“सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर “ म्हणजे जागृत व सुप्त मनातील ताण-तणावांचा परिणाम. वेदना जरी शारीरिक असली तरी तिचे मूळ मानसिक असते व आपल्या मनाच्या संरक्षण पद्धतीची (डिफेन्स मेकॅनिझम) करामत असते.
“सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर ”
• रुग्ण एक किंवा अनेक लक्षणे घेऊन डॉक्टरांकडे येतो पण लक्षणे कोणत्याच शारीरिक आजार निर्देश करत नाहीत.
••एकापेक्षा अनेक शारीरिक तक्रारी ज्यांच्यासाठी नेहमी वैद्यकीय मदत घेतली जाते किंवा ज्यांचा कामावर व नातेसंबंधांवर परिणाम होतो.
•••दुखण्याची लक्षणे (कमीत कमी चार) डोळे, पाठ, सांधे, हात-पाय, छाती, पाळीच्या वेळी, लैंगिक संबंधाचे वेळी किंवा लघवी करताना,
••••पचनसंस्थेची निगडित लक्षणे (कमीत कमी दोन) मळमळ, उलटी, ढेकर येणे, शौचास लागणे, अन्नपचन न होणे,
•••••लैंगिक लक्षणे (कमीत कमी एक) लैंगिक इच्छा न होणे, शीघ्रपतन, ताठरता न येणे, अनियमित पाळी, अंगावर जास्त जाणे,
••••••मज्जासंस्थेची निगडित लक्षणे- बोलता न येणे, डबल दिसणे, ऐकू न येणे, आंधळेपणा, झटके येणे, बेशुद्ध पडणे, भास होणे, स्मृती जाणे, इत्यादी
•• लक्षणांशी निगडित सर्व शारिरीक रक्ताच्या व इतर प्रगत तपासण्या करून कोणत्याही शारीरिक आजाराचे निदान ठरत नाही.
दुसऱ्या प्रकाराला “सोमॅटोफॉर्म पेन डिसऑर्डर ” असे म्हणतात.
या प्रकारात कुठल्यातरी ठराविक एक किंवा दोन ठिकाणी वेदना जाणवत असतात व इतर कुठलीही लक्षणे जाणवत नाहीत व त्या दुखण्याच्या त्रासामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होतो.
जयश्रीला अनेक दिवसांपासून घसा दुखण्याचा त्रास होता. अनेक नाक, कान घसा, तज्ञांकडून तपासण्या व उपचार करूनही तिला कसलाच फरक जाणवत नव्हता. तिची सखोल चौकशी केल्या नंतर समजले की, तिच्या वडिलांचा मृत्यू घशाच्या कॅन्सरने झाला होता.
अनेकदा रुग्ण त्यांच्या त्यांच्या जवळच्या व्यक्तीला झालेल्या गंभीर आजारातील काही ठराविक लक्षणे उचलतात.
कुणाचा दात दुखतो, कुणाची छाती दुखते, तर कुणाची मान दुखते तर कुणाचे डोके दुखते.
या सगळ्या प्रकाराला “कनव्हर्जन डिसऑर्डर “ असे म्हणतात.
- या प्रकारामध्ये मज्जासंस्थेची निगडित लक्षणे जाणवतात. म्हणजे बेशुद्ध होणे व दातखिळ बसणे हे सर्वात जास्त दिसणारे लक्षण आहे.
- तसेच हातापायाला मुंग्या येणे,
- चक्कर येणे,
- तोल जाणे, इत्यादी लक्षणे जाणवतात.
- काही रुग्ण शरीराच्या अर्ध्या भागाला मुंग्या येतात किंवा संवेदना जाणवत नाहीत अशी तक्रार करतात.
अशा प्रकारचे संवेदनांचे विभाजन शरीर शास्त्राच्या नियमात बसत नाही. हे मानसिक आहे हे तज्ञ डॉक्टरांच्या लगेच लक्षात येते.
काहीजणांना मिरगी / फिट सारखे झटके येऊ शकतात. पण प्रत्यक्षात त्यांना फिटचा आजार नसतो. योग्य पद्धतीने घेतलेली माहिती व काही तपासण्यांद्वारे हे मानसिक कारणांमुळे होत आहे हे लक्षात येते.
चौथ्या प्रकाराला “हायपोकाॅंड्रीयासिस “ म्हणतात.
यामध्ये रुग्णाला सतत वाटत असते की, आपल्याला कुठलातरी गंभीर आजार झालेला असून त्याच्या निदानासाठी ते वारंवार तपासण्या करत राहतात.
कॉलेजला जाणाऱ्या अभिजीतला सतत मोठा आजार झालाय अशी भीती वाटायची.
कुठेही छोटीशी जखम झाली तर त्यातून कॅन्सर होईल का ?
तोंडात फोड आले तर कॅन्सर झाला का व तो सतत डॉक्टरांना दाखवत राहायचा.
यामध्ये रुग्णाला उपचारापेक्षा आजाराच्या निदानामध्ये जास्त रुची असते.
यापुढे डॉक्टरांनी वारंवार शास्त्रीय माहिती सांगितली तरी त्याचे समाधान होत नाही. ते दुसऱ्या डॉक्टरकडे जातात. तिथून तिसरा, चौथा, पाचवा, अशाप्रकारे “डॉक्टर शॉपिंग “ करत वारंवार तपासण्या करत राहतात.
या प्रकारामध्ये रुग्ण बाह्य रुपाविषयी व दिसणे विषयी प्रमाणापेक्षा जास्त जागृत असतो.
त्यांना सतत आपल्यामध्ये काहीतरी व्यंग आहे किंवा शरीराचा एखादा भाग विकृत झालाय असे वाटत राहते.
या विकारात रुग्णाला शरीराच्या एखादा भाग लहान किंवा बेढब दिसण्यास इतका मोठा आहे असे वाटते.
आपले कान, नाक, उरोज, हनवटी आणि जननेंद्रिय फार लहान अथवा मोठी आहे असे वाटत राहते.
आपल्या शरीरातील मेंदू, जठर, आतडे कामच करत नाहीत.
आपल्या चेहऱ्यात, तोंडात, हिरड्यात किंवा दातातील बुरशीमुळे आपण विद्रूप दिसतो.
अशा बऱ्याच काल्पनिक तक्रारीसाठी वारंवार डॉक्टरांकडे हजेरी लावतात. डॉक्टरांनी समजावून त्यांचे समाधान होत नाही.
हे रुग्ण स्वतःच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत व सातत्याने त्याच विचारात राहून दुःखी, कष्टी होत राहतात.
बऱ्याचदा रुग्ण शारीरिक कारणांमुळेच मानसिक त्रास होत आहे असे सांगतो. या रुग्णांमध्ये बेचैनी अस्वस्थता व उदासीनतेची लक्षणे जाणवतात.
बरेचसे ताण-तणाव या गोष्टी डॉक्टरांना काय काय सांगायचे आहे ?
या विचाराने डॉक्टरांसमोर सांगितले जात नाही. कारण त्यांच्या दृष्टीने आजाराची लक्षणे व ताण-तणावांचा सरळ सरळ संबंध नसतो. बरेचसे ताणतणाव शरीराच्या संरक्षण पद्धतीमुळे (रिप्रेशन) जागृत मन:पटलावरून पुसले गेलेले असतात.
होमिओपॅथीमध्ये शारीरिक आजार समजून घेऊन व मानसिक करणे लक्षात घेऊन होमिओपॅथिक डॉक्टर उपचार करतात. त्यामुळे उदासी, बेचने सारखे लक्षणे हळूहळू कमी होत जातात.
होमिओपॅथीमध्ये अशा मानसिक विकारांवर अनेक गुणकारी औषधे उपलब्ध असून त्या औषधोपचारांमुळे लक्षणांची तीव्रता कमी होत जाऊन ते पूर्ण नाहीसे होतात.
अशा वेळी रुग्णांनी दीर्घकाळ औषधोपचार चालू ठेवणे व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बंद करू नये. कारण म्हणून होमिओपॅथिक औषधांनी सुरुवातीस लक्षणे कमी होतात त्यामुळे रुग्णाला आजार बरा झाला असे वाटते, परंतु मूळ आजाराचे, मानसिक कारणांचा पूर्ण निचरा झालेला नसतो, म्हणजेच मूळ आजार पूर्ण बरा झालेला नसतो.
रुग्णाला दैनंदिन जीवनातील ताण-तणावांना सामोरे जाण्याचे योग्य प्रकारे हाताळले हाताळण्याचे सामर्थ्य होमिओपॅथिक – साबुदाण्यासारख्या लहान गोळ्यांमध्ये आहे.
तसेच होमिओपॅथिक औषधांमुळे रुग्णांच्या मानसिकतेत बदल होऊन त्यांना या आजारातून बाहेर पडण्यास मदत करू शकतात.