“कन्या वरयते रूपम् माता वित्तं पिता श्रृतम् । बांन्धवाः कुलमिच्छन्ति, मिष्टान्न इतरे जना:”॥
विवाह संदर्भात प्रत्येकाच्या आवडीनिवडीची माहिती देणारा हा प्रसिद्ध संस्कृत श्लोक आहे. याचा अर्थ असा, लग्न ठरवताना विवाहेच्छुक मुलगी आपल्या होणाऱ्या जोडीदाराचं रूप बघून त्याला पसंत करते. मुलीची आई तो वर सुखवस्तू घरातला आहे ना ? आपल्या मुलीला काही कमी पडणार नाही ना? याचा विचार करते. मुलीचे वडील जावयाचे शिक्षण, कर्तुत्व बघतात. नातेवाईक मुलांचं कुळ बघतात. तो सुसंस्कृत घरातला आहे का, याची खात्री करतात. इतर लोक मात्र फक्त लग्नातल्या भोजनाचा आनंद घेतात.
या संस्कृत श्लोकात म्हटल्याप्रमाणे, आपल्या समाजात विवाह ठरवताना जोडा अनुरूप आहे ना ? हे बघितलं जातं. मुला-मुलींचे रंग, रूप, शिक्षण,व्यवसाय, कुटुंब याबरोबरच धर्म, जात सुद्धा विचारात घेतली जाते. मुला- मुलींचे गुण-दोष पारखले जातात. कुटुंबीयांचा, नातेवाईकांचा विचार केला जातो. अनेकदा जन्मपत्रिकेतले किती गुण जुळत आहेत यावरही लग्न ठरतं. ही सर्व अनुरूपता आजमावताना वैद्यकीय बाबींकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होतं.
लग्न ठरवताना लक्षात घेण्याची एक महत्त्वाची बाब म्हणजे नात्यांमधले विवाह संबंध कसे आहेत, ते पाहणे.
पूर्वीच्या काळी आपल्या देशात अनेक ठिकाणी आत्ते- मामे भावंडांच्यात लग्न लावण्याची प्रथा होती. आपली मुलगी लग्न होऊन आत्याच्याच घरी गेली तर तिला सासुरवास होणार नाही, जास्त हुंडा द्यावा लागणार नाही आणि ती चांगल्या ओळखीच्याच घरात राहील, या कारणाने ही पद्धत योग्य समजली जात असे. अजूनही काही समाजात नात्यात लग्नसंबंध जुळविले जातात.
श्याम आणि बबीता दोघे आते- मामे भावंड. जी ‘ चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक ‘ मध्ये किरकोळ तब्येतीच्या तक्रारीसाठी औषधं घ्यायचे. समाजातल्या रितीप्रमाणे त्या दोघांचं लग्न झालं, पण त्या नात्यातील लग्नसंबंध टाळावेत असा सल्ला त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी दिला होता, पण त्याकडे त्यांच्या कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले. दोघेही शारीरिक व मानसिक दृष्ट्या पूर्णपणे सामान्य प्रकृतीचे. लग्नानंतर एका वर्षातच बबीताला मुलगा झाला. मुलगा जन्मतः सुदृढ होता. दोन वर्षांनी बबीताला एक मुलगी ही झाली. सगळं छान चालू होतं. मुलगा दोन वर्षाचा असताना अचानक फिट्स येऊ लागल्या. त्याच्यावर औषधोपचार सुरू झाले. एक दोन वर्षातच त्याच्या शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागले. हातापायातली शक्ती हळूहळू कमी व्हायला लागली. त्याला उभं राहायला,चालायला त्रास होऊ लागला. तपासण्या करताना लक्षात आलं की,बाळाच्या गुणसूत्रांमध्ये दोष होता. त्यामुळे त्याच्या मेंदूची झीज (ॲट्रॉफी) सुरू झाली होती. दुर्दैवानं या आजाराला वैद्यकशास्त्रा मध्ये उपचार नव्हते.
गुणसूत्रातील हा दोष आनुवंशिक असल्याने बबीता आणि श्यामची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान लक्षात आलं की दोघेही या आजाराचे ‘वाहक ‘ (कॅरियर) होते. काही वर्षात मुलाला बसायला, अन्न गिळायला व अखेर श्वास घ्यायला सुद्धा त्रास होऊ लागला. त्यांच्या छोट्या मुलीलाही हाच आजार असल्याने वयाच्या दुसऱ्या वर्षी तिलाही त्रास सुरू झाले. औषधोपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे दोन्ही मुलं त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी दगावली.
काही कुटुंबात आनुवंशिक आजार असू शकतात. बहुतेक वेळी ते व्यक्त होत नाहीत. मात्र नात्यात लग्न केल्यास नवरा व बायको दोघांमध्ये हे आजार असण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी त्यांना होणाऱ्या अपत्यांमध्ये आजार गंभीर स्वरूपात व्यक्त होतो. जसा, शाम व बबीताच्या बाळांमध्ये झाला. म्हणूनच आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार नात्यातील लग्नसंबंध नक्कीच टाळायला हवा.
गीता आणि अविनाश यांची मुलगी मिताली हिच्यासाठी ‘ वर ‘ संशोधन जोरात सुरू आहे. मितालीसाठी एक पूरक स्थळसुद्धा सांगून आलंय. मुलगा उच्चशिक्षित आहे. चांगल्या कंपनीत नोकरीला आहे, सुशिक्षित कुटुंबातला आहे. मुला- मुलीने एकमेकांना पसंतही केलं आहे. पण मग कुणीतरी म्हणालं की, दोघांचा रक्तगट एकच असल्यामुळे पुढे बाळ व्हायला त्रास होईल. रक्तगट एकच म्हणून इतकं चांगलं स्थळ सोडून द्यायचं का ? रक्तगट एक असेल तर खरच काही त्रास होतो का? हे विचारायला गीता आणि अविनाश ‘ चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक ‘ मध्ये आले होते. मुला-मुलीचा रक्तगट एक असेल तर बाळ होण्यात अडचणी निर्माण होतात. यासारख्या अनेक गैरसमजुती समाजात आढळतात. रक्तगट एक असेल तर काहीही समस्या निर्माण होत नाही. मुलीचा रक्तगट ‘ निगेटिव्ह ‘ असेल व तिच्या नवऱ्याचा ‘ पॉझिटिव्ह ‘ असेल तर मात्र गर्भारपणात काही वेळेस समस्या निर्माण होऊ शकते. यामध्ये बाळाचा रक्तगट वडिलांप्रमाणे ‘पॉझिटिव्ह ‘ असल्यास आईच्या रक्तामध्ये बाळासाठी त्रासदायक अशा ‘अँटीबोडीज ‘ निर्माण होऊ शकतात. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्रात औषधांच्या सहाय्याने हा त्रास टाळता येऊ शकतो. म्हणूनच रक्तगट कोणताही असला, तरी लग्न करायला हरकत नाही.
प्रत्येक विवाहेच्छुक जोडप्याने ‘थॅलेसेमिया ‘ या रक्ताच्या आजाराची तपासणी मात्र नक्की करून घ्यायला हवी. ‘ अल्फा ‘ व ‘ बीटा ‘ ‘थॅलेसेमिया ‘ हे आजार रक्तातील हिमोग्लोबिन मधील प्रथिनांच्या साखळीतील दोषांमुळे होतात. या आजारात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. ‘ बीटा थॅलेसेमिया ‘ दोन प्रकारचा असतो ‘थॅलेसेमिया ‘ मेजर मध्ये प्रथिनांच्या दोन्ही साखळ्यांत दोष असतो. या आजाराचे अगदी लहान वयातच निदान होते. यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी होत असल्याने शरीरात वारंवार रक्त भरावं लागतं. हा आजार खूपच गंभीर असतो.
‘थॅलेसेमिया मायनर ‘ मध्ये प्रथिनांच्या एका साखळीत दोष असतो. या आजाराच्या व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण थोडे कमी असते. स्वतःला आजार असल्याची माहिती बहुतेकदा त्यांना नसते. या व्यक्ती प्रामुख्याने आजाराच्या ‘ वाहक ‘ (कॅरिअर) असतात. गरोदरपणातील तपासण्यांमध्ये प्रेमा हिला ‘थॅलेसेमिया मायनर ‘ आजार असल्याचे लक्षात आलं. त्यामुळे तिच्या नवऱ्याची अखिलची तपासणी करण्यात आली. अखिल पण ‘थॅलेसेमिया मायनर ‘ होता. अशा वेळेस गर्भाला ‘थॅलेसेमिया मेजर ‘ असण्याचा धोका असल्याने गर्भजल परीक्षा करून तपासणी केली. दुर्दैवाने गर्भाला ‘थॅलेसेमिया मेजर ‘ चा आजार असल्याचे निदान झालं. अशा परिस्थितीत प्रेमाला नाईलाजाने गर्भपात करायला लागला. नवरा व बायको दोघेही ‘थॅलेसेमिया मायनर’ असतील तर होणाऱ्या बाळांमध्ये ‘थॅलेसेमिया मेजर ‘ ची शक्यता 25% असते तर 50% बाळांमध्ये ‘थॅलेसेमिया मायनर ‘ आढळतो व 25% बाळांमध्ये ‘थॅलेसेमिया ‘ हा आजार नसतो. म्हणूनच ‘थॅलेसेमिया मायनर ‘ असणाऱ्या दोन व्यक्तींनी एकमेकांबरोबर विवाह करणे टाळावं.
लग्न करण्यापूर्वी मुला- मुलींनी हिमोग्लोबिन,रक्तातील साखर,थायरॉईड याबरोबरच एच.आय.व्ही., हीपॅटाइटिस सारख्या रक्ततपासण्यासुद्धा नक्की कराव्यात. शारीरिक स्वास्थ्या बरोबर मानसिक स्वास्थ्याबद्दलची माहिती असावी.
कॉलेजमधील शेवटच्या वर्षात माधवीला नैराश्याचा (डिप्रेशन) त्रास सुरू झाला. महाविद्यालयातील वातावरण, अभ्यासाचा ताण इत्यादी अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत होत्या. नैराश्य दूर होण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडून औषध सुरू केले आणि त्याचा चांगला परिणाम व उपयोगही झाला. तिची आई दररोज तिला नाश्त्यातून औषध देत असे. यथा अवकाश कॉलेज संपलं, नोकरी लागली आणि लग्नही झालं. लग्नाच्या वेळेस तिच्या नैराश्याच्या आजाराची कल्पना सासरच्यांना दिली गेली नव्हती. सासरी केल्यावर माधवीची औषधं बंद झाली. नवीन संसाराच्या ताणाने व औषध बंद झाल्याने माधवीला पुन्हा नैराश्याचा (झटका) आला. त्यानंतर सासरच्यांनी माधवीला ‘ चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक’ मध्ये उपचार सुरू केले, कारण त्यांना आलेला होमिओपॅथिक औषधांचा गुणकारी स्वानुभव. यथा अवकाश माधवी देखील होमिओपॅथिक औषधोपचाराने नैराश्यातून पूर्णपणे बरी झाली.
आपण प्रेमात पडतो, पण लग्न अचानक होत नाही, ते करावं लागतं. म्हणून शारीरिक व मानसिक, सर्वच गोष्टींचा नीट विचार करूनच पुढे जायला हवं, विशेषतः वैद्यकीय पूरकतेसाठी. त्यासाठी काही गैरसमजुतीही दूर करायला हव्यात. एकमेकांशी संवाद साधूनच भविष्यावर परिणाम करणारं पाऊल उचलायला हवं.
‘ चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक ‘ मध्ये एक जोडपं आलं होतं. लग्नाला एक वर्ष झालं होतं, परंतु अजूनही त्यांना शरीर संबंध ठेवायला जमत नव्हतं. याविषयी एकमेकांशी ते मोकळेपणाने बोलू शकले नव्हते व इतर कोणाशीही बोलायचं हे त्यांना समजत नव्हतं. सुरुवातीला ठेवलेला संयम आता सुटत चालला होता आणि आता चिडचिड, अबोला, भांडण सुरू झाली होती. अगदी नाईलाजाने त्याने आपल्या बहिणीला ही समस्या सांगितली आणि मग बहीणच त्या दोघांना माझ्याकडे मार्गदर्शनासाठी घेऊन आली कारण तिच्या देखील लैंगिक समस्या होमिओपॅथिक औषधाने पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या. खरं तर ही खूपच सर्वसामान्य समस्या आहे. बहुतेकदा याविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. हा विषय आपल्या समाजात निषिद्ध समजल्या जातो. अनेकदा नवविवाहित जोडप्याला शरीरचना, शरीरसंबंध याविषयीची शास्त्रीय माहितीच नसते. कधी कधी याविषयी भीती असते. दुखेल का ?किती त्रास होईल का ?जमेल का ? यासारखे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात.
सिनेमा, कादंबऱ्या, मित्रमंडळी यांच्याकडून अतिरंजीत व अशास्त्रीय माहिती त्यांना मिळालेली असते. ‘ सुहागरात’, ‘ पहिली रात्र’ याविषयी वेगवेगळ्या काल्पनिक अपेक्षा असतात. आणि मग अपेक्षाभंग झाल्यावर एकमेकांबरोबरच्या नात्यावर वाईट परिणाम होतात. अशावेळी अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचलेली जोडपी आम्ही ‘ चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक’ मध्ये पाहिली आहेत. म्हणूनच लग्न ठरल्यानंतर प्रत्येक जोडप्याने याविषयी शास्त्रीय माहिती घ्यायला हवी.
लग्न ठरलं की लग्नघरी धामधुम सुरू होते. खरेदी, वेगवेगळे समारंभ आणि त्याची तयारी यात सगळेजण पूर्णपणे मग्न होतात. आणि मग काही महत्त्वाच्या गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष होतं.
लग्नासाठी सुट्टी काढून अमेय अमेरिकेतून भारतात आला. स्नेहाबरोबर लग्न ठरलं आणि 15 दिवसात झालं सुद्धा. स्नेहाचे शिक्षण अजून चालू होतं. एका वर्षाने शिक्षण संपल्यावर ती अमेरिकेला जाणार होती. लग्नानंतरचा दीड महिन्याचा काळ धावपळीतच गेला. अमेयची अमेरिकेला परत जाण्याची वेळ अगदी उदयावर येऊन ठेपली. तेव्हा अमेय व स्नेहा घाईघाईतच ‘ चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक’ मध्ये सल्ला घेण्यासाठी आले. स्नेहाची मासिक पाळी चुकली होती. ती गर्भवती होती. मूल होऊ देण्याची दोघांची तेव्हा मानसिक तयारी नसल्याने गर्भपाताविषयी विचारणा करण्यासाठी ते दोघेजण माझ्याकडे आले होते.
स्नेहा आणि अमेय प्रमाणे अनेक जोडपी नको असताना गर्भधारणा झाल्याने गर्भपात करण्याविषयी विचारणा करण्यासाठी आमच्या क्लिनिकमध्ये येतात. खरं तर लग्नानंतर गर्भधारणा कधी हवी हा विचार लग्ना आधीच करायला हवा. त्यानुसार गर्भनिरोधक साधनांची माहिती सुद्धा लग्नापूर्वीच घ्यायला हवी. या काळात प्रामुख्याने कंडोम व गर्भनिरोधक गोळ्या वापरल्या जातात याविषयी माहिती फॅमिलीडॉक्टरांकडून घ्यावी.
वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी अनुरूप जोडीदार निवडताना वैद्यकीय सल्ला घ्या. जोडीदाराची माहिती घ्या. समानता व भिन्नता डोळसपणे बघा. एकमेकांशी संवाद साधा. भविष्यावर चर्चा करा आणि तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी चर्चा करून विवाहपूर्व समुपदेशन घ्या आणि नंतरच लग्नाचा निर्णय घ्या. संवादाने अनेक गोष्टी सोप्या होतात हा मूलमंत्र अत्यंत महत्त्वाचा.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
————————————————-
“कन्या वरयते रूपम् माता वित्तं पिता श्रृतम् । बांन्धवाः कुलमिच्छन्ति, मिष्टान्न इतरे जना:”॥
This famous Sanskrit verse describes the preferences of different people regarding marriage. Its meaning is this: when deciding on a marriage, the prospective bride chooses her future partner based on his appearance. The bride’s mother considers whether the groom comes from a well-to-do family and whether her daughter will be well provided for. The bride’s father looks at the groom’s education and achievements. Relatives examine the groom’s family background to ensure he comes from a cultured home. Other people, however, simply look forward to enjoying the wedding feast.
As the Sanskrit verse says, in our society, compatibility is carefully assessed before finalizing a marriage. Factors such as complexion, appearance, education, profession, and family background are considered, along with religion and caste. The strengths and weaknesses of both the bride and groom are weighed, and the opinions of family members and relatives are taken into account. Many times, the decision also depends on how many points match in the horoscopes. Yet, while testing all these areas of compatibility, medical considerations are often overlooked.
One important factor to keep in mind when arranging a marriage is to see how closely related the couple is. In earlier times, in many parts of our country, it was common for cousins to marry. If a girl married her maternal or paternal cousin, it was believed she would avoid the hardships of a new household, her family would not have to give a large dowry, and she would live in a familiar home. Even today, some communities still arrange marriages within the extended family.
Shyam and Babita were maternal cousins who would often visit ‘Chaitanya Homeopathic Clinic’ for minor health complaints. Following social custom, the two got married—despite their family doctor’s advice against marriages between close relatives. The family ignored the warning. Both were physically and mentally healthy at the time of marriage. Within a year, Babita gave birth to a healthy baby boy. Two years later, she had a daughter. Everything seemed to be going well.
When the boy turned two, he suddenly began having seizures. Treatment began, but within one or two years his muscles started weakening, and the strength in his arms and legs gradually declined. He had increasing difficulty standing and walking. Medical tests revealed a genetic defect in his chromosomes, which had begun causing brain atrophy. Unfortunately, modern medicine had no cure for this condition.
Since the defect was hereditary, Babita and Shyam were tested and found to be carriers of the same disorder. Within a few years, their son began struggling to sit, swallow food, and eventually even to breathe. Their young daughter developed the same condition by the age of two. With no effective treatment available, both children sadly passed away by the age of eight.
Some families carry hereditary illnesses that often remain unexpressed. However, in marriages between close relatives, both husband and wife are more likely to carry the same genetic condition. In such cases, the disease may manifest severely in their children—just as it happened with Shyam and Babita’s children. That is why modern medicine strongly advises avoiding marriages between blood relatives.
Geeta and Avinash were busy looking for a suitable groom for their daughter, Mitali. They had already found a highly compatible match: the young man was well-educated, had a good job in a reputable company, and came from a cultured family. The couple had met and liked each other. But then someone remarked that both had the same blood group, which could cause problems in having children.
Confused, Geeta and Avinash came to ‘Chaitanya Homeopathic Clinic’ to ask: “Should we reject such a good proposal just because the blood group is the same? Does this really cause problems?”
In truth, having the same blood group causes no difficulty in conceiving or having healthy children. A possible medical concern arises only if the bride’s blood group is negative (Rh-negative) and the groom’s is positive (Rh-positive). In such cases, during pregnancy, if the baby inherits the father’s positive blood type, the mother’s body may produce antibodies harmful to the baby. However, modern medicine can prevent this complication with timely treatment. Therefore, regardless of blood group, there is no obstacle to marriage.
Every couple planning to marry should, however, get tested for Thalassemia, a blood disorder. Alpha and Beta Thalassemia occur due to defects in the protein chains of hemoglobin. In this condition, hemoglobin levels in the blood are low.
Beta Thalassemia has two forms:
Thalassemia Major – Defects in both protein chains. This is diagnosed in early childhood. Severe anemia requires frequent blood transfusions. The condition is life-threatening.
Thalassemia Minor – Defect in only one protein chain. Hemoglobin levels are slightly low. Most people don’t know they have it; they are usually carriers.
During pregnancy tests, it was found that Prema had Thalassemia Minor. Her husband Akhil was tested and found to have it as well. This meant the baby could be at risk of Thalassemia Major. Amniotic fluid testing was done, and sadly, the diagnosis confirmed that the fetus had Thalassemia Major. Prema had to undergo a medical termination of pregnancy.
When both husband and wife have Thalassemia Minor, there is a 25% chance their child will have Thalassemia Major, a 50% chance the child will have Thalassemia Minor, and a 25% chance of having no Thalassemia at all. Therefore, two Thalassemia Minor carriers should avoid marrying each other.
Before marriage, both bride and groom should get tested for hemoglobin, blood sugar, thyroid function, HIV, and hepatitis, along with other health checks. Mental health awareness is equally important.
Madhavi experienced depression in her final year of college due to academic pressure and other factors. She sought psychiatric treatment, and the medication helped her recover. Her mother made sure she took her medicines daily. Eventually, Madhavi graduated, got a job, and married. Her in-laws were not informed about her history of depression. After marriage, her medication was stopped. The stress of adjusting to her new life and stopping the medication triggered a relapse.
Her in-laws, having experienced positive results with Homeopathy before, brought her to ‘Chaitanya Homeopathic Clinic’ for treatment. Over time, Madhavi fully recovered through Homeopathic care.
Even today, mental illnesses are often hidden and not openly discussed. This secrecy can hinder emotional bonding between partners. Emotional compatibility is essential for marriage. Couples should spend time together before marriage to understand each other. While compromises are part of married life, one must assess beforehand if they are possible. Premarital counseling can be helpful in such situations.
We fall in love, but marriage does not happen by accident—it is a deliberate decision. Therefore, physical, mental, and especially medical compatibility must be considered carefully. Misconceptions should be cleared, and couples should communicate openly before making a life-changing decision.
A couple once visited ‘Chaitanya Homeopathic Clinic’. They had been married for a year but had not yet consummated their marriage. They had never spoken openly about it to each other or to anyone else. Patience was running out, and the relationship had started showing signs of irritation, silence, and quarrels. Out of desperation, the husband confided in his sister, who then brought the couple for guidance—because her own sexual problems had been completely cured through Homeopathy.
In truth, this is a very common problem, but one that is rarely spoken about because it is considered taboo. Many newlyweds lack proper scientific knowledge about anatomy and sexual relations. Some have fears: “Will it hurt? How much will it hurt? Will it even work?” They often get exaggerated and unscientific information from films, novels, and friends. Unrealistic expectations about the “wedding night” can lead to disappointment and strain on the relationship.
At ‘Chaitanya Homeopathic Clinic’, couples have come to us on the brink of divorce for such issues. That is why, after engagement, couples should receive correct scientific information about sexual health.
When a wedding is fixed, preparations begin in full swing—shopping, ceremonies, and excitement keep everyone busy. In the process, some important matters are often neglected.
Ameya took leave from his job in America and came to India for his wedding with Sneha. The wedding took place just 15 days after it was arranged. Sneha was still completing her studies and planned to move to America after graduation. The first month and a half after marriage passed in a whirlwind. As Ameya’s return date to America approached, Sneha missed her period and was found to be pregnant. Since neither was mentally prepared for a child, they came to me to discuss abortion.
Like Ameya and Sneha, many couples come to our ‘Chaitanya Homeopathic Clinic’ seeking advice about terminating an unplanned pregnancy. In reality, the question of “When to have a child?” should be discussed before marriage. Couples should also learn about contraceptive options in advance—commonly condoms and oral contraceptive pills—by consulting their family doctor.
For a happy married life, choose a compatible partner by seeking medical advice. Learn about each other’s similarities and differences. Communicate openly. Discuss your future. Consult your family doctor and undergo premarital counseling before making your decision. Remember—communication is the key to solving many issues.
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.
Please Read Next Article-