पाळीची अनियमितता आणि होमिओपॅथी / Irregular Periods and Homeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJune 29, 2026 Anxiety Bone Diseases Cancer Female Problems General Information Hair Loss Heart Problem Hematological Disorder Homeopathic and Cure marriage Problem Mental Health Mental Health Psychosomatic Problems Rheumatic Arthritis Sexual Problems Skin & Cosmatology Sleep Disorders

पाळीची अनियमितता आणि होमिओपॅथी

 

पौगंडावस्थेची पुढची स्थिती म्हणजे तारुण्य. मुलींच्या जीवनातील एक अत्यंत आनंददायी असा हा काळ. तारुण्य म्हणजे अमाप उर्जा व सळसळता उत्साह. तारुण्य म्हणजे कुतूहल आणि नवनवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास. तारुण्यात पदार्पण केलेल्या मुली स्वतःच्या आयुष्यात रममाण झालेल्या असतात. शिक्षण व करिअरमध्ये पूर्णपणे व्यग्र असतात. तारुण्य म्हणजे शारीरिक तंदुरुस्तीचा काळ. या वयात जननसंस्थेची पूर्ण वाढ होऊन, ती संपूर्णपणे कार्यरत झाल्यानंतर दर 21 ते 35 दिवसांमध्ये मासिक पाळी नियमित येऊ लागते.

काही वेळेस मात्र मासिक पाळी संबंधित समस्यांसाठी या वयातील मुलींना डॉक्टरांकडे जावं लागतं.

अनियमितता ही मासिक पाळीची सगळ्यात सर्वसामान्य समस्या आहे. नियमितपणे येणारी पाळी अचानक अनियमितपणे कधीही येऊ लागते. थायरॉईड, प्रोलॅक्टीन सारख्या संप्रेरकांमधील असंतुलन, मानसिक व शारीरिक ताणतणाव यासाठी कारणीभूत असतात आणि यातीलच एक महत्त्वाचे कारण म्हणजे “पॉलिसीस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम ” (पीसीओएस).

गेली दोन वर्ष सायलीची पाळी अनियमित झाली आहे. कधी बरोबर महिन्याने येते तर कधी कधी तीन-चार महिने सुद्धा येत नाही. आता सुद्धा गेले तीन महिने मासिक पाळी न झाल्याने 24 वर्षाची सायली वैद्यकीय सल्ला घ्यायला “चैतन्य होमपेथिक क्लिनिक “ मध्ये आली होती. तिला इतरही त्रास होत होते. तिचं वजन वजन वाढलं होतं. हनुवटीवर जाड लव आली होती. चेहऱ्याची त्वचाही मुरमे व पुटकुळ्यांनी खराब झाली होती. सायलीच्या लक्षणांवरून तिला “पीसीओएसचे “ प्राथमिक निदान झालं होतं.

  “पीसीओएस” ही हल्ली अनेक मुलींमध्ये आढळणारे समस्या आहे. भारतात 10% तरुण मुलींमध्येही समस्या कमी- अधिक प्रमाणात आढळते. यामध्ये बीज निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये (ओव्हूलेशन) दोष निर्माण होतो. यामुळे होणारे संप्रेरकांमधील असंतुलन मुलींमध्ये दिसणाऱ्या लक्षणांना कारणीभूत असतं.

“पीसीओएस” चा त्रास असणाऱ्या स्त्रियांमध्ये “अँड्रोजन “ या पुरुषांमध्ये आढळणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण वाढतं. यामुळे शरीरावर विशेषतः हनुवटीवर जाड लव येते.चेहऱ्यावर मुरमु-पुटकुळ्या येतात. मानेची त्वचा काळी पडते. केस गळती वाढल्याने टक्कल पडू शकते. “पीसीओएस “ मध्ये इन्सुलिन संप्रेरकाला प्रतिरोध निर्माण होतो.यामुळे वजन वाढतं. “पीसीओएस “चा आजार असलेल्या 80% मुलींमध्ये लठ्ठपण आढळतो.

  •    इन्सुलिनला प्रतिरोध झाल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. बीजनिर्मितीत दोष निर्माण झाल्यामुळे या मुलींमध्ये वंध्यत्वाची समस्या आढळते.
  • प्रौढावस्थेत या स्त्रियांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार व गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका संभवतो.
  • लठ्ठपणा, त्वचेच्या समस्या व संप्रेरकांमधील असंतुलनामुळे या मुलींच्या नैराश्य, मानसिक संतुलन यासारख्या समस्या जास्त प्रमाणात आढळतात.
  • “पीसीओस “ चं निदान करण्यासाठी रक्तातील संप्रेरकांची (हार्मोन्सची) पातळी तपासण्यात येते.
  • सोनोग्राफीमध्ये बिजांडकोशावर पाण्याने भरलेल्या छोट्या गाठी “पीसीओएस ” मध्ये दिसतात.
  • निदान झाल्यावर या मुलींना सर्वप्रथम जीवनशैली सुधारण्याचा सल्ला दिला जातो.
  • नियमितपणे दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम केल्याने संप्रेरकातील असंतुलन कमी होते. संतुलित आहार घेणं, आहारातील कर्बोदक, दुग्धजन्य पदार्थ व मांसाहार कमी केल्यास “पीसीओएस “ ची तीव्रता कमी होते. वजन आटोक्यात येतं.
  • जागरण न करता पुरेशी झोप घेणं,ताण-तणाव कमी करणे, याचाही सकारात्मक फायदा होतो.
  • “पीसीओएस “ समस्या कमी करण्यासाठी अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्यात होमिओपॅथिक उपचार पद्धती ही अग्रगण्य म्हणून ठळकपणे उदयास आली आहे.

संप्रेरकांमुळे मासिक पाळी नियमित करता येते. तसेच त्वचेच्या समस्या कमी होतात. इन्सुलिन प्रतिरोध औषधांच्या साह्याने हा त्रास कमी करता येऊ शकतो. वंध्यत्वाची समस्या असल्यास बिजनिर्मिती होण्यासाठी औषध दिली जातात. चेहऱ्यावरील अनावश्यक लव लेझरच्या साह्याने नियंत्रणात आणता येते.

     होमिओपॅथिक औषधांमुळे मासिक पाळी नियमित करता येते. तसेच त्वचेच्या समस्या कमी होतात. इन्सुलिन प्रतिरोध औषधे घेण्याची गरज पडत नाही आणि वंधत्वाची समस्या कमी होऊन बीज निर्मिती नैसर्गिकरित्या झाल्यामुळे गर्भधारणा नैसर्गिकरित्या राहण्यास मदत होते. चेहऱ्यावरील अनावश्यक लव वाढण्यास प्रतिबंध होतो.

“डॉक्टर दोन महिन्यांपूर्वी घरी पूजा असल्यामुळे, मी पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्या. मला गोळ्यांचे नाव माहित नाही, पण कोपऱ्यावरच्या औषधांच्या दुकानातून त्या घेतल्या होत्या. माझी आईसुद्धा पाळी लांबवायला अशा गोळ्या अधून मधून घेते. पण आता गोळ्या घेतल्यापासून माझी मासिक पाळी अनियमित झाली आहे. कधीही थोडा थोडा रक्तस्त्राव होतो.आता काय करू?” 21 वर्षांची केतकी “चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक “ मध्ये अनियमित पाळीच्या उपचारांसाठी आली होती. केतकी प्रमाणे अनेक मुली स्त्रिया मासिक पाळी लांबविण्यासाठी वैद्यकीय सल्याशिवाय औषध घेत असतात

हे किती योग्य आहे ? खरं तर नियमित मासिक पाळी पुढे मागे करण्यासाठी शक्यतो औषधे घेऊ नयेत. ही औषधं संप्रेरकयुक्त असल्याने त्यांचे काही दुष्परिणाम निश्चितपणे होतात. अगदी एखाद्या वेळी नाईलाजाने अशी औषधे घ्यावी लागलीच तर ती वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत.

निधीला मासिक पाळीच्या वेळी पोटदुखीचा त्रास होतो. ही पोटदुखी तिला अजिबात सहन होत नाही, पण औषधांची सवय होईल म्हणून तिची आई तिला वेदनाशामक औषध घेऊ देत नाही.

रुचिराला सुद्धा मासिक पाळीच्या वेळी पोटात व कंबरेत खूप दुखतं. कधी कधी वेदनाशामक औषधांचाही फारसा उपयोग होत नाही. दोन-तीन दिवस काम सोडून घरी बसावं लागतं. मासिक पाळीच्यावेळी पोटात दुखणं नॉर्मल आहे का? वेदनाच्या गोळ्या कायमस्वरूपी घेणे योग्य आहे का?

तर, मासिक पाळीच्या वेळी थोडे पोटात दुखणं, कंबर- पाय दुखणे हे अगदी सामान्य आहे. पाळीच्या वेळी गर्भाशयाच्या आकुंचन पावण्यामुळे व तिथला रक्तपुरवठा वाढल्यामुळे हे दुखतं. हे दुखणं पोट- कंबर शेकण्यानं, थोडा व्यायाम केल्याने कमी होतं. वैद्यकीय सल्ल्याने वेदनाशामक गोळा घ्यायलाही हरकत नाही. दुखण्याची तीव्रता जास्त असेल तर मात्र डॉक्टरांकडे जायला हवं. होमिओपॅथिक उपचाराने याच्यावर निश्चितपणे मात करता येते.

बिजांडकोश व गर्भाशयाच्या गाठी, जननसंस्थेचा जंतुसंसर्ग यांसारखी त्याची कारणं असतात.

“एन्डोमेट्रीओसीस” (Endometriosis) या आजारात पोटात दुखण्याची तीव्रता जास्त असते.या आजारात गर्भाशयाचं आतलं आवरण “एंडोमेट्रियम” (Endometrium) गर्भाशयाबाहेर वाढत असतं. दर महिन्याला मासिक पाळीचे वेळी या गर्भाशयाबाहेरील आवरणात रक्तस्त्राव होतो व तिथे गाठी तयार होतात यामुळे पोटात दुखतं. ही पोटदुखीची वेदना मासिक पाळीचे वेळी सुरू होऊन मासिक पाळी नंतर काही दिवस चालू राहते. निदान झाल्यावर होमिओपॅथिक औषधानेही वेदना कमी करता येते.

प्रत्येक वेळी मासिक पाळीच्या दरम्यान साधारणतः 30 ते 80 मिली रक्तस्त्राव होतो. रक्तस्त्राचे प्रमाण जास्त असल्यास डॉक्टरांकडे जायला हवं. रक्तस्त्राव जास्त होतो हे कसं समजायचं? दिवसाला चार-पाच पेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन्स वापरायला लागत असतील किंवा रक्तस्त्राव बरोबर रक्ताच्या मोठ्या गाठी जात असतील तर याचा अर्थ जास्त रक्तस्त्राव होतो आहे. जास्त रक्तस्त्राव झाल्यास किंवा सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रक्तस्त्राव चालू राहिल्यास वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा.

संप्रेरकांमधील असंतुलन व गर्भाशयाच्या गाठींमुळे जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. जास्त रक्तस्त्रामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन दम लागणं, अशक्तपणा येणं, गरगरणं यासारखे त्रास होऊ शकतात. म्हणूनच जास्त रक्तस्त्राव होत असल्यास औषध उपचार हवेत आणि होमिओपॅथी मध्ये यावर खात्रीशीर औषधं निश्चितपणे आहेत.

भारतातील 57% स्त्रियांमध्ये म्हणजेच रक्तक्षयाची (ॲनिमिया) समस्या आढळते. यात रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असते. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. अन्नामध्ये लोहाचे प्रमाण कमी असणं, कुपोषण, मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव होणं, जंतुसंसर्ग ही त्याची महत्त्वाची कारणं.

रक्तक्षयामध्ये प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वेगवेगळे जंतुसंसर्ग होऊ शकतात. गंभीर प्रकारच्या रक्तक्षयात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सात ग्रॅमपेक्षा कमी होते. अशा हृदयावर पाणी येऊन त्याची कार्यक्षमता कमी होते. यामुळे जीवघेणा प्रसंग वाढवू शकतो. रक्तक्षय असलेल्या स्त्रियांना पुढे गरोदरपणही झेपत नाही. यामुळे रक्तक्षय असल्यास अन्नातील लोहाचं प्रमाण वाढवायला हवं. हिमोग्लोबिनचे प्रमाण अतिशय कमी असल्यास लोहाची इंजेक्शन देण्याची अथवा रक्तसंक्रमण (Blood transfusion) करण्याची गरज भासू शकते. होमिओपॅथिक उपचारांमुळे मासिक पाळीच्या वेळी होणारा रक्तस्त्राव संपूर्णपणे थांबवून रक्तक्षयक आटोक्यात आणता येतो.

“डॉक्टर गेले काही महिने मासिक पाळीच्या आधी काही दिवस मला खूप त्रास होतोय.” असं अर्चना, “चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक “ मध्ये उपचारासाठी आलेली एक पेशंट सांगत होती.” खूप चिडचिड होते, सारखं रडायला येतं, अंगावर इतकी सूज येते की कपडे आणि चपला सुद्धा घट्ट होतात. खूप आजारी असल्यासारखे वाटत. छातीत दुखतं. एकदा मासिक पाळी सुरू झाली की अगदी पुनर्जन्म झाल्या सारख वाटतं. सगळे त्रास कमी होतात. याला काय उपाय आहे का? कारण महिन्यातले जवळजवळ आठ दिवस माझे या त्रासातच जातात.”

अर्चनाला होणारही लक्षणे म्हणजे “पीएमएस”(pre menstrual syndrome) , जवळपास 50% स्त्रियांना याची लक्षणे थोड्याफार प्रमाणात जाणवतात. शरीरातील संप्रेरकांमधील बदल व सिरोटोनिन या या पदार्थाची पातळी कमी होणं ही त्याची काही कारणं. ही लक्षणं मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी काही दिवस जाणव लागतात व मासिक पाळी आल्यानंतर कमी होतात. अंगावर सूज येणं, दमायला होणं, स्तनांमध्ये जडपणा येऊन दुखणं, डोकं दुखणं ही त्याची सर्वसामान्य लक्षण आहेत.

यामध्ये चिडचिडेपणा, मानसिक असंतुलन, नैराशय, मन एकाग्र न होणं, पुरेशी झोप न लागणं यासारखे मानसिक त्रासही जाणवतात.

 “पीएमएस “ चा त्रास होत असलेल्या स्त्रियांनी जास्त प्रमाणात चहा कॉफी पिणं, धूम्रपान करणं, मसालेदार पदार्थ खाणं टाळावं. नियमित व्यायाम, पुरेशी झोप व संतुलित आहाराने “पीएमएस ” चा त्रास कमी होतो. याशिवाय कॅल्शियम, जीवनसत्व ‘ब ‘ आणि ‘ ड’, वेदनाशामक औषधांबरोबर होमिओपॅथिक औषधांचाही चांगला उपयोग होतो. खूप त्रास झाल्यास संप्रेरके व मानसिक आजारांवरील होमिओपॅथिक औषधे दिली जातात.

    मासिक पाळीच्या तक्रारी या एखाद्या शारीरिक व्याधीचे लक्षण असू शकतात. यावर वेळीच उपचार न झाल्यास पुढील आयुष्यात गंभीर समस्या बनू शकतात. म्हणूनच मासिक पाळीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा व होमिओपॅथिक औषध उपचारांची त्याला जोड द्यायला हवी.
तारुण्याचा काळ हा आनंदाचा, सळसळत्या उत्साहाचा असतो. तो कायमस्वरूपी टिकवायला हवा असेल तर आरोग्यभान हे हवंच आणि होमिओपॅथिक उपचार पद्धतीची जोड ही हवीच !!!

 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)  ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001 🌐 www.chaitanyahomeocare.com
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद

कृपया पुढील लेख वाचा  –

आपला विश्वास – नैसर्गिक आरोग्य पुनर्स्थापनेची आमची जबाबदारी!

=========================================

Irregular Periods and Homeopathy

 

Adolescence is the next stage after puberty—a very delightful period in a girl’s life. Youth is full of immense energy and bubbling enthusiasm. It is also a phase of curiosity and eagerness to learn new things. Girls stepping into adolescence are deeply absorbed in their own world, completely engaged in education and career building. It is also the period of peak physical fitness. At this age, once the reproductive system is fully developed and begins to function actively, menstruation starts occurring regularly every 21 to 35 days.

However, sometimes girls in this age group have to consult a doctor due to problems related to menstruation.

The most common problem is irregular periods. Periods that were coming regularly may suddenly start coming irregularly. Hormonal imbalances such as those involving thyroid or prolactin, as well as mental and physical stress, are among the causes. One of the most important underlying reasons is Polycystic Ovarian Syndrome (PCOS).

For the past two years, Sayali’s menstrual cycle had become irregular. Sometimes her period came on time, but at other times it didn’t occur for three to four months at a stretch. Recently, as she hadn’t had her period for three months, the 24-year-old Sayali visited ‘Chaitanya Homeopathic Clinicfor consultation. She also complained of other symptoms—weight gain, coarse hair growth on the chin, and pimples and acne spoiling the skin of her face. Based on these symptoms, she was preliminarily diagnosed with PCOS.

PCOS is increasingly common among girls today. In India, it affects around 10% of young women to varying degrees. In this condition, there is a defect in the process of ovulation (egg formation). The resulting hormonal imbalance gives rise to the typical symptoms seen in affected girls.

  • In women with PCOS, the level of androgens (hormones usually found in men) increases.
  • This leads to excessive hair growth, especially on the chin, acne and pimples on the face, darkening of the skin around the neck, and in some cases, hair loss leading to baldness. PCOS also causes insulin resistance, which contributes to weight gain.
  • About 80% of women with PCOS suffer from obesity. Due to insulin resistance, the risk of developing diabetes also increases. Because of the ovulatory dysfunction, infertility is another common issue.
  • As these women grow older, the risk of diabetes, high blood pressure, heart disease, and uterine cancer also rises.
  • In addition, obesity, skin problems, and hormonal imbalance contribute to psychological issues such as depression and emotional instability.
  • To diagnose PCOS, doctors check hormone levels through blood tests. Ultrasound often reveals small fluid-filled cysts on the ovaries, typical of PCOS.
  • After diagnosis, the first recommendation is lifestyle modification. Regular daily exercise of at least 30 minutes helps reduce hormonal imbalance. A balanced diet with reduced intake of carbohydrates, dairy products, and non-vegetarian food helps reduce the severity of PCOS and controls weight
  • . Proper sleep, avoiding late nights, and reducing stress also have a positive effect.
There are many treatment options available to manage PCOS, and among them, Homeopathic treatment has emerged prominently as a leading approach.

Conventional medicines can regulate menstruation, reduce skin problems, and improve insulin resistance. If infertility is present, ovulation-inducing medicines are given. Unwanted facial hair can be controlled with laser treatment.

Homeopathic medicines help regulate periods naturally. They also improve skin problems. Unlike conventional treatment, they reduce insulin resistance without requiring additional medicines. Infertility issues improve as ovulation occurs naturally, thereby increasing the chances of natural conception. Homeopathy also helps control excessive facial hair growth.

One young woman, Ketaki (21 years old), came to ‘Chaitanya Homeopathic Clinicwith complaints of irregular periods. She shared her experience:

“Doctor, two months ago, because we had a religious ceremony at home, I took tablets to postpone my periods. I don’t know the name of the tablets, but I bought them from the local pharmacy. Even my mother occasionally takes such tablets to delay her period. But since I took them, my cycle has become irregular. Now I get slight bleeding at odd times. What should I do?

Just like Ketaki, many young girls and women take medicines to postpone their periods without medical advice. This often leads to irregular menstruation and other health problems.

Is this right? In fact, medicines should generally not be taken to postpone or advance regular menstruation. These medicines contain hormones, and they definitely cause some side effects. If, in unavoidable circumstances, such medicines must be taken, they should only be taken under medical supervision.

Nidhi suffers from stomach pain during menstruation. The pain is unbearable for her, but her mother does not allow her to take painkillers, fearing that she may become dependent on them.

Ruchira also experiences severe pain in her abdomen and back during menstruation. Sometimes, even painkillers do not provide much relief. She has to miss work for two to three days and remain at home. Is abdominal pain during menstruation normal? Is it safe to take painkillers regularly?

Mild abdominal, back, or leg pain during menstruation is quite common. This happens because of uterine contractions and increased blood supply in that area. Such pain can be relieved by applying heat to the abdomen or back, or with light exercise. Painkillers can also be taken under medical advice. However, if the pain is severe, one must consult a doctor. Homeopathic treatment can definitely help overcome this condition.

Sometimes, the causes may include ovarian cysts, uterine fibroids, or infections of the reproductive system. In Endometriosis, the pain is usually more intense. In this disease, the inner lining of the uterus (endometrium) grows outside the uterus. During menstruation, these abnormal endometrial tissues also bleed, forming clots that cause severe abdominal pain. This pain starts during menstruation and often continues for a few days after. Once diagnosed, Homeopathic medicines can help reduce this pain.

Normally, around 30 to 80 ml of blood is lost during each menstrual cycle. If bleeding is heavier, a doctor should be consulted. How do we know if it is excessive? If more than four to five sanitary napkins are needed per day, or if large blood clots are passed along with the flow, this indicates heavy bleeding. If heavy bleeding continues for more than seven days, medical advice is necessary.

Hormonal imbalance and uterine fibroids can lead to excessive bleeding. This, in turn, may cause reduced blood volume, resulting in breathlessness, weakness, and dizziness. That is why medical treatment is necessary in such cases, and Homeopathy definitely has reliable remedies for this.

In India, about 57% of women suffer from anemia. This means their hemoglobin levels are low. The most common type is iron-deficiency anemia. Its main causes include low iron content in food, malnutrition, excessive menstrual bleeding, and infections.

Due to reduced immunity in anemia, women become more prone to infections. In severe anemia, hemoglobin levels fall below seven grams. This can strain the heart, reducing its efficiency, and may even become life-threatening. Women with anemia often find it difficult to cope with pregnancy later. Therefore, if anemia is present, dietary iron must be increased. In very severe cases, iron injections or even blood transfusions may be required. Homeopathic treatment can regulate menstrual bleeding and thus help control anemia.

“Doctor, for the past few months, I have been experiencing severe discomfort before my periods,” said Archana, a patient who came to ‘Chaitanya Homeopathic Clinic ‘ “I feel very irritable, keep crying, my whole body swells so much that my clothes and shoes feel tight. I feel as if I am seriously ill. I even get chest pain. But once my period begins, it feels like being reborn—all the symptoms reduce. Is there any treatment for this? Because nearly eight days of every month are spent in this suffering.”

The symptoms Archana described are those of PMS (pre-menstrual syndrome), which affect around 50% of women to some extent. The causes include hormonal fluctuations and a decrease in serotonin levels. These symptoms appear a few days before menstruation and subside once it begins. Common symptoms include swelling of the body, breathlessness, heaviness and pain in the breasts, and headachesThis condition may also involve irritability, emotional imbalance, depression, lack of concentration, and disturbed sleep.

Women suffering from PMS should avoid excessive consumption of tea and coffee, smoking, and eating spicy foods. Regular exercise, adequate sleep, and a balanced diet help in reducing PMS symptoms. In addition, calcium, vitamins B and D, along with pain-relieving medicines, can be beneficial, and homeopathic remedies are also found to be very effective. In severe cases, Homeopathic medicines for hormonal and psychological disorders are prescribed.

   Menstrual complaints can sometimes be a sign of an underlying health condition. If not treated on time, they may lead to serious problems later in life. Therefore, such complaints should never be ignored; medical advice should be sought promptly and supported with homeopathic treatment.
   Adolescence is a time of joy and vibrant energy. If one wishes to preserve this vitality for the long term, awareness about health is essential—and the support of homeopathic treatment is equally important!

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom)  ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001 🌐 www.chaitanyahomeocare.com
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.

Your Trust – Our Responsibility to Restore Health Naturally!

Please Read Next Article-