जीवघेणी कळ आणि होमिओपॅथी! / Excruciating Pain and Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneNovember 24, 2026 Anxiety Bone Diseases Cancer Children Problems Female Problems Geriatric Problems Homeopathic and Cure Mental Health Psychosomatic Problems Sleep Disorders

जीवघेणी कळ आणि होमिओपॅथी!

एके दिवशी संध्याकाळी अचानक प्रसिद्ध ऑन्को सर्जन नितीन यांनी मला फोन केला आणि सांगितलं की एक 65 वर्षाची स्त्री आहे, तिच्या असह्य वेदना आहेत, त्यासाठी तिला होमिओपॅथी ट्रीटमेंट द्यायची आहे. तेव्हा तुम्ही येऊ शकता का?

मी लागलीच त्यांच्या हॉस्पिटलला जाण्यास निघालो. हॉस्पिटलच्या पायऱ्या चढता चढतात डॉक्टर नितीन मला भेटले. त्यांनी सांगितलं, गर्भाशयाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया केली आहे. एक महिना झाला अजून वेदना कमी होत नाहीये. एवढीच माहिती देऊन ते निघून गेले.

साधनाताई, गोरा पण उदास सुरकुतलेला चेहरा, कलप उतरल्यानं फिकट लाल- पिवळे झालेले केस, कृश प्रकृती, डोळ्यात वेदना. मी त्यांच्या रूममध्ये गेल्यावर त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं, ‘तुमच्या ओटी पोटातलं दुखणं कमी होत नाहीये, त्यासाठी डॉक्टरांची मदत करण्यासाठी आलोय’.

साधनाताईंनी माझ्याकडे काहीशा साशंक नजरेने पाहिलं. पण डॉक्टर माझं दुखणं शस्त्रक्रिया नंतर सुरू झालंय. औषधानं तात्पुरता कमी होतं, नंतर पुन्हा सुरू होतं.

मी त्यांची फाईल चाळताळता म्हंटलं, ‘तुम्ही चक्क पीएच.डी. आहात’. हे ऐकून त्या क्षणभर सुखावल्या. म्हणाल्या, नवऱ्याची बदली केरळला झाली. मी इथेच. मग जुनी राहिलेली इच्छा पूर्ण केली. तेव्हा सुमित सिंगापूरला शिफ्ट झाला होता. माझाच प्रश्नार्थक चेहरा पाहून त्यांनी खुलासा केला. माझा मुलगा, खाजगी कंपनीत असतो. मी म्हटलं, ‘अरे वा. लग्न झालंय त्याचं की अजून बॅचलर आहे?’ पण तेवढ्यात साधनाताईंच्या पोटात एक असह्य कळ आली. ” आई गं…..डॉक्टर, त्या किंचाळल्या. नर्स पटकन धावत येऊन त्यांना बेडवर निजवलं आणि वेदनाशामक गोळी दिली. मी म्हटलं,’ मी नंतर येतो भेटायला, तुम्हाला त्रास होतो असेल तर’?

“नाही थांबा डॉक्टर, आता बरं आहे.” हलकेच हलकेच उशीला टिकून त्या बसल्या. मी म्हटलं, “आधी कधी दुखलं होतं ?”, त्या सांगतायेत तर दुखण्याबद्दल विचारून घेऊ, असा मी विचार केला.

“वर्षभरापासून अधून मधून दुखायचं. पण गोळ्या घेतल्यावर थांबायचं. दिवस धावपळीचे होते. सुमित इथला जॉब सोडून सिंगापूरला निघाला होता तेव्हा…..” साधनाताईंच्या चेहरा हे सांगताना, ‘सूक्ष्म वेदनेनं चमकल्याचं’ माझ्या नजरेने टिपलं. मुलाचा उल्लेख झाला, की त्या अपसेट होतात हे माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं, “आणि पती? सोबत दिसत नाहीत तुमच्या?

त्या म्हणाल्या,” परवाच गेले ते केरळला. निवृत्त झाल्यावरही स्वस्त न बसणारा माणूस. पहिल्यापासून कामात मग्न. त्यांना मानक सल्लागार पदासाठी विनंती केली त्यांच्या कंपनीनं. मग मी म्हटलं जा, आणि हा माणूस रुजू ही झाला केरळला. बरं आहे. कौटुंबिक कटकटी पासून दूर ठेवतो स्वतःला. माझ्या डोक्यावर सोडून जातो.” साधनाताईनी सुस्कारा सोडला.

मी म्हटलं, ‘रात्री नीट झोप होत नाही का? सतत विचार येतात का काही’?

“हा परवापर्यंत सारं चांगलं होतं, हे काय दुखणं उद्भवलं ‘? साधनाताईंना पोटाच्या व्याधीपेक्षा दुसरं काहीतरी दुःख आहे याची मला खात्री पटली होती.

मी म्हटलं,“स्त्रियांना कधी घरच्या समस्यांमधून निवृत्ती नसतेच, नाही? रोजची कामं, शारीरिक व्याधी, त्यात मुलांचे प्रश्न….” साधनाताईंचे विषादाचे भाव मी टिपले

“खरंय डॉक्टर, शारीरिक व्याधी परवडली, तिला उपचार आहेत. मुलांचे प्रश्न न संपणारे. मुलांचे काय, आम्हाला एकच अपत्य, सुमित. तसा त्याचा काही प्रश्न नव्हता, मागल्या वर्षापर्यंत.” सुरुवातीला त्या डॉक्टरांना सांगावं की नाही या दुविधेत दिसल्या. पण माझं संभाषण सुरू झाल्यानंतर त्या हळूहळू व्यक्त होऊ लागल्या.

मी म्हटलं, “मुलं खरं तर आईजवळ जास्त व्यक्त होतात. म्हणजे मानसशास्त्र तसे सांगतं. एकुलता एक म्हणजे सुमित तुमचा लाडका असणार, नाही का”?

यावर त्या म्हणाल्या,” हो ना, एक तर त्याचे बाबा सदैव कामात व्यग्र.तो लहानपणापासून माझ्या सहवासात. खूप चांगला मुलगा. अभ्यासू”.

मी म्हटलं, “मग बिनसलं कुठे कुठे? मुलांना कधीतरी स्वतंत्र व्हावं लागतं ना? आई वडील किती दिवस पुरणार त्यांना”?

“व्हा स्वतंत्र, पण आई-वडिलांना ताप देऊन नका होऊ”! साधनाताई अचानक उसळल्या.

“त्यानं वडिलांसारखं इंजिनिअरिंग करावं असं मला वाटत होते, तेव्हा मेडिकलला मिळालेले एडमिशन सोडून तो इंजिनियर झाला. अंतिम वर्षातच चांगल्या कंपनीत त्याची निवड झाली. उंच, स्मार्ट, हुशार तरीही मोठ्यांबद्दल आदर बाळगून असलेला, माझ्या शब्दाबाहेर नसलेला मुलगा प्रेमात काय पडतो, भलतेच निर्णय काय घेतो”….. साधनाताईंच्या पोटात पुन्हा कळ आली.

“इथे बेंबीपाशी खूप दुखतंय डॉक्टर, सहन नाही होत. टाके तुटले असतील का”?

तेवढ्यात त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. तो फोन त्यांच्या मिस्टरांचा होता. त्यांना माझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी त्यांच्याकडून फोन घेऊन बोलू लागलो. त्यांच्याकडून अशी माहिती कळली, की “डॉक्टर माझ्या मुलांनं सिंधी मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांचं माझ्या पत्नीने खूप टेन्शन घेतलंय. पण त्याचा तिच्या वेदनेशी काही संबंध असेल असं मला वाटत नाही. बघा तुम्ही. यु नो द बेस्ट ठीक आहे. बाय.”

फोन झाल्यावर साधनाताई पुढे सांगू लागल्या,” काय सांगू, मला विचारल्याशिवाय साधा शर्ट सुद्धा घ्यायचा नाही विकत. अन् त्या निशाशी सूत जुळवून बसलाय.” त्यांचा चेहरा निराशेच्या गर्तेत कोसळल्यासारखा दिसू लागला.

मी म्हटलं, ‘मुलगी चांगली आहे ना’?  थोडं सावध अंदाज घेत बोललो.

“हो डॉक्टर, तसाही माझा प्रेमविवाहावर कसलाच आक्षेप असणार? करा, नं पण अगदी थेट आयुष्याची गाठ बांधेपर्यंत मला कळून देऊ नये? माझी परवानगी घ्यावी असं म्हणत नाहीये, पण विचारावं तरी? माझ्याशिवाय पण हालत नव्हतं त्याचं, इतका सुशील, हुशार मुलगा माझा अन् काही दिवसांच्या अवधीत तिच्या प्रेमात पागल होऊन गेला “?

मी म्हणालो की,” हे असंच असतं साधनाताई. मुलांनी आपला जोडीदार शोधावा, प्रेमात अखंड बुडून जावं, हे सुख त्यांना लाभावं म्हणून आपण धडपडतो ना”?

“प्रेमात आकंठ बुडावं, पण इतकं की त्याला, आईला काय वाटेल याचाही विसर पडावा”? साधनाताई जवळजवळ कडाडल्या जणू मी त्यांचा मुलगाच झालो होतो.

“हो, तुमची अपेक्षा चुकीची नाही. पण यथावकाश सांगितलं ना”?

दोघांनी मिळून सिंगापूरला जायचं ठरवलं तेव्हा. ‘निशा आणि मी चाललो’ म्हणाला तेव्हा कळलं. त्यांचा स्वर दुखावल्यासारखा झाला.

मी म्हणालो,” अशा गोष्टी मुलांना सांगायला संकोच वाटू शकतो. एनी वे, निशा तुम्हाला कशी वाटली? ती चांगली आहे ना”?

“ती चांगली आहे पण, तिचा बाप, (त्यांचा स्वर कातरला) त्या माणसाबद्दल चांगलं बोललं जात नाही. कार्पोरेट जगात मोठा माणूस असेल, पण त्याचे व्यवहार ससोटीचे नाहीत असे लोक सांगतात. अशा घराण्याच्या श्रीमंतीला भुलून माझा सालस पोरगा वाहवत गेला, मला कळलंही नाही. पोटचा पोरगा असं परकं करून टाकतो आईला, या नुसत्या विचाराने पोटात कळ येते हो डॉक्टर”!

साधनाताईंच्या पोटातला ताण असा उत्स्फूर्तपणे बाहेर पडला होता. त्यांनीच त्यांचे निदान केलं होतं.

“साधनाताई, माणसाचं पोट हे इतकं संवेदनशील असतं की, ताणतणाव, चिंता यांचा परिणाम मनाइतकाच पोटावर होतो. ज्या नाळेनं सुमित तुमच्या बंधनात होता ती खरी आत्ता तुटली, मुक्त झाली. हे जितकं नैसर्गिक, तितकं तुम्हाला दुःख होणं साहजिकच. सुमितला तुम्ही जन्म दिला, त्याच्या आयुष्याला दिशा दिली त्याबद्दल तुमचे कौतुकच. पण निसर्गच मुलांना स्वतंत्र दृष्टी देतो, आपली वाट निवडण्याची बुद्धी देतो हेही खरं. त्याने कायम आई-वडिलांवर विसंबून राहावं हे तुम्हाला तरी आवडेल का? आई-वडिलांचे अंतिमतः लक्ष काय असतं, तर मुलांनी स्वतंत्र बुद्धीचे व्हावं, स्वकर्तृत्व वाजवावं, हो ना”?

त्यांच्या मनात समजूतदारपणा झिरपू लागला होता, तरी त्यांनी प्रतिकार केलाच, आणि त्या म्हणाल्या,” तिच्या वडिलांचं काय? एका बदमाश माणसाच्या व्यवसायाचा भाग व्हायचं हे कितपत योग्य आहे”?

“साधनाताई, ही पिढी भविष्यातली आहे आणि त्यांची मुले वेगळी आहेत. पूर्वी ज्याला लबाड म्हणत त्याला आज ‘स्ट्रॅटेजिस्ट’ म्हणतात. कार्पोरेट जगातल्या उलाढालींचे ज्ञान आपल्याला नाही. तुम्हाला आहे का? ते ज्ञान घेण्यासाठी तुम्ही सुमितला सक्षम केले आहे, ते तो वापरल्याशिवाय राहील का? आजची लढाई, आजची शस्त्रे परतूनच लढावी लागेल, त्यांच्या हातात तुमच्या काळातली शस्त्रे देण्यात शहाणपण आहे का”?

मी थोडा वेळ जाऊ दिला आणि म्हटलं, “सुमितनं आपल्या जोडीदाराची निवड स्वतः केली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत केलं पाहिजे. त्याला निवड करता येत नाही असं म्हणणं म्हणजे आपण त्याला सक्षम केलं नाही असं म्हणता येईल. नवी पिढी जे करते त्याला पाठिंबा देणं, त्यात दुर्दैवाने अपयश आलं तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं एवढंच तुमच्या हाती आहे. सुमितन एक नवीन घेतली आहे, याचा तुम्हाला अभिमान आहे. तो त्याच्या काळजीपोटी झाकोळला आहे एवढेचं. तुम्ही मुलाच्याच्या निर्णयाचे स्वागत करा. तुमच्या साऱ्या कळा शांत होऊन जातील”.

त्यांना होमिओपॅथिक औषध सुरू केल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या वेदना खूपशा कमी झाल्या आणि एका आईचं तटातट तुटलेले काळजाचे धागे पुन्हा जुळून यायला सुरुवात झाली होती. ही कमाल होमिओपॅथिक औषधांची होती.

 

डॉ अजय व. हनमाने
एम. डी. (होमिओ) ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद  
आपला विश्वास – नैसर्गिक आरोग्य पुनर्स्थापनेची आमची जबाबदारी!

कृपया पुढील लेख वाचा  —

0000000000000000—————————————————————

Excruciating Pain and Homoeopathy

 

One evening, quite suddenly, a well-known onco-surgeon, Dr. Nitin, called me. He said,

“There is a 65-year-old woman suffering from unbearable pain. I want to try homoeopathic treatment for her. Can you come?”

I immediately left for his hospital. As I was climbing the hospital steps, Dr. Nitin met me and briefly informed me,

“She has undergone surgery for uterine cancer. It has been a month, but her pain has not reduced.”

Saying only this, he left.

Sadhanatai lay there — fair-complexioned, with a sad, wrinkled face; her hair had turned pale reddish-yellow after chemotherapy; her body was frail, and her eyes reflected pain.

When I entered her room, I greeted her and said,

“I have come to help reduce the pain in your lower abdomen.”

She looked at me with some suspicion and said,

“Doctor, my pain started after the surgery. Medicines reduce it temporarily, but it returns again.”

As I flipped through her file, I remarked,

“You are a Ph.D. holder.”

She smiled faintly. “My husband was transferred to Kerala. I stayed back and fulfilled an old, unfinished dream.”

Seeing the question on my face, she clarified,

“My son, Sumit, shifted to Singapore. He works in a private company.”

I smiled and asked,

“Oh! Is he married, or still a bachelor?”

Just then, an excruciating spasm seized her abdomen.

“Mother… Doctor!” she screamed.

A nurse rushed in, laid her down, and administered a painkiller. I said gently,

“I can come later if you are uncomfortable.”

“No, please stay, doctor. I am better now,” she said, slowly propping herself against the pillow.

I thought it best to understand her pain in detail and asked,

“Have you experienced this pain before?”

“For about a year, on and off. It used to stop after taking tablets. Life was busy. When Sumit left his job here and moved to Singapore…”

As she mentioned her son, I noticed a subtle flicker of pain on her face. I realized that talking about him upset her.

I asked,

“And your husband? He isn’t here?”

“He went to Kerala recently. Even after retirement, he cannot sit idle. His company requested him to take up a consultant role, and he agreed. It’s fine. He keeps himself away from family hassles and leaves everything to me,” she sighed.

I asked gently,

“Do you sleep well at night? Do you have recurring thoughts?”

“Until recently, everything was fine. Then suddenly this pain started…”

By now, I was convinced that her suffering was not only physical.

I said,

“Women never really retire from family responsibilities, do they? Daily chores, health problems, and children’s issues…”

She nodded silently.

“That’s true, doctor. Physical illness is manageable — there are treatments. But children’s problems never end. We have only one child, Sumit. Until last year, there was no issue at all.”

She hesitated at first, unsure whether to share more, but gradually began to open up.

I said,

“Children usually open up more to their mothers. Psychology says so. And an only child is naturally very close to the mother, isn’t he?”

“Yes,” she replied.

“His father was always busy with work. Sumit grew up mostly with me. He is a very good, studious boy.”

I asked,

“Then where did things go wrong? Children eventually need to become independent, don’t they? How long can parents guide them?”

“Let them become independent, but not at the cost of hurting their parents!” she burst out.

“I wanted him to become an engineer like his father. He left a medical admission and pursued engineering. In his final year, he got selected by a good company. Tall, smart, intelligent, respectful — always listened to me. And suddenly, he falls in love and starts making such decisions…”

Another sharp pain gripped her abdomen.

“It hurts terribly near my navel, doctor. I can’t bear it. Could the stitches have opened?”

Just then, her phone rang. It was her husband calling. He wanted to speak to me, so I took the call.

He said,

“Doctor, my son has decided to marry a Sindhi girl. My wife has taken a lot of stress because of this. But I don’t think it has anything to do with her pain. Please see what you can do. You know best. Bye.”

After the call, Sadhanatai continued,

“He wouldn’t even buy a shirt without asking me. And now he has suddenly bonded with this Nisha.”

Her face seemed to sink into despair.

I asked cautiously,

“The girl is good, isn’t she?”

“Yes, doctor. I have no objection to love marriages. But should he not have at least informed me before deciding to tie his life to hers? I’m not saying he needed permission, but shouldn’t he have asked? A boy who couldn’t manage without me has become blindly obsessed with her within days!”

I replied,

“This is how it happens, Sadhanatai. We raise our children hoping they find love and happiness.”

“To be so deeply in love that he forgets what his mother might feel?” she snapped, almost as if I were her son.

“Your expectations aren’t wrong,” I said gently.

“But he did tell you — eventually.”

“When they decided to go to Singapore together. That’s when he said, ‘Nisha and I are leaving.’”

Her voice trembled.

I said,

“Children often hesitate to discuss such matters. Anyway, how did you find Nisha?”

“She is good, but her father…”

Her voice faltered.

“People don’t speak well of him. He is big in the corporate world, but his dealings are questionable. My innocent son got carried away by their wealth. The thought that my own child has made me feel like a stranger gives me stomach pain, doctor.”

Her emotional tension had spilled out freely. In fact, she had diagnosed herself.

I said calmly,

“Sadhanatai, the stomach is extremely sensitive. Stress and anxiety affect it just as deeply as they affect the mind. The bond that tied Sumit to you has now loosened — not broken, but transformed. This is natural, though painful. You gave him life and direction — that itself is admirable. But nature gives children independence and the ability to choose their path. Would you really want him to remain dependent on you forever? Ultimately, don’t parents want their children to stand on their own feet?”

Understanding slowly dawned on her, though she resisted once more,

“But what about her father? Is it right to be associated with such a man?”

“This generation is different,” I explained.

“What earlier was called ‘cleverness’ is now termed ‘strategy.’ Corporate dynamics are complex. Do we truly understand them? You educated Sumit to handle such realities — will he not use that knowledge? Today’s battles must be fought with today’s weapons. Is it wise to hand them outdated ones?”

After a pause, I continued,

“Sumit has chosen his partner. His choice should be respected. If we deny his ability to choose, we deny our own role in empowering him. Supporting the new generation — and standing by them even if they fail — is all we can do. You are proud of your son. That pride is simply clouded by concern. Accept his decision, and your pain will subside.”

After starting Homoeopathic treatment, within a few days her pain reduced significantly.

And slowly, the torn threads of a mother’s heart began to mend again.

This was the quiet miracle of Homoeopathic medicine.

 

Dr Ajay V. Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.
Your Trust – Our Responsibility to Restore Health Naturally!

Please Read Next Article-