गर्भाशयाचे आजार आणि होमिओपॅथी / Diseases of the Uterus and Homeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneSeptember 10, 2026 Cancer Female Problems General Information Geriatric Problems Homeopathic and Cure Mental Health Psychosomatic Problems Sexual Problems

गर्भाशयाचे आजार आणि होमिओपॅथी

ही गोष्ट आहे चंदाची. चंदा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा एका खेड्यात राहणारी. आई-वडील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करायचे. दारिद्र्य त्यांच्या पाचवीलाच पुजलेलं. चंदा पाच भावंडांपैकी सर्वात थोरली. खाणारं एक तोंड कमी होईल म्हणून चंदाचे पंधराव्या वर्षीच लग्न लावून दिलं. सासर बीडचं आणि तिथेही तशीच गरिबी. लग्नानंतर दोन वर्षातच चंदाला पहिला मूल झालं आणि 23 वर्षाची होईपर्यंत चंदा तीन मुलांची आई झाली.

चंदा व तीचा नवरा ऊस तोडणी कामगार म्हणून शेतात कामाला जायचे. दिवसाला 12- 14 तास काम करायला लागायचं. अशातच चंद्राला पोट दुखीचा त्रास सुरू झाला. अंगावरून पांढर जायला लागलं. अशक्तपणा आला. पाळीच्या वेळी तर पोटदुखीचा खूपच त्रास व्हायचा. शेतात कामाला गेले की ना स्वच्छतागृहाची सोय ना पाण्याची. मग अशा वेळी स्वच्छता कशी पाळणार? त्यामुळे कामावरून सुट्टी घ्यायला लागायची. पैसे कापले जायचे. औषध पाण्याला सुद्धा पैसे नसायचे. मुलाबाळांच्या खाण्यापिण्याच्या हाल व्हायचे. अशातच तिच्या मैत्रिणीने तिला गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला. गर्भाशय पिशवी काढली की, मासिक पाळी आणि पाळीचे त्रास दोन्ही बंद होईल. मग कामावर खाडा नाही आणि औषधावरही खर्च नाही. चंदाला हा उपाय पटला. ती डॉक्टरने भेटली.अंगावरून पांढरे जात असल्याने डॉक्टरांनी गर्भाशयाची पिशवी काढून टाकली. वयाच्या 25 व्या वर्षी चंद्राची गर्भाशय पिशवी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झाली.

आता चंदा कशी आहे? चंदाचा मासिक पाळीचा त्रास थांबलाय, पण लहान वयात गर्भाशय काढल्याने इथं त्रास सुरू झाले आहेत. कंबर- पाठदुखी, अशकपणा यामुळे ते बेजार झाली आहे. कामावरच्या सुट्ट्या वाढल्या आहेत.औषध पाण्याचा खर्चही वाढलाय. शिवाय शस्त्रक्रियेच्या वेळी घेतलेल्या पैशाचे कर्ज डोक्यावर झालेय. ही गोष्ट एकटा चंदाची नाही आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार स्त्रियांमध्ये लहान वयात Hysterectomy अर्थात गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. याची कारणे अनेक आहेत. दारिद्र्य, लहान वयात मुलं, स्वच्छतेचा अभाव, पाण्याचे दुर्भिक्ष, यामुळे या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा जंतुसंसर्ग व गर्भाशयाचे इतर आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. ‘मुलं झाली आहेत आता गर्भाशय काय कामाचं? तो एक तर निरुपयोगी अवयव आहे.’ यासारख्या चुकीच्या समजुतीमुळे गर्भाशयाचे त्रास झाल्यास औषध घेण्याऐवजी गर्भाशय थेट काढून टाकण्याचे निर्णय घेतला जातो. शस्त्रक्रिया केली नाही तर कर्करोग होईल अशी अवास्तव व चुकीची भीती सुद्धा यासाठी कारणीभूत असते. शस्त्रक्रिया नंतर होणाऱ्या त्रासाविषयी या स्त्रियांना काहीच माहिती नसते.

लहान वयात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचे अनेक तोटे असतात. मोठ्या शस्त्रक्रिया नंतर अशक्तपणा येतो. कंबरदुखी वाढते. सांधे दुखतात. गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. एकूण शारीरिक क्षमता कमी होते. संप्रेरकांच्या कमतरतेमुळे लवकर वार्धक्य येते. हाडं ठिसूळ होतात. लघवीच्या आजारांची शक्यता वाढते. यामुळे लहान वयात ‘हिस्ट्रेक्टॉमी’ ची शस्त्रक्रिया टाळणं योग्य. गर्भाशयाच्या अनेक प्रकारच्या आजारांसाठी ‘हिस्ट्रेक्टॉमी’ ची शस्त्रक्रिया केली जाते.

मध्यम वयातील स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या स्त्री- आरोग्य समस्या व गर्भाशयाच्या आजारांविषयी थोडं समजून घेऊया व या त्यासाठी उपलब्ध असलेल्या उपचार पद्धतींची माहिती करून घेऊया.

गर्भाशयातून होणारा अनैसर्गिक रक्तस्त्राव,(Abnormal Uterine Bleeding) ही चाळीशीच्या सुमारास अनेक स्त्रियांना भेडसावणारी समस्या आहे. काही जणींमध्ये मासिक पाळीतील रक्त स्तरावरचे प्रमाण खूप वाढतं तर, काही वेळेस खूप जास्त दिवस रक्तस्त्राव होतो. काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित होते तर काही जणींना अधून मधून रक्तस्त्राव होत राहतो. संप्रेरकांमध्ये असंतुलन हे याचं सर्वात महत्त्वाचं कारण. चाळीशीच्या सुमारास बीज निर्मिती अनियमित झाल्याने संप्रेरकांमध्ये असंतुलन निर्माण होते. यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होतात. मासिक पाळीच्या समस्या होत असल्यास होमिओपॅथिक औषध सुरू करायला हवे तिचे संप्रेरकांमधील संतुलन नियमित करून पाळीच्या समस्या पूर्णपणे नाहीशा करते.

निदान करण्यासाठी सोनोग्राफी ने गर्भाशय व बिजांडोकोशाची तपासणी केली जाते. संप्रेरकांची रक्तामधील पातळी बघितली जाते. काही स्त्रियांमध्ये गरज भासल्यास गर्भाशयाच्या आतील आवरणाची ‘बायोप्सी’ (इंडोमेट्रिअल बायोप्सी) करून कर्करोगपूर्व पेशी तपासल्या जातात व गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता पडताळली जाते.

मासिक पाळीचा त्रास बहुतेकदा होमिओपॅथिक औषध उपचाराने नियंत्रणाखाली आणता येतो.

संप्रेरकांमधील असंतुलन किंवा कर्करोग पूर्व पेशी आढळल्यास संप्रेरकयुक्त औषध दिली जातात. यासाठी ‘एलएनजी-आययुएस’ (LNG-IUS) ही आधुनिक औषधोपचारप्रणाली खूप उपयोगी पडते. या साधनात प्रोजेस्टेरॉन संप्रेरक असतं. हे साधन गर्भाशयात बसवल्यावर त्यातून दररोज अत्यल्प प्रमाणात प्रोजेस्टेरॉन गर्भाशयात वितरित केले जातं. या साधनाद्वारे रक्तस्त्राव नियंत्रणात आणता येतो व गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी करता येतो.

जास्त रक्तस्त्राव होत असल्यास ‘ इंडोमेट्रीयल ॲब्लेशन’ (गर्भाशयाच्या आतील थराला इंडोमेट्रीयम) काढून टाकण्याची प्रक्रिया करता येते. गर्भाशयातून होणाऱ्या अनैसर्गिक रक्तस्त्रासाठी अगदी क्वचितच गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रिया हा या समस्येसाठी असलेल्या शेवटचा उपाय असायला हवा.

तत्पूर्वी मासिक पाळीच्या बहुतेक त्रासांमध्ये होमिओपॅथिक औषध उपचाराने दुखणे, रक्तस्त्राव व मासिक पाळीच्या तक्रारी पूर्णपणे आटोक्यात आणता येतात.

या काळात स्त्रियांमध्ये आढळणारे सर्वसामान्य समस्या म्हणजे ‘फायब्रॉईड.’

फायब्रॉईड’ म्हणजे गर्भाशयाच्या स्नायूंची गाठ. साधारणतः 30% स्त्रियांमध्ये गर्भाशयात गाठी आढळतात आणि त्या गाठींची कोणती लक्षणे जाणवत नाहीत. या गाठीचं निदान सोनोग्राफीने करता येतं. काही स्त्रियांमध्ये ‘फायब्रॉईड’ च्या गाठी मुळे पाळीच्या वेळेस जास्त रक्तस्त्राव होतो किंवा पोटात जास्त दुखतं.

गाठी खूप मोठ्या असल्यास आजूबाजूच्या अवयवांवर ताण पडतो. गर्भाशयाच्या गाठी छोट्या असल्यास व त्याचा काहीच त्रास होत नसल्यास औषध उपचाराची गरज नसते. जास्त रक्तस्त्राव होत असल्यास अथवा पोटात दुखत असल्यास होमिओपॅथिक औषधांनी त्रास पूर्णतः कमी करता येतो.

‘फायब्रॉईड’ चा आकार कमी करण्यासाठी आधुनिक औषध उपचार पद्धतीत संप्रेरकयुक्त औषध उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा उपयोग तात्पुरता होतो. औषधचा उपयोग न झाल्यास अथवा गाठी असल्यास आधुनिक चिकित्सापद्धतीत शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय करण्यात येतो. शस्त्रक्रियेमार्फत ‘फायबरॉइड’ च्या गाठी काढता येतात अथवा गर्भाशय पूर्णपणे काढून टाकलं जातं. या गाठींमध्ये कर्करोग होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने गाठ आहे म्हणून शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. होमिओपॅथी मध्ये या ‘फायब्रॉईड’च्या गाठी साठी अत्यंत गुणकारी औषध उपलब्ध आहेत, ज्यामुळे गाठींचा आकार कमी होत जातो व रक्तस्त्राव देखील कमी होऊन पाळीची तक्रार नाहीशी होते.

गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये कधी कधी गर्भाशयाच्या आतील आवरणातील पेशी असतात. (Adenomyosis) ऑडिनोमायोसिस. पाळी दरम्यान त्यात रक्तस्त्राव होतो. त्यामुळे गर्भाशयाचा आकार मोठा होतो. पाळीच्या वेळी पोटात खूप दुखतं व जास्त रक्तस्त्राव होतो. संप्रेरकयुक्त औषधाने त्रास कमी करता येतो. बीजांडकोशाच्या गाठीचे निदान सोनोग्राफीने करता येतं. बीजंडकोशात गाठ आढळल्यास तपासणी करून कर्करोगाची शक्यता नाही हे निश्चित करायला हवं. बीजांडकोशाच्या गाठी बहुतेकदा संप्रेरकांमधील बदलांमुळे होतात व त्या आपोआप जातात. काही वेळेस संप्रेरकयुक्त औषधं द्यावी लागतात. इ इंडोमेट्रीओसिसच्या आजारात बिजांड कोशात रक्ताच्या गाठी निर्माण होतात. त्यामुळे पाळी दरम्यान व पाळी नंतर पोटात खूप दुखत. ‘एन्ड्रोमेट्रीओसिस’ नियंत्रणात आणण्यासाठी आधुनिक औषध उपचार पद्धतीत संप्रेरक घ्यावी लागतात तर काही वेळेला शस्त्रक्रिया करावी लागते.

 पण होमिओपॅथीमध्ये अनेक गुणकारी औषध असून जे संप्रेरकांमधील बदल आटोक्यात आणतात व बिजांडकोशातील गाठी विरघळण्यास मदत करतात.

विक्रम गोखले दिग्दर्शित ‘आघात’ चित्रपटाची कथा आठवतेय. यात संगीता ही बावीस वर्षाची तरुणी बीजांडकोशाच्या शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात दाखल होते. तिच्या बीजांडकोशावर मोठी गाठ आली आहे व तो कर्करोग असण्याची शक्यता आहे. डॉक्टर खुराना शस्त्रक्रिया करून बिजांडकोश व गाठ काढून तपासतात. त्यात कर्करोग असल्याचं निष्पन्न झाल्यावर दुसरा बीजांडकोश देखील काढून टाकणार असतात. तेथील डॉक्टर स्मिता दुसरेबीजांडकोश तपासणीशिवाय काढायला विरोध करतात. दुसऱ्या बीजांडकोशात कर्करोग नसल्याचे नंतर सिद्ध होतं. डॉक्टर खुराणांचं म्हणणं आहे की,दुसऱ्या बीजांडकोशात कर्करोग होण्याची शक्यता असल्याने एकाच शस्त्रक्रियेत दोन्ही बीजांडकोशात काढून टाकले म्हणजे रुग्णाला परत शस्त्रक्रियाला सामोरे जायला नको. परंतु डॉक्टर स्मिताच्या मतानुसार संगीताचं वय लक्षात घेता बीजांडकोशसारखा महत्त्वाचा अवयव तपासणीशिवाय काढायला नको. दोन्ही बीजांडकोश काढून टाकल्यास संप्रेरक निर्मिती बंद होईल व अकाली वार्धक्य टाळण्यासाठी कायमस्वरूपी संप्रेरकयुक्त औषध घ्यावी लागतील. तसेच बीजांडकोश काढल्याने स्वतःच मूल होण्याची शक्यता ही मावळते. मग डॉक्टर खुराणांचा निर्णय योग्य की डॉक्टर स्मिताच म्हणणं योग्य?

लहान वयाच्या मुली व तरुणींच्या बीजांडकोशात गाठी झाल्यास स्त्री आरोग्यतज्ञ बीजांडकोश वाचवण्याचा प्रयत्न करतात. कर्करोगाचं निदान झाल्यास शस्त्रक्रियापूर्वी किंवा ‘ केमोथेरपी’ व ‘रेडिएशन’ च्या आधी स्त्री बीजे संकलित करून ठेवण्याचा विचार करता येतो. बुरशीजन्य संसर्ग किंवा जिवाणू संसर्गामुळे योनी मार्गातून स्त्राव जाणं ही स्त्रियांमधील सर्वसामान्य समस्या. हा स्त्राव हिरवट पिवळा किंवा घट्ट पांढरा असतो. त्याचबरोबर खाज सुटणे, घाण वास येणे यासारखे त्रास होतात.

अशी लक्षणे दिसल्यास लगेच होमिओपॅथिक औषध उपचार करायला हवेत, यासाठी शस्त्रक्रियेची गरज नसते. जंतू संसर्ग बळवल्यास तो गर्भाशय इतर अवयवांना पोचू शकतो. अशा वेळेस पोटात दुखणं, ताप येणं, यांसारखी लक्षणे जाणवतात. होमिओपॅथिक औषधांनी या तक्रारीवर त्वरित आराम मिळतो.
मध्यमवयीन गटातील स्त्रिया दैनंदिन आयुष्य, मुलं, कुटुंबीय, नोकरी यामध्ये पूर्णपणे व्यग्र असतात. कुटुंबातील सदस्यांच्या सुखासाठी झटणाऱ्या या स्त्रिया स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतात. प्रकृतीचा त्रास झाला तरी तो अंगावर काढतात. सहसा डॉक्टरांकडे जात नाहीत. स्वतःच्या आरोग्य समस्यांसाठी वेळ व पैसा खर्च करणं त्यांना अयोग्य वाटतं. हे चित्र बदलण्याची गरज आहे. स्त्रीचे स्वतःच आरोग्य उत्तम राहिलं तर कुटुंबाचा भरभक्कम आधार बनू शकते. वैद्यकीय तपासणी करणे व आरोग्य संपन्न राहण्यासाठी होमिओपॅथिक औषधोपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.

 

डॉ अजय व. हनमाने
एम. डी. (होमिओ) ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद  
आपला विश्वास – नैसर्गिक आरोग्य पुनर्स्थापनेची आमची जबाबदारी!

कृपया पुढील लेख वाचा  —

———————————————————————————

Diseases of the Uterus and Homeopathy

 

This is the story of Chanda, a woman from a small village on the Maharashtra–Karnataka border. Her parents were daily wage laborers, struggling to make ends meet. Poverty was their constant companion. Chanda, the eldest among five siblings, was married off at the age of fifteen — one less mouth to feed, her parents thought.

Her husband’s family lived in Beed, and their condition was no better. Within two years of marriage, Chanda gave birth to her first child, and by the time she was twenty-three, she was a mother of three. Both she and her husband worked as sugarcane cutters, toiling in the fields for 12–14 hours a day.

Over time, Chanda began experiencing abdominal pain and white vaginal discharge. Weakness crept in, and menstruation brought unbearable cramps. The working conditions in the fields were harsh — no toilets, no access to clean water — making it impossible to maintain proper hygiene. She often had to miss work, losing wages she could barely afford to lose. There was no money for medicine either, and her children often went hungry.

One day, a friend suggested a “permanent solution”: removal of the uterus. “Once it’s gone, you’ll be free from periods and pain. No more absences from work, no more medicines,” she said. Desperate for relief, Chanda agreed. The doctor, noticing her chronic discharge, also recommended the surgery. At just 25 years old, Chanda underwent a hysterectomy — surgical removal of her uterus.

Today, Chanda no longer suffers from menstrual pain — but her troubles are far from over. Since the surgery, she has developed back pain, fatigue, and general weakness. Her work attendance has decreased, medical expenses have increased, and she still struggles to repay the money borrowed for the operation.

Sadly, Chanda’s story is not unique.

According to the National Family Health Survey (NFHS), the rate of hysterectomy among young Indian women is alarmingly high. The causes are deeply rooted — poverty, early childbearing, lack of hygiene, and water scarcity. These factors increase the risk of uterine infections and related disorders.

Adding to this are harmful misconceptions such as:

“Once a woman has children, what’s the use of the uterus? It’s a useless organ.”

Many women, influenced by such beliefs or by fear of cancer, choose surgery over medical treatment without understanding the long-term consequences.

  • Removing the uterus at a young age has several serious drawbacks:
  • Persistent weakness after major surgery
  • Increased back and joint pain
  • Early onset of menopause due to hormonal imbalance
  • Brittle bones and osteoporosis
  • Urinary problems
  • Accelerated aging
  • Hence, hysterectomy should be a last resort, not a routine procedure.

Common Uterine Problems and Alternatives

One of the most common problems in women around their forties is Abnormal Uterine Bleeding (AUB) — irregular, heavy, or prolonged menstrual bleeding. The main cause is hormonal imbalance, often due to irregular ovulation during the perimenopausal years.

Diagnosis typically involves ultrasound (sonography) to assess the uterus and ovaries, and blood tests to measure hormone levels. If necessary, an endometrial biopsy (sampling the uterine lining) may be done to rule out precancerous changes.

In most cases, Homeopathic treatment can effectively regulate hormonal imbalance, relieve pain, and control bleeding — without surgery or hormonal side effects.

Modern Non-surgical Options

For women requiring additional medical intervention, modern treatments like the LNG-IUS (Levonorgestrel Intrauterine System) — a hormone-releasing intrauterine device — can reduce heavy bleeding and lower cancer risk.

In some cases, Endometrial Ablation (removal of the uterine lining) is done.

Only rarely does AUB necessitate hysterectomy — it should be the last option after conservative therapies are tried.

Fibroids and Other Conditions

Another frequent uterine condition is fibroids — benign growths in the uterine muscle wall. Around 30% of women may have fibroids, often without symptoms. When symptomatic, they may cause heavy bleeding, pain, or pressure on nearby organs.

Small, asymptomatic fibroids usually require no treatment, while painful or heavy bleeding cases can respond very well to Homeopathic remedies, which help shrink the fibroids naturally and regulate menstruation.

While modern medicine offers temporary hormonal therapy or surgery to remove fibroids (or even the uterus), these measures are not always necessary — especially since fibroids are rarely cancerous.

Adenomyosis and Ovarian Cysts

Sometimes, uterine tissue grows into the muscular wall — a condition called Adenomyosis, leading to an enlarged uterus, severe cramps, and heavy bleeding.

Similarly, ovarian cysts — fluid-filled sacs on the ovaries — are usually benign and caused by hormonal fluctuations. They often resolve on their own, but Homeopathy can help regulate hormones and dissolve cysts naturally.

In Endometriosis, blood-filled cysts form in the ovaries or pelvic cavity, causing chronic pain. Conventional medicine uses hormones or surgery, but homeopathy offers a safe, non-surgical way to restore balance and relieve symptoms.

Lessons from “Aghaat” — A Thought-provoking Case

In the film Aghaat, directed by Vikram Gokhale, a 22-year-old woman named Sangeeta undergoes surgery for an ovarian tumor suspected to be cancerous.

During the operation, one ovary is removed, and the surgeon decides to remove the second one “as a precaution.” However, another doctor opposes this, arguing that removal without proper testing is unethical — especially for a young woman.

The moral question arises:

Should organs vital for fertility and hormonal health be removed without absolute necessity?

Premature removal of ovaries stops hormone production, causing early menopause, requiring lifelong hormone therapy, and eliminating the chance of natural motherhood. A Call to Awareness

Fungal and bacterial vaginal infections causing discharge, itching, and foul odor are common and easily treatable with Homoeopathy — no surgery required. If untreated, infection can spread to the uterus or pelvis, leading to fever and pain. Early treatment ensures quick recovery.
Many middle-aged women, busy with work, family, and responsibilities, neglect their health. They bear discomfort silently and avoid medical check-ups, believing that spending time or money on their own health is selfish.
But this mindset must change.
A healthy woman is the foundation of a healthy family. Regular medical check-ups and timely Homeopathic care can ensure lasting wellness — naturally, safely, and holistically.

 

Dr Ajay V. Hanmane
M.D.(Hom) ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.
Your Trust – Our Responsibility to Restore Health Naturally!

Please Read Next Article-