By Dr. Ajay HanmaneJanuary 30, 2026 Anxiety Bone Diseases Cancer Female Problems General Information Geriatric Problems Heart Problem Homeopathic and Cure Kidney Problems Mental Health Psychiatry Sexual Problems Sleep Disorders
दोन वर्षांपूर्वी ‘महिला बालकल्याण अधिकारी ‘ म्हणून निवृत्त झालेल्या माझ्या एका मित्राच्या बायकोचा मला फोन आला. एरवी उत्साहाने खळखळणारा त्यांचा आवाज खोलवर गेलेला जाणवला. योगायोगाने दुसऱ्याच दिवशी त्यांची रस्त्यात गाठ पडली आणि त्यांना पाहून मला आश्चर्यच वाटलं. नोकरीत असताना टकाटक राहणारी राहणाऱ्या त्या, त्यांचा तो पडलेला चेहरा, इस्त्री न केलेले कपडे….. एकदम उदास वाटल्या….. त्यांच्या बोलण्यातून एकच वाक्य कानावर आदळत होतं, वेळ खायला उठतोय…….
त्यांना एकच मुलगी. तिचं लग्न होऊन ती नवऱ्याबरोबर दिल्लीला आहे, त्यामुळे येणं-जाणं कमी. त्यांना प्रवासाची अजिबात आवड नाही. त्यात पाठदुखीचा त्रास असल्याने प्रवास झेपत नाही. या उलट माझा मित्र, तिचा निवृत्त नवरा सतत प्रवासाचे नवनवीन प्लॅन्स करत फिरत असतो. अधिकार पदामुळे असेल, कुणातही फार न मिसळण्याच्या स्वभावामुळे त्यांना सततची ‘गेट-टुगेदरर्स ‘ आणि ‘प्रवास ‘ यांचा अगदी वैताग आला होता. तिघांच्या कुटुंबातली ‘ ती’ आता एकटी पडल्यासारखी झाली आहे. तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. खरं तर हे अपवादात्मक उदाहरण असलं तरी काही प्रमाणात ते प्राथनिधीकही आहे.
गेल्या दहा वर्षात माझ्या बऱ्याच मित्र-मैत्रिणी,कोणी शैक्षणिक क्षेत्रातून तर कोणी बँकेतून तर कोणी शासकीय क्षेत्रातल्या अधिकार पदावरून निवृत्त झालेले आहेत. हे सारे जण संघटित, शासकीय किंवा निमशासकीय क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत असल्यामुळे, निवृत्तीनंतर त्यांना आर्थिक चिंता नाही. त्यांना प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी सर्व काही मिळालेले आहे. तसेच भरपूर निवृत्तीवेतन मिळत आहे.खरंतर निवृत्ती पूर्वीची एक- दोन वर्ष ते सर्वजण निवृत्त झाल्यावर काय काय करणार याच्याच जास्त गप्पा मारत. कोणी म्हणे मी आता घराकडे पूर्ण वेळ लक्ष देणार आहे, घराचा अगदी काया कायापालटच करून टाकणार, काहीजण म्हणत मी सकाळी अजिबात लवकर अंथरून सोडणार नाही आणि पैसे मिळविण्यासाठी नवीन उद्योग करणार नाही. भरपूर पुस्तक वाचेन, सगळं जग पाहीन, चित्रपट, नाटकं, लाईव्ह प्रोग्रामना जाईन, आतापर्यंत जाऊ न शकलेल्या नातेवाईकांच्या सगळ्या सण- समारंभांना यापुढे जाणारच असे, मनसुबे रचले जात होते. यातल्या बहुतेकांना मुलं लहान असताना पाळणा घरात किंवा कुणाकडे तरी सोडून नोकरीवर जावं लागत असल्याने निदान भरपाई म्हणून नातवंडांसाठी पूर्णवेळ देतील असे काही जण मनोमन ठरवत. पण प्रत्यक्ष जेव्हा निवृत्त झाल्यानंतर काही काळ ते त्यांनी केलंही पण पुढे? …
त्यातल्या जवळपास सर्वांना नोकरी बरोबर आलेल्या अधिकार पदाच्या वलयातून बाहेर पडून सर्वसामान्य नागरिकाचे आयुष्य जगणं हे आयुष्यातलं सर्वात मोठं आणि अवघड स्थित्यंतरं होत. त्यापैकी बहुतेकांना सलग 24 तास घराची सवय नव्हती किंवा घरालाही त्यांची सवय नव्हती,हीच त्यातली सर्वात मोठी गोम होती.
विद्यापीठातील महत्त्वाच्या पदावरून निवृत्ती झालेल्या एक पेशंट, सौ माधवी कोणताही पदार्थ करायला आली की तिची स्वयंपाकाची बाई सतत सूचना करत असे, हे असं नाही ते तसं करा. सुरुवातीला तिने ते हसण्यावरी नेलं, पण तिच्या घरातील अकार्यक्षमतेमुळेच तिला ती ऐकून घेणे भाग आहे, अशी काहीशी समजूत तिने करून घेतली आणि त्याचे रूपांतर कायमस्वरूपीच्या नाराजीत झालं.
आणखीन एक माझे पेशंट, पुष्पाताई या आयकर आयुक्त पदावरून निवृत्त झाल्या आहेत. त्यांचा जोडीदार व्यवसायिक होता. दोघांनाही आयुष्यभर एकमेकांबरोबर घालवायला वेळ मिळाला नाही. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी चांगला महिनाभराचा युरोप प्रवास ठरवला होता. पण नवऱ्याचं आकस्मिक निधन झालं.घरात मुलगा, सून, दोन नातवंडे सगळे आपापल्या व्यापात असायचे. काही दिवस त्यांनी घरात रमण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या स्वतःच्या घरात त्यांची जागाही त्यांच्या विशेष पदाच्या कौतुका सारखीच राखीव होती. त्यांनी एकदा हौसेनं दुपारचा सगळा स्वयंपाक केला. त्यांच्या मुलाला आणि सुनेला आश्चर्याबरोबर अपराधी वाटत राहिले की आईला आपण कशातही सामील करून घेतलं नाही याचं. घरातले छोटे-मोठे निर्णय त्यांच्या अपरोक्ष घेतले जायचे, कारण तेव्हा त्यांच्याकडे वेळ नसायचा. आताही ‘आईने’ घरी काय राहायचं, बाहेरच्या जगात बदल घडवणं, हे तिचं खरं काम आहे ‘, असं त्यांचा मुलगा कोणाला तरी सांगत असताना त्यांनी ऐकलं. त्या म्हणाल्या,” मला त्याला अगदी ओरडून सांगावसं वाटलं, बाबा रे, मी आयुक्त नंतर बनले. अगोदर मी बाई, बायको आणि आई आहे. या घरातली गृहिणी आहे. करू दे ना मला आवडते ते आता.” पण शेवटी त्या घरातून बाहेर पडल्या आणि त्यांनी कोकणातील एक शाळा दत्तक घेतली. तिथे त्या उत्तम काम करत आहेत.
काहीजण खाजगी क्षेत्रातून निवृत्त होतात. खाजगी क्षेत्रात कामाचे तास जास्त आणि त्यामुळे पगार कमी अशी परिस्थिती असते. अशा वेळेस ‘साठी’ आली आणि शरीर थकलं तरी घरातील आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून काही ना काही करणं भाग असतं. त्यामुळे त्या निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या कमी दर्जाच्या नोकऱ्या स्वीकारताना दिसतात. काही मात्र काहींची मुलं जर त्यांच्या निवृत्तीनंतर स्थिरावलेली असतील आणि त्यांनी घरीच राहावं म्हटलं तर तेही त्यांना जड जातं. कधी घरातील वृद्ध माणसांचं वागणं त्यांना सहन होत नाही, तर कधी नवरा / बायको आणि मुलांची आरेरावी, कधी सुनेचं मनमानी वर्तन, तर कधी नातवंडांची उधळपट्टी होत नाही. यात मनाची नुसती कुतर ओढ होत असते. अशावेळी मन उदास होऊन जातं आणि ‘ संध्याछया भीवविती हृदया….’ वाटू लागते.
निवृत्तीनंतरच्या आयुष्यात विवाहित जोडप्यांमध्ये सुसंवाद असेल तर आयुष्य असतं अन्यथा….. उच्च पदांवरून निवृत्त झालेल्या एका जोडप्यात निवृत्तीनंतर एवढा बेबनाव व्हायचा किती दोघे एकमेकांना चक्क टाळायला लागले. तोपर्यंत ते फारच कमी काळ एकत्र राहले होते. त्यामुळे एकमेकांना सहन करणं त्यांना कठीण जातयं. इतकं की बायको ट्रिपला गेले की नवरा घरी राहतो आणि ती आल्यावर नवरा मित्रांसोबत फिरायला जातो. पण असे किती दिवस करत राहणार, असा त्यांनाही पडलेला प्रश्न आहे. त्यासाठी ते दोघेही समुपदेशन आणि उपचारासाठी ‘चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक’ मध्ये आले होते.
निवृत्तीनंतर कामांची आणि कामावर जाण्याची बांधलेली वेळ संपते. ‘डेडलाईन’ हा प्रकार संपतो. आपल्यासमोर भरपूर रिकामा वेळ आहे असं वाटायला लागतं. परिणामी घरामध्ये अनेक गोष्टीमध्ये गृहीत धरलं जातं
एकट्या राहणाऱ्या बायकांचे निवृत्तीनंतरचे प्रश्न वेगळेच असतात. एक तर त्यांना म्हणावा तसा कोणाचाच आर्थिक आधार नसतो. शारीरिक ताकद कमी होते आहे, याची जाणीव होत असल्याने एकटेपणा अधिकच अधोरेखित होतो. त्यात निवृत्तीनंतरचे आयुष्याची आखणी केली नसेल तर अनेकजण अक्षरशः उदासीनतेच्या गर्तेत घसरत जातात. परिणामी अनेकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, पाठदुखी, गुडघेदुखी अशा अनेक व्याधी मागे लागतात. अनेक जणी याच काळात कर्करोगासारख्या दुर्धर आजारांची शिकार होतात.
माझ्या एका सरांच्या बहिण, एक वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठात त्या संगीत विभाग प्रमुख पदावरून निवृत्त झाल्या. त्या जन्मांध आहेत आणि त्या एकट्याच राहतात. त्यांनाही निवृत्तीवेतन नाही.त्या अगदी कमी मानधनावर गाण्याची वर्ग घेतात. त्यांना सततची एक मदतनीस लागते आणि गाडीसाठी चालक लागतो. त्याचा मोठा खर्च त्यांना करावा लागतो. तरीही त्यांना जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्या अतिशय आनंदात असतात. त्यांच्या आयुष्याची शिस्त निवृत्तीनंतरही कायम आहे. त्यानंतर ‘ साठी’ नंतर आपल्या उत्पन्नाचे अधिकचे स्त्रोत मिळणं अवघड असतं, त्यामुळे सांभाळून वागायला हवं. एकदा परिस्थिती आनंदाने स्वीकारले की काही ना काही मार्ग मिळतो आणि कोणताही अवघड आणि अनघड प्रवासही सोपाच होऊन जातो.या त्यांच्या धीरोदत्त जीवनशैली पुढे मी नतमस्तक झालो.
खरंतर लोकांचं जीवनमान उंचावलं आहे. साठीच्या म्हणजे निवृत्तीच्या वयातही लोकांच्यातील उमेश टिकून असते. शरीरस्वास्थ्य चांगलं असतं. त्याचा चांगला उपयोग करून घेता आला पाहिजे. निवृत्तीनंतरचा सगळ्यात मोठा यक्षप्रश्न असतो, तो म्हणजे वेळ कसा घालवायचा? त्याचे जर व्यवस्थित नियोजन केलं नाही तर वेळ घरंगळून जातो आणि चिडचिड व्हायला लागते.
यासाठी योगा व्यायाम, योग्य व्यायाम, घराबाहेरची ‘सपोर्ट सिस्टीम’ वाढवणं, घराभोवती नैसर्गिक निर्माण करणं,छंद जोपासणं यासारखे काही उपाय आहेत.
डॉ अजय व. हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद
आपला विश्वास – नैसर्गिक आरोग्य पुनर्स्थापनेची आमची जबाबदारी!
कृपया पुढील लेख वाचा —
—————————————————————————————-
Two years ago, I received a phone call from the wife of one of my friends, who had retired as a Women and Child Welfare Officer. Her voice, usually brimming with cheer and enthusiasm, sounded unusually heavy and subdued. By coincidence, I ran into her on the street the very next day — and I was shocked. Once a woman who carried herself with sharp elegance while in service, she now appeared weary and worn out. Her face looked dull, her clothes were crumpled, and her entire being radiated sadness. From her words, one phrase kept echoing in my mind: “Time is eating me alive.”
She has only one daughter, married and living in Delhi with her husband, which limits visits. She never had a liking for travel, and chronic back pain makes journeys unbearable. Her husband, in stark contrast, has thrown himself wholeheartedly into travel, constantly making new plans and exploring places. Because of her temperament — somewhat reserved, and perhaps shaped by her years in a position of authority — she dislikes constant “get-togethers” and ‘trips’. Now, in their family of three, she feels like the odd one out. Her self-confidence has begun to crumble.
Although this is an exceptional case, it is in some ways representative.
Over the last decade, many of my friends — whether from education, banking, or high-ranking government service — have retired. Financially, they are secure. With provident fund, gratuity, pensions, and savings, they do not face financial worries. In fact, during the one or two years leading up to their retirement, most of them endlessly discussed the wonderful plans they had in mind. Some said they would finally devote full attention to their homes, remodeling and reviving them. Others declared they would never again rise early in the morning, nor pursue money-making ventures. They spoke of reading voraciously, traveling the world, attending plays, films, and live concerts, and never again missing a family gathering or celebration.
Many secretly resolved that, having once left their children in day-care or with relatives while working, they would now make up for it by devoting themselves entirely to their grandchildren. And indeed, for a while after retirement, they did just that. But then… what next?
The greatest challenge came when these individuals stepped out of the aura of their official positions and into the life of an ordinary citizen. For most, this transition — from power and status to anonymity — was the hardest. Added to this, they were not used to being home 24 hours a day. Nor were their families accustomed to having them constantly around. This clash of adjustment became the root of many struggles.
One of my patients, Madhavi, who retired from a high post at a university, found herself being corrected by her household cook whenever she tried to prepare any dish. At first, she laughed it off. But soon, the repeated comments began to sting, and she convinced herself that perhaps her own inefficiency was to blame. What began as tolerance slowly grew into a permanent resentment.
Another patient, Pushpa, retired as an Income Tax Commissioner. Her husband was a businessman, and because of their busy careers, they had never spent much time together. To make up for it, they had planned a month-long tour of Europe after her retirement. But fate intervened — her husband died suddenly.
Although she lived with her son, daughter-in-law, and two grandchildren, everyone was absorbed in their own routines. She tried to engage herself at home, but soon realized that her role there was still defined more by her past status than by her present needs. Once, out of enthusiasm, she prepared an entire afternoon meal. Her son and daughter-in-law were delighted, but also guilty — guilty that they had never really allowed her to participate in household life. Decisions had always been made in her absence, simply because she had never been available. Now, even in retirement, they believed that her true place was “outside,” shaping the world, not “inside,” in the kitchen.
When she overheard her son tell someone, “My mother’s work is not in this house, but out there, in society,” she was deeply pained. She wanted to shout, “Son, I became a Commissioner later. First, I was a woman, a wife, and a mother. I am the homemaker of this house. Let me do what I wish now.”
Ultimately, she left home and adopted a school in Konkan, where she now works with great joy and fulfillment.
Some retire from the private sector, where long hours and smaller salaries are the norm. For them, retirement can be especially harsh. Even after sixty, when their bodies are weary, they must continue working in lower-paying jobs just to keep the family afloat. Others, who finally wish to rest at home, often find it difficult to adjust — whether because of the behavior of elderly relatives, constant conflicts between spouse and children, or misunderstandings with daughters-in-law and grandchildren. This daily tug-of-war eats away at the mind, leaving it restless and melancholy, echoing the words, “The evening shadows strike fear in the heart…”
In marriages, too, retirement can bring unexpected strains. When communication and understanding exist, life flows smoothly. Without it, even couples who once held high positions begin to drift apart. I know of one such couple who, after retirement, could not bear to spend time together. During their working years, they had hardly been at home at the same time. Now, forced into proximity, they found each other intolerable. If the wife went on a trip, the husband stayed home; when she returned, he would escape with friends. But how long could this go on? With such questions troubling them, they both sought counseling and treatment at Chaitanya Homeopathic Clinic.
Retirement frees one from the deadlines and rigid schedules of working life. Suddenly, there seems to be an endless stretch of empty time. But if this time is not consciously structured, it quickly turns into boredom and frustration.
For women living alone, the challenges are even greater. Without a steady financial base, and with declining physical strength, loneliness becomes magnified. Without a well-thought-out plan for retirement, many slip into depression, and with it come lifestyle diseases like diabetes, hypertension, heart disease, backache, and arthritis. Sometimes, serious illnesses such as cancer surface in this very stage of life.
One inspiring example is my teacher’s sister, who retired a year ago as the Head of the Music Department at Shivaji University. Born blind, she lives alone and receives no pension. She teaches music classes for a modest honorarium. She needs the help of an assistant and a driver, which incurs heavy expenses. And yet, her outlook on life is entirely positive. She remains disciplined, cheerful, and content. Even without financial security, she embraces life with courage and grace. Her dignified way of living leaves me humbled.
Today, life expectancy has increased, and even at sixty, people retain vigor and enthusiasm. Health is often good, and this gift must be utilized wisely. The greatest question that arises post-retirement is: How to spend time?
If not addressed, time slips away, leaving only restlessness behind. The solutions are many: yoga, regular exercise, strengthening one’s “support system” outside the home, surrounding oneself with nature, or nurturing long-forgotten hobbies.
Traditionally, retirement has been equated with Vanaprasthashram — a phase of quiet withdrawal. But for those who once juggled challenges and responsibilities with ease, quietness can feel unbearable. The key is to keep searching — because when you search, you always find. Opportunities surround us; what is needed is the will to see them. While physical strength may decline with age, research shows that mental and intellectual abilities actually increase.
If the work you do after retirement brings you personal satisfaction and benefits others, then life retains meaning right up to the end.
And to sustain this — to preserve physical vitality, to keep the mind cheerful and the spirit bright —Homeopathy offers tremendous support.
Dr Ajay V. Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.
Your Trust – Our Responsibility to Restore Health Naturally!
Please Read Next Article-