधल्या मित्राचा फोन आला. ” आत्ताच आलो ऑफिसमधून. खूप छान लिहिलयस ! पण म्हटलं, आज शनिवार संध्याकाळ. तुला आजच फोन करावा आणि अभिप्राय कळवावा. नाहीतर ही माझी ही वेळ अमेरिकेतल्या मुलीशी बोलण्याची असते. त्यावेळी मी इतर कोणाशी बोलत नाही;  पण शनिवार – रविवार मी तुला फोन करत नाही आणि तिलाही सांगतो, तू पण करू नको…..तुमचा वीकेंड आहे ना, मी नाही तुम्हाला त्रास देणार, आठवडाभर कामात असता, घ्या तुम्ही पण विश्रांती ! “
वर नमूद केलेल्या चारही प्रसंगावरून असं लक्षात येतं की, ही तक्रार करणारी मंडळी साधारण 50 ते 60 वयोगटातले आहेत. त्यांना घरातल्य घरातल्या घरातल्या त्यांच्यापेक्षा वरिष्ठ लोकांचं करताना त्रास होतोय. त्याचबरोबरीने घरातले कनिष्ठ अर्थात मुलाबाळांच्या अपेक्षा पूर्ण करता करता ते थकून जात आहेत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आयुर्मान वाढलं आहे आणि नव्या तंत्रज्ञानामुळे नवी पिढी व्यग्र झाली आहे.
 त्यामुळे या मधल्या पिढीला अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढायला लागते. आपल्यापेक्षा मोठे म्हणून त्यांचा ज्येष्ठांचा मान राखणं, त्यांचा औषधपाणी, रुग्णालय, पथ्य, पेन्शनची कामं, बँकेची कामं, त्यांचं मनोरंजन, त्यांना नातेवाईकांकडे घेऊन जाणं किंवा त्यांना भेटायला आलेल्या लोकांसाठी वेळ काढून काही करणं करावे लागतंय, तर दुसरीकडे आपल्या मुलांनाही मदत करणं, त्यांचे करियर चांगलं व्हावं म्हणून त्यांचं मूल सांभाळणं   त्यांच्या ऑफिसच्या पाहून आपल्या गोष्टी ठरवणं.
सून किंवा मुलगी यांचं  बिझी रुटीन म्हणून त्यांचे घर सांभाळणं, त्यांना त्यांच्या मुलांना वेळ देता येत नाही, त्यांची भरपाईसुद्धा आपणच करणं, नातवंडांनी घरचं खावं म्हणून त्यांच्या आवडीचे पदार्थ घरी करणं, घरातल्या तरुण पिढीचं ‘डाएट’  सांभाळणं, घरातील छोटी मोठी काम करावं लागते काम छोटी-मोठी काम करणं, करावं लागतंय आणि कामांची ही यादी संपतच नाही. हे सगळं करताना मधल्या पिढीची दमछाक होते.
मधल्या पिढीची ज्येष्ठांबरोबर वागताना अशी मानसिकता असते की, ‘ यांची आता वयं झाली आहेत. गेल्या अनेक वर्षे त्यांनी कष्ट केले आहेत. मोठ्यांना उलट बोलू नये, त्यांचा अपमान करू नये, त्यांचे आता कितीसे दिवस राहिलेत …… ? ‘
काही ठिकाणी हेही दिसून येते की , 75 उलटलेले लोक यामध्ये लोकांच्या वयाची, त्रासांची अजिबात दखल घेत नाहीत, जो समजूतदारपणा त्यांनी पुढच्या पिढीत रुजवायला, तो त्या पिढीशी वागताना ते का वापरू शकत नाहीत ? त्यांच्या वयामुळे त्यांच्यातला विवेक गेला असेल का ? की वयामुळे ते आत्मकेंद्री तर होत नाहीत ना ? असा प्रश्न पडतो.
खूप ठिकाणी मध्यम वयाची पिढी संयम आणि समजूतदारपणा दाखवून तरुण पिढीला, आपल्या मुलांना वैचारिक स्वातंत्र्य देऊन करिअर, जोडीदार, त्यांचं राहायचं ठिकाण निवडण्याची मुभा देत आहेत, त्यांची ‘ प्रायव्हसी’  जपत आहेत. तसेच, त्यांच्या संपर्कात  राहता यावं, त्यांचं काय चाललं आहे हे कळावं, म्हणून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून, मोबाईल, कॉम्प्युटर सारखी साधनं वापरून समाजमाध्यमं हाताळून त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण कधी कधी त्यामुळे तरुण मंडळींना ती पालकांची लुडबुड वाटते.
मधल्या पिढीतील काही मोजकेच लोक असे दिसतात की, ज्यांच्यावर जेष्ठांची जबाबदारी नाही किंवा काही ना काही कारणानं मुलांची किंवा नातवंडांची जबाबदारी नाही;  पण असे लोकही आपल्या वयाच्या इतर लोकांच्या समस्या समजून घेताना दिसत नाहीत. उलट ‘तुम्ही फार अडकून पडता या सगळ्यात…..’ अशी इतरांची चेष्टा करताना दिसतात किंवा ‘मोकळे व्हा सगळ्यातून,’असा आग्रह सुद्धा करतात धरतात.
माझी कॉलेजमधली एक मैत्रीण आहे ती तिच्या आईला सांभाळते, मुलीच्या करिअरसाठी ‘सपोर्ट‘  व्हावं म्हणून नातीला सांभाळते. ती नेहमी म्हणते, “आपली पिढी म्हणजे जात्यातले ही आम्ही आणि सुपातलीही आम्हीच !”
 या मधल्या पिढीच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, यातल्या स्त्रियांना जास्त कसरत करावी लागते आणि याच वयातले पुरुष मात्र बऱ्याच वेळेला थोडी तटस्थ भूमिका घेतात. शिवाय ते आपल्या बायकोला, बहिणीला किंवा वहिनीला सहज सांगून जातात की, ‘नको लक्ष देऊ ! हे तुला आता माहीतच आहे ना ? मोठी माणसं अशीच वागणार ! किंवा त्यांचीच मुलं बेजवाबदारपणे वागली तरी घरातल्या स्त्रीलाच दोष देतात की, ‘तूच सवयी लावल्यास या ! मग आता काय अपेक्षा करतेस ?
इथे पुरुषांनी आपल्या बरोबरीच्या स्त्रियांना समजून घेऊन सहकार्य करणे गरजेचे आहे.
मधली पिढी म्हणजे ज्यांना घरातल्या वरिष्ठांचंही करायला लागतं आणि कनिष्ठानचंही. अनेकदा हे वरिष्ठ  आपल्या वय होत चाललेल्या मुला सूनेकडून अनेक अवाजवी कामांची अपेक्षा करतात, तर कनिष्ठांची पिढी ही आई-वडिलांकडून तीच अपेक्षा करते. त्यामुळे कोंडी होते ती मधल्या पिढीची !!
वर दिलेले चारी उदाहरणामधील व्यक्ती हे माझे पेशंट असून त्यांना होमिओपॅथिक औषध दिल्यामुळे त्यांना लक्षात आले की, त्यांना काय करायला जमेल आणि काय करायला जमणार नाही, हे आत्मपरीक्षण करणं आणि त्यांनी ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं. जिथे जमतय तिथे योग्य वेळी स्वतःसाठी ‘नाही ‘  म्हणणं त्यांना जमायला लागलं. हा होमिओपॅथिक औषधाने त्यांच्यामध्ये झालेला बदल आणि ‘नाही ‘ म्हणताना त्यांच्यामध्ये अपराधीपणाची कोणतीही भावना राहिली नाही आणि तो बदल त्यांनी सहजपणे स्वीकारला.
या मधल्या पिढीतील लोकांचा त्रास कमी करण्यासाठी काय काय करता येईल ?…
  • तर दोन्ही पिढ्यांनी एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या भाषेत मोकळा संवाद वेळेवर साधायला हवा.
  • मला काय करायला जमेल आणि काय जमणार नाही याचे आत्मपरीक्षण करून ते आधीच्या आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे.
  • योग्य वेळी स्वतःसाठी ‘नाही ‘  म्हणणंही जमलं पाहिजे.
  • मोठ्यांना किंवा लहानांना मदत करता आली नाही किंवा त्यांना आनंदी ठेवता आले नाही तर अपराधीपणाची जाणीव न ठेवता काही गोष्टी आपल्याला आपल्याही वयानुसार करता किंवा बदलता येणार नाहीत हे सत्य स्वीकारलं पाहिजे.
हा बदल स्वीकारण्यासाठी होमिओपॅथिमध्ये  अनेक प्रकारची गुणकारी औषधे आहेत  ज्यामुळे रुग्णांच्या किंवा त्या व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये बदल होऊन तारतम्याने विचार करता येऊ लागतो. त्यामुळे “सुपातले जात्यात जाताना ” चा बदल सहजगत्या होऊ शकतो. त्यामुळे मधल्या पिढीतले उतारवयातले जीवन सहज सुंदर आणि आनंदाने जगता येणे शक्य आहे. जर प्रत्येक पिढीने दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून त्या त्या पिढीच्या समस्या समजून घेऊन त्यानुसार स्वतःमध्ये विचारपूर्वक काही बदल केले, तर प्रत्येक पिढीच्या समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकतील आणि ‘सुपातले जात्यात जाताना’  तो बदल सगळ्यांसाठीच सुसह्य होईल.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123,9404507723
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

———————————–

‘Hanging’ of the Middle Generation and its Homoeopathic Treatment

 

Case one –
I went to see one of my friends, Sushma, as she had a Grand-Daughter. She looked very tired. Saw her Grand-Daughter. We played with her. Then the baby was hungry so her mother took her inside. Just then Sushma brought coffee for us, said, I am tired of this mother-in-law’s expectations. I got a granddaughter. A few days before that, I had a hysterectomy, but I am doing everything related to the relationship. The baby girl is doing well. Even now I am, when my mother-in-law was of the same age, she had the same operation…. I was doing everything for her then. For a while, if my daughter was asked to take her granddaughter, she would say, “I have just had an operation. I don’t want it.” But even today, if I have any problem, neither the girl nor her MIL understand. I don’t know how to deal with them!”
Case Two –
Our friend Ajit was telling me on the phone, “Hey, please explain to my mother about using diapers. Now she is 80 years old. I know that sometimes she has incontinence. But should she wear diapers ?”. Time we both go outside the house and sit in the garden of the society. When we go back home, mom starts yelling at Poonam’s name, “What are you doing wandering around ? Where did you disappear ? Then Poonam’s irritation at that; But if the mother uses diapers, many problems will be solved. Mother does not listen to anything…….Please tell mother once. “
Case Three-
Two friends were chatting during morning walk. One friend said to the other, “You are fine, lady, your son lives abroad. Son-in-law comes for four-eight days. Appreciate them, grandchildren, then you are free. I have a son and he lives very close to our house. Son-in-law is doing many careers and so on. No; but it takes us for granted to take care of the grandchild……. sometimes bring them from school, drop them from class….. sometimes the children want to go to a party, the son suddenly calls and sends the grandchild to stay. One of our relatives says, at this age you return to mother. It’s like being a father! You increase the responsibilities instead of reducing them!
Scenario Four –
I got a call from my college friend after reading an article in my newspaper. “Just came from the office. You wrote very well! But I said, today is Saturday evening. You should call me today itself and give you feedback. Otherwise, this is my time to talk to the American girl. I don’t talk to anyone else at that time; but I don’t call you on Saturday – Sunday. And tell her too, don’t do it either…..It’s your weekend, I’m not going to bother you, you’ve been working all week, take a break!
From all the four incidents mentioned above, it can be seen that, the complainants are in the age group of about 50 to 60 years. They have trouble dealing with people senior to them in the house. At the same time, they are getting tired while fulfilling the expectations of the juniors in the house i.e. children. Advances in science have increased life expectancy and new technologies have made new generations busy.
So this Middle Generation has to fight on many fronts simultaneously. Being older than us, they have to respect their elders, take care of their medicine, hospital, diet, pension work, bank work, entertain them, take them to their relatives or take time out for the people who come to visit them, on the other hand, help our children too, their careers are good. Taking care of their child to be able to decide their affairs by looking at their office.
Taking care of the house as a busy routine of daughter-in-law or daughter, they are not able to give time to their children, they also have to pay for them, make their favorite food at home so that the grandchildren can eat at home, take care of the ‘diet’ of the young generation in the house, have to do small and big work at home. – A lot of work has to be done and the list of tasks is never ending. The Middle Generation gets tired while doing all this.
The Middle Generation has such a Mindset when dealing with the elders that ‘they are old now’. He has worked hard for many years. Do not speak against the elders, do not insult them, how many days have they left ?
In some places, it can be seen that the people who are 75 years old do not take into account the age and problems of the people. Has their age lost their conscience ? Or do they not become autistic due to age ? The question arises.
In many places, the Middle Age Generation is showing patience and understanding to the young generation, giving freedom of thought to their children and allowing them to choose their career, spouse, place of residence, preserving their ‘privacy’. Also, to be able to stay in touch with them, to know what is going on with them, they are trying to stay with them by adopting new technologies, using tools like mobiles, computers and handling social media. But sometimes because of this, the young people feel that it is a prank from their parents.
There are few people in the Middle Generation who do not have the responsibility of the elders or for some reason do not have the responsibility of the children or grandchildren; But even such people do not seem to understand the problems of other people of their age. On the contrary, they are seen making fun of others saying ‘You are so stuck in all this…’ or even insisting that ‘be free from everything’.
I have a college friend who takes care of her mother, takes care of her grandson to ‘support’ her daughter’s career. She always says, “We are our generation and we are the ones who are born!”   (“आपली पिढी म्हणजे जात्यातले ही आम्ही आणि सुपातलीही आम्हीच !”)
Another thing that stands out about this Middle Age Generation is that women have to exercise more and men of the same age often take a more neutral stance. Moreover, they easily tell their wife, sister or sister-in-law that, ‘Don’t pay attention! You know this now, right ? Elder people will act like this ! Or even if their own children behave irresponsibly, they blame the woman in the house and say, ‘If you are the one who makes the habit ! So what do you expect now ?
Here men need to understand and cooperate with their equal women.
The Middle Generation means those who have to do both the seniors and juniors in the house. Often these seniors expect a lot of extra work from their aging sons-in-law, while the Younger Generation expects the same from their parents. So the dilemma is that of the Middle Generation !!
The person in the above four examples is a patient of mine who, after being given Homoeopathic Medicine, realized that they were self-examining what they could and could not do and passed it on to the next person. They started saying ‘NO’ to themselves at the right time wherever possible. This was the change in him with Homoeopathic Medicine and he no longer felt guilty about saying ‘NO’ and he accepted the change easily.
What can be done to reduce the suffering of people in this Middle Generation?…
  • Then both generations should have free communication with each other in their own language on time.
  • I have to self-examine what I can do and what I can’t do and pass it on to the previous and next generation.
  • You should also be able to say ‘NO’ to yourself at the right time.
  • We should accept the fact that there are some things we can’t do or change as we age without feeling guilty if we can’t help or make the older or the younger ones happy.
To accept this change, Homoeopathy has many types of effective Medicines which can change the Mentality of the patient or the person and start thinking rationally. So the change of “as found” (“सुपातले जात्यात जाताना “) can easily happen.
Therefore, it is possible to live a beautiful and happy life in the Middle Generation. If each Generation enters into the role of the other and understands the problems of that Generation and makes some thoughtful changes in themselves accordingly, then the problems of each Generation can be reduced to a large extent and the change will be tolerable for all.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123, 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-