निवृत्ती एक प्रवृत्ती…. त्यासाठी होमिओपॅथी !!! / Retirement is a Tendency… For That, Homeopathy !!!

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneFebruary 27, 2026 Anxiety Cancer Ear Problems Female Problems General Information Geriatric Problems Heart Problem Homeopathic and Cure Mental Health Psychiatry Sleep Disorders

निवृत्ती एक प्रवृत्ती…. त्यासाठी होमिओपॅथी !!!

 

“निवृत्त मी झालो, पण निवांत मी झाली” अशी सुरुवात असलेली, वास्तव असं असायला हवं, असं सांगणारी एक गोड कविता नुकतीच वाचनात आली. मात्र या कवितेत अनेकांच्या भावकथा-व्यथा व्यक्त झाल्यात असं वाटलं. निवृत्तीनंतर त्याच घरी राहणं सक्तीच झालंय आणि ती काही कामं हक्काने त्याच्यावर सोपवून रोजच्या धावपळीतून स्वतःला निवांत करत गेलीय….. अशी ती कविता. सगळ्यांच्या घरी अर्थातच अशी परिस्थिती नसेल, उलट निवृत्तीनंतर नवरा पूर्णवेळ घरी राहिल्याने अनेकींच आयुष्य निवांत होण्याऐवजी अशांतसुद्धा झालेले असू शकतं. पण समंजसपणा यातच आहे की दोघांसाठी ती निवृत्ती आनंददायी ठरायला हवी, मग ती त्याची निवृत्ती असो वा तीची.

फार वर्षांपूर्वी ‘आई रिटायर होतेय ‘ हे अशोक पाटोळे यांचं नाटक रंगभूमीवर आलं होतं. भक्ती बर्वे यांनी रंगवलेली ‘आई’ आजही मनामध्ये ठाण मांडून आहे. नवरा निवृत्त होतो आणि मी आता काहीही करणार नाही असं जाहीर करत आरामात आयुष्य घालू लागतो. पण घरातल्या तिला मात्र सकाळपासूनच ‘तेच ते’ म्हणत कोणत्याच गोष्टीपासून मुक्तता नाही. त्यावर  ‘मला निवृत्ती हवी आहे ‘ असं ठामपणे म्हणण्यासाठी लागणार धैर्य असणारी ती आत्ताच्या काळात ती स्त्री आहे.

बाईला घरातून निवृत्त होता येतच नाही, ती कायम घरातच अडकलेली असणार, मग ती नोकरी करणारी असो वा पूर्ण वेळ गृहिणी, या गृहीतकाला छेद देणं बाईला जमलंय का? जमणार आहे का? हा खरा प्रश्न आहे.
खरंतर आपल्या संस्कृतीत वानप्रस्थाश्रमाचा उल्लेख आहेच. याचा आत्ताच्या काळात कसा अर्थ लावायचा हे प्रत्येकाने ठरवायला हवंय. मात्र नोकरीतली निवृत्ती म्हणजे आयुष्यातल्या महत्त्वाच्या, परंतु फक्त एका व्यवधानातून मोकळीक असते, त्यामुळे अनेक गोष्टींना पूर्णविराम मिळत असला तरी तो मिळणार आहे याची कल्पना आपल्याला आधीच असते, परंतु जगण्यातली निवृत्ती मिळवायची तर कशाकशाला स्वल्पविराम, पूर्णविराम द्यायला हवा, याचं येणारे नेमकं भान मनाला परिपक्व करणारं असतं आणि त्यातून येणारं समाधान मनातल्या वानप्रस्थाश्रमाकडे आपसूक येऊन जातं.

आज आयुष्याची वयोमर्यादा खूपच वाढलीय, पूर्वी ‘साठी’ ही वृद्धत्वाची सीमा मानली जायची. त्याच्या पलीकडे माणूस गेला की तो वृद्धच. परंतु आजकाल साठीच्या पुरुषाला ना कोणी आजोबा म्हणणार ना बाईला आजी म्हणणार, इतका बदल वाढत्या जीवनशैलीमुळे नक्कीच झाला आहे. मग जर शरीराला वृद्धत्व येणार नसेल तर मन ही ताजतवानंच असायला हवं. साठीपर्यंत आयुष्य जगलेला माणूस खूप काही अनुभव गाठीशी राखून असतो. अनेक उलथापालथीतून गेलेला असतो. काहींचं आयुष्य तर वेगवान रोलर कोस्टर सारखं वरती- खाली, आडवं-तिडवं होऊन हळूहळू स्थिर होत आलेलं असतं. अशावेळी अनेकदा माणसं दुःखीकष्टी झालेली दिसतात.एक तर या कटू, वाईट अनुभवानी छातीशी कुरवाळून दुःखाचे कढ काढत बसतात किंवा मग आपल्यावरच्या अन्यायाला दुसऱ्या कुणा व्यक्तीला किंवा त्या त्या प्रसंगांना जबाबदार ठरवतात. यातून तात्पुरतं समाधान मिळेलही, पण ते कायमस्वरूपी असेल का? खरंतर अशावेळी वयही जगण्याशी संघर्ष करत राहायला नाखूश असतं. ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ ही विरक्तीची भावना मनाला वेढायला लागते.

इंग्रजीतील ‘हीलिंग’ विषयक साहित्याला अनेक आणि आयुष्यातल्या कटू घटनांना ‘लेट गो’ करता आलं पाहिजे, हे सांगितलेलं आपण ऐकलेलं असतं. पण म्हणजे काय हे अनेकदा कळत नसतं. अनेक जणांचं बोलणं ऐकल्यावर, बरंच काही वाचल्यावर जे संचित हाती आलं त्यातून सांगायचं झालं तर मनःशांतीसाठी, आधी मन स्थिर करायचं. मनाला त्रास देणाऱ्या, छळणाऱ्या घटनेला समोर एक घेऊन बसायचं. आपण नेमके कशामुळे दुखावलं गेलोय हे शोधायचं. त्यात आपल्याला काही जबाबदारीची घेता येत असेल तर ती घ्यायची, स्वतःला माफ करायची गरज असेल तर ते करायचं. दुसरी एखादी व्यक्ती त्याला कारणीभूत असेल तर तिच्या नजरेतून त्या घटनेचा विचार करून पाहायचं. त्या व्यक्तीशी बोलता येईल असं वाटत असेल तर ताबडतोब बोलून मोकळं व्हावं. त्याने गैरसमज दूर होतात (ते अनेकदा गैरसमजच असतात ). नसेल बोलायचे तर त्या व्यक्तीला माफ करून टाकायचं. पुढचं संपूर्ण आयुष्य लावणीला लावण्याइतकी इतकी ती घटना, ती व्यक्ती मोठी नाही हे मनाला ठामपणे सांगायचं आणि झालं- गेलं सारं सगळं मनाच्या गंगेत विसर्जन करायचं.

आयुष्य सुंदर आहेच, ते जगायचं. छोटे- मोठे कटू प्रसंग आपल्या आनंद पेक्षा मोठे करायचे नाहीत, ते सोडून द्यायचे, छान हसायचं…. आणि नव्या नव्या डाव खेळायला सुरुवात करायची, वयाच्या साठीनंतरची सेकंड इनिंग खेळायचीच, सोडून नाही द्यायची मोबाईल फोन आणि टीव्ही बघत…

वरील अनुभ “चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक” मध्ये येणाऱ्या एका पेशंटच्या आयुष्यात घडला होता.

होमिओपॅथिक औषधा नंतर त्या व्यक्तीच्या पेशंटच्या आयुष्यात जे काय बदल झाले आणि मनस्थिती मध्ये बदल घडले ते अनुभव कथन करत आहे.

काय करता येईल त्यासाठी? हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा ‘शोधलं तर खूप पर्याय दिसतील’ असं मी सुचवलं.

सत्तरीच्या मधुराताईंना बाग कामाची हौस. उन्हाळ्याच्या दिवसात त्यांच्या गच्चीवर बागेत मोगरा, जाई, जुईला बहर येतो. त्यांनी आता बाग कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं आहे. जाई, जुईला बहर आल्यानंतर त्यांचा सुगंध त्या मन भरून घेतात, त्यात त्यांना जणू समाधीच लागते. हलका हलक्या हाताने त्या फुलांना टिपतात. दोन- चार ओंजळी भरून आलेली फुलं त्या बाजूलाच असलेल्या नाना- नानी पार्क मधल्या कुणा एकट्याने बसलेल्या त्याच्या किंवा तिच्या ओंजळीत टाकत जातात. त्यांना त्यासाठी ना ओळख लागते, ना काही. पण या कृत्याने त्यांना आता रोज सारे जण ओळखू लागले आहेत. त्याही दोन मिनिटं थांबून सर्वांची गप्पा मारतात. आणि दिवसभरासाठी लागणारा ऊर्जेचा दरवळ मनात साठवून घेतात.

काही दिवसापूर्वी ‘ मॉर्निंग वॉकला ‘ आणखीन एक पेशंट- सुवर्णा ऑंटी भेटल्या. सगळ्यांच्या त्या आंटीच ! 72 वर्षाच्या एकदम सडसडीत, काटक, ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट घालून रोज बॅडमिंटन खेळायला मैदानात येतात.त्यांच्या बरोबरीच्या लोकांबरोबर तर त्या खेळतातच पण अगदी तरुण मुलांबरोबरही मस्त मजेत खेळतात. त्यांचे सारं आयुष्य मुलांना शिकवण्यात गेलं. तो त्यांच्या आयुष्यातला आनंदाचा अमोघ ठेवा. अलीकडेच त्यांना त्यांच्या शाळेतून बोलावणं आलं. सुट्टीत मुलांसाठी कुठलासा कार्यक्रम ठरवला होता. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि निरीक्षक म्हणून येणार का विचारत होते. ‘ हैप्पी गो लकी ‘ असणाऱ्या आंटींना ‘नाही’ म्हणायचं कारणच नव्हतं. त्यात भर म्हणजे त्यासाठी अनपेक्षितपणे मानधन मिळणार आहे, दिवसाला सात हजार रुपये. …‘ लव्ह यु जिंदगी….. हेच गुणगुणलं असणार त्यांनी त्यावेळी. अर्थात ते मिळाले नसते तरी त्यांनी ते काम सोडलं नसतंच. खूप खुश वाटल्या. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचे कृतार्थपण नजरेत भरलं. कुणाचंच आयुष्य सरळ, सोपं, सुरळीत नसतंच. पण त्या प्रवाहावरच स्वार होऊन पुढे जायचं असतं, सुवर्णा ऑंटीना ते फार लवकर कळलं असावं.

निवृत्तीनंतर तुम्ही एकत्र येऊन किंवा गटाने एकत्र काम करा, स्वेच्छेने अनेक गोष्टी करू शकता. फक्त स्वतःची शारीरिक, आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन करा. झाडं लावणं असो समुद्रकिनारा- बाग साफ करणं असो, कोणा गरिबांना जेवण देणं असो, आजाऱ्यांची सोबत सेवा करणं असो, आरोग्य शिबीर आयोजित करणं असो वा मातीकाम, चित्रकला, शिल्पकला शिकवणं, शिकणं असो, छंद हवेतच. त्यांचं महत्त्व जाणवलं तर आताही नवीन आवड शोधणे शक्य असतं. असं काम दुसऱ्यांसाठी असलं तरी समाधान मिळतं ते आपल्याला.

   तीच ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी होमिओपॅथिक औषधं हमखास उपयोगी पडतात आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेला ऊर्जेचा पॉवर हाऊस टिकवण्यासाठी होमिओपॅथिक उपचारपद्धती उपयोगी पडते !!!

 

डॉ अजय व. हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद  
आपला विश्वास – नैसर्गिक आरोग्य पुनर्स्थापनेची आमची जबाबदारी!

कृपया पुढील लेख वाचा  —

—————————————————————————————-

Retirement is a Tendency… For That, Homeopathy !!!

 

    “I may have retired, but I have not become restful” — this was the beginning of a sweet little poem I recently came across, which beautifully expressed what retirement should feel like. Yet, while reading it, I felt it reflected the emotional stories and struggles of many people.

The poem spoke of a man who, after retirement, was compelled to stay at home, while his wife cleverly assigned him daily chores and gradually freed herself from the endless rush of responsibilities. Of course, not every household has the same situation. On the contrary, for some women, life may actually become more restless after their husbands retire and remain at home full-time.

True maturity lies in ensuring that retirement becomes joyful for both — whether it is his retirement or hers.

Years ago, the Marathi play Aai Retire Hote (Mother Retires), written by Ashok Patole, made a lasting mark on the stage. The role of the mother, portrayed by Bhakti Barve, still lingers in our minds. In the play, the husband retires and declares that he will no longer do anything, living a life of leisure. But for his wife, there is no such relief. From morning till night, her duties remain the same, without any sign of “retirement.”

It takes great courage for a woman to firmly declare, “I want retirement too.” That woman exists today — the one who dares to break the assumption that a woman can never retire from her household duties, whether she is a working woman or a full-time homemaker. The real question is: has she succeeded in breaking this notion? Will she ever?

Our culture mentions the concept of Vanaprasthashram (the stage of withdrawal from worldly duties). How one interprets this in modern times is a personal decision. Job retirement gives freedom from only one structured routine of life, but not from life itself. True retirement — from worldly attachments, grudges, and burdens — requires maturity of mind. That maturity brings inner satisfaction, which naturally leads us towards the spirit of Vanaprastha.

Today, life expectancy has increased drastically. In the past, crossing sixty was considered old age. Beyond that, one was automatically labeled “grandfather” or “grandmother.” But now, a man in his sixties is rarely called “grandpa,” nor a woman “grandma.” Lifestyle changes have redefined age. If the body can resist aging, then surely the mind should remain young too.

By sixty, one has gathered vast experiences — some sweet, some bitter, some like a roller coaster of ups and downs before finally finding stability. At this stage, many people appear weary and sorrowful. Some cling to their painful memories, constantly rehashing old wounds. Others blame people or circumstances for the injustices in their lives. Such approaches may give temporary relief, but do they bring lasting peace?

Often, the heart itself grows tired of carrying such struggles. A feeling of detachment naturally arises: “Whatever happened, let it go.”

In English literature on Healing, the concept of “letting go” is frequently emphasized. But what does it really mean? Through many conversations and readings, I have understood this much: for peace of mind, the first step is to stabilize the mind. Then, one must face the hurtful memory directly and examine what exactly caused the pain. If part of the responsibility lies with oneself, acknowledge it. If self-forgiveness is needed, grant it. If another person was the cause, try to see the incident through their perspective. If possible, talk it out and clear the misunderstanding (which often is just that — a misunderstanding). If not, forgive them anyway. And finally, tell yourself firmly: “This incident or person is not greater than the rest of my life.” Then immerse that memory into the sacred river of the mind and let it flow away.

Life is beautiful. It must be lived. Do not let small or big bitter experiences overshadow your happiness. Let them go, smile wholeheartedly, and begin playing fresh new games — because the second innings of life after sixty must be played, not wasted sitting idly with a mobile phone or TV.

A Patient’s Experience at Chaitanya Homeopathic Clinic

The above reflections come from the life of a patient who visited ‘Chaitanya Homeopathic Clinic’. After starting homeopathic treatment, remarkable changes occurred in their mindset and overall outlook.

When the question arose, “What can I do now?” I suggested: “Search, and you will find many possibilities.”

Take the example of Madhura Tai, in her seventies. She had always loved gardening. On her rooftop, fragrant jasmine and mogra bloom beautifully during summer. She has now immersed herself in tending her plants. When flowers bloom, their fragrance fills her heart with joy, almost like meditation. She gently plucks a few handfuls of flowers and quietly places them in the palms of elderly men or women sitting alone in the nearby park. No introductions, no recognition needed — yet this small act of kindness has made her beloved among everyone there. She spends a few minutes chatting with them, and in return, she gathers a reservoir of energy for the day.

Another example is Suvarna Aunty, whom I met during my morning walk. She is 72, slim, fit, dressed in track pants and a T-shirt, and plays badminton every day — not only with her peers but even with youngsters! Her entire life was dedicated to teaching children, which remains her inexhaustible source of joy. Recently, her school invited her back to guide and observe a vacation program for students. True to her cheerful, “happy-go-lucky” nature, she agreed without hesitation. To her delight, she was offered an unexpected honorarium of ₹7,000 per day. Even if she hadn’t been paid, she would have done it gladly — because for her, fulfillment lay in giving back. The gratitude shining on her face while recounting this experience was unforgettable.

No one’s life is smooth and simple. But Suvarna Aunty had long realized that the way forward is not to resist the flow but to ride it with grace.

Living Fully After Retirement.

    After retirement, you can come together with others and voluntarily engage in numerous activities — while keeping in mind your physical and financial circumstances. You could plant trees, clean beaches or gardens, provide meals to the underprivileged, offer companionship and care to the sick, organize health camps, or explore hobbies such as pottery, painting, or sculpture. New interests can still be discovered, no matter your age. Though these activities serve others, the true reward is the inner satisfaction you yourself receive.
To sustain this energy and zest, homeopathic medicines are especially valuable. They help preserve the inner “powerhouse” of vitality, enabling you to live your retirement years with health, energy, and joy.

 

Dr Ajay V. Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.
Your Trust – Our Responsibility to Restore Health Naturally!

Please Read Next Article-