खिन्नता व होमिओपॅथी / Melancholy  and Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJanuary 22, 2025 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry Sleep Disorders

खिन्नता व होमिओपॅथी

पुष्पाताईंचे वय अंदाजे 45 वर्षे. चार दिवसांपूर्वी त्यांच्या नवऱ्याला हृदयविकाचा विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले होते. परंतु ते गेले आहेत हे मान्य करायला त्या कोणत्याही परिस्थितीत तयार होत नव्हत्या. अजून हॉस्पिटलमध्येच ऍडमिट आहेत. हे लवकर बरे होऊन घरी येणार आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. त्या अजून रडल्या देखील नव्हत्या.
सुमित व्यवसायाने वकील. वय वर्ष 40. एका वर्षापूर्वी त्याची पत्नी रीना हिचे अपघाती निधन झाले होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम. तसेच दोघांमधील ही अड्जस्टिंग खूप चांगले होते. सुखाचा संसार चालला असतानाच रीनाच्या अकाली जाण्याने सुमेध पूर्णपणे कोलमडून गेला होता. पहिले काही महिने तो सुन्नपणे बसून होता. वकिलीचे काम बंदच होते. कोणाशी बोलण्याची इच्छा होत नव्हती. सहा महिन्यानंतर नातेवाईकांनी परत परत सांगितल्यानंतर त्याने कामास सुरुवात केली, पण पूर्वीसारखा उत्साह नव्हता. रीनाच्या घरातील सर्व गोष्टी त्याने जिथल्या तिथेच ठेवल्या होत्या. कधी कधी त्याला ती आपल्याशी येऊन काहीतरी बोलते आहे, असे वाटायचे. कधी कधी तो एकटाच तिच्या फोटो समोर येऊन रडायचा. त्याचे जेवणा-खाण्यावर लक्ष नसल्यामुळे तब्येत ढासळली होती.चेहऱ्यावरचे तेज लोप पावले होते. आयुष्य जणू कसेबसे ओढत होता.
वरील दोघांनी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती अचानकपणे गमावली होती.
पुष्पाताईंना धक्का सहन झाला नव्हता. नवऱ्या शिवाय आयुष्याची त्या कल्पनाच करू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या मनाने नवऱ्याने नसणे नाकारले होते.
सुमेध रीनाची जाणे मान्य केले होते, पण आतून तो पूर्णपणे कोलमडून गेला होता. तिच्याशिवाय जगणे त्याला असह्य वाटत होते. एक वर्ष उलटून गेले तरी त्याच्या दुःखाची तीव्रता अजिबात कमी झाली नव्हती.
तसे पाहिले तर, दोघेही काही मानसिक आजारी नव्हते. त्यांना झालेले दुःखही सहज सामान्य प्रतिक्रिया होती. आपल्या जवळच्या व्यक्तींचा मृत्यू ही जास्त तणावाची घटना असते व  घटना अकाली घटना घडली असेल तर तीव्रता अधिकच असते. अशा तणावाला सामोरे गेलेली व्यक्ती काही ठराविक मनोवस्थेतून जाते.
पहिली प्रतिक्रिया असते  ती तीव्र मानसिक धक्क्याची.
ही बातमी कळल्यानंतर व्यक्ती बधीर सुन्न होउन जाते. त्यांचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. दुःख आवेगाने ती एक तर स्तब्ध होते किंवा मोठ्याने रडायला लागते. या स्थितीत थोडा वेळ गेल्यानंतर ती भानावर येते व बाकीचे गांभीर्य लक्षात येते व आता ती व्यक्ती परत कधीच येणार नाही याची त्याला जाणीव होती. त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पना सहन झाल्याने घडलेली घटनात्मक नाकारायला लागते. ही (Denial-डिनायलची) नकाराची अवस्था असते. या अवस्थेत काही तास ते काही दिवस ही राऊ शकतात.
आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा गोष्टीला आपण मुकलो आहोत, ही भावना चिंता करते. ती गोष्ट गमावल्यावर वाईट वाटते.
  • खिन्नता ही वाईट वाटल्याची तीव्र किंवा दीर्घकाळ टिकून राहणारे स्थिती असते.
  • खिन्नतेमध्ये वाईट वाटण्याच्या जोडीला थकवा, निरुत्साह व आता आपल्याला कोणी मदत करू शकणार नाही आणि भविष्यात काही बरे होण्याची आशा नाही असे वाटत राहते.

 

  • चेहऱ्यावर खिन्नतेचा भाव असतो. आवाज खोल जातो. उठणे,बसणे,चालणे, संथ होते. आपल्या जवळच्या व्यक्तीला (पती-पत्नी, माता-पिता, भाऊबंद, मित्र, मैत्रिण) जेव्हा देवाज्ञा होते तेव्हा प्राथमिक मन, मानसिक स्थितीचे स्वरूप एक धक्का-  शॉक या प्रकारचे असते. मन मोकळे होते. एक पोकळी निर्माण झाल्याची भावना होते. असे काही घडलेच नाही असे मन मानू लागते.(डिनायल) नकार.
  •   त्यानंतर राग, चिंता व दुःख अशा भावनांची लाट येते. भूक लागेनाशी होते. वजन घटते. झोप नीट लागत नाही. बहुतेक वेळा जाग लवकर येते व मनात खिन्नता जाणवते. म्हणून एकाग्र होण्यात अडचण जाणवू लागते. याच सुमारास अपराधीपणाची भावना निर्माण होते. आपले कुठेतरी चुकले, या चुकीमुळे व्यक्ती देवाघरी गेली असे वाटू लागते.त्या व्यक्तीचे बोलणे ऐकू येत असल्याचे भास होऊ लागतात. कधी कधी संबंधात घटना आत्ताच डोळ्यासमोर घडल्याचा भ्रम होतो.
या  घटना केवळ जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनेच होतात असे नाही, तर मोठे आर्थिक नुकसान झाले किंवा होईल असे वाटले तरी अशा स्थितीतून मन जाते.
त्याचप्रमाणे मानहानी झाली किंवा होईल असे वाटले तरी असेच घडते. जेव्हा कोणतीही घटना घडलेली नसताना तीव्र खिन्नता जाणवते, तेव्हा एक मनोविकाराचा भाग असतो. अशा मनोविकार व्यक्तीला जीवनात कशातच रस वाटेणासा होतो. थोड्याही वेळे पुरता कशातही  आनंद वाटत नाही. खरोखरीच काही चांगले जरी घडले तरी बरे वाटत नाही. या खिन्नतेच्या भावना सकाळच्या  प्रहरी जास्त जाणवतात.
अनेक अंर्तग्रथींच्या आजारात रुग्णांच्या प्राथमिक तकरीचे स्वरूप खिन्नतेच्या वर्णनाशी मिळते जुळते असते.
 थायरॉईड ग्रंथीचे कार्य नीट न होणे, हायपोथायरॉईडीझम हा एक  आढळणारा विकार आहे. यात थकवा, भास होणे, जीवनातील रस जाणे,इत्यादी लक्षणे दिसतात.
खिन्नतेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला जेव्हा  परिस्थिती बदलली नाही असे लक्षात येते, तेव्हा त्या गोष्टीचा स्वीकार होतो. परंतु अगोदर झालेल्या नुकसानामुळे उदासीनतेची भावना दाटून येते. स्वतःची भविष्याची चिंता सतावायला लागते. अधून-मधून रडणे, सुन्न बसणे, दैनंदिन व्यवहारात लक्ष नसणे, ही लक्षणे जाणवतात.
नंतर हळूहळू आयुष्य पूर्ववत  स्थितीला यायला लागते. गेलेल्या व्यक्तीच्या गत:स्मृती जपून तो व्यक्ती आपल्या पूर्ववत जबाबदाऱ्या उचलतो.सामाजिक संबंध प्रस्थापित करतो. आपलं मन इतर व्यक्तींमध्ये, कामांमध्ये गुंतवतो. पूर्वायुष्याप्रमाणे आनंद घ्यायला सुरुवात करतो. याला ” रिव्होल्युशनरी (Revolutionary State) अवस्था”  “पूर्ण स्वीकार ” म्हणतात. रिव्होल्युशनची अवस्था यायला प्रत्येक व्यक्तीला वेगळा वेळ लागतो. सामान्यतः काही महिने ते वर्षापर्यंत ही अवस्था राखली जाते.

 

 मृत व्यक्तीशी असलेली जवळीकता, परस्पर संबंध, मृत्यूची पूर्वकल्पना असणे किंवा नसणे, कौटुंबिक परिस्थिती व सहाय्य या सर्व गोष्टींवर हा कालावधी अवलंबून असतो.
सामान्यपणे या अवस्थेतून जाणाऱ्या व्यक्तीला सहकार्य, समजून घेणे, आधार देणे या पलीकडे उपचारांची गरज पडत नाही. परंतु काही व्यक्ती या दुःखात इतके गुरफटून जातात (उदाहरणार्थ सुमेधचे) वरीलपैकी कुठल्यातरी अवस्थेत ते अडकून पडतात व पूर्ववत आयुष्य सुरू करू शकत नाहीत.
अशावेळी डॉक्टरांचा औषध व सल्ला त्यांना पूर्ववत जगायला मदत करू शकतो.
होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीमध्ये अशा खिन्नतेवरती अनेक चांगली, गुणकारी, महत्त्वपूर्ण औषध उपलब्ध असून त्याच्यामुळे रुग्ण पूर्वीप्रमाणे आयुष्य जगायला सुरू करू शकतो. विचार बदलून, परिस्थिती अपरिहार्यता  स्वीकारून, इतर जबाबदारी स्वीकारायला तयार होतो व रुग्ण पुढील आयुष्य पूर्वीप्रमाणे आनंदाने, सहजतेने जगू शकतो.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123, 9404507723
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

————————————————————

       Melancholy  and Homoeopathy

Pushpatai’s age is approximately 45 years. Four days ago, her husband died due to a severe heart attack. But she was under no circumstances ready to admit that her husband  was no more. There are still admissions in the hospital. She said that he will recover soon and come home. She hadn’t even cried yet.
Sumit is a lawyer by profession. Aged 40. A year ago his wife Reena died in an accident. Both love each other very much. Also the adjustment between the two is very good. Sumit was completely devastated by Reena’s untimely death while both were living a happy life. For the first few months he sat numbly. The lawyer’s work was closed. He didn’t want to talk to anyone. After six months, after being repeatedly told by relatives, he started work, but there was no enthusiasm. He kept everything as it is in Reena’s house where it belonged. Sometimes he felt that she was coming to him and talking to him. Sometimes he used to cry alone in front of her photos. His health had deteriorated due to lack of attention to food. The glow on his face had disappeared. Life seemed to drag on.
The above two had suddenly lost the most important person in their lives.
Pushpatai could not bear the shock. She could not imagine life without her husband. So her mind rejected not having a husband.
Sumit had accepted Reena’s departure, but inside he was completely devastated. He found it unbearable to live without her. Even after a year passed, the intensity of his grief had not abated at all.
From that point of view, both of them were not mentally ill. Even the pain they felt was a normal reaction. The death of a loved one is a highly stressful event and the intensity is greater if the event is premature. A person exposed to such stress goes through certain Mental states.
The first reaction is one of intense shock. After hearing this news, the person becomes numb. They don’t believe him. In an impulse of Grief she either freezes or starts crying loudly.
After some time in this state she regains consciousness and realizes the rest of the seriousness and now he realizes that the person will never come back. Having endured the idea of ​​life without him, one begins to reject what has happened. This is the state of  Denial. In this state, it may cry for a few hours to a few days.
Anxiety is the feeling that we are missing out on something that we have. It feels sad to lose that thing.
MEALENCHOLY  is a chronic or prolonged state of feeling bad.
Melancholy is accompanied by feelings of exhaustion, discouragement, and a sense of helplessness and hopelessness in the future.
There is a sad expression on the face. The voice deepens. Getting up, sitting, walking becomes slow. When someone close to you (husband, wife, parents, brothers, friends) commits to God, the primary state of Mind is one of shock. The Mind is free. There was a feeling of emptiness. The Mind begins to believe that nothing like this has happened. (Denial)
Then comes a wave of Emotions like Anger, Anxiety and Sadness. I was not getting hungry. Weight decreases. Not sleeping well. Often wakes up early and feels depressed. Therefore, it becomes difficult to concentrate. It is around this time that feelings of guilt arise.  The person starts to feel that, due to his or her mistake that person died. Sometimes in a relationship there is an illusion that the incident happened right before the eyes.
These events are not only caused by the death of a loved one, but also by a major financial loss or perceived loss.
Similarly, even if defamation has occurred or is thought to occur, the same occurs. When intense sadness is experienced when no event has occurred, a psychotic episode is present. Such a psychotic person feels interested in nothing in life. There is no joy in anything even for a short while. Even if something really good happens, it doesn’t feel good. These feelings of sadness are more felt in the morning time.
In many endocrine diseases, the patient’s initial presentation is consistent with the description of depression.
An underactive thyroid gland, hypothyroidism is a relatively new disorder. Symptoms of fatigue, moodiness, loss of interest in life, etc. are seen in this.
When a person in Melancholy realizes that the situation has not changed, then they accept it. But a sense of depression comes over the previous loss.
One starts worrying about one’s future. Symptoms include occasional crying, sitting numb, lack of attention in daily activities.
Then slowly life starts to return to normal. By preserving the past memory of the person who has passed away, that person takes up his previous responsibilities. Establishes social relations. Involves his/her mind in other people and activities. Begins to enjoy as before. This revolutionary stage is called “full acceptance”. Each person takes a different time to reach the stage of revolution. This state is usually maintained for a few months to a year.
The duration depends on closeness to the deceased, mutual relationship, premonition of death or not, family situation and support.
Usually a person going through this stage does not need treatment beyond cooperation, understanding and support. But some individuals get so engrossed in this suffering (Sumit for example) that they get stuck in one of the above states and cannot start life afresh.
In such cases the medicine and advice of the doctor can help them to restore the world.
There are many good, effective, important Medicines available in Homoeopathic System for such Melancholic state and due to which the patient can start living life as before. By changing the Mind, accepting the inevitability of the situation, becoming ready to accept other responsibilities and the patient can live the next life happily and easily as before.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123, 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-