एखाद्याला मानसिक आजार का झाला, याचं मूळ कारण नेहमी सापडतंच असं नाही. व्यक्ती नैराश्यात गेली म्हणजे तिच्या नैराश्याला प्रत्येक वेळी कारण (ट्रिगर) असेल असं नाही. काही लोकांना मानसिक आजार होतात आणि इतरांना होत नाहीत असं का, याचं नेमकं उत्तर आधुनिक विज्ञानाला अद्याप समजलेलं नाही. याचे उत्तर होमिओपॅथिक शास्त्रामध्ये निश्चितपणे मिळू शकते. जणूकीय रचना, ताण-तणाव आणि हिंसा या काही गोष्टी मात्र कारणं म्हणून लक्षात आले आहेत.
दुसरा गैरसमज –
असा, की नैराश्य म्हणजे प्रत्येक वेळी रडू येणं, दु:खी वाटणं किंवा इतरांपासून वेगळं, एकटं एकटं राहणं, एवढीच लक्षण असतात. परंतु तसं नाही, अनेक नैराश्यग्रस्तांमध्ये अस्वस्थ होणं, वैतागणं, चिंता करणं आणि हिंसक वागणं दिसतं. त्यांना अशा लक्षणांमुळे स्वतःबद्दल शरम वाटत असते; किंवा नसतेही.
नुकत्याच घडलेल्या घटनेत बंगलोरच्या उच्चशिक्षित उद्योजक सूचना सेठनं स्वतःच्या मुलाची हत्या केली, असं तिच्यावर आरोप आहे. मात्र तिने या हत्तेचा इन्कार केला आहे. शिवाय या प्रकरणाचा अद्याप सुरू आहे, त्यामुळे त्याविषयी बोलणं योग्य होणार नाही.
मात्र यापूर्वी अनेक मातांनी प्रसूतीनंतरच्या नैराश्यामधून त्यांच्या अर्भकांना, मुलांना मारल्याच्या घटना घडल्या आहेत आणि आपल्याही वाचनात आले असेल.
जवळजवळ 20 वर्षांपूर्वी मी निवासी डॉक्टर म्हणून काम करत होतो, तेव्हा चित्रपटसृष्टीमधल्या एका प्रसिद्ध व्यक्तींनं एका रुग्ण स्त्रीच्या उपचारांसाठी विनंती केली होती. राजस्थान मधल्या त्या स्त्रीने तिच्या पहिल्या दोन मुलांना जन्मत:च मारून टाकलं होतं. आता ती पुन्हा गर्भवती होती. आम्ही तिला रुग्णालयात दाखल करून घेतलं आणि मानसोपचार सुरू केले. आज ती आणि तिचं मूल दोघेही जिवंत आहेत.
माझ्याकडे एक तरुण आई मुलाच्या जन्मानंतर उपचार घ्यायला आली होती. माझ्याशी बोलताना तिने कबूल केलं, की तिनं तिचं पहिलं मुल एक वर्षाचे झाल्यावर त्याला गुदमरून मारण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्याच्या मुलाच्या बाबतीत असं घडू नये, म्हणून तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी होमिओपॅथिक उपचाराचा मार्ग अवलंबिला होता. आज तिची दोन्ही मुलं मोठी झाली आहेत आणि त्यांच आयुष्य व्यवस्थित सुरू आहे. मात्र ही आई आजही होमिओपॅथिक उपचार घेत आहे. तिची मानसिक स्थिती चांगल्या प्रकारे सुधारली आहे.
तिसरा गैरसमज –
व्यक्ती सुस्थितीत आणि सधन आहे म्हणजे, तिचं मानसिक आरोग्य चांगलं राहील.
महाराष्ट्र एक हे एक सधन राज्य मानलं जातं आणि देशातल्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या पहिल्या 10 राज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ? खरंतर या सगळ्याच कंपन्यांनी,कार्यालयांनी ठराविक काळाने कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून घ्यायला हवी.
सहसा, जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशनचे कारण पुढे करून हे टाळलं जातं. याचा संबंध व्यक्तीचे मूलभूत हक्क-विशेषत: व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहावी याचा त्यांना असणारा अधिकार अबाधित ठेवण्याची आहे. या कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती अबाधित रहावी, परंतु त्यांचा जीव वाचला पाहिजे, त्यांचे शारीरिक-मानसिक आरोग्य उत्तम टिकलं पाहिजे. अधिकारांवर अति भर देण्यात माणसाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, असं माझं वैयक्तिक मत आहे.
एखाद्याचे व्हिजिटिंग कार्ड समोरच्यावर मोठा प्रभाव पडणारं असतं. कंपनीकडून भरपूर इन्सेंटिव्ह मिळणं किंवा मोठी बढती मिळणे या गोष्टी त्याला आत्महत्या करण्यापासून किंवा हिंसक वागण्याच्या प्रवृत्तीपासून परावृत्त करणाऱ्या आहेत असं होतं नाही.
आमच्या निरीक्षणानुसार, कारपोरेट क्षेत्रात घडणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चाललं आहे, पण खरे आकडे कधीच उघडे होत नाहीत. बऱ्याचदा हिंसात्मक वागणं आणि आत्महत्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात.
अनेक मोठ्या कंपन्या ऑनलाइन समुपदेशन करणाऱ्या संस्थांची सेवा घेतात किंवा कर्मचाऱ्यांसाठी म्हणून एखादा माणसोपचारतज्ञ नेमतात. मात्र त्यांना फारसा फायदा होत नाही. मानसिक आजारांशी समाजात जो एक कलंक जोडला गेलाय, त्याचा अडथळा होतो. कार्पोरेट कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी भक्कम आणि सर्व समावेशक धोरणाची आवश्यकता आहे आणि सध्या तरी आमच्या पाहण्यात असं आलेलं नाही.
जो कर्मचारी मानसिक दृष्ट्या आजारी पडतो, त्याला अनेकदा कंपनीकडून तगादा आणि मानहानीकारक वागणूक सहन करावी लागते. त्यांचे वरिष्ठ देखील पुष्कळ आपल्या कर्मचाऱ्यांविषयी अजिबात सहानुभूती न दाखवणारे आणि कर्मचारी ठरवून दिलेलं लक्ष गाठतोय का यावरच भर देणारे असतात. खूपदा कंपन्यांचा मनुष्यबळ विभाग या रेट्यास बळी पडतो आणि संबंधित कर्मचाऱ्याला त्यांच्याकडून सहानभूतीचा पूर्ण अभाव आणि भावनिक हिंसा यांस तोंड द्यावे लागतं. अशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, जिथे आपल्या ‘वर्क एथिक्स’ बद्दल भलावंण केली जाते.
कंपनीत वैविध्य आणि सर्वसामावेशकता या मूल्यांना मूल्यांचा लगेच स्वीकार केला जातो; पण मानसिक आरोग्याच्या विषयावर मात्र थातुरमातूर उपाययोजना केल्या जातात.
काही वर्षांपूर्वी इथल्या एका बँकेच्या प्रमुखानं असं सांगितलं होतं, की ते रोज आपल्या मुलांची खेळता यावं म्हणून संध्याकाळी पाच वाजता घरी जातात; शिवाय ते मोबाईल फोनसुद्धा वापरत नाहीत. पण मला असं वाटतं की, त्यांचा अगदी शेवटचा कर्मचारी पाच वाजता घरी जाऊ शकला तरच या बोलण्याला कौतुकाची दाद देता येईल.
कर्मचाऱ्याला भावनिकदृष्ट्या भंडावून सोडलं की, तू भरपूर काम करेल- अर्थात कामाच्या बाबतीतली आकड्यांमधली लक्ष अधिकाधिक पूर्ण करेल, या समाजाला नामवंत कंपन्याही बळी पडत आहेत. ” स्केअर अँड इन्स्पायर “, असा शिरस्त आहे. एका प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनीतला एक हुशार कर्मचारी व्यवस्थापनाकडून मागे लागलेल्या तगाद्यापुढे आणि शाब्दिक तलवारच घेऊन बसलेल्या ‘एचआर ‘पुढे पुरता मोडून पडल्याचे उदाहरण माझ्यासमोर आहे. त्याला भीती दाखवून उर्मटपणे बोलून कामासाठी ‘अनफिट’ घोषित करण्यात आलं. नंतर अर्थातच वरिष्ठांशी बोलल्यावर परिस्थिती आटोक्यात आली.
व्यक्तीच्या मनातल्या अस्वस्थतेचं किंवा त्या दृष्टीने भविष्यात घडणाऱ्या अपघाताचं निदान तेव्हाच होऊ शक्य होईल, जेव्हा कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि गृहसंकुलं अशा ठिकाणी वारंवार मानसिक आरोग्य तपासणीसाठी शिबिर घेतली जातील आणि संबंधित संस्थांमधल्या वरिष्ठ व्यक्ती आपल्या कुटुंबासह त्या शिबिरात तपासणीसाठी सहभागी होतील…… इतरही कर्मचारी तपासणीस प्रवृत्ती होतील.हे सर्व करूनही अपघात घडतीलच; पण अरिष्ट टाळण्याची शक्यता जास्त असेल.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, जगात प्रत्येक 8 व्यक्तींपैकी 1 जण मानसिक आजाराने ग्रस्त आहे. भारतात हेच प्रमाण 7 व्यक्तींमधील 1 असा आहे. आपल्याकडे ‘स्वच्छ भारत’, ‘करोना लसीकरण’ आणि ‘उज्वल योजने ‘हून मोठी मोहीम आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी लागणार आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असेल तरच हे शक्य आहे.
लोकांच्या कार्यालयीन कामांच्या ताणाबरोबरच आज मोठ्या प्रमाणात ताण वाढतो आहे तो कौटुंबिक स्तरावर. निरोगी भावनेपेक्षा आक्रमकता, तिरस्कार, बदल्याची भावना यांचा माणसांवर पगडा आहे. कौटुंबिक न्यायालयात एकमेकांविरोधक उभ्या टाकलेल्या बहुतेकांच्या तोंडी ‘मी त्याला किंवा तिला चांगला धडा शिकवीन’ हे शब्द असतात. एकमेकांशी आपल्या भावना ‘शेअर’ करण्यासाठी लोकांकडे वेळच नाही. कुटुंबात आणि व्यक्ती व्यक्तींमध्ये भावनिक देवाणघेवाणीसाठीचा वेळ कमी होतोय. वाहिन्यांवरच्या चर्चांमधला गोंगाट, रस्त्यावरचा वाढता गोंधळ किंवा कौटुंबिक मतभेदांमध्ये वाढणारे आवाज अधिक झालेत. व्यक्ती एकटी आणि एकाकी पडणं हे चित्र आता सामान्य वाटतं.
राष्ट्रीय आकडेवारीनुसार आत्महत्या (एनसीआरबी 2022) करणाऱ्या प्रत्येक 3 व्यक्तींमागे एकाचं कारण कौटुंबिक समस्या हे असतं.
‘ न्यूरो- सायकियाट्री’ बाजाराची उलाढाल 12000 कोटी रुपयांच्यावर गेल्याचं एका बाजार संशोधन संस्थेच्या निरीक्षण आहे. मानसोपचारातल्या औषधांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या काही महिन्यात मानसिक आरोग्यविषयक थेरपीज् घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या 80 ℅ ने वाढल्याचं ‘माईंड पियर्स’ या मानसिक आरोग्यविषयक व्यासपीठाचे म्हणणं आहे. यातले 85% लोक 35 वर्षाच्या आतले आहेत. जर 140 कोटी भारतीयांचे मानसिक-भावनिक आरोग्य चांगलं असेल तरच भारताची अर्थव्यवस्था पुढील काही वर्षात पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा निश्चित ओलांडेल.
सूचना सेठ प्रकरणानंतर व्यक्तीचं शिक्षण, तिनं कमावलेले नाव, यश, आर्थिक भरभराट आणि तिला हाताळावी लागणारी भावनिक आंदोलन या बाबी बद्दल फार चर्चा केली जात आहे.
मात्र भावनिक पोकळी असेल, तर उत्तम शिक्षण आणि पैसा या गोष्टी केवळ वरवरच्या ठरतात. व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची हमी शिक्षण व त्याचा भौतिक यश देऊ शकणार नाही, परंतु होमिओपॅथिक उपचार पद्धती नक्की देऊ शकते. होमिओपॅथीमध्ये मानसिक आरोग्यावर काम करणारी अनेक गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. या औषधांच्यामुळे भावनिक पोकळी निश्चितपणे कमी होऊन मानसिक तसेच शारीरिक आरोग्याची हमी देता येणे शक्य आहे.
होमिओपॅथिक औषधांच्यामुळे लोकांच्या कार्यकालीन कामांचे ताण तसेच कौटुंबिक स्तरावर असणारी भावनिक आक्रमकता, तिरस्कार, बदल्याची भावना अशा अनेक भावनांची आंदोलनं त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे हाताळता येणे शक्य होतं.
वरील लेखावरून लक्षात आलं असेलच की, कौटुंबिक स्वास्थ्याचा भावनिक आरोग्याशी किती संबंध आहे ते ?
होमिओपॅथिक औषधांमुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची हमी देता येते व त्याचबरोबर बुद्धी आणि मन यांच्यातील तोलदेखील सांभाळता येण्यास मदत होते. त्याचबरोबर मानसिक आरोग्यबिघडलेल्या व्यक्तींच्या मनात आत्महत्या सारखे विचार येतात त्यापासून त्यांना वाचवणे शक्य आहे. त्याचप्रमाणे नैराश्यग्रस्त व्यक्तींमध्ये असणारी लक्षणे- अस्वस्थ होणे, वैतागणं, हिंसक वागणं देखील होमिओपॅथिक उपचारांमुळे निश्चितपणे कमी होतं आणि त्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक उत्तम राहू शकते.