प्राधान्य हवं आरोग्यालाच ! स्वीकारा होमिओपॅथीला !! / Priority should be given to Health ! Accept Homoeopathy !!

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneAugust 8, 2025 Anxiety Female Problems General Information Geriatric Problems Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry Sleep Disorders

 

प्राधान्य हवं आरोग्यालाच !

स्वीकारा होमिओपॅथीला !!

           दलाई लामा मनुष्याच्या स्वभावाबद्दल सांगताना म्हणतात, “संपत्तीच्या मागे धावताना माणूस स्वतःच्या स्वास्थ्याचा विचार बाजूला सारतो आणि नंतर तो पैसा गमावलेलं आरोग्य पुन्हा मिळवण्यात खर्च करतो.”
        यात तात्पर्य असं की, “शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या जर माणूस आरोग्य संपन्न नसेल तर भौतिक यशाला काही अर्थ उरत नाही.”
    संपत्ती आणि यश  मिळवण्याच्या नादात आपण आरोग्याची किंमत ओळखायला चुकतो. आधुनिक जगात आर्थिक फायदा, स्थावर-जंगम मालमत्ता, प्रसिद्धी या गोष्टींना प्राधान्य दिले जातात. मात्र त्या धकाधकीत अनेकदा स्वास्थ्याचं बळी जातो.
    उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या जाहिरातीमध्ये ‘अमुक इतक्या विद्यार्थ्यांना लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळायला ‘,अशी आकडेवारी रंगवून सांगितलेली दिसते. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्यासमोर ध्येय काय असतं ? …. तर आयुष्यात भरपूर पैसा मिळेल असा नोकरीधंदा !
   आधुनिक जीवनशैलीत ताण पुष्कळ आहेत. त्यात नोकरीत त्या व्यक्तीकडून सातत्यानं उत्तम कामगिरीची अपेक्षा असते. कुटुंबाची जबाबदारी आणि सामाजिक जीवन यांचाही तोल साधायचा असतो. या कसरतीत आरोग्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष होतं.  ते जणू गृहीतच आहे. रोजच्या संघर्षातून वाट काढताना तब्येतीचा विचार करायला वेळ नसतो. पण ‘सजगतेनं जगणं ‘  या संकल्पनेत आपल्या दैनंदिन जगण्याचा वेग थोडा कमी करत व्यक्तींना आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. ही ‘ निवड नाही आहे, गरज ‘च आहे.
   सर्वांगीण स्वास्थ्याच्या पायावर आयुष्याची इमारत उभी आहे. जेंव्हा तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, तेंव्हा आयुष्यातल्या अनुभवांशी पूर्णपणे समरस होऊन त्यांची मजा घेता येत नाही. त्यामुळे आरोग्याचा विचार सर्वात शेवटी करण्याची मानसिकता आधी बदलायला हवी. मौल्यवान संपत्ती म्हणून त्याचा अग्रक्रम हवा.
  • आपण सतत व्यग्र  का असतो ?
  • घाईत का असतो ?
  • आपण करतो ते काम कितीही समाधान देणार असलं, तरी न संपणारी धावपळ, अवास्तव अपेक्षा, सारखा तणाव, या चक्राती समाधान हिरावून घेतलं जाईल, हे आपल्यालाही खरं माहीत असतं. कारण या प्रकारात कामातली मजा हरवते. तरी आपलं लक्ष कुठे ?
  • तर सतत पुढे काय करायचं ?….
  •  सगळ्या गोष्टी दिनक्रमात  ‘ कट टू कट ‘ कशा बसवायच्या ?
  •  प्रत्येक विनंतीला ‘हो ‘  म्हणायचं …… याकडे !
  •  त्यामुळे आता जे समोर आहे, त्याचा आनंद घेता येत नाही.
   माणूस सारखा व्यग्र आहे, म्हणजे ती कुणीतरी उच्चभ्र व्यक्ती असणार, असा समज असतो. ‘मी सतत काम करतोय’  हे माणूस सारखा दुसऱ्याला दाखवून देत असतो. याचा कंसातला अर्थ ‘मी फार महत्त्वाची व्यक्ती आहे’  किंवा ‘मला बघा किती मागणी असते’  म्हणजे, “सतत काम करा, तरच तुमची योग्यता सिद्ध होईल”  असा संदेश आपल्याला मिळतो.
      ‘व्यग्रता ‘ हा माणसाच्या यातनां वरचा वेदनाशामक उपाय आहे, असे म्हणतात. आणि या पैलूवर काही संशोधनही झाली आहेत. स्वतःला सतत काही ना काही कामात गुंतवून घेण्यात आपण जगण्यातल्या वेदनेच्या जाणिवा बदल करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे रूढ अर्थाने अशा व्यक्तीची प्रगती होताना दिसते, पण खरंतर त्याचे मूळ प्रश्न त्यानं उत्तराशिवाय काढून टाकलेले असतात.
   अस्वस्थ करणारे सत्य दूर सारण्यासाठी किंवा आपणच आपल्याला खोदून खोदून प्रश्न विचारणं टाळण्यासाठी व्यग्रता ढालीसारखी वापरली जाते.
   थोडक्यात, सारखं कामात का राहायचं ? तर, वास्तवापासून दूर पाळण्यासाठी ! तुमच्या सततच्या व्यग्रतेची कारणं काहीही असोत, पण शेवटी तिचं पर्यवसान दृष्टचक्रात होतं.
   आपल्या हातात सगळं नियंत्रण असल्याची हवीहवीशी जाणीव आणि त्या क्षणी काय चकचकीत,झगमगीत दिसतंय, या दोन गोष्टींमध्ये आपलं मानसिक आणि भावनिक आरोग्य मागं राहतं. ‘सारखं कामात राहायचं ‘, हे खूणगाठ मनाने बांधली, की दिवसभर आपण अनेक – अगदी बिनमहत्वाची कामही करत राहतो; केवळ कामात राहण्यासाठी !
   अशावेळी आपला दृष्टिकोन बदलायला हवा. एक प्रयोग करून बघा. नोकरी- व्यवसायातलं तुमचं नेहमीचं काम करताना याचा इतरांना किंवा समाजाला कसा उपयोग होणार आहे, असा विचार करून पाहा. म्हणजे, “महत्त्वाच्या कार्यात आपला खारीचा वाटा आहे, असा दृष्टिकोन ठेवला, तर नेहमीच्याच कामाबद्दल आपल्या मनात सकारात्मकतेची भावना निर्माण होईल. काम केल्यावर समाधान वाटू लागेल. दृष्टिकोनातल्या अशा बदलामुळे अंतिमतः व्यक्तीला एकूणच अधिक बरं वाटायला लागतं.”
    आनुवंशिकतेने जे आजार आपल्याकडे येतात, ते येणारच, हे अनेकांनी गृहीत धरलेलं असतं. ‘माझं आरोग्य चांगलं का नाही ?….. तर आनुवंशिकता ! त्यापुढे काय करणार ‘? असा सूर असतो. त्यामुळे आरोग्य सुधारण्यासाठी काही करायला हवं, याचं गांभीर्यच लोकांच्या लक्षात येत नाही.
     खरं तर जीवनशैलीतून काही चांगले बदल केले, तर आरोग्यावर उत्तम नियंत्रण ठेवता येतं. म्हणजे आनुवंशिकतेने येणारे विकार हेच आपलं नशीब, असं नसतं ! आपण कशाप्रकारची जीवनशैली स्वीकारतो, त्यावरही आरोग्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.
   स्वास्थ्यपूर्ण आणि आनंदी जीवनाकडे टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतःवर आहे, हे समजून आचरण करणं.
   माझ्या एका पेशंटला  स्वतःबद्दल आलेला अनुभव लिहीत आहे. ” मी चाळीशी ओलांडली तेव्हा, एखाद्या फोनची बॅटरी जशी झरझर उतरते,  तशी माझ्या शरीरातली ऊर्जा दिवसभर वेगाने कमी कमी होत आहे, असं मला जाणवायला लागलं. दिवसभर मला थकवा, निरुत्साह जाणवायचा. कंबर वारंवार दुखत असायची.  वारंवार आजारी पडत असे. शनिवार-रविवार पुणे मुंबई प्रवास झाला की लगेच  सर्दी खोकला झालाच ! कामात ऊर्जा राहावी म्हणून रोज तीन-चार कप कडक ब्लॅक कॉफी प्यायचो. या काळात रात्री सात -आठ तास झोपत होतो आणि किमान आठवड्यात तीन दिवस जिमला जात होतो तरी  ताजतवानं वाटण्या ऐवजी मलूल आणि आजारी वाटायचं.
  नंतर तो, होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेण्यासाठी ‘चैतन्य क्लिनिक ‘ मध्ये आला. तेव्हा त्याला आहाराबद्दल त्याच्या मनात किती गैरसमज आहेत हे त्याच्या लक्षात आणून दिलं.
    आरोग्याचा विचार सर्वांच्या बाबतीत सरसकट सारखा करता येत नाही. आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं, त्याचं म्हणणं ऐकता आलं पाहिजे. आपण काय खातो हे जाणीवपूर्वक निवडणूक आपल्या हातात असतं. जीवनशैलीत संतुलन आवश्यक आहे. शिवाय कठीण परिस्थितीत तग धरून राहणं जमवावं लागतं.
   माझं आरोग्य आणि ऊर्जा त्याच्याच हाती आहे आहे हे हळूहळू त्याच्या लक्षात आलं.
    होमिओपॅथिक औषध सुरू केल्यानंतर त्याची फोनची बॅटरी म्हणजे शरीरातील ऊर्जा पूर्वीप्रमाणे चार्ज राहू लागली, म्हणजे ऊर्जावान राहू लागला. दिवसभराचा थकवा निरुत्साह जाणवणे पूर्णपणे कमी झालं, वारंवार आजारी पडणं, कंबर दुखीचा त्रास नाहीसा झाला आणि आजारी वाटण्याचं बंद होऊन ताजतवांना राहू लागला.
    माणसाचा आरोग्य किती महत्त्वाचं आहे, याचा साक्षात्कार गंभीर आजारी पडल्यावर किंवा रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागल्यावरच अनेकांना होतो.
    प्रत्यक्षात आरोग्य जपणं तितकेसे कठीण नसतं. त्याला आपण कधी प्राधान्य न देणं किंवा ते द्यावसं न वाटणे ही पुष्कळ यांची खरी समस्या ! सजग राहून जगायचं असेल, तर मात्र शारीरिक, मानसिक स्वास्थ्य आवश्यक आहे. तरच प्रत्येक क्षण पूर्ण क्षमतेने अनुभवता येईल.
  आधुनिक जीवनातील गुंतागुंत वाढतच राहणार. पण त्यातून मार्ग काढताना केवळ बाह्य गोष्टींवर माणसाचं यश अवलंबून नाही. तर आतून आपण किती सुदृढ आहोत हे तपासून लक्षात ठेवायला लागतं. तेव्हा आपले प्राधान्यक्रम पुन्हा नव्याने ठरवून ठरवा, कारण आरोग्य हा समृद्ध अस्तित्वाचा पाया आहे.
     होमिओपॅथिक औषधोपचार ही अशी गोष्ट आहे की, आरोग्याशी असलेलं आपलं नातं सुधारायला मदत करते आणि प्रत्येकाच्या बाबतीत हे होऊ शकतं. विशिष्ट काळानंतर त्याची वेळ उलटून गेली आहे असं काही नसतं ! होमिओपॅथिक औषधोपचार ही सजगतेने जगण्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद

कृपया पुढील लेख वाचा  —

 

——————————————

Priority should be given to Health ! Accept Homoeopathy !!

The Dalai Lama says of human nature, “In the pursuit of wealth, one neglects one’s own health and then spends the money on regaining the lost health.”
    This means that “Material success means nothing if a person is not Healthy Physically, Mentally and Emotionally.
   In the pursuit of wealth and success, we lose sight of the value of health. In the modern world, financial gain, immovable property, fame are given priority. But Health is often sacrificed in that stress.
      In the advertisement of higher education institutes, it is seen that ‘so many students get high paying jobs’, the statistics are painted. So what is the goal in front of us in general ? …. So a job that will get a lot of money in life !
     Stresses abound in modern lifestyles. In that, the person is expected to consistently perform well in the job. Family responsibilities and social life also have to be balanced. In this exercise, health is neglected for a long time. It’s a given.
     There is no time to think about health while going through the daily struggle. But in the concept of ‘vigilant living’, it is necessary to give priority to health by slowing down the pace of our daily life. It is ‘not a choice, it is a necessity’.
   The building of life is built on the foundation of Holistic Health. When Health is neglected, one cannot be fully in Harmony with life’s experiences and enjoy them. Therefore, the mindset of thinking about Health last should be changed first. It should be prioritized as a valuable asset.
  • Why are we always Busy ?
  • Why are you in a Hurry ?
  • No matter how satisfying the work we do, we also know for a fact that this cycle of endless rush, unrealistic expectations, and similar stress will rob us of our satisfaction. Because in this type of work fun is lost. But where is our Attention ?
  • So what to do Next ?
  • How to fit all the things in the routine ‘Cut to Cut ‘?
  • To say ‘Yes ‘ to every request… to this!
  • Therefore, what is in front of you cannot be Enjoyed.
   It is believed that she is busy like a man, so she must be some elite person. ‘I am constantly working’ is like a man showing to others. It means in parentheses ‘I’m a very important person’ or ‘look how demanding I am’, which gives us the message “work hard, only then will you prove your worth”.
    It is said that ‘preoccupation ‘is an antidote to human suffering. And some research has been done on this aspect. By constantly engaging ourselves in some activity, we try to change the perception of the pain of living. That is, in the conventional sense, such a person appears to be progressing, but in reality, his original questions are removed without answers.
     ‘Preoccupation’ is used as a shield to hide uncomfortable truths or to avoid digging in and asking questions.
     In short, why stay in the same job ? So, to keep away from reality ! Whatever may be the reason for your constant preoccupation, its end is in sight.
     Our Mental and Emotional Health is held back by our desire to be in control, and what is glittering in the moment. To stay at work, this landmark is built by the Mind, that throughout the day we continue to do many – even insignificant tasks; Just to stay at work !
     In that case, we should change our attitude. Try an experiment. Job – Think about how this will benefit others or society while doing your regular work in business. That is, “If we take the view that we have a role to play in an important task, we will feel positive about routine work. We will feel satisfied after doing the work. Such a change in attitude ultimately makes the person feel better overall.”
     Many people assume that the diseases that come to us through Genetics will come. ‘Why is my health not good ?….. But Genetics ! What will you do next ? ‘ There is such a tone.
    Therefore, people do not realize the seriousness of doing something to improve their health. In fact, by making some good lifestyle changes, health can be better controlled. It means that hereditary disorders are not our destiny ! Health also depends a lot on the kind of lifestyle we adopt.
   The first step to a Healthy and Happy Life is to take responsibility for your own Health.
    Writing about an experience one of my patient had about himself. “When I crossed 40, like a phone battery discharging, I started to feel that my body’s energy was rapidly depleting throughout the day. I felt tired, depressed throughout the day. Back pain often. Sick feeling often. Saturday-Sunday Pune to Mumbai, as soon as I traveled used to suffer from cold, I used to drink three to four cups of strong black coffee every day and I used to go to the gym at least three days a week, but instead of feeling refreshed, I feel exhausted, drained  & sick.”
    Later, he came to ‘Chaitanya Clinic’ for Homoeopathic treatment. It made him realize how many misconceptions he had about diet. Health cannot be considered the same for everyone.
    Our body talks to us, we should be able to listen to what it is saying. Conscious choice of what we eat is in our hands. Balance in lifestyle is essential. Moreover, one has to gather strength to hold on in difficult situations.
      He gradually realized that my Health and Energy were in his hands.
             After starting the Homoeopathic Medicine, his phone battery i.e. the energy in the body started to remain charged as before, i.e. energetic. The feeling of tiredness during the day is completely reduced, the frequent sicknesses, backaches are gone and the feeling of being sick is gone and the feeling of Freshness has come.
     Many people realize how important a person’s Health is only after getting seriously ill or having to go around the hospital.
    Actually maintaining Health is not that difficult. The real problem of many is that we never give priority to him or don’t want to give it ! If you want to live Mindfully, Physical and Mental health is necessary. Only then can each moment be experienced to its fullest potential.
    The complexities of modern life will continue to increase. But the success of a person does not depend only on external things while making a way out of it. So we have to check and remember how strong we are inside. So redefine your priorities, because Health is the foundation of a prosperous existence.
       Homoeopathic Medicine is something that helps improve our relationship with Health and it can happen to anyone. There is no such thing as its time has passed after a certain period !                                                         Homoeopathic Medicine is an important step in Mindful Living.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123 / 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-