शोकाकुल एकटेपणावर होमिओपॅथीची साथ  / Grieving Loneliness – Help of Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneAugust 25, 2026 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry Sleep Disorders

 

शोकाकुल एकटेपणावर होमिओपॅथीची साथ

  आपणा सर्वांना गौतम बुद्धांचा इतिहास माहीत आहेच. राजकुमार सिद्धार्थ जेव्हा राज्याचा फेरफटका मारायला बाहेर पडतो, तेव्हा त्याला जर्जर अवस्थेतला एक वृद्ध  दिसतो. तसेच पुढे गेल्यावर शवयात्रा दिसते. ते शव वाहून नेणाऱ्या नातेवाईकांचे दुःख पाहून सिद्धार्थाला खूप वाईट वाटतं. या प्रसंगानंतर तो वैभव, सुंदर बायको, मुलगा या सर्वांना सोडून संन्यास घेतो आणि हाच सिद्धार्थ पुढे ‘गौतम बुद्ध’ म्हणून ओळखला जाऊ लागतो.
   शाळेतला हा धडा वाचताना, राजकुमार सिद्धार्थला एवढं कशाचं वाईट वाटलं, हे त्यावेळी बऱ्याच जणांना नीटसं कळलेलं नव्हतं, पण जवळच्या व्यक्तीचा प्रथमच मृत्यूशी सामना होतो तेव्हा त्या गोष्टीचा नीट अर्थ समजतो.
    आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे माणूस आतून पार तुटून जातो. ही अवस्था ज्याची त्याला समजत असते. त्या अवस्थेत प्रचंड एकटेपणा येत असतो.
    आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या आणि प्रिय व्यक्तीचा मृत्यू होणं म्हणजे वियोग (Bereavement) आणि प्रिय व्यक्तीच्या मृत्यूला दिली गेलेली प्रतिक्रिया किंवा त्या मृत्यूमुळे निर्माण झालेली भावना म्हणजे शोक (Grief).
      याचाच अर्थ एकाच घरात झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे वियोग जरी सगळ्यांनाच होत असला, तरी शोक प्रत्येकाचा वेगवेगळ्या पातळीचा असतो. गेलेल्या व्यक्तीशी आपली कशा प्रकारची बांधिलकी आहे,
     मृत्यू कशामुळे झालेला आहे, गेलेल्या व्यक्तींवरचं अवलंबित्व कसं होतं, या काही घटकांचा शोकाच्या पातळीवर परिणाम होतो.
     हे सगळं समजावून घेणं अशासाठी महत्त्वाचं आहे, कारण शोकामुळे जे एकटेपण येतं, त्यात ‘ मला कोणीही समजून  घेऊ शकत नाही ‘,ही भावना खूप प्रबळ असते.
     अशा प्रत्येक  व्यक्तीचा शोक वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. त्या मागची त्याची भावना काय आहे यावर होमिओपॅथीमध्ये अनेक चांगली गुणकारी औषध आहेत.
    रोहन आणि मनीषा यांची आई कर्करोगामुळे वर्षभरापूर्वी गेली. आई गृहिणी असल्यामुळे रोहन, मनिषाच्या बाबांसहीत सगळ्यांचंच तिच्यावर अवलंबित्व होतं. रोहन पाचवीत तर मनीषा आठवीत होती. बाबांवरची जबाबदारी आता दुप्पट झाली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःला घर आणि ऑफिस यात गुंतवून घेतलं होतं. रोहनला बाबा आणि ताईकडून प्रेम मिळत असल्यामुळे तोही लवकर सावरला.
      पण ज्या काळात मनीषाला आईची सगळ्यात जास्त गरज लागणार होती त्याच काळात ती  सोडून गेली होती. आता मनीषा कोणाशी जास्त बोलायची नाही, कोणामध्ये मिसळायची नाही. नातेवाईक, तिचे शिक्षक, सगळे तिला सांगायचे, ‘जे झालं ते आता बदलता येणार नाही. बाबा आणि रोहनला पण दुःख झाले आहे पण ते आपापल्या कामाला लागलेत ना ?’…….. हे ऐकलं की तिला अधिकच एकटं वाटायचं.
    ती पूर्वी तिच्या मैत्रिणींच्या शाळेतल्या सगळ्या गमती आईला सांगायची. मागच्या महिन्यात तिची मासिक पाळी सुरू झाली होती. मात्र पोट दुखलं तर ती कोणाला सांगणार होती ? तिच्यासाठी सगळं काही आईच होती.आता कोण असेल यापुढे ?
    सगळे लाड, प्रेम, हट्ट आईजवळ होते आणि आता तिला मोठं समजूतदार होणं भाग होतं. हे विचार मनात आले की तिला वाटायचं, आता माझ्यासाठी कोणीच नाही आहे.
   मनीषाच्या बाबतीत तर तिची आई अवेळी गेली होती. पण माणसानं वयाची साठी जरी गाठली तरी पालकांचं जाणं म्हणजे त्यांच्यासाठी पोकळी तयार होते. ती पोकळी कशानच भरून निघत नाही.
  आपल्या  ‘आतल्या मुलाला’ (Inner Child) गोंजारणारं त्यांच्या माघारी कोणीच नसतं. आपलं बालपण आठवून कौतुकाने बोलणार कोणीच राहत नाही. बायको किंवा नवरा, मुलं, मित्रपरिवार ही आपल्या प्रेमानं ही उणीव भरून काढू शकत नाहीत.
   वरच्या उदाहरणातल्या मनीषा आणि रोहनचा विचार करता आईचा वियोग दोघांनाही झाला आहे. पण आईच्या मृत्यूला दिली गेलेली  दोघांची प्रतिक्रिया वेगवेगळी आहे. तसेच त्यांची परिस्थिती हाताळायची पद्धत ही वेगवेगळी आहे.
    इथे तुलना करणं अजिबात योग्य नाही. जेवढी तुलना वारंवार होत राहील तेवढी मनीषा आतल्या आत स्वतःला मिटून घेत राहील. वास्तविक पाहता मनीषा हतबल आहे, पण या तुलनेमुळे तिच्यामध्ये एक अपराधीपणाची भावना वाढीला लागते.
    जेवढे घळाघळा वाहणारे अश्रू खरे असतात, तेवढेच मौनही ही खरं असतं. अश्रू पुसायला जर आपण धावत जातो, तर मग एखाद्याच्या मौनामध्ये आपण त्याच्याबरोबरच का असू शकत नाही ?
     संवेदनशीलतेच्या आणखी एका वरच्या पायरीवर जाऊन मौनामध्ये ही जर आपण होमिओपॅथीचा हात पुढे केला तर ती व्यक्ती एकटेपणाच्या भावनेतून निश्चित बाहेर पडते
    भांडण, रुसणं, फुगणं, प्रेम या सगळ्या भावनां सहित आपल्याशी संबंधित असणारी व्यक्ती काही तासांपूर्वी होती आणि आता ती नाही आहे, हे  स्वीकारायला खरंच खूप जड आहे. काही भावना या वारंवार अनुभववायला मिळतात. त्यामुळे त्यांची तीव्रता कमी-जास्त होते.
     पण जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंबहुना मृत्यू ही घटना काही आपल्या आयुष्यात नियमितपणे येत नाही. (काही दुर्दैवी अपवाद सोडता) त्यामुळे ते धक्कादायक असणं, त्यातून बाहेर पडणं हे अवघड असू शकतं हे आधी मान्य करायला हवं.
    35 वर्षाचा निनाद, आपल्या लहान मुलाला बाईक करून घेऊन येत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यात मुलाच्या मेंदूला मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला. निनादला आधीच आपल्या हातून अपघात झालाय, ही अपराधीपणाची भावना होतीच; शिवाय त्याचं लाडकं लेकरू त्याच्यापासून नेहमीसाठी हिरावून घेतले गेलं, ही शोकाची भावनाही होती.
    या शोकांमुळे त्यांन सगळ्यांशी बोलणं बंद केलं. ऑफिसला जाणं बंद केलं. तो पूर्णपणे एकटा राहायला लागला. खरंतर आता त्याच्या बायकोने आणि त्यांनंच एकमेकांना समजून, सांभाळून घ्यायला हवं होतं. पण तो तिच्यापासून लांब झाला होता.
    अशा प्रकारचा शोध फक्त मन, भावना इथपर्यंतच मर्यादित नसतो. त्याचा मेंदूवर परिणाम होतो. आपल्या मेंदूमध्ये बदामी केंद्र  (Amygdala)  नावाचा एक भाग असतो. या भागाचे काम प्रेम, राग, भीती या भावनांना सांभाळणं हे असतं.
    शोकाचा या भागावर परिणाम झाला की काही गोष्टींचा विस्मरण होतं, धोक्याच्या गोष्टींची जाणीव न होण्यासारख्या गोष्टी घडतात. त्यामुळे ती व्यक्ती स्वतःतच हरवल्यासारखी भासते. इतरांशी तिचा ‘कनेक्ट’ कमी होतो.
   अर्थातच बऱ्याच वेळा समोरच्याला वाटतं की, हे असे किती दिवस चालत राहणार ? निनादने सगळ्यांमध्ये मिसळायला हवं, ही जगरहाटी आहे. सगळं बरोबर आहे,  पण त्या मेंदूवर शोकाचा जो परिणाम झाला आहे, तो हे सगळं त्याच्याकडून करून घेतोय. त्या व्यक्तीला जेवढं ‘फोर्स ‘ केलं जाईल, तेवढं त्यांना अपराधी वाटायला सुरू होणार आहे.
  त्याऐवजी पुरेशी गाड झोप, मेडिटेशन आणि सोबत होमिओपॅथीक उपचार या गोष्टींनी अमिग्डालावरील (Amygdala) परिणाम कमी होऊ शकतो. परिणामी तो माणूस शोक आणि एकटेपणातून बाहेर येतो.
    जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे होणारा शोक केवळ तात्कालिक नसतो. अनेकांच्या बाबतीत दीर्घकाळ रेंगाळतो. त्याचा सामना करता आला नाही तर येतो एकटेपणा आणि समाजापासून तुटणं. अशावेळी व्यक्तीव्यक्तीच्या शोकाचे तुलना टाळावी.
   शोकामुळे जो एकटेपणा येतो त्यातून बाहेर पडण्यासाठी तीन   ‘C’ मानसशास्त्रात सांगितले आहेत. Choose, Connect आणि Communicate (चुज, कनेक्ट आणि कम्युनिकेट) ही त्रिसूत्री समजली आणि होमिओपॅथीक औषधाबरोबर त्याचं  आचरण केलं तर एकटेपणाला दूर सारणं जमू शकतं.
   सोनमच्या पतीचे निधन होऊन सहा महिने झाले तरी ती अजूनही घराबाहेर पडली नव्हती. पालकांच्या  सततच्या, ‘तू बाहेर जा, लोकांमध्ये मिसळ’  या घोशाचाही तिला आजकाल फार कंटाळा आला होता. त्यामुळे त्याची चिडचिड वाढली होती.
    शेवटी तिची आई तिलाचैतन्य होमिओपॅथीक क्लिनिक ‘  मध्ये होमिओपॅथीक उपचारासाठी घेऊन आली. होमिओपॅथीक (केस टेकिंगच्या) माहिती घेतानाच्या हिल्या सत्रात ती खूप रडली. डॉक्टरनी तिला विचारलं, ‘तुम्हाला स्वतःला या एकटेपणाच्या गर्तेतून बाहेर पडण्याची इच्छा आहे का ?” त्यावर ती म्हणाली,  “मला यायचंच आहे…..आयुष्य असं जगू शकत नाही , हे कळतंय मला. पण मला जमत नाही आहे.”
तिची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर  होमिओपॅथिक औषधांबरोबर तिला पहिला (सी) ‘C’ सांगितला, म्हणजे निवड – (Choose) आयुष्यात वाईट प्रसंग येतात, तसे चांगले प्रसंग येतात.
    समाजातल्या चांगल्या प्रसंगात तिला बोलावलं जाईल. पण तिला विचारपूर्वक निवड करायची आहे की, तिला या कार्यक्रमाला जायचं की नाही ? ……. एखाद्या प्रसंगात तिला तिच्या पतीची तीव्रतेने आठवण येऊ शकते. दुःख परत उमाळून वर येईल,तर तिने अशा ठिकाणी जाऊ नये.
   पण काही ठिकाणं अशी असतील की, जिथे जाऊन तिला बरं वाटेल. थोडा वेळ का होईना पण दुःख बाजूला राहील. घरात एकदम कोंडून घेण्यापेक्षा तिने कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही याची, निवड करावी. तिने तिच्या जवळच्या माणसांची चर्चा करावी. अशावेळी निर्णय घेण्यासाठी होमिओपॅथीक औषध निश्चितपणे मदत करतात.
    तिला जेव्हा अशी निवड करण्याची सवय लागली तेव्हा होमिओपॅथिक डॉक्टरने तिला दुसरा सी (‘C’)शिकवला. जोडलं जाणं (Connect-कनेक्ट).

मुळात आयुष्य एकटं राहण्यासाठी नाही आहे. अगदी तुम्ही अंतर्मुखी असला तरी. अशा प्रसंगांमध्ये एकटं राहणं पूरक नाही. तिला तिच्या जवळच्या व्यक्तींची जोडलेलं राहण्यास सांगण्यात आलं. काही न करता, न बोलता फक्त ती बाजूला जरी कोणी बसून राहत असेल, तिच्या मौनाला मौनानंच साथ देत असेल, तर तीने तशी परवानगी दिली पाहिजे. कदाचित ती व्यक्ती तिचं दुःख पूर्णपणे दूर करू शकणार नाही, पण त्या व्यक्तीची सोबत असल्यामुळे तिला खूप फरक पडेल.

  पुढच्या सत्रात होमिओपॅथी डॉक्टरने तिला तिसरा  सी ‘(C’) शिकवला (कम्युनिकेट- Communicate).
   तिला सांगितलं की, जरी तू खूप अवघड काळातून जात असलीस  तरी तू मोकळेपणांना तुला काय हवय ते बोलून दाखविल्याशिवाय तुझे पालक, मित्रपरिवार तुला पाठिंबा देऊ शकणार नाहीत. तू जर ‘सगळं काही ठीक आहे’, असा मुखवटा घालून फिरशील किंवा कोंडून घेशील, तर या दोन्ही परिस्थितींत तुला काय मदत करावी हे त्यांना कळणार नाही. या प्रवासात तू तुझ्या भावना त्यांना सांगितल्यास तर त्यांना तुझा तुला हात देणं सोपं जाईल.
   या त्रिसूत्रीच्या बरोबरंच होमिओपॅथिक औषधांच्या मदतीने तिने पुष्कळच चांगल्या प्रकारे एकटेपणावर मात केली.
   कुटुंबातल्या कोणाचं तरी निधन होतं , काही काळ जातो आणि आपण आपल्या कामाला पूर्वत जायला लागतो. पण शोकातून बाहेर पडण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतील आणि लागणारे वेळही वेगवेगळा असेल. फक्त त्या व्यक्तीचा प्रवास परत समाजात मिसळण्यामध्ये होत आहे, की उलटा – एकटेपणाकडे होत आहे, हे मात्र काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे.
   अशा शोकाकुल व्यक्तींना बाहेर पडण्यासाठी दीर्घकाळ लागत असेल, अशा व्यक्तींना होमिओपॅथीक औषध उपचारपद्धती खूप चांगल्या प्रकारे मदत करते आणि त्या व्यक्तीचा प्रवास एकटेपणाकडे न जाता समाजात पुर्ववत मिसळण्यामध्ये होतो.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
आपला विश्वास – नैसर्गिक आरोग्य पुनर्स्थापनेची आमची जबाबदारी!
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

—————————————————————————————-

         Grieving Loneliness –            Help of Homoeopathy

   We all know the history of Gautam Buddha. When Prince Siddhartha goes out for a tour of the kingdom, he sees an old man in a shabby state. Also, a funeral procession is seen after proceeding further. Siddhartha feels very sad to see the suffering of the relatives carrying that dead body. After this incident, he renounces glory, beautiful wife, son, and Siddhartha comes to be known as ‘Gautama Buddha’.
  While reading this lesson in school, many people did not understand, why Prince Siddhartha felt so sad, but when a close person faces death for the first time, it makes sense.
  The death of a loved one breaks a person from the inside out. He understands this state. There is great loneliness in that state.
    Bereavement is the death of an important and dear person in our life and the reaction to the death of a loved one or the feeling caused by that death is Grief. This means that even though the death of a person in the same household is Bereaved, everyone grieves at different levels. What kind of commitment do you have to the departed ?
   What is the cause of death, how is dependence on the deceased,
  Some of these factors affect the level of mourning.
It is important to understand all this, because the feeling of ‘no one can understand me’ is very strong in the Loneliness that comes with Bereavement.
Each person’s Grief may be expressed in different ways. Homoeopathy has many good effective medicines on what is the feeling behind it.
Rohan and Manisha’s mother passed away a year ago due to cancer. As mother was a housewife, everyone including Rohan, Manisha’s father depended on her. Rohan was in fifth and Manisha in eighth. Baba’s responsibility was now doubled. So he had involved himself in home and office. Rohan also recovers quickly as he gets love from Baba and Tai.
But when Manisha needed her mother the most, she left. Now Manisha does not want to talk much with anyone, does not mix with anyone. Relatives, her teachers, everyone used to tell her, ‘What happened cannot be changed now. Baba and Rohan are also sad but they are busy with their work right?’……..
Hearing this made her feel more lonely.
She used to tell her mother about all the pranks of her friends at school. Her period started last month. But if she had a stomach ache, who would she tell ? Mother was everything for her. Who will be now ?
All the pampering, love, insistence was with the mother and now she had to be very understanding. She thought that there is no one for me now.
In Manisha’s case, her mother passed away untimely. But even if a person reaches the age, the departure of the parents means that a void is created for them. Nothing fills that void.
There is no one behind them to nurture their ‘Inner Child’. There is no one who remembers his childhood and speaks with appreciation.                                            Wife or husband, children, friends and family cannot fill this gap with their love.
Considering Manisha and Rohan in the example above, both have lost their mothers. But both of them have different reactions to their mother’s death. Also their method of handling the situation is different.
It is not fair to compare here. The more the comparisons keep happening, the more Manisha will keep closing herself inside. In reality, Manisha is desperate, but this comparison makes her feel guilty.
As true as the flowing tears are, so is the Silence. If we run to wipe the tears, then why can’t we be with someone in his Silence ?
Going to another higher level of sensitivity, if we extend the hand of Homoeopathy in silence, the person will definitely get out of the feeling of loneliness.
It is really hard to accept that a person who was related to you a few hours ago and is no more, with all the feelings of Fighting, Ill-tempered, Morose, Gloomy, Love. Some Emotions are experienced over and over again. So their intensity becomes more or less.
But the death of a close person in fact death is not a regular event in our life. (with a few unfortunate exceptions) So while it may be shocking, let’s first admit that it can be difficult to get out of.
Ninad, 35, was carrying his young son on a bike when he met with an accident in which the child suffered a brain injury and died. Ninad had already had an accident at her hands, a sense of Guilt; There was also a feeling of Grief that his beloved Son was taken away from him forever.
Due to this Grief, he stopped talking to everyone. Stopped going to office. He became completely alone. Actually now his wife and he should understand and take care of each other. But he was distant from her.
Such a search is not limited to the Mind and Emotions. It affects the Brain. In our Brain there is a part called Amygdala. The job of this part is to manage Emotions like Love, Anger, Fear.
Bereavement affects this area, forgetting things, not being aware of dangers. So the person seems to be lost in himself. Her ‘connect’ with others decreases.
Of course, many times the other person thinks that this will continue for how long? Ninad should mix with everyone, this is  Customs (जगरहाटी).
That’s all right, but the effect of Grief on that Brain is taking it’s toll. The more the person is ‘forced’, the more they will start feeling Guilty.
Instead, adequate deep sleep, meditation, and Homoeopathic remedies can reduce the effects on the amygdala. As a result the man comes out of Grief and Loneliness.
Grieving the death of a loved one is not only temporary. In many cases it lingers for a long time. If it is not dealt with, it leads to Loneliness and disconnection from society. In such a case, comparison of individual Grief should be avoided.
There are three ‘C’s’ in Psychology to overcome the loneliness that comes with Bereavement.
Choosing, Connect and Communicate is the trinity of understanding and practicing it along with Homoeopathic Medicine, Loneliness can be removed.
Six months after Sonam’s husband passed away, she still hadn’t moved out. She was also very tired of her parents’ constant ‘you go out, mix with people’ slogan these days. This increased his irritation.
Finally her mother brought her to ‘Chaitanya Homeopathic Clinic’ for Homoeopathic treatment.
She cried profoundly during her session of Homoeopathic (case taking) information.
The doctor asked her, ‘Do you want to get yourself out of this hole of loneliness?’, s
he said, ‘I have to come…I know that life cannot be lived like this. But I can’t.”
After taking her complete information, along with Homoeopathic Medicines, she was told the first ‘C’ which means ‘Choose’.
She will be called on good occasions in the society. But she has to make a conscious choice whether she wants to attend this program or not? …….
At some point she may miss her husband intensely. She should not go to such a place if the sorrow will come back up. But there will be some places where she will feel good. For a little while, the sadness will be left aside. She should choose where to go and where not to go, instead of being completely locked in the house. She should discuss her close people. In such cases, Homoeopathic Medicines definitely help in making a decision.
When she got into the habit of making such a choice, the Homeopathic doctor taught her the second C (‘C’). Being connected (Connect-Connect).
Basically, life is not meant to be alone. Even if you are an introvert. Being alone in such situations is not complementary. She was asked to stay in touch with her loved ones. Even if she sits by the side without doing anything, without speaking, supporting her silence with silence, she should be allowed to do so. That person may not be able to completely eliminate their Grief, but having that person by their side will make a big difference.
In the next session, the Homoeopathic Doctor taught her the third C (Communicate) and told her that even if you are going through a very difficult time, your parents, friends and family will not be able to support you unless you openly say what you want.
If you walk around with a mask of ‘Everything is Fine’ or shut up, they won’t know how to help you in either situation. If you share your feelings with them during this journey, it will be easier for them to give you their hand.
With the help of Homoeopathic Medicines along with this Trisutra- (त्रिसूत्र) , she overcame loneliness very well.
Someone in the family dies, some time passes and we go back to our work. But everyone’s coping mechanisms will be different and the time it will take will be different.
However, one needs to carefully look at whether the person’s journey is towards reintegration, or the reverse – towards isolation.
Such bereaved individuals may take a long time to come out, such individuals are very well helped by Homoeopathic Medicine treatment and the person’s journey is towards reintegration into the society rather than towards isolation.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom)  ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
Your Trust – Our Responsibility to Restore Health Naturally!
Mobile No. 7738667123 / 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-