‘नाही’ म्हणण्याचं धाडस …… होमिओपॅथिक उपचाराने येते ! / Courage to say ‘NO’……comes with Homoeopathic Treatment !

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneApril 28, 2025 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Mental Health

“नाही” म्हणण्याचं धाडस …… होमिओपॅथिक उपचाराने येते !

काल निताचा फोन आल्यापासून अनुष्का अस्वस्थ होती. मधूनच विचारात पडलेली, मधूनच चिडचिड, मधूनच पुटपुट ही तिची नेहमीची लक्षणे पाहून तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलं, की बहुतेक तिच्या मैत्रिणीचा नीताचा फोन आला असणार !
नीताने अनुष्काला, ” तिच्या भाच्याच्या लग्नाला जायचंय, त्यामुळे तुझ्या आईचा नेकलेस घालायला दे, तो नेण्यासाठी उद्या सकाळी येते “ असं सांगून टाकलं होतं.
दरवेळी नीताने काहीतरी वस्तू मागितली, की अनुष्काची चिडचिड होत असायची. तिला नेहमी वाटायचे, की ही अशी कशी वागू शकते ? पण शेवटी ती तिला वस्तू द्यायची. हे असं गेले कित्येक वर्ष ठरल्याप्रमाणे होत होतं, कारण शेवटी ती लहानपणापासूनची सख्खी मैत्रीण होती. तिची पण अनुष्काला तिच्या या सख्या मैत्रिणीचं मागा-मागी अजिबात आवडत नव्हती. तिची ही लहानपणापासूनची सवय आहे, हेही तिला माहीत होतं.
दोघी एकमेकांच्या गोष्टी वापरायच्या, पण तिला आता असं वाटायचं, की आपण आता लहान नाही आहोत आणि तिला ते आवडत नसायचं तिचं हे वागणं! ती  मोठी कधी होणार ? मला गृहीत धरण कधी थांबवणार ? असं तिला नेहमी वाटायचं.
अनुष्काला दुसऱ्याचे काही घेणं आवडत नसायचं आणि ती कधीच मागायची पण नाही. तिने तिला नेकलेस देतेस का ? असं न विचारता डायरेक्ट नेकलेस घ्यायलाच येते असं सरळ सांगून टाकलं, म्हणजे सरळ सरळ आज्ञाच केली होती, ती तिच्यावर हक्क दाखवत होती, हे अनुष्काला सहन होत नव्हतं.
तिच्या मते ती स्वतःची सोय पाहते. तिचं असं दिवसेंदिवस गृहीत धरण वाढत चाललेला आहे हे तिला जाणवत होतं. मैत्रीचा हक्क ती जास्तच  गाजवत होती. पण ती काहीही घेऊन जाते याचा तिला त्रास होत होता.
कारण मागच्या वेळी तिने दोन दिवसासाठी तिची कार  नेली होती आणि तिचा एक्सीडेंट (गाडी ठोकून आणली होती ) केला होता. गाडीच एवढं नुकसान करूनही ते हसून साजरं करावं लागलं. ती दुरुस्तीचे पैसे देते म्हणाली होती खरं, पण आपण असे कसे घेणार तिच्याकडून ? म्हणून त्यावेळेस पैसे घेतले नाहीत.
ण एवढ्या घट्ट मैत्रिणीबद्दल एवढी चिडचिड का होती आहे, हे तिला कळत नव्हतं. जर नेकलेस दिला नाही, तर ती दुखावेल आणि मैत्रीत तुटेल अशी मनात एक भीती वाटत होती किंवा जर या वेळेस तिला नेकलेस दिला आणि तीने नेकलेस हरवला तर ?.…तिच्या मनाचा गोंधळ सुरू झाला होता.

 

हा आईचा नेकलेस तिची आठवण आहे ही.  त्याची किंमत पैशात करता येणार नाही किंवा ती रिप्लेसमेंट होऊ शकत नाही, याची तिला चांगलच माहिती होतं.
पण तिच्या मनात निताला नेकलेस द्यायची इच्छा नव्हती, पण “नाही “ म्हणता येत नाही याचा तिला स्वतःवरच राग येत होता. नीताला नाही म्हणणं कधीच जमणार नाही म्हणून हेल्पलेस (Helpless)वाटतं होते म्हणून तिला स्वतःचा खूप राग यायला लागला होता.
 सख्ख्या मैत्रिणीला “नाही ” म्हटलं तर ती दुखावेल, पण तिला दुखवायचं पण नव्हतं असं तिला वाटत होतं. दरवेळी ती स्वतः मात्र दुखावून जात होती हे तिच्या लक्षात येत नव्हतं. हे आयुष्यभर असं चालणार का ? म्हणून स्वीकारून टाकता येणार आहे का ? याही प्रश्नाचे उत्तर तिला मिळत नव्हतं.
तिने जेव्हा तिच्या नवऱ्याला तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस? असं विचारलं तेव्हा त्याने स्पष्ट सांगितलं, कि “माझे मैत्रीचे फंडे स्पष्ट आहेत. खऱ्या मैत्रीत मैत्री आहे तशी स्वीकार करायला हवी आणि आपल्याला न पटणारी गोष्ट सांगण्याचा मोकळेपणा आणि विश्वास हवा.”
एवढं सांगितल्यावर सुद्धा, आपली मैत्रीण दुखावली जाईल यासाठी ती 50 (पन्नास) कारणं नवऱ्याला सांगत होती. त्यात तीची अडकल्याची भावना  लक्षात येऊन चिडचिड होत होती.
नवऱ्याने तिला चॅलेंज केलं की, तुला फक्त नाही म्हणायचंय यासाठी  तू 50 (पन्नास) कारणं आणि परत त्याचे परिणाम मला सांगत आहेस, त्यापेक्षा तुझं प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स दाखव.
असं चॅलेंज केल्यानंतर तिला डोन्ट से एस  व्हेन यू वॉन्ट से नो (Don’t Say Yes When You Want Say No) वगैरे वाचलेली पुस्तके तिला आठवली एवढं वाचून ही प्रत्यक्ष वेळ आल्यावर ती अवघड जातं हे तीच्या लक्षात आलं.  परंतु घट्ट नात्यात असं म्हणणं  ही खरी कसरत असते. अशा प्रसंगी आपणच आपल्या भोवती ” असं झालं तर काय?” च्या कल्पनेत प्रश्नांचे कोंडाळे तयार करतो आणि मानसिक शांती हरवून बसतो.
ती स्वतःच  स्वतः सोबतच संभाषण करू लागली, ‘अनुष्का, तुमची मैत्री एवढी लेचीपेची आहे का ? आणि  इतक्या वर्षांच्या सवयीमुळे असं घडतंय ना ? पण मला हे आवडत नाही आहे हे तिला कसे कळेल ? यासाठी मलाच सांगायला पाहिजे ना मोकळेपणाने ? तिला  ‘नाही‘ म्हणावं अशा गोष्टी  आहेत पण आपण कधीच ‘नाही ‘ का म्हणू शकत नाही ?  या प्रश्नामुळे आपण स्वतःचीच घुसमट करून घेतोय ? फक्त एकदा ‘नाही ‘ म्हणता आलं, तर तो ते बॅरिअर किंवा कुंपण तुटेल. मग दरवेळेचा ताण आणि चिडचिड थांबेल. तीच्या लक्षात येत होतं, की मुद्दा नेकलेसचा नाही आहे तर तिच्या मनातल्या बॅरिअरचा आहे. तिला  प्रश्न पडला की जर ही सख्खी मैत्रीण रुसली किंवा माझं मनावर न घेता पूर्वीसारखी वागत राहिली तर ?’
अनुष्का पुन्हा माझ्याकडे नेहमीप्रमाणे डोकं ठणकते आहे, प्रचंड दुखते या कारणासाठी औषध घ्यायला आली. तेव्हा मी कोणताही बाकीचे प्रश्न न विचारता, मैत्रिणी सोबत परत काय झालं आहे  का ? हा डायरेक्ट प्रश्न विचारला. तेव्हा तिने घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या.
ती माझी नियमित येणारी आणि वेगवेगळ्या आजारांवरती नियमितपणे होमिओपॅथिक औषध घेणारी,  होमिओपॅथीवर अत्यंत विश्वास असणारऱ्या अनेक पेशंट पैकी एक होती. कोणत्या कारणामुळे तिची डोकेदुखी आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर लक्षात आलं की, तिला ‘नाही ‘ म्हणणं जमत नव्हतं आणि यातून तिच्या मानसिक स्थिती बिघडून तिचं टेन्शन वाढत जाऊन ‘ टेन्शन हेडेक ‘नावाचा आजार सुरू व्हायचा.
जेव्हा कधी तिला उत्तर सुचायचं नाही,  अडचणीत यायची, कोणाला ‘नाही’ म्हणण्याचा प्रसंग यायचा, अशा वेळेस तिचं उत्तर तिला सापडलं नाही तर डोकेदुखी सुरू व्हायची.
त्या रात्री तिला  होमिओपॅथिक औषध चा एक डोस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम प्रसन्न मनाने ती उठली. रात्रभर शांत झोप झाली होती. तिचं डोकं दुखण  एकदम शांत झालं होतं. डोकेदुखी कुठल्या कुठे पळून गेली होती.
 चटकन तिला आठवले की, तिच्या डोक्यात जो प्रश्न राहिला होता त्या प्रश्नाचं तिला पटकन उत्तर सापडलं होतं. तिला आपल्याला नेमकं काय हवं आहे आणि त्यासाठी काय करायला हवं याचे उत्तर मिळालं होतं.
“तिने कसं वागायचं हा तिचा प्रश्न आहे. ती दुखावेलही  किंवा नव्याने विचार करेलही.  आपल्याला कसं वागायचं हे आपण ठरवायचं. तिच्याशी थोडक्यात बोलायचं आणि काय बोलायचं हे शब्द तिला सापडले. “
आपल्याजवळचे इतर चांगले नेकलेस मैत्रीणीच्या समोर ठेवायचे. यातला तुला हवा तो घे मात्र आईच्या नेकलेसबद्दल मी पझेसिव्ह आहे, तू नको मागूस”, हे सांगून टाकायचं. खरा छळणारा मुद्दा ‘बॅरियर’ तोडता न येणे एवढाच होता. बाकीच्या पन्नास मुद्द्यात थोडं तथ्य असलं तरी महत्त्वाचे नव्हते, हे मनापासून तिला पटलं. तिचं मन हलकं झालं. उत्तर मिळाल्यामुळे तिची ‘भावनिक परिपूर्ती’ झाली होती. ती तिच्या मैत्रिणीचीच वाट पाहत थांबली होती.

हे सगळं शक्य होमिओपॅथिक औषधांनी होऊ शकतं !! मनातील संभ्रम, गोंधळ, नाहीसा होऊन  समग्र विचार करण्याची शक्ती हे होमिओपॅथिक औषधाने शक्य होते आणि आपल्या जीवनातील किरकोळ वाटणाऱ्या गोष्टींनी येणारे टेन्शन कमी होऊन आनंदाने जीवन जगता येणे  शक्य होतं. मानसिक शांती मिळून भावनिक परिपूर्ती होऊ शकते !!

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123, 9404507723
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

——————————————————

Courage to say NO……comes with Homoeopathic Treatment !

Anushka was upset since Nita’s call yesterday. After seeing her usual symptoms of thinking, being irritated, and sulking, her husband realized that most of the time, her friend must have received a call from Neeta !
Neeta told Anushka, “She has to go to her niece’s wedding, so let her wear your mother’s necklace, she will come tomorrow morning to take it.”
Every time Neeta asked for something, Anushka used to get irritated. She always thought, how can she act like this ? But eventually she would give her things. It had been going on like this for years, because after all, she was a close friend from childhood. Anushka did not like the back-and-forth of her friend at all. She also knew that this was a habit of hers since childhood.
Both used to use each other’s things, but she now felt that we were not young anymore and she didn’t like her behavior ! When will she grow up ? When will the dam stop me assuming ? She always thought so.
Anushka did not like to take anything from others and never asked for it. Did she give her the necklace ? Anushka could not bear the fact that she directly told that she can take the necklace directly without asking, that is, she had directly ordered, she was asserting her rights over her. 
According to her, she looks after her own convenience. She felt that her assumption was increasing day by day. She was enjoying the right of friendship more. But it bothered her that she carried anything.
Because last time she took her car for two days and had an accident. Despite the damage to the car itself, it had to be celebrated with a smile. It is true that she said that she pays for the repair, but how can we take this from her ? So no money was taken at that time.
But she did not know why she was so angry about such a close friend. There was a fear in her heart that if the necklace is not given, she will be hurt and the friendship will be broken, or if this time she is given the necklace and she loses the necklace?….her Mind was confused.
This mother’s necklace is her memory. She knew very well that it could not be valued in money or replaced.
But she didn’t want to give the necklace to Nita, but she was angry with herself for not being able to say “No”. Neeta felt so helpless that she would never be able to say “No”, so she started getting angry with herself.
Saying “No” to a close friend would hurt her, but she felt she didn’t want to. She didn’t realize that she was hurting herself every time. Will it be like this for life ? So can it be accepted ? She could not find an answer to this question either.
When she asked her husband, what would you have done if you were me ? When asked about this, he made it clear, “My terms of friendship are clear. A true friendship requires accepting friendship as it is and having the freedom and confidence to say what you don’t like.”
Even after saying this, she was telling her husband (50) fifty reasons why her girlfriend would be hurt. She was getting irritated realizing the feeling of being stuck in it. Show your problem solving skills rather than telling me (50) fifty reasons why you just want to say No and back the consequences when the husband challenges her.
After such a challenge, she read books like Don’t Say YES When You Want to Say No etc. to the point where she realized that when the actual time comes, it becomes difficult. But in a tight relationship, saying that is a real exercise. In such cases, we are the ones around us, “What if this happens ?” Creates tangles of questions in the imagination and loses mental peace.
She started talking to herself, ‘Anushka, is your friendship so difficult ? And this is happening because of the habit of so many years? But how will she know that I don’t like it ? Do I have to say this openly ? There are things she should say “No” to but why can’t we ever say “No” ? Are we intruding on ourselves because of this question ? Just saying “No” once will break down that barrier or fence. Then the stress and irritation every time will stop. She was realizing that the issue is not the necklace but the barrier in her mind.
She wondered what if this close friend gets upset or continues to behave as before without taking my heart ?
Anushka again came to me to take medicine for the reason that her head is pounding, it hurts a lot. So I asked no other questions, what happened again with the girlfriend ? Asked this direct question. Then she narrated everything that happened.
She was one of the many patients who came to me regularly and took Homoeopathic medicine regularly for various ailments, who had great faith in Homoeopathy.
After trying to find out the reason for her headache, it was realized that she could not say No and due to this, her Mental condition worsened and her tension increased and the disease called Tension Headache started.
Whenever she didn’t want to suggest an answer, got into trouble, had to say “No” to someone, when she couldn’t find the answer, she would get a headache.
After a dose of Homoeopathic Medicine was given to her that night, she woke up the next morning in a very happy mood. Had a peaceful sleep all night. Her headache was completely relieved. The headache had gone.
She quickly remembered that she had quickly found the answer to the question that had been lingering in her head. She got the answer of what we really want and what we need to do for it.
“It’s her question how to act. She’ll either hurt or think a new. She  decide how to act. She finds the words to talk to her briefly and what to say. “She will put the other good necklaces in front of her girlfriend. Take what you want, but I am possessive about mother’s necklace, don’t ask for it”. Relieved. She was ‘Emotionally fulfilled'(‘भावनिक परिपूर्ती’)
by getting the answer. She waited for her friend.
All this can be possible with Homoeopathic Medicines  !!
Confusion, confusion, the power of holistic thinking is made possible by Homoeopathic Medicine and the tension caused by trivial things in our life is reduced and it is possible to lead a happy life. Emotional fulfillment can come with Mental Peace !!

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123, 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-