By Dr. Ajay HanmaneAugust 11, 2026 Anxiety Children Problems Female Problems General Information Homeopathic and Cure marriage Problem Mental Health Uncategorized
पालकांसाठी आपल्या हयातीत पुढली पिढी अपयशी निघणं यासारखे दुसरे दुःख नाही. खरंतर निवृत्तीचा काळ पुढल्या पिढीचा उत्कर्ष पहात सुखावून जाण्याचा. मात्र काही लोकांना इच्छा नसतानाही संसारातून मुक्त होता येत नाही. नोकरीचा कार्यकाळ संपलेला असतो, मात्र सांसारिक कटकटीतून निवृत्ती नसते. दोष कोणाचा? अकार्यक्षम मुलांचा कि ती अकार्यक्षम घडवणाऱ्या जुन्या पिढीचा?
अशावेळी दोषाचे खापर एकमेकांवर न फोडता त्या खापरांचे छत करून मुलांना अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढणं हे पालकांचे कर्तव्य ठरतं आणि त्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती फार उपयोगी पडते.
मात्र पालकांत एकजूट नसेल तर? हीच समस्या घेऊन विवंचनाग्रस्त नमिता ‘चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक’ मध्ये आल्या होत्या. पन्नाशी ओलांडलेल्या नमिता स्वतः पेशाने डॉक्टरच, बालरोगतज्ञ. मात्र आपला मुलगा निखिल आणि नवरा प्रभाकर यांच्यातील शीतयुद्धाचा तळ कसा शोधावा, त्यांच्यात मनोमिलन कसं घडवून आणावं हे त्यांना कळत नव्हतं. काहीशी स्थूल, ठेंगणी बांधणी, गोरा वर्ण पण चेहऱ्यावर चिंतेचा एक पातळ थर लिंपलेला. त्यासमोर आल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची (डॉक्टरांनी) नोंद घेतली गेली.
“डॉक्टर समस्या मुलात आहे की नवऱ्यात हेच मला कळेनासे झाला आहे. मुलांचं आयुष्य मार्गी लागावं ही प्राथमिक गरज आहे एवढं नक्की. तो आता तिशी ओलांडतो आहे. एव्हाना आयुष्यात स्थिर व्हायला हवा आहे.
नवऱ्याला याची फारशी चिंता आहे असं वाटत नाही. असेलही, पण सध्या तरी मुलावर डाफरण्याच्या पलीकडे तो काही करत नाहीये. आमचा प्रेम विवाह झालाय. प्रभाकर त्यावेळी अभियांत्रिकीला होता. त्याने अचानक सैन्यात ‘शॉर्ट सर्विस कमिशन ‘ घेण्याचं ठरवलं. त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम. पाच वर्षे नोकरी करू मग स्वतःचा व्यवसाय करू. सैन्याच्या नोकरीमुळे सवलती मिळतील हा विचार. पुढे मात्र शिस्तीच्या आयुष्याची सवय झाल्याने त्याने कायम सैन्य राहण्याचे ठरवलं. त्याचा स्वभावच सैन्याच्या चाकोरीबद्ध, काटेकोर जीवनाला पूरक. आता हा स्वभाव तिच्या मानसिकतेला जेवढा पूरक तेवढाच निखिलसाठी घातक ठरला आहे, असं माझं मत आहे. नमिताने आपलं विश्लेषण मांडलं.
“मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बालरोगतज्ञाची पदविका घेतली. काही काळ आम्ही सगळे एकत्र होतो. मात्र नवऱ्याची बदली दूर होऊ लागल्याने मी पुण्यातच व्यवसाय करू लागले. निखिल एकुलता एक मुलगा. त्याच्या शिक्षणाचाही प्रश्न होता. सासू-सासरे जवळच राहायचे. त्यांची मदत झाली. निखिलच शालेय शिक्षण पूर्ण होता होता नवऱ्याची बदली पुण्यात झाली. तेव्हापासून आमचं कुटुंब एकत्र झालं, मात्र माणसे दुरावत गेली.” त्यांच्या स्वरात काहीशी खंत जाणवली.
“निखिलचे त्याच्या वडिलांचे खटके बोलू लागले. निखिल त्यांच्यासारखाच अबोल,काहीसा आळशी, मनस्वी स्वभावाचा. प्रभाकरचा स्वभाव शिस्तीचा. लेकावर प्रत्येक गोष्टीत डाफरायचा. शिस्त प्रेमानं ही लावता येते. कधी कधी आपल्यात आणि मुलात प्रेमाचं नातं टिकवणं, जागतं ठेवणं महत्त्वाचं असतं हे नवऱ्याला कधी कळलं नाही.”
“मुलाला पाक कलाकृतीत फार रुची! मग हॉटेल व्यवस्थापन, हॉस्पिटल, वगैरे क्षेत्राचा विचार झाला. मात्र नवऱ्याने बायकांची काम कसली करतोस म्हणून हे सारं उडवून लावलं. निखिलची शैक्षणिक प्रगती फार चांगली म्हणावी अशी नव्हती. त्याने अभियंता व्हावं असं प्रभाकरच ठाम मत, मात्र त्यातही तुला बीई पदवी घेणं जमणार नाही, तू पदविका अभ्यासक्रम निवड हा त्याचा आग्रह. आणि खरोखरच नवऱ्याने त्याला जबरदस्तीने पदविका अभ्यासक्रम घ्यायला लावला. पोराच्या मनाविरुद्ध थोपलेला तो अभ्यास तो मन लावून कसा करेल? माझ्या या प्रश्नाला त्याच्याजवळ उत्तर नव्हतं. उत्तर नसलं तरी हार मारायची नाही, ऐकून घ्यायचं नाही हा नवऱ्याचा स्वभाव. दरवेळी मुसंडी मारणं श्रेयस्कर नसतं, कधी कधी पिछाडीला येणे उपकार हे सैन्यात असूनसुद्धा नवऱ्याला कळत नव्हतं याचं वाईट वाटतं.”
“एकदा मन पूर्वग्रहदूषित झालं की, मग दुसऱ्याची प्रत्येक गोष्ट खटकू लागते. त्याचं नुसतं खाकरणं, खोकणंदेखील बोचू लागतं. निखिलला प्रभाकर हेच सांगायचा, ‘कसला आवाज काढतोस, एक तर नीट गुळण्या करून घे नाहीतर औषध घे खोकल्याचं आणि दुरुस्त करून घे घसा !’ पोरगा नाराज होऊन आतल्या खोलीत जाऊन दार लावून बसून राही’. रात्री माझ्याजवळ तक्रार करी. बाबांना माझं खोकणंसुद्धा खटकत, उद्या श्वास घेताना आवाज करू नको म्हणतील. मी जर प्रभाकर च्या बाजूने काही बोलले तर निखिल माझ्यापासून तुटून जाईल म्हणून मी गप्प बसू लागले. आता उलट्या बाजूने वडिलांची प्रत्येक सवय मुलाला खटकू लागली! छोट्या छोट्या गोष्टींनी बाप-लेकात दरी वाढत गेली आहे.”
‘नमिता, तुम्ही निखिलला वडिलांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही का? शिक्षणाच्या निमित्ताने कुठे पाठवण्याचा प्रयत्न? कारण अशावेळी मुलांना या नकारात्मक वातावरणातून बाहेर काढणं हे उपयुक्त ठरतं’.
“असा प्रयत्न केलाय डॉक्टर. निखिलला लंडनला जाऊन पदवी घ्यायची होती. मग नवऱ्याच्या मनाविरुद्ध त्याला मी इंग्लंडला प्रवेश मिळवून दिला. शिष्यवृत्ती मिळाली नाही. बराच खर्च झाला त्यावरून निखिल राहिला बाजूला आणि आम्हा नवरा-बायकोतच खटके पडू लागले. मी मात्र पोराची साथ द्यायचं ठरवलं. त्याला माझ्या पैशाने इंग्लंडला पाठवलं. तिथे तो दोन वर्षे राहिला, पण….. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं….
“माझं क्रेडिट कार्ड त्याला दिलं होतं. त्यावर दीड लाखाचं कर्ज झालं. ते पैसेही मीच भरले. त्याच्या हातून तेथे खर्च होत होता. मात्र अभ्यासाच्या बाबतीत हातात ठोस काही पडत नव्हतं. इकडेही गेले तीन महिने हीच परिस्थिती आहे. नवऱ्याचं पिणं वाढलंय. त्यालाही मुलाची चिंता वाटतेय, पण तो पूर्ण दोष मलाच देतो आहे. ‘पोराला अक्कल नाही, तुला तरी समजायला हवं, म्हणतो आहे. आधी फक्त मुलाची लायकी काढायचा, आता माझी काढतो आहे.”
नमिता यांना म्हटलं, ” तुमचा मुलगा सध्या ज्या मानसिकतेतून जातो आहे, त्याला मेडिकल भाषेत ‘हाय एक्सप्लोरेशन लो कमिटमेंट’ ची अवस्था म्हणतात. ‘लो कमिटमेंट’ याचा अर्थ निष्ठेची कमतरता असा नाही, पण ज्या दिशेवर पूर्ण भिस्त ठेवावी अशी दिशा त्याला अजून सापडलेले नाही एवढेचं. त्याचा ‘एक्सप्लोरेशन’ म्हणजे मुक्त शोध सुरू आहे.
तुमचा नवरा मिलिटरीवाला, वरिष्ठांची आज्ञा संपूर्णपणे समर्पण वृत्तीने अमलात आणणं हेच उत्तम सैनिकाचं लक्षण. त्यांना पोराचं हे शोध घेणं वगैरे पटणारं नाही हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. त्यात भर म्हणजे निखिलची, मुलाची पौगंडावस्था. ती तशीच बंडखोर असते. ही बंडखोरी दडपशाहीने नव्हे तर समजूतदारपणे निभावून न्यायला हवी, म्हणजे साधारण पंचविस-तिशीत आई-वडिलांचे म्हणणं पटू लागतं. त्याला जबाबदारीची जाणीव करून द्या, पण अपयशाची पाठ राखण करा. अपयशाचा आत्मविश्वासाशी संबंध नाही, ‘सपोर्ट सिस्टीम’शी आहे. माझं हरण कुणीतरी समजून घेणारं आहे. या कल्पनेनंही मुलांचा आत्मविश्वास कायम होतो. त्यांना होमिओपॅथिक औषधे दिल्यानंतर तुमच्या नवऱ्याला, मेजर साहेबांना भेटायला आवडेल असा निरोप दिला.
होमिओपॅथिक औषधांमुळे नमिता यांना एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला आणि एकाकी पडल्याची जी भावना होती त्यातून त्या लवकरच बाहेर पडल्या.
नमिता पुढील फेरतपासणीस येताना त्यांच्या नवऱ्याला बरोबर घेऊन आल्या. तो देखणा, सहा फूट उंच, प्रमाणबद्ध शरीर, बारीक कापलेले केस, साधे पण स्वच्छ इस्त्रीचे कपडे, पॉलिश केलेले बूट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करारी नजर. निखिलचा विषय निघाल्याबरोबर मात्र मेजर प्रभाकर तेवढ्यातच तन्मयतेने डॉक्टरांच म्हणणं ऐकू लागले. त्यांचा स्वभाव आग्रही असेल पण हेकट नव्हता.
मी परिस्थिती समजावून सांगितल्यावर ते म्हणाले, “मला समजतं तुमचं विश्लेषण. मुलगा आयुष्यात स्थिर व्हावा ही माझी इच्छा आहे. नमितानं त्याचे नको इतके लाड केलेत अशी माझी धारण आहे. ती म्हणते, होईल एक दिवस सगळं ठीक, येईल त्याला जबाबदारीचा भान. मला सांगा, असं नुसतं म्हणून तसे चालेल? Life is not give you another chance.”
“नमिताला ब्रेक हवाय. मला कल्पना आहे. किती दिवस झाले आम्ही कुठे सहलीला गेलो नाही.”
मी सल्ला दिला,” सहल दोघांना नाही तिघांना गरजेची आहे. एक कुटुंब म्हणून. मेजर, जीवनातल्या लौकिक यशापयशापलीकडे पती-पत्नी, आईबाप-मुलं यांचे छान नातं असायला हवं. या स्नेहबंधात साऱ्या समस्यांना तोंड देण्याची, उत्तर शोधण्याची क्षमता असते. ते स्नेहबंध पुन्हा निर्माण करण्याचे प्रयत्न करा. बाकी काळजी त्याची आई घेईलच. तिचा त्याचा बंध कायम आहे. तो नेईल तारून निखिलची अडखळती वाट.”
तिकडे निखिलच्या आयुष्यानं एक वेगळेच वळण घेतलं. लंडनला राहणाऱ्या एका मुलीशी त्याची ओळख झाली, प्रेम जुळलं. त्याची निरनिराळे खाद्यपदार्थ करण्यातली रुची, जाण आणि कौशल्य पाहून ती प्रभावित झाली. दोघांनी भारतात परत येण्याचे ठरवलं. निखिल निरनिराळ्या रेसिपी तयार करायच्या आणि तिनं मार्केटिंगची जबाबदारी घ्यायची. या गोष्टीला नमिताने पूर्ण पाठिंबा दिला. निखिलच्या ही बोलण्यात उत्साह जाणवू लागला. त्याचा आत्मविश्वास परतला. त्याच्या आवडीची दिशा आणि सहचारिणी, दोन्ही त्याला गवसली. नमिताच्या नवऱ्याला हे सारं एकदम पटलं नाही, पण आता पोराच्या निवडीच्या आड यायचं नाही हे त्यानं मान्य केल.
युद्धाचे अंतिम ध्येय शांती असेल आणि संघर्ष आपल्याच लोकांशी असेल तर हरणे म्हणजे जिंकणं या विचाराचा विजय झाला. होमिओपॅथिक उपचारामुळे नात्यात शांती निर्माण झाली. संसार शांतीचा झरा हा बोध त्यांनी हृदयी धरला.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —–
For parents, there is no sorrow greater in life than seeing the next generation fail. Retirement should ideally be a time of joy, watching one’s children flourish and succeed. Yet for some, even after retiring from their jobs, there is no retirement from worldly struggles. Who is at fault in such situations? The children who fail to stand on their own feet, or the older generation who failed to prepare them well?
At such times, instead of blaming each other, parents must unite to lift their children out of the pit of failure. Homeopathy can be of immense help in such cases. But what happens if there is no unity between the parents themselves?
This was precisely the concern that brought Namita to Chaitanya Homeopathic Clinic. In her fifties, Namita herself was a pediatrician. Yet she was unable to figure out how to resolve the silent war between her husband Prabhakar and their only son, Nikhil, or how to bring peace and harmony into her family. Slightly stout, of short stature, and fair-skinned, her face carried a thin layer of constant worry.
“Doctor, I cannot understand whether the real problem lies with my son or with my husband. All I know is that Nikhil, who has now crossed thirty, should have been settled in life by now. My husband doesn’t seem to be seriously concerned about this. Or maybe he is, but all he does is scold our son—nothing more. Our marriage was a love marriage. At the time, Prabhakar was studying engineering, but then suddenly decided to join the army through Short Service Commission. His family background was modest, and he felt that after five years in the military, he could shift to private business using the benefits of army service. But once he grew accustomed to the disciplined lifestyle of the army, he chose to stay permanently. His nature suited that disciplined life. But the same traits that worked for him became destructive for our son.”
Namita continued with her analysis:
“I completed my diploma in pediatrics from a government medical college. For a few years, we stayed together, but with Prabhakar’s frequent postings to far-off places, I eventually began my medical practice in Pune. Nikhil was our only child, and his education also had to be taken care of. My in-laws lived nearby and helped us. Later, when Nikhil was finishing school, Prabhakar was posted to Pune again, and our family came together—but emotionally, the distances had already begun to grow.”
Conflicts between father and son soon became frequent. “Nikhil, like his father, is introverted, somewhat lazy, and strong-willed. But unlike his father, he is sensitive and artistic. Prabhakar, on the other hand, is strict and disciplined. He scolds Nikhil for everything. Discipline can be taught with love too—but my husband never understood that maintaining love is as important as enforcing rules.”
“Nikhil was very interested in cooking. He wanted to pursue hotel management or the hospitality industry. But Prabhakar dismissed it outright—‘Why do you want to get into women’s work?’ he said. Nikhil was never an outstanding student, but he had his talents. Still, my husband was adamant that he must become an engineer. Not even a full engineering degree—he forced him into a diploma course instead, saying Nikhil wasn’t capable enough. How could a child excel in something forced upon him against his will? Whenever I questioned this, my husband had no answer. His attitude was simple: no matter what, never back down. But sometimes, one must step back for the greater good. Being in the military, he never understood this. That has harmed our son deeply.”
Namita described how things worsened:
“Once prejudice enters the mind, even trivial things become intolerable. Nikhil’s father would even complain about his coughing or clearing his throat. ‘Either gargle properly or take medicine and fix it,’ he would shout. Nikhil, hurt, would lock himself in his room. At night he would tell me, ‘Even my coughing irritates dad. Tomorrow he will tell me not to breathe loudly.’ If I took Prabhakar’s side, my son would drift away from me, so I stayed silent. This silence made the gap between father and son wider.”
When asked whether she had tried to separate her son from this toxic atmosphere, Namita replied:
“Yes, I tried. Nikhil wanted to go to London for further studies. I helped him get admission against my husband’s wishes. He did not get a scholarship, so I financed him myself. For two years, he lived there, but….” Tears welled in her eyes. “I had given him my credit card. He ran up a debt of 1.5 lakh rupees. I had to pay it off. He spent, but in terms of studies, nothing concrete came out. Even now, three months after returning, the situation is unchanged. My husband’s drinking has increased. He is worried too, but he blames me entirely. ‘The boy may be brainless, but you should at least have some sense!’ he says. Earlier he used to insult only our son; now he insults me too.”
I explained to her:
“Your son is currently in what psychologists call a phase of ‘high exploration but low commitment.’ Low commitment does not mean a lack of loyalty—it simply means he hasn’t yet found a direction to which he can dedicate himself fully. Exploration is necessary at this age. But your husband, as a disciplined army man, cannot relate to this. To him, obedience and dedication are supreme virtues. Nikhil’s experimentation and uncertainty feel intolerable to him. Add to this the natural rebellion of youth, and clashes are inevitable. The key is not to suppress this rebellion but to handle it with patience. By the mid-twenties or thirties, children usually begin to understand their parents’ perspective. Meanwhile, he needs support—reassurance that even if he fails, someone will stand by him. This belief alone builds confidence.”
After receiving homeopathic treatment, Namita herself began feeling more confident and less isolated. Later, she returned for a follow-up appointment with her husband, Major Prabhakar. Tall, well-built, neatly dressed, and sharp-eyed—his disciplined military bearing was unmistakable. He listened carefully when the subject of his son came up. His nature was firm, but not stubborn.
“I understand your analysis,” he said. “I want my son to settle in life. But I believe Namita has spoiled him too much. She says he will eventually understand responsibility. But tell me, doctor—will it just happen on its own? Life does not give you another chance.”
He admitted, however, that Namita needed a break. “It’s true, we haven’t gone on a holiday in years,” he added.
I suggested:
“Not just you two—the three of you must go together, as a family. Beyond worldly success or failure, there must be love and harmony between husband and wife, and between parents and children. These bonds of affection give families the strength to face any challenge. Rebuild those bonds, and everything else will fall into place. Nikhil still shares a deep bond with his mother. With her support, he will find his way.”
Meanwhile, Nikhil’s life took a turn. In London, he had met a young woman, and their friendship blossomed into love. She admired his culinary talent and creativity. The two decided to return to India together—Nikhil would focus on creating new recipes, and she would handle the marketing. With his mother’s encouragement, Nikhil found new enthusiasm. His confidence returned—he had discovered both his passion and a life partner. Prabhakar was not fully convinced at first, but this time he chose not to oppose his son’s choices.
In the end, the thought prevailed: If the ultimate goal of war is peace, then when the battle is within one’s own family, sometimes losing is the true victory.
Through Homeopathic treatment, peace was restored in their relationships. The lesson they carried in their hearts was simple yet profound:
“Family is a fountain of peace… and homeopathy can help preserve it.”
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.
Your Trust – Our Responsibility to Restore Health Naturally!
Please Read Next Article-
Dr. Ajay Hanmane
Dr. Mrs. Seema Hanmane
Monday to Saturday
Morning: 9AM – 3PM | Evening: 5PM – 9PM
Sunday Closed