ताण-तणावनिर्मित उदासीनता व होमिओपॅथी / Stress-Induced Depression and Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneMarch 12, 2025 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry Sleep Disorders

 ताण-तणावनिर्मित उदासीनता व होमिओपॅथी

उल्हासरावांनी मोठ्या उत्साहाने नवीन दुकान उघड उघडले होते. जुन्या दुकानावर आता मुलगा लक्ष देत होता. परंतु नवीन धंद्यात पहिल्याच वर्षात तोटा झाला. त्यामुळे कामावरचे लक्ष उडाले. सतत चिंताग्रस्त राहणे, चिडचिड करणे, घरातील संभाषण कमी झाले होते. झोप उडाली होती.
चिमनराव एका वर्षापूर्वी नोकरीतून रिटायर झाले होते. पहिले सहा महिने व्यवस्थित गेले. परंतु रिकामेपण छळायला लागले. घरातील सर्वजण आपापल्या कामात गुंतलेले. त्यामुळे एकटेपणा जाणवायला लागलं. पूर्वी नोकरीत असताना मान, प्रतिष्ठा होती. आता एकटेपणा चिमणरावांना बोचायला लागला होता. त्यांना सतत असे वाटायला लागले की, आपण कोणाच्या कामाचे नाही, कोणाला आपली गरज नाही, त्यामुळे चिडचिड वाढली होती, उत्साह कमी झाला, जेवणावरचे लक्ष उडाले, व्यायामतला रस उरला नाही, अशी भावना त्यांच्या मनात घर करायला लागली.
शशिकला बाईंचा नवरा चार वर्षांपूर्वी हार्टअटॅकने मरण पावला होता. एक मुलगा इंजिनीयर होऊन परदेशात स्थायिक झाला होता. मुलीचेही लग्न ठरले. पती नंतर नेटाने घर सांभाळले व मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मुलीचे लग्न ठरल्यावर खूप आनंद झाला होता. परंतु तिच्या लग्नानंतर ‘आपण एकट्या पडणार ‘ हा विचार त्यांना सतत सतावायला लागला होता. त्यामुळे त्यांची तहान-भूक कमी झाली. उत्साह कमी झाला. जुन्या आठवणी काढून त्या सतत रडायच्या. सतत बेचैनी, चिडचिड, कामात लक्ष नाही, सगळी अवस्थाच बिघडून गेली होती.
अशा अनेक समस्या रोजच्या जीवनात आपल्याला आढळून येतात. त्यातून आलेली निराशा सांभाळता न आल्यामुळे उदासीनतेच्या आजाराला बळी पडल्यांची संख्या प्रचंड असते.
कोणाला परीक्षेत अपयश किंवा कोणाचे आर्थिक नुकसान, कोणाच्या कामाच्या ठिकाणी निर्माण झालेली समस्या, कुटुंबातील परस्परांमधील तणाव, कोणा जवळच्या संबंधित किंवा  नातेवाईकांचा मृत्यू, व्यवसायातील अपयश, प्रेमभंग, जोडीदाराचा व्याभीचार, अशा रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना व त्यातून निर्माण होणारे (डिप्रेशन) उदासीनता ! 
उदासीनता कोणत्याही कारणाने आली असली तरी, लक्षणे मात्र जवळपास सारखीच असतात.
  • सतत उदास, 
  • निराश वाटणे, 
  • उत्साह कमी होणे, 
  • थकवा जाणवणे, 
  • पूर्वी ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटायचा त्यात रस न वाटणे,

मन इतरत्र गुंतविण्याचा प्रयत्न केला तरी सतत सततची उदासीनता कमी न होणे. 

 

कुणाच्याही आयुष्यात तणाव निर्माण झाले तर तो निराश होणे ही सहज भावना आहे. परंतु इतक्या निराशेवर मात करून प्रस्तुत समस्येतून मार्ग शोधणे अपेक्षित असते. परंतु जर एखादी व्यक्ती या समस्येमुळे अपेक्षित कालावधीपेक्षा जास्त काळ त्यातच गुरफटून राहिली व समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याऐवजी समस्या वाढत गेल्यास ती निराशा मग आजाराचे स्वरूप धारण करायला लागते. 
या प्रमुख लक्षणं सोबतच जाणवणारी इतर लक्षणे म्हणजे
  • कामातील उत्साह कमी होणे,
  • एकाग्रता कमी होणे. एकाग्रता कमी झाल्याचा परिणाम म्हणून अनेक गोष्टी विसरायला लागणे.
  • झोप कमी होणे.
  • भूक मंदावणे.
  • जास्त काळापासून (डिप्रेशन)उदासीनता राहीली की वजन कमी झाल्याची तक्रार जाणवते.

सतत नकारात्मक विचार राहिल्यामुळे साधे साधे पर्यायही समोर दिसत नाहीत.

त्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर मात करणे अवघड होऊन जाते. अनेकदा कळते पण वळत नाही, अशी स्थिती निर्माण झालेली असते. विनाकारण निर्माण झालेली अपराधीपणाची भावना, स्वतःबद्दल व भविष्याबद्दल नकारात्मक दृष्टिकोन, यामुळे जगण्यातील आनंद क्षमतो व जीवन संपविण्याची विचार यायला लागतात. 
बहुतांश वेळी निर्माण झालेली समस्या ही त्यातून मार्ग काढण्यासारखी ही असते. परंतु आजारी मन:स्थितीमुळे ते शक्य होत नाही. अशा रुग्णांच्यावर व्यवस्थित उपचार करणे गरजेचे असते. एकदा ही मनाची अवस्था ठीक झाली की व्यक्ती स्वतःच्या अवस्थेतून मार्ग काढण्यास सक्षम बनते. परंतु या रुग्णाला असे वाटत असते की, ” कुठल्यातरी कारणाने उदासीनता निर्माण झाली असल्यामुळे त्यांच्याकडे आजार म्हणून पाहण्याची रुग्णाची तयारी व इतरांची ही तयारी नसते, याला डॉक्टर काय करणार ? ही सर्वसाधारण धारणा असते.औषधांनी ही समस्या थोडीच सुटणार आहे ? हा त्यांचा पुढील प्रश्न असतो.”
 लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या उदाहरणावरून असे लक्षात येते की, त्या सर्वांच्या आयुष्यात तणाव काहीतरी समस्या निर्माण समस्या निर्माण करून गेला होता. त्यामुळे त्यांना उदासीनतेचा आजार झाला होता. या प्रकाराला रिॲक्टिव्ह डिप्रेशन (Reactive Depression)  म्हणतात म्हणजे ताण-तणावांचा प्रतिसाद म्हणून निर्माण झालेली उदासीनता असे म्हणतात.
यामध्येही मेंदूतील रसायनांमध्ये बदल झालेले असतात, हे संशोधनांति मान्य झालेले आहे. 
या उदासीनतेच्या आजारात होमिओपॅथिक औषधांबरोबरच, रुग्णाला समुपदेशनाची ही कौन्सिलिंगची (Counseling) गरज असते. अशा रुग्णांमध्ये होमिओपॅथिक औषधे हा चांगला पर्याय ठरतो.
अशा रुग्णांना होमिओपॅथिक  औषधाने ताण-तणावांना सामोरे जाणे, नकारात्मक  वृत्तीत  बदल होणे व उदासीनता कमी होण्यास मदत होणे हा उपयोग होऊ शकतो.
 एकदा त्यांची उदासीनता कमी झाली की, ते स्वतःच इतर समस्यातून मार्ग शोधून काढतात. त्यावेळेस त्यांना समुपदेशनाची गरज ही पडत नाही.
कधी कधी या रिॲक्टिव्ह डिप्रेशनमध्ये (Reactive Depression) औषधाबरोबर समुपदेशनाचा वापर केल्यास त्यांचा लवकर व चांगला फायदा रुग्णाला होतो. कोणतीही समस्या अशी नसते की, ती सोडवता येत नाही. समस्या जरी आपण बदलू शकलो नाही तरी, त्याला सामोरे जाण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. होमिओपॅथिक औषधांनी संपूर्णपणे शक्य होते. त्यामुळे रुग्णाला पूर्वीप्रमाणेच आनंददायी जीवन पुन्हा अनुभवता येते.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123, 940450723
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

—————————————————

Stress-Induced Depression and Homoeopathy

Ulhasrao had opened the new shop with great enthusiasm. The boy was paying attention to the old shop now. But the new business made losses in the first year. So he lost focus on work. Constant anxiety, irritability, conversation at home was reduced & unable to sleep peacefully.
Chimanrao had retired from the job a year ago. The first six months went well. But the emptiness began to torment. Everyone in the house is busy with their work. So he started feeling lonely. Earlier, while employed, there was Respect, Prestige – Mann, Pratishtha (मान, प्रतिष्ठा). Now Chimanrao was starting to feel lonely. They constantly started feeling that they are nobody’s business, nobody needs them, because of which the irritation increased, the enthusiasm decreased, the focus on food was lost, and was lost interest in physical exercise.
SasikalaBai’s husband died of a heart attack four years ago. One son became an engineer and settled abroad. The girl was also married. After her husband, she took care of the house and completed the children’s education & other responsibilities. The girl was very happy when her marriage was fixed. But after her marriage, the thought of ‘she will be alone’ started bothering him constantly. Therefore, their thirst and appetite decreased. Enthusiasm waned. She used to cry constantly by removing old memories. Constant restlessness, irritability, lack of attention in work, the whole situation had deteriorated.
We encounter many such problems in our daily life. Unable to handle the frustration caused by it, the number of victims of depression is huge.
Someone’s exam failure or someone’s financial loss, someone’s workplace problem, family tension, death of a close relative or relative, business failure, love break-up, spouse’s adultery, many incidents that happen in daily life and the resulting  depression !
Regardless of the cause of depression, the symptoms are almost the same.
  • Constantly sad,
  • Feeling down,
  • Loss of enthusiasm,
  • Feeling tired,
  • Losing interest in things that used to be fun,
  • Persistent unrelenting depression despite attempts to divert the mind elsewhere.
It is an easy feeling to feel depressed when stress arises in one’s life. But it is expected to overcome such Disappointment and find a way out of the present problem.
But if a person is trapped by this problem for longer than expected and instead of trying to solve the problem, the problem worsens, then the frustration starts to take the form of an illness.
Along with these major symptoms, other symptoms are:
  • Loss of enthusiasm at work,
  • Loss of concentration. Forgetting many things as a result of loss of concentration.
  • Loss of sleep
  • Appetite Decreased.
  • Weight loss is reported after prolonged depression.
  • Due to constant negative thoughts, simple alternatives are not visible.
So it becomes difficult to overcome the problem. Often there is a situation where one knows but does not turn.
Unreasonable feelings of guilt, a negative view of oneself and the future, diminish the joy of living and lead to thoughts of ending one’s life.
Most of the time, the problem that has arisen is to find a way out of it. But it is not possible due to diseased state of Mind. It is necessary to properly treat such patients.
Once this state of Mind is fixed, one is able to move out of one’s state. But this patient feels that “due to some reason depression has arisen, the patient is not ready to see it as a disease and others are not ready, what will the Doctor do about it ? This is a general perception. Medicines are going to solve this problem a little ? This is their next question. “
From the example given at the beginning of the article, it can be seen that all of them had stress in their lives causing some kind of problem. Because of this, he developed a disease of Depression. This type of Depression is called Reactive Depression, which means Depression caused as a response to stress.
Research has also confirmed that there are changes in brain chemicals.
Along with Homoeopathic Medicines, the patient needs counseling in this Depression disease. Homoeopathic Medicines are a good option in such patients.
Such patients may find helpful medication to help them deal with stress, change negative attitudes, and reduce depression.
Once their depression subsides, they work their way through other problems on their own. At that time they do not need counseling.
Sometimes in Reactive Depression, if counseling is used along with medication, the patient will benefit quickly and better. No problem is insurmountable. Although we cannot change the problem, we can certainly change the way we approach it.
It is completely possible with Homoeopathic Medicines. Thus, the patient can again experience a pleasant life as before.

Dr Ajay Hanmane
M.D. (Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123, 940450723
Sunday Closed.

Please Read Next Article-