By Dr. Ajay HanmaneJanuary 3, 2026 Anxiety Female Problems Homeopathic and Cure Mental Health Psychiatric Problem
‘चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक ‘ मध्ये नेहा नावाची एक पेशंट, जी स्वतःच्या कर्तुत्व आणि महत्त्वाकांक्षेने उच्च पदावर पोहोचलेली असून देखील तिची मानसिक स्थिती गोंधळाची आणि करियर मध्ये मिळालेल्या यशाबद्दल असमाधानी होती. त्या चक्रव्यूहातून तिला बाहेर पडण्यासाठी ती होमिओपॅथिक उपचार घेण्यासाठी आली होती. होमिओपॅथिक औषधाने ती यथावकाश गोंधळलेल्या मन:स्थितीतून बाहेर आली आणि ती तारतम्याने निर्णय घेण्यास सक्षम बदली. तिचा स्वानुभव आपणासमोर सादर करत आहे.
एके दिवशी एका मागोमाग एक मीटिंग्स आणि डेड-लाईन्सनी व्यापलेला आठवडा संपवून नेहा आपल्या ऑडिशन घरात निवांत विश्रांती घेत बसली होती. तिच्या करिअर मधल्या प्रगतीच्या सातत्याने उंचावणाऱ्या आलेखाबद्दल तिला स्वतःचा खूप अभिमान होता. एका कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून सुरुवात करून आज तिथेच ती उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करत होती. तिला मिळालेली प्रत्येक बढती तिच्या यशावर शिक्कामोर्तब करत होती. नुकत्याच मिळालेल्या बोनसच्या रकमेची बँकिंग ॲप उघडून तिने खात्री केली आणि पुढच्या काही गोष्टी ठरवण्याचा विचार करत असतानाच आपण हे काय आणि का करतो आहोत, अशी काहीशी विचित्र भावना तिच्या मनात निर्माण झाली. आणि या गोंधळाच्या स्थितीतून तिला काही प्रश्न पडले.
जगत असताना हेच आयुष्य मला हवं आहे का? ते मला सहजपणे मिळत आहे का? नसेल तर मी काय करायला हवं? अशा अनेक प्रश्नांमध्ये ती गुरफटून जाऊन तिची मानसिक स्थिती अत्यंत गोंधळाची झाली होती.
वर्षानुवर्ष नेहाने एक साधं तत्त्व पाळलं होतं. अधिक अधिक कमवा, अधिक बचत करा. अधून मधून स्वतःचे लाड करा. आणि हेच चक्र चालू ठेवा. तिनं मिळवलेलं प्रत्येक यश हा तिच्यासाठी पुरस्कारच होता, पण आज परिस्थिती वेगळी होती.
अतिश्रमानं नेहा प्रचंड दमलेली होती. तिच्या बँकेच्या खात्यात पैसे तर भरपूर होते, पण कामासाठी उशिरापर्यंत जागवलेल्या रात्री आणि त्यामुळे आठवड्याच्या अखेर झालेली दमछाक, या सगळ्यांचा मोबदला, या पलीकडे त्याचं काही कौतुकच तिला वाटेनासं असं झालं होतं….. तिला प्रश्न पडला की, आतापर्यंत अधिकाधिक पैसे कमावण्यावरच आपलं लक्ष केंद्रित झालेला आहे. ‘पण ते का’? हा प्रश्न कैक वर्षात तिने स्वतःला विचारला नव्हता.
इतका पैसा कमवून तिला नेमकं काय मिळवायचं होतं? एक नवी गाडी? एक आलिशान घर? आपण जी शिडी चढतोय, ती चढून झाल्यावर आपल्याला नेमकं काय मिळणार आहे याची तिला खात्री नव्हती. कित्येक दिवस ती फक्त शिडी चढत राहिली होती……
ती विचारात पडली तेव्हा तिच्या लक्षात आलं की, ज्या गोष्टीची तिला सर्वात जास्त किंमत होती त्या गोष्टी खरंतर फार साध्या होत्या. जवळच्या लोकांच्या सहवास, सुरक्षितता आणि नवनव्या गोष्टी करून बघण्याचे स्वातंत्र्य! या अगदी साध्या गोष्टी मिळवण्यासाठी जास्तीत जास्त कमवत राहण्याचा तिचा जो अट्टाहास होता त्याची खरं काही गरज नव्हती.
नेमकं किती मिळालं म्हणजे तिच्यासाठी ‘पुरेसं’ ठरेल? या प्रश्नाचे तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. पैशांच्या बाबतीत याआधी तिने या पद्धतीने कधीच विचार केला नव्हता.
नेहा ची गोष्ट चारचौघांपेक्षा वेगळी नाही आहे. पैसा कमावण्याच्या ध्यासानं आपल्यापैकी कित्येक जण अथक धावत असतात, पण आपण इतकं का धावतोय हा प्रश्न त्यांना पडतच नाही. हे गृहीत धरणे फार सोपं असतं, की अधिक पैसा मिळवल्याने अधिक समाधान मिळेल, पण जेव्हा ‘का धावतोय’? चं नेमकं उत्तर आपल्याला देता येत नाही तेव्हा, काही कितीही कमावत असलो तरी आपण, ही भावना आपल्याला ग्रासून टाकतेच. पैशांमध्ये धावण्यापेक्षा आपली खरी गरज काय आहे हे ओळखायला आणि आपला पैसा योग्य करण्यासाठी आणि हेतूसाठी सार्थकी लावून सहजतेने जगायला शिकता यायला हवं.
नेहाच्या दृष्टीने यश म्हणजे जे आहे त्याचा विस्तार वाढवत जाणं आणि नवनवीन उद्दिष्ट साध्य करत जाणं. पण आपल्याला नेमकं काय हवंय याबाबतीत स्पष्टता नसल्याने ती हव्यासाच्या शर्यतीत वाहवत गेली होती. जेव्हा ती आपल्या संपत्तीचा विचार करत होती तेव्हा तिला हाही प्रश्न सतावत होता की, आपल्याकडे असलेला पैसा आपण नेमका कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरतोय?
हे प्रश्न प्रत्येकाला सोहळ्याच्या विविध टप्प्यांवर पडायला हवेत. समाधानाचं, आनंदाचं आयुष्य हवं असेल तर त्यासाठी संपत्ती तर कमवायलाच हवी, पण कोणती?
केवळ पैशापेक्षा त्यामागच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून जगताना आर्थिक स्थिती आपोआपच मजबूत होईल, असा दृष्टिकोन ठेवल्यानं पैशामागची अथक धावाधाव थांबेल आणि आपल्यासाठी नेमकं किती असलं की ‘पुरेसे’ होईल हे आपल्याला ठरवता येईल मग आपल्या जवळची खरी संपत्ती मोजण्यापलीकडची असेल.
डॉ अजय व. हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद
आपला विश्वास – नैसर्गिक आरोग्य पुनर्स्थापनेची आमची जबाबदारी!
कृपया पुढील लेख वाचा —–
At Chaitanya Homeopathic Clinic, a patient named Neha came seeking treatment. A highly accomplished woman who had reached an impressive professional position through her talent and ambition, yet she found herself caught in inner confusion — dissatisfied with her success and unable to find meaning in it. Homeopathic treatment gradually helped her emerge from that mental chaos and regain clarity, enabling her to make balanced, thoughtful decisions. Here is her story.
After a long week filled with back-to-back meetings and deadlines, Neha finally sat down to rest in her stylish apartment. She felt proud of her steadily rising career graph. From starting as a trainee to becoming a senior executive in the same company, every promotion had seemed like a well-earned reward. She opened her banking app to check her recently credited bonus and began planning her next goals — when suddenly, a strange thought crossed her mind: “What am I really doing all this for?”
That moment of confusion gave rise to a deeper set of questions: Is this the life I truly want? Is it coming to me naturally? If not, what should I do differently? These questions spun her into a spiral of self-doubt and inner turmoil.
For years, Neha had lived by a simple formula — earn more, save more, indulge occasionally, and keep the cycle going. Every achievement had felt like a trophy. But this time, things were different. Exhaustion had set in. Despite a well-padded bank account, the sleepless nights and weekend fatigue made her wonder — was it all worth it?
She realized that her relentless focus on earning more had become an end in itself. But why? She had never asked herself that question. What was she truly trying to gain? A new car? A luxury home? She wasn’t sure anymore what she was climbing the ladder for. She had simply kept climbing.
In quiet reflection, Neha discovered that what she valued most were simple things — the company of loved ones, a sense of safety, and the freedom to explore new experiences. Ironically, her obsession with accumulating more had distanced her from these very joys. How much is enough? She had no answer.
For Neha, success had meant constant expansion and achievement. But lacking clarity about her deeper purpose, she had been swept up in the race of ambition.
These questions —
If we wish to live with joy and fulfillment, we must earn wealth — but the right kind.
Dr Ajay V. Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.
Your Trust – Our Responsibility to Restore Health Naturally!
Please Read Next Article-