वेदना शारीरिक आजार मानसिक आणि होमिओपॅथिक उपचार-1 / Pain Physical Illness Mental and Homoeopathic Treatment-1

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJune 21, 2025 Allergic Disorders Anxiety Children's Illness Female Problems General Information Geriatric Problems Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry Sleep Disorders

 

वेदना शारीरिक आजार मानसिक आणि होमिओपॅथिक उपचार-1

नंदाताईंना घेऊन त्यांचे यजमान हातात भली मोठी फाईल घेऊन माझ्या दवाखान्यात आले. खुर्चीवर बसताना ते म्हणाले, “शेवटचा उपाय म्हणून तुमच्याकडे आलो आहोत डॉक्टर !” .
त्यांनी दिलेली फाईल व्यवस्थित पाहिली असता असे लक्षात आले की, मागील चार-पाच वर्षांची सर्व औषधे चिठ्ठ्या रिपोर्ट्स यांनी व्यवस्थित जपून ठेवले होते. आतापर्यंत जवळपास दहा ते बारा स्पेशल डॉक्टरांना दाखवून झाले. त्यांनी विविध प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या, सोनोग्राफी, सि.टी.स्कॅन, एम.आर.आय.इत्यादी तपासण्या करून घेतल्या होत्या. जवळपास सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते.तसेच नंदाताईंनी सर्वच औषधोपचार देखील व्यवस्थित घेतले होते.
बहुतेक डॉक्टरांनी तुम्हाला कसलाही शारीरिक त्रास नाही, टेन्शन घेऊ नका असा सल्ला दिला होता. वैद्यकीय उपचारांनी फरक पडत नाही मग “ते काहीतरी बाहेरचे असावे”म्हणून तेही सर्व उपाय करून झाले होते.
साधारणपणे पाच वर्षापूर्वी त्यांच्या किरकोळ तक्रांरींना सुरुवात झाली. कधी कंबर दुखणे, कधी डोके दुखणे, कधी पाठ दुखणे, यावर उपचार घेतल्यावर तात्पुरता आराम मिळत असे. हळूहळू या तक्रारीचे प्रमाण वाढत गेले व त्याप्रमाणे तीव्रताही. यासारख्या काही ना काही तक्रारी त्यांना जाणवू लागल्या, कधी चक्कर, कधी मळमळ, कधी पोटात आग पडणे, कधी लघवीला जळजळ होणे, कधी अंगात ताप आल्यासारखा वाटणे, हाता-पायाला मुंग्या येणे, डोळे जड होणे, अशा एक न अनेक तक्रारी सतत जाणवत राहिल्या. या शारीरिक तक्रारीमुळे घरातील काम होईनासे झाले. त्यामुळे त्यांची चिडचिड वाढत गेली.
 नंदाताईंशी चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले  की, त्यांना सर्व शरीरातच प्रत्येक ठिकाणी काही ना काही त्रास होत होता. त्यांची लक्षणे कोणत्याही ठराविक शारीरिक आजारांकडे निर्देश करत नव्हते. शारीरिक तपासणी केली असता कोणताही शारीरिक  आजाराच्या खुणा जाणवल्या नाहीत. त्यांच्या घरात सर्व काही चांगले चालले होते. कसलीच टेन्शनची गोष्ट नव्हती, परंतु त्यांच्या आजाराचे निदान न झाल्याने व उपचारांनाही फरक न पडल्याने त्या कमालीच्या त्रस्त झाल्या होत्या.
मी त्यांना म्हणालो की, तुम्हाला कुठलाही शारीरिक आजार नाही, याचा अर्थ तुम्हाला आजार नाही असा होत नाही.
तुम्हाला “सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर” नावाचा मानसिक आजार आहे.
सोमा म्हणजे बॉडी म्हणजे शरीर. या आजारामध्ये सर्व लक्षणे हे शारीरिक असतात परंतु रुग्णाला कुठलाही शारीरिक आजार झालेला नसतो. कोणतेही शारीरिक लक्षण जाणवायला लागले की, सर्वप्रथम त्यासाठी कोणते शारीरिक कारण असेल याचा शोध घेतला जातो व त्यानुसार उपचार केले जातात. शरीरात घडणारे  बदल, शारीरिक लक्षणे निर्माण होण्यास जबाबदार असतात.
त्यामुळे  लक्षण समूहावरून आजार कोणता असेल याबद्दल अंदाज येतो. त्यानुसार काही तपासण्या करून आजाराचे निदान निश्चित करण्यात येते.
परंतु “सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर” मध्ये रुग्णांनी सांगितलेली लक्षणे कुठल्याही ठराविक आजार दर्शवित नाहीत. त्यामुळे अशा रुग्णाला कोणताही शारीरिक आजार नाही याचे निदान होते, परंतु रुग्णाला अनेक लक्षणे जाणवत असतात व त्याचा त्रासही होत असतो आणि हा त्रास खोटा नसतो तेव्हा शारीरिक कारणे बाजूला जातात तेव्हा हा त्रास मानसिक कारणांनी होत असावा अशी शंका घेण्यास जागा निर्माण होते.
परंतु रुग्ण कोणत्याही मानसिक त्रासाबद्दल सांगत नाही किंवा सर्व अलबेल आहे, कसलेच टेन्शन नाही उलट शारीरिक त्रासामुळे मानसिक तणाव जाणवतो अशी उत्तरे मिळतात.
जेव्हा रुग्णाच्या मानसिक स्थितीबद्दल बोलले जाते तेव्हा मानसिक लक्षणे ठळकपणे जाणवत नाहीत. परंतु उदासीनतेच्या आजाराचे निदान करणे सोपे जाते.
या आजारात रुग्ण स्वतःच्या लक्षणांच्या उत्पत्ती (निर्माणा) साठी कारणीभूत असणाऱ्या मानसिक कारणांविषयी अनभिज्ञ असतो. अशा रुग्णांमध्ये त्यांच्या मानसिक कारणांचा शोध घेणे व शारीरिक लक्षणे नियंत्रणात आणणे व त्यामागील मानसिक कारण रुग्णासमोर आणून योग्य ती उपाययोजना करणे ही दुहेरी भूमिका होमिओपॅथिक डॉक्टरांना करावी लागते.
 नंदाताईंच्या आजाराचे कारण मानसिक आहे  त्याबद्दल कसलीही शंका नव्हती. खोलात जाऊन चौकशी केली असता समजले की, लग्न होऊन सासरे आल्या तेव्हा एकत्र कुटुंबात राहत होत्या, सासूबाईंच्या स्वभाव कडक असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना बोलणी खावी लागत. सर्वांची मर्जी सांभाळताना त्यांची दमछाक व्हायची. तरी सासूबाईंचे टोमणे कमी झाले नाहीत. दोन नणंद व दिरांची लग्ने व्हायची होती व त्यांचे पती सर्वात मोठे असल्यामुळे वेगळे राहण्याची सोय नव्हती. माहेरी लाडात वाढलेल्या नंदाताईंना तो काळ खूप त्रासाचा गेला होता. त्यांना आपला हा त्रास कोणाजवळ बोलून दाखवता आलाच नाही.  आई-वडिलांना त्रास नको म्हणून, त्यांना काही सांगितले नाही व पतीदेवांना काही सांगितले तर, “लक्ष देत जाऊ नकोस” असा सल्ला देऊन ते मोकळी व्हायचे. त्यामुळे मनातच सर्व गोष्टी दाबून त्या येणाऱ्या दिवसाला सामोऱ्या जायच्या. नंतर नंणंद व दिरांचे लग्न झाले. सासुबाई मरण पावल्या. मधला काळ तसा सुखात गेला, परंतु “आपल्याला कोणी समजून घेतले नाही”, ही सहल त्यांच्या मनात कायमची राहिली.
पाच वर्षांपूर्वी मुलाचे लग्न होऊन सून घरात आली. तेव्हा त्यांना स्वतःच्या सासुरवासाची आठवण झाली. सुनेशी त्यांचे खूप चांगले संबंध आहेत, परंतु तेव्हापासून त्यांच्या शारीरिक त्रासाला सुरुवात झाली. इतकी वर्ष मनात साठवून ठेवलेला मानसिक ताण शारीरिक लक्षणांची सुरुवात होऊन बाहेर पडत होता. त्यांच्या त्रासामुळे घरातील सर्वजण त्यांची काळजी घेत होते, हे त्यांच्या मनाला सुखावणारे होते. त्यांच्या शारीरिक त्रासाचे हे खरे मानसिक कारण होय. “सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर” या आजारात रुग्णाच्या शारीरिक लक्षणांच्या मागे, काहीतरी मानसिक कारण असतेच. हे बऱ्याच रुग्णाच्या जागृत कक्षेत नसते. त्याचा आपल्याला त्रास होत आहे याबद्दलसुद्धा अनभिज्ञ असतात. अनेकदा मानसिक त्रास असे रूपांतर शारीरिक तक्रारीत होते.
ज्या तक्रारी शारीरिक आजारातून निर्माण होतात अशा तक्रारी रुग्ण सांगतो. असे होण्याचे कारण म्हणजे मानसिक तक्रारी सांगणे हा कमीपणा आहे असे त्या व्यक्तीला वाटत असते. अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक विकारांबद्दल असणारी अप्रति.
 “मानसिक” या शब्दाचा अर्थ “काल्पनिक” असा केला जातो. आपल्याला काही त्रास होतो आहे यावर यावर इतरांचा विश्वास नाही असे रुग्णाला वाटू लागते. अनेक व्यक्तींना आपल्या भावनांचे शब्दांकन करता येत नाही. त्यांचे शब्द भांडार अपुरे पडते व भावना व्यक्त करण्याची सवय नसते. वय वाढले असेल किंवा काही  सांस्कृतीक कल्पनांच्या पगड्याखाली भावनांचे प्रदर्शन हे कमजोरीचे लक्षण मानले गेले तर भावनांना प्रकट करण्यात अडथळे येऊ लागतात.
आपल्याला शारीरिक त्रासाचे महत्त्व पटले आहे परंतु मानसिक त्रास अजूनही  स्वीकाराहर्य नाही. एक तर टेन्शन  नको घेऊ नको असे सांगितले जाते किंवा दुर्लक्षित केले जाते. आपल्या मनाची संरक्षक रचना यासाठी कारणीभूत असते. स्वतःला मानसिक तणावांपासून दूर ठेवण्यासाठी आपले मन विविध मानसिक संरक्षण पद्धतींचा वापर करत असते.
ज्या गोष्टींचा आपल्याला आपल्या मनाला त्रास होतो तेव्हा ज्या समाजाला स्वीकारहर्य नाहीत त्या आपल्या सुप्त मनामध्ये दाबून टाकावे लागतात (रिप्रेशन). या आजाराच्या रुग्णाच्या मनात निर्माण झालेली भावनिक ऊर्जा ही (रिप्रेशनद्वारे)सूप्त मनामध्ये दडपून टाकण्याचा प्रयत्न होतो. अशावेळी ती ऊर्जा नष्ट न होता ती भावनिक स्वरूपातील ऊर्जा शारीरिक लक्षणांचे स्वरूप  घेऊन बाहेर पडते. अशा पद्धतीने त्या ऊर्जेचा निचरा होतो व मूळ स्वरूपातील मानसिक त्रासापासून बचाव होतो.
परंतु त्रास नष्ट न होता मानसिक आजाराचे शारीरिक त्रासामध्ये रूपांतर होते. पण त्रास सुरू राहतोच. मानसिक तणाव हे विविध स्वरूपाचे व काही असू शकतात.
पूर्वी झालेल्या त्रासदायक घटना, सध्याच्या आयुष्यातील त्रासदायक प्रसंग,
आर्थिक तणाव,
जवळच्या व्यक्तींविषयी चिंता,
भविष्याची चिंता,
आपापसातील मतभेद,
अपेक्षा पूर्ण न होणे,
जवळच्या व्यक्तींचे आजारपण,
विरह,
मृत्यू,
नातेसंबंधातील तणाव,
तसेच आपल्याच विचारातील द्वंद्व म्हणजे परस्परविरोधी विचार.
एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम व तिरस्कार या दोन्ही भावना अशी अनेक कारणे मानसिक आजारांना कारणीभूत ठरतात.
हे सर्व तणाव सूप्त  मनात (रिप्रेशनद्वारे) दडपल्यामुळे व्यक्तीच्या मन:पटलावर या गोष्टीसमोर नसतात. त्यामुळे मानसिक तणाव नाही अशी उत्तरे रुग्णांकडून ऐकायला मिळतात. या मानसिक कारणांपर्यंत पोहोचायला रुग्णाशी संवाद साधून खोलवर चौकशी करणे गरजेचे असते.
होमिओपॅथीमध्ये अशा भावनिक विकारांवर भरपूर औषधे असून त्या औषधांद्वारे  रुग्णाच्या आजार समूळ  नायनाट करता येतो. व त्याचबरोबर त्यांची मानसिकता बदलते.  त्यांच्या तक्रारी काल्पनिक नसून त्यांना शारीरिक वेदना होत्या पण कारणे मानसिक असल्यामुळे त्यांना शारीरिक आजार म्हणून केलेल्या उपचारांचा फायदा झाला नव्हता.
होमिओपॅथीक औषधांनी त्यांना चांगला फरक पडला.  त्यांचा आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. दबलेल्या भावनांचा योग्य निचरा झाल्यामुळे त्यांना हलके वाटायला लागले. आता त्या आपल्या व मुलाच्या संसाराचा आनंद घेत आहेत.
मानसिक व शारीरिक व्याधी कोणतीही असली तरी होमिओपॅथीक तज्ञ रुग्णाचा स्वभाव व मानसिक लक्षणांची सखोल चौकशी का करतात हे नंदाताईंच्या उदाहरणावरून लक्षात आले असेल !मानसिक दडपणातून बाहेर येण्यासाठी व मनाची शांतता लाभण्यासाठी होमिओपॅथी ही उत्कृष्ट परिपूर्ण उपचार पद्धती आहे.
“मनाची प्रसन्नता ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे”  हे होमिओपॅथिक उपचार पद्धतीने पूर्णपणे शक्य होते.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

————————————————————

Pain Physical Illness Mental and Homoeopathic Treatment-1

 

Nandatai and his host came to my clinic with a big file in hand. Sitting on the chair, he said, “Doctor, we have come to you as a last resort .!”
On looking at the file given by him properly, it was noticed that all the reports & prescriptions of medicines of the last four-five years were  kept properly. So far about ten to twelve special Doctors have been shown. He underwent various blood tests, sonography, CT scan, MRI etc. Almost all the reports were normal. Also Nandatai had taken all the Medicines properly.
Most of the doctors advised you that you have no physical problem, don’t take tension. Medical treatment didn’t make a difference then “it must be something outside” so that too was done with all the remedies.
About five years ago, their minor complaints started. Sometimes waist pain, sometimes headache, sometimes back pain, after treatment, there was temporary relief. Gradually the volume of this complaint increased and so did the severity. He started feeling some or the other complaints like this, sometimes dizziness, sometimes nausea, sometimes burning in the stomach, sometimes burning urine, sometimes feeling like heat in the body, tingling in hands and feet, heavy eyes, etc. Due to this physical complaint, housework was not done. So their irritation increased.
After discussing with Nandatai, it was realized that he was suffering from some or the other in every part of his body. His symptoms did not point to any specific physical ailments. Physical examination revealed no signs of physical illness. Everything was going well in their house. There was no tension, but she was extremely distressed as her illness was not diagnosed and the treatment did not make any difference.
I told them that you don’t have any physical ailment, it doesn’t mean you don’t have any disease.
You have a Mental illness called “Somatoform Disorder “.
Soma means Body. In this disease all the symptoms are physical but the patient does not have any physical disease.
When any physical symptom is felt, the first thing is to find out the physical reason for it and treat it accordingly. Changes in the body are responsible for causing physical symptoms. So from the set of symptoms it is possible to predict what the disease will be. Accordingly, the diagnosis of the disease is determined by doing some tests.
But in ” Somatoform Disorder ” the symptoms reported by patients do not indicate any specific disease. Therefore, such a patient is diagnosed as having no physical disease, but the patient is experiencing many symptoms and is suffering from it, and when the suffering is not false, when the physical causes are left aside, there is room to suspect that the suffering may be due to Psychological reasons.
But the patient does not tell about any Mental Distress or all is confused, there is no tension but the answer is that Mental Stress is felt due to Physical Distress.
Psychiatric symptoms are not prominent when talking about the patient’s Mental state. But Depression is easy to diagnose.
In this disease, the patient is unaware of the Mental causes responsible for the origin of his symptoms. In such patients, the Homoeopathic Doctor has to perform a dual role of finding out the Psychological causes and bringing the Physical symptoms under control and bringing the Psychological cause before the patient and taking appropriate measures.
There was no doubt that the cause of Nandatai’s illness was Mental. When we inquired deeply, we realized that when the in-laws came after marriage, they were living together in the family, because of the strict nature of the mother-in-law, they had to negotiate in small matters. He used to get tired trying to please everyone. However, mother-in-law’s taunts did not subside. Two SIL and BIL’s were to be married and their husband being the eldest did not have separate accommodation.
Nandatai, who grew up in a pampered home, had a lot of trouble at that time. They could not talk to anyone about their problems. In order not to disturb the parents, they were not told anything and if anything was told to Husband, they were advised to “don’t pay attention” and they would go free. So she used to suppress everything in her mind and face the coming day. Later SIL and BIL got married. Mother-in-law died. The intervening period passed happily, but “no one understood us”, the feeling that remained in her Mind forever.
Five years ago, the son got married and the daughter-in-law came into the house. Then he remembered his own mother-in-law. He has a very good relationship with DIL, but from then on his physical problems started.
The Mental stress stored in the Mind for so many years was coming out with the onset of physical symptoms. It was comforting to him that everyone in the family was taking care of him because of his troubles. This is the real psychological cause of their physical suffering.
In ” Somatoform Disorder “ there is a Psychological cause behind the physical symptoms of the patient. This is not in the consciousness of many patients. We are also unaware that it is bothering us.
Often Mental Distress turns into Physical complaints. The patient states that the complaints arise from Physical ailments. The reason for this is that the person feels that it is a weakness to express Mental complaints. A more important reason is the stigma surrounding Mental disorders.
The word “Mental” means “Imaginary”. The patient begins to feel that others do not believe that he is suffering. Many people are unable to verbalize their feelings. Their vocabulary is insufficient and they are not used to express their feelings. As we get older or under the guise of certain cultural ideas, the display of Emotions is considered a sign of weakness, and barriers to expressing Emotions begin to appear.
We understand the importance of Physical suffering but Mental suffering is still not acceptable. One is told not to take tension or ignored. The protective structure of our Mind is responsible for this.
Our Mind uses various Psychological Defense Mechanisms to protect itself from Mental stress. Things that are not acceptable to the society when we suffer from our Mind have to be suppressed in our Unconscious Mind (Repreparation).
In such a case, the emotional form of energy comes out in the form of physical symptoms without being destroyed. In this way, the energy is drained and the original form of mental distress is avoided.
But mental illness transforms into physical suffering without the suffering disappearing. But the trouble continues. Mental stress can be of various forms and some.
Conflicting thoughts include –
  • past traumatic events,
  • current life traumatic events,
  • financial stress,
  • worries about loved ones,
  • future worries,
  • interpersonal differences,
  • unfulfilled expectations,
  • illness of loved ones,
  • alienation,
  • death,
  • relationship stress, as well as,
  • conflict in our own thoughts.
  • Feelings of both love and hate towards a person are due to many reasons leading to Mental Illness.
All these tensions are suppressed in the unconscious mind through repression, so they are not present on the surface of the individual’s mind. Therefore, we hear answers from patients that there is no mental stress. In order to reach these mental causes, it is necessary to communicate with the patient and inquire deeply.
Homoeopathy has a lot of Medicines for such Emotional Disorders and through those Medicines the patient’s disease can be completely eradicated. And at the same time their Mentality changes. Their complaints were not imaginary, they had Physical pains, but the causes being Psychological, they did not benefit from treatment as physical ailments.
Homoeopathic Medicines made a great difference to him. His attitude towards illness changed. Due to the proper drainage of suppressed Emotions, they felt lighter. Now she is enjoying her life with her son.
No matter what the Mental or Physical Disease, Homeopathic experts investigate the nature and Mental symptoms of the patient in depth from the example of Nandatai.
“Peace of Mind is the key to Health” is completely possible with Homoeopathic Treatment.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123 / 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-

Back To Top