समंजस, प्रगल्भ सोबत आणि होमिओपॅथी / Understanding Relationships, Maturity, and Homeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJuly 6, 2026 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure marriage Problem Mental Health Sexual Problems Uncategorized

समंजस, प्रगल्भ सोबत आणि होमिओपॅथी

 

‘राही, तुमच्या रविवारच्या बैठकीबद्दल कळलं. काय झालंय ‘? या मेसेजला ‘ संध्याकाळी भेटायला येते क्लिनिकला ‘ असं राहीनं फॅमिली डॉक्टरनां उत्तर पाठवलं.

दोन वर्षापूर्वी लग्नानंतरच्या स्वप्नाळू दिवसांत ‘ ऋग्वेदसोबत खूप खुश आहे डॉक्टर’ असं म्हणणारी, लहानपणापासून ‘चैतन्य होम्योपैथिक क्लिनिक ‘ मध्ये ट्रीटमेंट घेणारी ती माझी फॅमिली पेशंट होती. हल्ली काहीतरी बिनसून दोन-तीन वेळा माहेरी निघून आली होती. ‘चैतन्य होम्योपैथिक क्लिनिक ‘ मध्ये समुपदेशन झाल्यावर शांत होऊन सासरी परत गेली होती.

यावेळी राही महिनाभर माहेरी होती आणि त्याच वेळी दोन्ही घरातल्या मोठ्यांची बैठक होऊनही राही माहेरीच राहिली, त्यामुळे काळजीने तिच्या आईने मला मेसेज केला होता.

राहीचे बाबा मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळे पहिल्यापासून आई आणि राहीच जास्त काळ एकत्र असायच्या. नंतर बाबांच्या आकस्मिक निधनानंतर तर दोघीच एकमेकांना उरल्या. वयाची तिची ओलांडल्यानंतर आईच्या अत्याग्रहामुळे राही लग्नाला तयार झाली. ज्याच्याशी लग्न केलं तो ऋग्वेदही पस्तिशीपार. कामाशी अति बांधिलकी असल्यामुळे त्याचंही लग्न मागे पडलेलं वधूवरसूचक मंडळातून दोघे एकमेकांना सापडले, आवडले आणि लग्न झालं.

ऋग्वेदच्या एकत्र कुटुंबात त्याचे आई-वडील, धाकटा भाऊ आणि वहिनी अर्थातच अथर्व- आदिती, छोटी पुतणी आणि घटस्फोटीत थोरली बहीण होती. ऋग्वेद प्रेमळ, कर्तव्यतत्पर प्रत्येकाची काळजी घेणारा आदर्श मुलगा. घरातल्या प्रत्येकाचं काम त्याच्यासाठी अडलेलं असायचं. ‘कौटुंबिक ‘ आपलेपणाच्या नव्या अनुभवानं आणि ऋग्वेदच्या सहवासानं राही सुखावली होती. दोनेक महिन्यांनी मात्र ती गोंधळलेली, वैतागलेली दिसायला लागली.

एकदा क्लिनिक मध्ये आली असता तिने सांगितले,” घरातल्या लोकांचे एकमेकांवर प्रेम असूनही अचानक बारीकसारीक गोष्टींवरून भांडणं, वरच्या पट्टीतले वाद होत असतात. जाऊ- नणंदेशी काही बोलले तर इतरांपर्यंत ते वेगळ्याच पद्धतीने कसं पोहोचतं हे मला समजत नाही. घरात सर्व जबाबदाऱ्या ऋग्वेदच्या आणि कौतुक सतत अथर्वच असतं. एखादं काम मागे पडलं तरी ऋग्वेदलाच विचारतात, त्यालाही लगेच अपराधी वाटतं. त्याच्या भाबड्या, शब्द पाळण्याच्या स्वभावाचा घरचे फायदा घेतात, गृहीत धरतात. अथर्व स्वतःच्या मनाप्रमाणं, पक्केपणाने वागतो. ऋग्वेद मात्र प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगतो, मत घेतो. ‘ऋग्वेद भोळा’ आहे असं सासूबाई सरळ सरळ सर्वांसमोर म्हणतात. त्याचाही त्याला काहीच कसं वाटत नाही?”

“प्रत्येक घराचा आणि माणसाचा स्वभाव वेगळा असतो. काही घरांमध्ये जबाबदाऱ्या दादाच्या आणि लाड करायचे धाकट्याचे अशी सवय असते. भोळा, पक्का, वात्रट, आगाऊ वगैरे लेबल सुद्धा लहानपणीपासूनच असतात. जाणून-बुजून अन्याय वगैरे नसतो. त्यात, म्हणून ऋग्वेदलाही ते खटकत नसेल. तू आत्ता या वयात बाहेरून त्या घरात गेल्यामुळे आणि ऋग्वेदवरच्या प्रेमामुळे तुला त्याचा त्रास होतो. थोडा धीर धर, एकत्र कुटुंबाचे वेगळे डायनामिक्स समजून घे.” असं ‘ चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक ‘ मध्ये आलेल्या राहिला समजावलं. राहीनंही ते समजून घ्यायचं प्रयत्न केला.

काही काळानं म्हणाली, “ऋग्वेद प्रत्येकाचं मनापासून करत राहतो. त्यामुळे आम्हाला एकमेकांसाठी वेळ, स्पेस, प्रायव्हसी मिळत नाहीये. घरचे प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ करतात. रविवारीच यांना घराची आवराआवरी आठवते. ती करून फिरायला निघालो की, इकडे नको, तिकडे जा, नऊ पर्यंत परत या. सव्वानऊ झाले, तर लगेच आईचा फोन येतो. सुरुवातीला घरच्यांच्या या   ‘ सो कॉल्ड ‘ काळजी नावाच्या कंट्रोलचा त्रास झाला. पण नंतर अथर्व (दीर) प्राधान्य ठरवायला शिकला दोघांची स्पेस जपायला शिकला. ऋग्वेदला मात्र ते जमत नाहीये. त्याचा प्रेमळ स्वभाव मला आवडतो. पण भाबडी बांधिलकी नाही आवडत. ‘गुड बॉय ‘  इमेजमुळे तो इतरांना ‘ नाही ‘ म्हणू शकत नाही. पण हक्काच्या बायकोसाठी असणाऱ्या वेळेतच फक्त तडजोड होते. क्वचित कधीतरी आम्ही पस्तिशीचे रीतसर नवरा-बायको असताना, ‘ नऊच्या आत घरात ‘ चं दडपण पाहून चिडचिड होते. मी पहिल्यापासून स्वातंत्र्यात वाढले, स्वतःचे निर्णय स्वतः घेते. हे वातावरण, ऋग्वेदची ‘ श्रावणबाळगिरी ‘, एकमेकांच्या पायात पाय घालणारं प्रेम मला आयुष्यभर झेपेल का?

‘यालाच तर ‘संसार’ म्हणतात. ऋग्वेद आवडतो, त्याची सोबत हवीय तर त्याच्या घरच्या कम्फर्ट झोनची जुळवून घ्यावे लागणार. कधी भांडायचं, तर कधी सोडून द्यायला शिकले पाहिजे’, हा सल्ला मिळाल्यानंतर अस्वस्थपणे विचार करत राही सासरी परतली. पण त्यानंतर बैठकीची बातमी समोर आली.

महिनाभर माहेरी राहिल्यामुळे, ऋग्वेदचे आई-बाबा तिच्या आईला फोन करून भेटूयात म्हणून मागे लागले. खरंतर मी आणि ऋग्वेद भेटत-बोलत होतो. सॉर्ट करायचा प्रयत्न करत होतो. पण माझं न ऐकता आईने माझ्या काका- काकू वगैरेंनाही बोलावून घेतलं.

आता बैठक होणारच म्हटल्यावर मीही ठरवलेलं,’ आमचं एकमेकांवर प्रेम आहे, फक्त घरात स्पेस मिळत नाहीये तेवढं समजून घ्या.’ असं बोलायचं. पण प्रत्यक्षात ती बैठक म्हणजे लहान मुलांवरून झालेली आयांची भांडाभांडीच होती. सासूबाईंनी कधी काळचे प्रसंग काढून इतका विपर्यास केला आहे की, राही बधीरच झाली. तुमच्या मुलीने दोघांपुरता शिरा करून खाल्ला, आम्हाला विचारलं नाही’ वगैरे वगैरे अशी तक्रार केली.

“त्यादिवशी वर्क फ्रॉम होम असल्यामुळे, दोन कॉल्समध्ये ती बाहेर आली तर घरातील सर्वांचा नाश्ता झालेला. तिच्यासाठी पुरेसा नाश्ता शिल्लक नव्हता म्हणून पटकन स्वतःपुरता शिरा केला आणि थोडासा घासभर नवऱ्याला आवडतो म्हणून दिला, इतकचं. यातून ‘ही एकटीनं करून खाते ‘ असा बोभाटा होईल हे तिच्या कल्पनेतही नव्हतं. हे आणि असलं बरंच, त्या बैठकीतच समजलं मला. सासऱ्यानी ‘एकदा ‘ ऑफिसमधून आल्यावर मला चहा सुद्धा करून दिला होता, तरी मला सासरच्‍यांची कशी किंमत नाही. आता मी कोणासाठी काय करते याची यादी वाचायची का यावर? त्यांच्या मनात कशाकशाचा राग साठलेला, मला पत्ताच नव्हता. मग काका-काकू सरसावले. पूर्वी कधीतरी मी काकूला म्हटलेले, ‘तिकडच्या जेवणाच्या चवी आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे माझा हात लोणच्यावर असतो आणि काकूने ते सिरीयसली लक्षात ठेवलेलं. त्यांना म्हणाली, ‘ आमची मुलगी तुमच्याकडे लोणच्यावर राहिली. यावर ‘ माझ्या आईच्या हाताला चवच नाही? तुला उपाशी ठेवतात का? म्हणून ऋग्वेद भडकला. सगळ्यांचे इगो एकमेकांवर चढत राहिले. कोण बरोबर कोण चूक, तुमचं-आमचं, कोणी कोणासाठी काय केलं, काय नाही, लग्नातले मानपान….. काहीही निघालं. आमच्या प्रायव्हसी-स्पेसचा मुद्दा मी मांडायचा प्रयत्न केल्यावर तर कडाक्याचा विपर्यास आणि भांडणं. शेवटी राहीनं आणि आईने बोलणं थांबवलं, सगळे दमल्यावर बैठक संपली आणि सर्वजण आपापल्या घरी गेले.

“बैठकीमुळे एक बरं झालं, हे लोक असे का वागतात? ऋग्वेदला एवढं गृहीत का धरतात? आमची स्पेस….या प्रश्नात मी भिरभिरत होते. बैठकीमुळे प्रश्नच बदलले. या घरचा स्वभाव असाच राहिला, तर ऋग्वेदसाठी मी किती काळ तडजोड करू शकेन? या प्रश्नापाशी पोहोचले.त्यावर विचार करताना लक्षात आलं, सासरच्यांवर माझे कितीही आक्षेप असले, तरी ते दुय्यमच आहेत. आमच्या प्रायव्हसीबाबत मुख्य जबाबदारी ऋग्वेदचीच आहे. माझ्या गरजा, माझं म्हणणं ऋग्वेदलाच नीट समजत नाहीये, तर सासरच्यांचं काय? आमच्या दोघांची ‘बडे भैया आणि भाभीजीची’ पारंपारिक इमेज त्यांच्याच मनात आहे. मग जोडप्याचं खाजगीपण महत्त्वाचं नसतंच, कुटुंब हेच केंद्र असतं”.

“त्याच्या कुटुंबासोबत राहायला माझी हरकत नाही आहे, पण माझी जोडीदाराच्या प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. पती-पत्नीच्या नात्याच्या काही मूलभूत गरजा असतात हे ऋग्वेदला समजायला हवं. सगळे आपलेच आहेत, तर मग. ‘आम्ही फिरायला जातोय, उशीर होईल ‘ हे सहज सांगता यायला हवं. कौटुंबिक सहली हव्यातच, पण फक्त दोघांची एखादी ट्रिप ही हवीच. आमच्यातल्या बॉन्डिंगसाठी वेळ काढण्याची गरज जर त्याला स्वतःला वाटत नसेल, तर प्रेम म्हणजे नेमकं काय? मला कुटुंबाच्या गरजा, जबाबदाऱ्या कळतात, पण दरवेळी त्यांनाच प्राधान्य कसं? दिवसातले पाच ते दहा मिनिटे, महिन्यातल्या एखाद्या वीकेएंड एवढाच वेळ हवाय मला.

‘फक्त माझ्यासाठी आणि मनापासून….. तेवढ्यासाठीही म्हणून महिनोन महीने भिकाऱ्यासारखी वाट पाहायची का? किती वर्ष? म्हातारपणापर्यंत?’

डॉक्टर,’ तुम्ही म्हणाला तशी मी सासरची माणसं समजून घेण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या चुका शोधल्या, अपेक्षा बदलल्या, वाट पाहण्यात दोन वर्षे गेली तसा संयम संपून माझी चिडचिड वाढत गेली. त्यांच्या घरच्यांवर टीका केल्यावर आमची भांडण वाढली. दोघांचे जॉब, रोजचा दोन तासांचा ट्रॅफिक जाममधून प्रवास, घरची कामं, यातून जो थोडासा वेळ एकमेकांसाठी मिळतो, त्यातही भांडणच होणार असतील तर मग माझं घर, कंफर्ट झोन, माझ्या आईला सोडून कशासाठी आले मी यांच्याकडे? आता बैठकीनंतर सगळेच दुखावलेत. माझ्याबद्दल मनात आढ्या घेऊन फिरणाऱ्या लोकांशी जुळवून घेण्यात मी का वेळ घालवू? हा प्रश्न आत्ताच पडतोच. ऋग्वेदला आधीचा कम्फर्ट झोन सोडता आला नाही, तो मोठा झालाच नाही, तर संसार ही धड नाही आणि करियर ही स्वतःच्या हाताने घालवलं असं चालेल का मला?

“इतकी शांतपणे लॉजिकली बोलत आहेस, तर काय निर्णय घेतलास?” असा थेट प्रश्न विचारला.

“योग्य प्रश्न सापडल्यावर उत्तरही जवळ आलंय तुमच्या होमिओपॅथिक औषधांमुळे. आज पहिल्यांदा गोष्टी नीट शब्दात मांडायला जमलंय. आम्ही एकमेकांना आवडतो. दोघांनाही सोबत कायम हवी आहे याबद्दल शंका नाहीये. आमच्या नात्याची जबाबदारी शेवटी फक्त आमची दोघांची असते हे मला आता पक्क कळलंय. आत्तापर्यंत आम्ही बरेचदा बोललो, तेव्हा घरच्यांवरूनच भांडलो. आता मात्र कुणालाही मध्ये न आणता फक्त आमच्या दोघांबद्दल, शांतपणे, थोडक्यात आणि नेमकेपणानं ऋग्वेदशी बोलणार आहे.

त्या बैठकीमुळे आणि एकमेकांपासून महिनाभर लांब राहण्यानं मला काही गोष्टी ‘उमजल्या ‘बदल घडू शकेल. त्यासाठी आमच्या नात्याला आणखी थोडा वेळ देणारे, वाट पाहणारे, मात्र माहेरीच राहणार आहे.

“आणि तरीही ऋग्वेदला तुझं म्हणणं समजलं नाही किंवा ‘ गुड बॉय इमेज’ सोडतात आली नाही तर?”
“….तर आम्ही दोघेही आपापल्या जागी चांगले आहोत, पण जोडीदार म्हणून योग्य नाही हे अवघड सत्य स्वीकारायला लागेल. खूप वाईट वाटेल, पण जोडीदार कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर ‘समंजस’, प्रगल्भ सोबत आणि आनंदासाठी’ असं आहे. ते असेल, तर मी हजार तडजोडी करू शकते. अन्यथा लग्न केलंय म्हणून ओढत-खेचतच भांडत राहणं मला जमणार नाही.”
राही होमिओपॅथिक उपचारांमुळे शांतपणे आणि ठामपणे निर्णयापर्यंत येऊन पोहोचली होती.
लग्नानंतर प्रत्येकाच्या दैनंदिन जगण्यात बदल होतोच. एकत्र कुटुंब असेल तर नवीन सुनेनं तडजोडी करण्यापेक्षा घरातल्यांनी योग्य त्या तडजोडी करत तिला नवखेपणाची जाणीव होऊ न देणे ही प्रगल्भाता. पण प्रत्येक घरात-कुटुंबात ती असतेच असं नाही, त्यासाठी त्या घरातल्या त्या नव्या पतीने समंजसपणा दाखवायला हवा ना!!!

 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद  
आपला विश्वास – नैसर्गिक आरोग्य पुनर्स्थापनेची आमची जबाबदारी!

कृपया पुढील लेख वाचा  —


Understanding Relationships, Maturity, and Homeopathy

 

“Rahi, I heard about your Sunday family meeting. What happened?” – this was the message Rahi sent in response: “I’ll come to the clinic in the evening.”

Rahi had been my family patient since childhood, coming regularly to Chaitanya Homeopathic Clinic. Two years ago, after her marriage, she had told me, “I am very happy with Rigved, doctor.” But recently, she had gone home several times in an unsettled state. After counseling at the clinic, she would calm down and return to her in-laws.

This time, Rahi stayed home for a month. During that period, even though both families had scheduled meetings, Rahi remained at her maternal home, which caused her mother to message me with concern.

Rahi’s father had been in the Merchant Navy, so she had spent most of her time with her mother. After her father’s sudden passing, they were left with only each other. When Rahi reached a suitable age for marriage, her mother encouraged her to consider it. She married Rigved, a man of integrity and devotion. Both had delayed marriages due to family and career obligations, and were introduced through a match-making circle. They liked each other and got married.

Rigved’s family included his parents, younger brother, sister (Atharva and Aditi), a little niece, and an elder divorced sister. Rigved, a loving and responsible son, cared for everyone, often putting the needs of the family before his own. Rahi enjoyed the warmth of the extended family and Rigved’s presence. However, after a couple of months, she began to feel confused and frustrated.

During one clinic visit, she expressed:

“Even though family members love each other, small issues often lead to arguments. I don’t understand how a simple conversation with my sister-in-law reaches others in a completely different way. All responsibilities and appreciation always fall on Rigved. If something is delayed, everyone asks him first, and he feels guilty. His naive and obedient nature is taken advantage of. Atharva acts according to his own mind and firmly. Rigved, however, shares everything and consults everyone. My mother-in-law openly calls him naive—yet he doesn’t mind at all.”

I explained to Rahi:

“Every family and individual has a unique temperament. In some households, responsibilities naturally fall on the elder or the caring one. Labels like naive, obedient, stubborn, or proactive exist from childhood. No one deliberately intends injustice. Rigved himself doesn’t mind, but coming from outside and loving him, you feel distressed. Be patient and try to understand the dynamics of a joint family.”

Rahi made efforts to understand this. Later, she said:

“Rigved truly cares for everyone, so neither of us gets private time or space. Family members interfere in everything. On Sundays, they remember household chores. When we go out, there are restrictions like ‘don’t go here, don’t go there, return by nine.’ If it’s half-past nine, my mother calls. Initially, this ‘so-called’ care felt controlling. But eventually, Atharva learned to prioritize and respect our space. Rigved, however, can’t say no to anyone because of his ‘good boy’ nature. I like his loving attitude, but not this excessive obligation. Sometimes, when we are alone as husband and wife, the pressure of ‘be home by nine’ irritates me. I have always grown up independently, making my own decisions. Will I ever be able to cope with this atmosphere, Rigved’s dutiful nature, and the entwined love of everyone?”

I advised:

“This is life—marriage is about learning to adjust. Sometimes you give, sometimes you let go. You must balance your own needs with the family dynamics of your spouse.”

After this counseling, Rahi returned home with unease, but later news of a family meeting reached her. Due to her month-long stay, Rigved’s parents called her mother to request a meeting. I was also involved in trying to mediate, but her mother called relatives without consulting me.

The meeting turned out to be about trivial disputes among younger family members. Long-held grievances were raised, and Rahi felt overwhelmed. Everyone’s egos clashed—deciding who was right, who did what, what was overlooked. When she tried to bring up privacy concerns, the situation worsened. Finally, Rahi and her mother stopped speaking, everyone was exhausted, and the meeting ended.

After the meeting, Rahi reflected:

“Why do they behave like this? Why are expectations from Rigved so high? How long do I have to wait to get my personal space? Even if I try to accommodate, will I always be compromising? The responsibility for our privacy rests mainly with Rigved. If he doesn’t understand my needs, what can I expect from the family?”

She realized that while she had issues with her in-laws, the most important responsibility for the couple’s relationship was their own. After Homeopathic Treatment, she calmly and logically reached a decision:

“We both love each other and want to be together. Our relationship’s responsibility is solely ours. From now on, we will communicate directly, clearly, and calmly, without involving others. Staying apart for a little while may help our bond grow. If Rigved cannot understand or change his ‘good boy’ image, then we must accept that we are good individuals, but not the right life partners. Marriage is for understanding, maturity, and happiness. That will guide how much compromise I am willing to make.”
Homeopathy helped Rahi reach clarity and peace, enabling her to handle family dynamics maturely and assertively.
Marriage inevitably changes daily life. In joint families, understanding and subtle compromise by all members help the newcomer feel at ease. Where such understanding is absent, the spouse must exhibit maturity and empathy. Homeopathy can provide guidance and support for navigating these delicate transitions.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123/ 9404507723
🌐 www.chaitanyahomeocare.com
Sunday Closed.
Your Trust – Our Responsibility to Restore Health Naturally!

Please Read Next Article-