By Dr. Ajay HanmaneJune 24, 2026 Anxiety General Information Homeopathic and Cure Mental Health Uncategorized
तुम्हाला त्यांचा ‘ बोध ‘ झाला…. तरीही गोष्टी तशाच असणार आहेत. तुम्ही अज्ञानात राहिलात….. तरीही गोष्टी त्याच, तशाच असणार आहेत.” झेन वचन.
‘सन्मानदायी मृत्यू’ या विषयावर परिसंवाद ऐकण्यास गेलो होतो. त्यात एक न्यायमूर्ती, एक वैद्यकीय आणीबाणी उपचार तज्ञ आणि मन:स्वास्थ्य क्षेत्रातील डॉक्टर अशा तिघा विद्वान मंडळींनी मृत्यूवर अनेक प्रकारची चर्चा केली.
तर्कशास्त्र शिकताना सॉक्रेटिसची विधान शिकवली जातात…. “सर्व माणसं मरती आहेत. सॉक्रेटिस मानव आहे. म्हणून तोही मर्त्य आहे.” असं तर्कशास्त्र आपल्या भावनाप्रधान मेंदूच्या पचनी पडतं. तुमचा आणि माझा भावनिक कलह ‘मृत्यू’ या शब्दापेक्षाही ‘माझा मृत्यू’ या शब्दामुळे होतो. कारण आपल्यातल्या बहुसंख्यांची अमूल्य मालमत्ता असते ‘मी’ पण.
‘मी’ ला कुरवाळण्यात, त्याचे लाड करण्यात, प्रसंगी त्याला हाणण्यात,शिव्या देण्यात माझं जीवन पुढे पुढे जात राहतं. ‘मी’ पणाला न हिणवता त्याला समजून घेण्याची गरज आहे, हे समजले.
आपलं ‘नाव’ स्वतःला कळायला लागायच्या आधीच स्वत्वाचे थर जमू लागलेले असतात. ते पुढे घट्ट बनत जातात .जीवनवादी आणि स्वहितवादी शिकवण जगण्यासाठीची ऊर्जा देते. तेही योग्यच. पण या स्वत्वाला सुखवादी बनवण्याची सवय पुढे घात करू शकते. जे अंतिम हितकर ते चवीला रुचकर असेलच असे नाही. रूढ जीवनशैली तर सुखाच्या मागे धावणारी. वस्तू आणि सुविधांची प्राप्ती, मालकी आणि सततचा उपयोग या भोवती जगणं फिरू लागतं. इतक्या गोंडस गोजिऱ्या ‘मी’ ला स्वतःच्या नष्ट होण्याचं दुःख सर्वात जास्त होणं अपरिहार्य नाही का?
“आता हौस म्हणून राहिलीच नाही कशाची,” या वाक्याचा ध्वनी विरण्याआधीच,” किती ग सुंदर आहे हा दागिना…… दिवाळीच्या वेळेस करेन् कदाचित,” अशी ‘मोह’ मयी माणसं आपण! त्यामुळे स्वत्वाच्या ‘मी’ पणाच्या विळख्यातून सोडविल्याशिवाय मृत्यूला एक स्थित्यंतर म्हणून सामोरे जाता येत नाही. स्थितिबदलाची इतकी का भीती असते आपल्याला? कष्टांनी, गुणांनी,थोडी नशिबाने घडली-घडवलेली जी ‘आयडेंटिटी’ असते आपली त्या स्वयंओळखीबद्दलचं प्रेम ही उपजत भावना आहे. अतिप्रेमात असलेली आत्मकेंद्रीत (नार्सिसस्टीक) मंडळी म्हणजे आपल्याच अधिक पुढे गेलेल्या आवृत्त्या. स्थित्यंतराचे वय 75 मानलं, तर स्वप्रेमाचे उमाळे कमी करण्याचा प्रवास गेलाबाजार दोन-तीन दशकं आधी सुरू करावा. भावनांचा अतिरेक काढून वास्तवात राहण्याची सवय लागायला एवढा वेळ लागणार. निस्पृहता बहुतेकांसाठी कमवायचा गुण आहे. माझ्या प्रियजनांचा वियोग मला असह्य होतो, कारण त्यातही माझं प्रतिबिंब दिसत असतं.
उपनिषदामध्ये एक प्रतिपादन आहे की, माजी सर्व जवळची नाती शेवटी ‘स्वान्त सुखाय ‘ च असतात. रूढ सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही ‘मृत्यू’ हा शोकदायकच मानला जातो. लहानपणापासूनच मृत्यूचे ‘वाईटपण’ आपल्या मनावर ठसवलेलं जातं. मला माझं आवडतं माणूस आता कधीच भेटणार नाही ही व्यथा असतेच. अशावेळी छोट्या मनाची समजूत घालण्यासाठी, ‘आजोबा तारा झालेत’,’आजी चांदणी झाली’ अशी प्रामाणिक काव्यमय कारणं देतो. पण मन असं जिज्ञासू की त्याला पटेल असे उत्तर हवं असतं. काही जण कर्मकांडांमध्ये, काहीजण तत्त्वज्ञानाच्या भूमिकांमध्ये आपापलं उत्तर शोधतात.खरंतर ज्याला जगण्याचा अर्थ कळतो त्याचीच मृत्युजिज्ञासा शमून जाते. वेदांत तत्वज्ञान आणि बौद्धीमत जीवन मृत्यूचं आवर्तन मानतात. त्यातही भेद आहेतच. ख्रिस्ती, ज्यू, मुस्लिम हे अंतिम निवडण्याचा पूर्णविराम मानतात. वेदांतात ‘जीवनमुक्त’ आणि ‘देहमुक्त’ अशा संकल्पना आहेत. विज्ञान म्हणतो की, चैतन्याचा अस्त (Loss of Vitality) म्हणजे मृत्यू. मज्जापेशीचा मृत्यू म्हणजे क्लिनिकल मरण. अचेतन देह म्हणजे ऊर्जाविरोहित स्थिती. हिंदू धर्मात वस्तू आणि ऊर्जा यामध्ये स्थितीबद्दल सांगितले आहे. कठोपनिषदाप्रमाणे ‘आत्मन्’ ला जन्म आणि मृत्यू नाही.
“न जायते म्रिवा अजो
नित्य: शाश्वतोsयम पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे”
शरीराच्या मृत्यू बरोबर जो मरत नाही त्याला चार विशेषणं लावली आहेत.
अज: – जन्ममृत्यू नसलेला.
नित्य:– काळाच्या चौकटीत न बसणारा.
शाश्वत:- ज्यात बदल संभव होत नाहीत.
पुराण:– नित्यनूतन, कधीही न कोमेजणारा.
कठोपनिषदाप्रमाणे जगण्यामध्ये ‘अप्राप्तस्य प्राप्ती’ या भागावर आपण खूप लक्ष देतो. आकर्षक आणि तत्कालीक सुखाचे स्त्रोत ऐहिक जीवनात आणि स्वतःच्या बाहेर शोधतो.हे आहे प्रेयस! ‘प्राप्तस्य प्राप्ती’ म्हणजे आपण स्वतःच समाधान आणि आनंदाचे मूळ आहोत हे समजणं. ‘आनंदरूप’ होण्याची सायुज्यता यायची, तर त्याआधी समीपता हवी. स्वतःची देहमनापलीकडची ओळख म्हणजे श्रेयस! स्वकेंद्रिततेकडून स्वकेंद्रित मनुवृत्तीकडे जाणं म्हणजे ‘प्रेयस’ कडून ‘श्रेयस’ कडे जाणं.
माझी ‘स्व-प्रतिमा’ म्हणजे माझं ‘मी’ पण,म्हणजे माझं स्वत्व आणि स्वत्व असेल तर मग ‘मी’ म्हणजे कोण? याची उत्तर शरीर, मन, संवेदना, भूमिका, उपलब्धी, नाती, स्थावरजंगम मालमत्ता, संपत्ती, गुण,व्यक्तिमत्व……यादी लांबत जाईल. हे सगळे माझे भाग आहेतच, पण यातील एक किंवा अनेक मिळून माझं ‘माणूसपण’ तयार होत नाही. इथपर्यंतची मांडणी मानसशास्त्राचीच आहे .माझ्या ‘उपाधी’ गळून पडल्याशिवाय स्वकेंद्रीतता संपणार नाही. त्याशिवाय नि:संग परोपकार कसा भेटणार. म्हणून दृष्टिकोन असा हवा की सगळी मडकी मातीपासून बनतात. मडकं म्हणून जगताना मातीचं भान सतत जागृत ठेवण्याचा प्रयत्न करायचा. याचाच अर्थ असा की तात्कालीक, आकर्षक अशा आरोग्यदायी अनुभवांपासून फटकून राहायचं नाही. उत्तम गाणं ऐकावं, अन्न स्वादपूर्वक खावं. कणकणानं ज्ञान मिळवण्याचा आनंद घ्यावा. सुखदुःखाचे क्षण समरसतेनं भोगावे. परंतु तो अनुभवसंपन्न झाल्यावर त्याला स्मृतींच्या गाभार्यात बसवून पूजा करायची नाही.आपण सदभावाच्या निर्मितीचे माध्यम आहोत, वाहक आहोत असं राहायचं. म्हणजे प्रेम व्यापक होतं. असमाधान, अस्थिरता कमी होते. भीतीने उन्मळून जायला होत नाही. होमिओपॅथिक औषध उपचारामुळे समाधानी, स्थिर राहण्यासाठी लागणारी मन:स्थिती निर्माण होण्यास मदत होते.
माझ्या अंतिम टप्प्यावर माझ्या शरीराचे कृत्रिम नळ्यांनी पोखरलेलं खेळणं बनू नये यासाठी वैद्यकीय इच्छापत्राची सुविधा आता कायदेमान्य झाली आहे.
मग देह भाव कमी करायचा म्हणजे कसं वागायचं? हा प्रश्न येतो.
“हा वृत्तीचा भाग आहे. तुम्ही असं म्हणायचं कारण नाही की, आज या शरीराने आंघोळ केली किंवा, या मनाला आता गाणं ऐकायचं आहे. तुम्हाला तुमच्या आनंदासाठी अत्तर लावायचा असेल तरीही ते लावा. क्षणिक आनंदाने अव्हेरता त्यांचा मर्यादापूर्ण स्वीकार करायची सवय लावूया. स्वतःबरोबर प्रामाणिक असावं.” होमिओपॅथिक उपचारपद्धती तुमचा आनंद मर्यादितपणे स्वीकारण्यासाठी मदत करते.
म्हणजे खेळकरपणे सुधारण्यास मदत करते. उदाहरणार्थ मधुमेह आहे आणि आंबे खाताना जीभ सैल झाली तर आता डॉक्टरी सल्ल्यानुसार तिला ताब्यात ठेवणं गरजेचं असतं.
मृत्यूला मित्र मानायचं का?
तेव्हा शत्रू न मानण्यापासून सुरुवात केली तर जवळची माणसं पुढे गेली तर मन काही काही काळ गलबलणार. जे मानवी आहे ते का टाळावं. शहाणे पर्याय स्वीकारण्याकडे कल असावा, म्हणजे स्वतःच्या शरीर मनाकडे माध्यम म्हणून पहायला हवं. स्वहिताची व्याख्या व्यापक करून इतरांना समजावणार हवं. प्रसंगी विनासंकोच मदत मागणारे, सत्ता आणि लोभ यापासून शक्यतो दूर राहून आरोग्याला जपणारे इत्यादी शहाणे पर्याय आहेत.
दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची भीती वाटण्याची गरज नाही, कारण काळानुसार मर्यादा वाढल्या तर मदत घेण्यास कमीपणा वाटून घेऊ नये. तक्रार वृत्ती कमी करण्याचा प्रयत्न करायचा आणि असलेल्या क्षमता, सोयी, नाती यांना मनापासून दाद गरजेचं आहे.
आर्य विद्या गुरुकुलाचे स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात, only body has DOB and DOD. Rest is L. जन्म आणि मृत्यूचे दिनांक असतात ते फक्त शरीरासाठी. बाकी सर्व उरणार तो वारसा. प्रियजनांसाठी विचारभावनांचा आणि जीवनमूल्य यांचा कोणता वारसा ठेवणार आपण हा विचार प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी करायचा आहे.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
आपला विश्वास – नैसर्गिक आरोग्य पुनर्स्थापनेची आमची जबाबदारी!
—————————————————————————————
Whether you realize their meaning or not… things are going to remain the same. Even if you stay ignorant… still, things will remain just the same. — Zen Saying
I had attended a symposium on the subject of “Dignified Death.” A Justice, an emergency medicine specialist, and a psychiatrist together discussed various aspects of death.
While learning logic, we are taught the statement of Socrates: “All men are mortal. Socrates is a man. Therefore, Socrates is mortal.” Our emotionally driven brain easily digests this. But the turmoil you and I experience is not with the word death itself, but with the phrase my death. Because for most of us, our most precious possession is the ego — the ‘I’.
Life goes on pampering this ‘I’, sometimes indulging it, sometimes scolding it, sometimes even cursing it. But what I understood is — instead of condemning this ‘I’, we need to understand it.
Even before a child learns to recognize their own name, layers of identity start forming. Over time, these layers harden. The teachings of self-interest and survivalism provide the energy for living — and that is natural. But when this identity becomes pleasure-seeking, it may lead to ruin. What is ultimately beneficial is not always pleasant to taste.
Our conventional lifestyle is one that runs endlessly after happiness. Life begins to revolve around acquiring, owning, and constantly consuming objects and comforts. Naturally, such a pampered, adorable ‘I’ feels the greatest grief at the thought of its own annihilation.
Aren’t we such people who, even before the echo of “Now I have no more desires left” fades, are already caught saying, “Oh, what a beautiful ornament… maybe I’ll buy it this Diwali”? Unless one is freed from the entanglement of the ego, death can never be faced as a simple transition. Why are we so afraid of change? The identity we build with effort, talent, and a bit of luck — that self-image is bound to be loved.
Those who are excessively self-loving (narcissistic) are merely extreme versions of ourselves. If we consider 75 as the average age of transition, then the journey of reducing self-love should begin two or three decades earlier. To balance out emotions and live in reality takes that much time. Dispassion is a quality most people have to cultivate.
The separation from loved ones feels unbearable — because in them we see our own reflection.
The Upanishads declare that all close relationships are ultimately for “one’s own joy.” From a cultural standpoint too, death is generally considered tragic. Since childhood, the “badness” of death has been imprinted on our minds. The pain is real — knowing I will never again meet my beloved. To console a child’s tender heart, we say, “Grandfather has become a star,” or “Grandmother has turned into moonlight.” These are poetic but unsatisfying answers to a curious mind. People seek their answers in rituals, or in philosophy.
Truly, when one understands the meaning of life, the curiosity about death dissolves. Vedanta and Buddhism both see life and death as cycles — though with differences. Christianity, Judaism, and Islam consider death as the final full stop. Vedanta speaks of jivanmukti (liberation while living) and videhamukti (liberation after death).
Science defines death as the loss of vitality. The death of nerve cells is clinical death. An unconscious body is a state without energy. Hinduism explains death as a transformation of matter and energy.
The Katha Upanishad says that the Atman has neither birth nor death:
Thus, four qualities of the Atman:
The right perspective is: all pots are made of clay. While living as a pot, we must stay aware of the clay within. This does not mean rejecting pleasant experiences. One must enjoy good music, relish food, delight in learning, and live moments of joy and sorrow with equanimity. But once lived, those experiences should be placed in the storehouse of memory — not worshipped forever.
At the final stage of life, I do not want my body to become a toy pierced with artificial tubes. That is why the legal facility of a living will is now available.
So then, how should one reduce body-attachment? It is not about denial. If you feel like putting on perfume for your own joy, do it. Train yourself to accept momentary pleasures with moderation, not rejection. Be honest with yourself. Homeopathy helps you enjoy such pleasures in moderation.
It teaches playful self-control. For example, if you have diabetes and crave mangoes, you must learn to regulate under medical guidance.
Should we consider death a friend? At least, let us stop treating it as an enemy. When loved ones pass away, the mind will be shaken — and that is human. But our choices should lean toward wisdom: looking at the body and mind as mere mediums, broadening self-interest into concern for others, asking for help without shame, staying away from greed and power when possible, protecting health, and practicing gratitude for our abilities and relationships.
There is no need to fear dependency. As limitations increase with time, one must accept help without shame. One must also try to reduce a complaining nature, and instead genuinely value the resources, people, and relationships one has.
As Swami Dayananda Saraswati of Arya Vidya Gurukula said: “Only the body has a Date of Birth and Date of Death. The rest is Legacy.”
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) , ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.
Your Trust – Our Responsibility to Restore Health Naturally!
Please Read Next Article-
Dr. Ajay Hanmane
Dr. Mrs. Seema Hanmane
Monday to Saturday
Morning: 9AM – 3PM | Evening: 5PM – 9PM
Sunday Closed