भीतीवर उपाय — होमिओपॅथीचा / Remedy for Fear — Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneMarch 29, 2025 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry

 भीतीवर उपाय — होमिओपॅथीचा

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या शेजारी राहणाऱ्या एका शाळेतल्या मुलाला रात्री साडेबारा- एकच्या दरम्यान टेरेसवर जाताना पाहिलं. दुसऱ्या दिवशी मी त्याला विचारलं तेव्हा, तो म्हणाला, “मला रात्री खूप अंधार झाला की, नक्षत्र तारे पाहायला मजा येते.” मी म्हणालो, “तुला भीती नाही वाटत तर ?” म्हणाला, “कशाची ? …..अंधाराची ?….भुताखेतांची ?…..असली भीती मला वाटत नाही. उलट भुतं आलीतर मला ती पाहायची आहेत ! मात्र माणसांची भीती वाटते. चेहरे झाकलेली हातात चाकू सुऱ्या घेतलेली माणसं आली, तर मी निश्चितच पळत सुटेन ! “
भयाचा जन्म अज्ञानातून होतो असं आपण म्हणतो.थोडं फार खरंही आहे ते. पण त्या मुलांनं भयाची जी व्याख्या केली होती, ती अधिकच खरी चिंता करायला लावणारी आहे.
तसाही माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत भयभीत असतो. भय हा कुठल्याच व्याख्येत न सामावणारा भलामोठा काळोखी डोह आहे. त्यांच्या तळाशी अनेक अज्ञात, रहस्यमय गोष्टी दडलेल्या आहेत. त्या अज्ञात रहस्यमय गोष्टी माणसाच्या मनातल्या भय  निर्मितीला कारणीभूत ठरतात.
 आपण अंधाऱ्या रस्त्यावरून चालतोय. रस्ता निर्मनुष्य आहे. घाईघाईने मुक्कामी पोहोचत असताना हळूच केव्हातरी मनात भीती घर करायला लागते. आपल्याच पावलांचे आवाज…….पण मागून कोणीतरी येतंय असं वाटायला लागतं. आपण गती वाढवतो, मागून येणाराही गती  वाढवतोय असा भास व्हायला लागतो. दरदरून घाम सुटतो. हृदयाचे ठोके वाढायला लागतात. हातापायांना कंपू सुटतो. आता संपलंच सगळं, या भावनेने घसा कोरडा पडतो. भयानं आपला पूर्ण कब्जा घेतलेला असतो. ही अवस्था नेमकी काय असते ?
या उदाहरणापुरतं बोलायचं झालं, तर आपण निर्मनुष्य रस्त्यावरून एकटे चालतोय याची जाणीव जेव्हा गडद व्हायला लागते तेव्हा अशा प्रसंगाशी निगडित असलेल्या आठवणी मनात जाग्या व्हायला लागतात. मेंदूतला आमिग्डला (Amygdala) नावाचं न्युराॅन काम करायला सुरुवात करतो. आपल्या मज्जासंस्थेला काहीतरी अकल्पित घडू शकतं, असा इशारा देतो, सावध करतो.
त्यामुळे अनेक भीतीदायक स्मरणं, वाचलेल्या घटना आठवायला लागतात आणि पाहता पाहता  भीती या सर्व शरीराचा ताबा घेते. मनात निर्माण झालेली ही भयभावना मुक्कामी पोहोचल्यानंतर मात्र नाहीशी होते. ओळखीची माणसं दिसतात, सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याची जाणीव होते. आता भ्यायचे कारण नाही, अशी मनाची खात्री पटते. न्युराॅनचे काम संपत आणि भीतीमुळे शरीरात घडलेले सर्व बदल नाहीसेव होऊन शरीर पूर्ववत होतं. हा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो.
माझ्या एका मित्राचं शेत जिथे आहे तिथे जवळपास वस्तीच नाही म्हटले तरी चालेल. समोर एक मोठा तलाव. रात्री बऱ्याचदा वीज नसते. तलावाचे पाणी काळंभोर दिसतं असतं. तलावाच्या पलीकडे पसरलेलं मोठा जंगल ! नाग, विंचू आहेतच. कधी कधी शेतात एखादा रानटी जनावरही येतं. अशा ठिकाणी एकट्यानं रहाणं म्हणजे……… आम्ही त्याला विचारलं, “तुला भीती नाही का वाटत? ” त्याचे उत्तर – “फार फार तर काय होईल? मरण येईल. पण त्याला आता पर्यायच नाही हे मान्य करून समोरची परिस्थिती स्वीकारले की भीती संपते. भीती कुठपर्यंत ? मागे पळून जायला जात आहे जागा आहे तोपर्यंत. आणि पर्याय आहे तोपर्यंत ते आपण वापरत राहतो आणि तोपर्यंत भीतीही पाठलाग करत राहते आणि पर्याय संपले हे माणूस निर्भय होतो.’
भयभावना मनाचा ताबा घ्यायला लागते, ती अगदी साध्या साध्या गोष्टीपासून.
उदा.
  • परीक्षेत पास होणार का ?
  • नोकरी मिळणार का ?
  • आजच्या स्पर्धेच्या जगात ती टिकणार का ?
  • नंतर लग्न, मुलाबाळांच्या काळज्या,
  • आयुष्यात अचानक होणारे बदल,
  • एकाकीपणा,
  • अपयश,
  • नकार,
  • अनिश्चितता,
  • दुखावलं जाणं,
  • आपल्याविषयी चुकीची मत बनणं,
  • अपूर्णतेची जाणीव,
  • बंधन,
  • न्यनगंड,
  • अगदी साधं वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचणं…….  

 

अशी अनेक कारणं माणसाच्या मनातल्या भयभावनेमागे कार्यरत असतात. पण भीतीमागची कारणं प्रत्येक वेळी जीवघेणी ठरतातच असं नाही.

माणसं त्यातून मार्ग काढत राहतात, विचार करतात, पर्याय शोधतात. खरंतर भीती आहे म्हणून सुरक्षितता आहे. भीतीची जाणीव असते म्हणूनच मेंदू त्यावरची उपाययोजना शोधून काढत असतो. म्हणूनच भयभावनेचा समावेश षड्रिपूंमध्ये होत नाही. काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया यांचा प्रसंगी अतिरेक होतो तेव्हा त्या भावना माणसाचा घात करणारे शत्रू म्हणून ओळखले जातात. पण भयभावना माणसाचा शत्रू म्हणून ओळखली जात नाही, हा या भावनेचा विशेष.

मनात निर्माण होणारी भीती माणसाला सावध होण्याची सूचना देते. कुठल्याही संकटापासून सुटका कशी होईल याचा विचार करायला लावते.
 उदाहरणार्थ समुद्रात तुफान उसळलंय, होडी घालू नकोस, कोनाड्यात अंधार आहे, न बघता हात घालू नकोस, गाडी भरधाव येतेय, रस्ता सावकाशीने ओलांड.  रस्त्या निसरडि आहे, पडशील…….अशा सावधगिरीच्या सूचना आपलं मन आपल्याला देत असतं. त्यामुळे आपल्याला संकटात पडण्यापासून वाचवणारं या प्रकारचं भय हा खरं तर आपला मित्र आहे.
आपण या रोजच्या छोट्या छोट्या भीतींचा म्हणूनच फार विचार करण्याचं कारण नाही. ती भीती नैसर्गिक आहे. अशा अनेक गोष्टींचे भय माणसाला वाटतं, या बहुतेकांच्या जीवनाचा अपरिहार्य भाग असतात. काही काळानंतर माणसं त्यातून बाहेरही  पडलेली असतात. नुसतीच बाहेर पडत नाहीत, तर आपण कशी एखाद्या संकटावर मात केली हेही अभिमानानं सांगतात. हे सांगताना त्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नसतो.
या भयापासून साऱ्या माणूस जातीचे रक्षण करण्याचा उपाय आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे होमिओपॅथिक औषधोपचार. 
समुपदेशन व योग्य उपाय करून भीतीच निराकरण करणं बऱ्याचदा शक्य असतं.  होमिओपॅथीमध्ये या अशा समस्यांवर अत्यंत गुणकारी औषध आहेत जी अर्थातच तज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेणं हिताचे नाही. 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123, 9404507723
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

——————————————————————–

Remedy for Fear — Homoeopathy

A few years ago there was a  story. Saw a schoolboy who lived next door to me going to the terrace between 12:30 and 1:30 a.m. When I asked him the next day, he told me that, when the night is very dark, it is fun to see the stars. I said, “If you are not afraid ? Said, “Of what? …..I don’t feel Fear of darkness ?…of ghosts ?….. On the other hand, if ghosts come, I want to see them ! But people are afraid. If people come with knives in their hands with their faces covered, I will definitely run away! “
We say that,  Fear is born out of ignorance. It is somewhat true. But the children’s definition of Fear is more of a real concern.
Even such a person is constantly afraid for some reason or the other. Fear is a big dark fog that defies definition. Many unknown, mysterious things are hidden at the bottom of them. Those unknown mysterious things cause the creation of Fear in Human Mind.
We are walking on a dark road. The road is deserted. While reaching the destination in haste, slowly Fear starts to creep in. The sound of our own footsteps…….but it seems that someone is coming from behind. As we speed up, it seems that the person coming from behind is also speeding up. Sweat breaks out all over. Heart rate starts to increase. Hands and feet tremble. The feeling that it is all over now makes the throat dry. Fear takes over us completely. What exactly is this condition.?
To speak of this example, when the awareness that we are walking alone on the street begins to darken, the memories associated with such an event start to arise in the Mind. A neuron in the brain called the  Amygdala starts working. It warns and warns that something unexpected may happen to our nervous system.
Because of this, many Fearful memories, incidents that have been read, start to be recalled and Fear takes control of the entire body. However, this Fear created in the Mind disappears after reaching the destination. Familiar people are seen, there is a sense of reaching a safe place. The Mind is convinced that there is no reason to Fear now. The neurons stop working and all the changes in the body due to Fear are eliminated and the body resets. Many people have this experience.
One of my friend’s farm is almost uninhabited. A big lake in front. There is often no electricity at night. The lake water looks dark. A large forest spread across the lake ! There are snakes and scorpions. Sometimes a wild animal also comes in the field. Being alone in such a place means……… We asked him, “Aren’t you afraid?” His reply – “What if it’s too far ? Death will come. But he accepted the situation, accepting that there was no other option.” That Fear ends.
‘How far does Fear go ? Running back until there is room. And as long as there is an alternative, we keep using it, and till then the Fear also continues to chase, and when the options are gone, one becomes Fearless.’
Fear starts to take over the Mind, from the simplest things.
E.g.
  • Will you pass the exam ?
  • Will you get a job ?
  • Will it survive in today’s competitive world ?
  • Later marriage, children worries,
  • Ssudden changes in life,
  • Loneliness,
  • Failure,
  • Rejection,
  • Uncertainty,
  • Getting hurt,
  • Wrong opinion about yourself,
  • Feeling of imperfection,
  • Constraint,
  • Inferiority Complex,
  • Even just reaching work place on time are many reasons…… 

They work behind the Fear in the Human Mind. But the reasons behind Fear are not always life-threatening.

People keep finding ways out of it, thinking, looking for alternatives. In fact there is safety as there is Fear. Because the brain is aware of the Fear, it finds solutions to it. That is why Fear is not included in Shadripu. Kama, anger, mada, matsra, moha, maya, when they get excessive on occasions, those Emotions are known as enemies that kill a person. But Fear is not recognized as the enemy of man, this is the specialty of this Emotion.

The Fear that arises in the Mind instructs a person to be careful. It makes you think about how to get rid of any crisis.
For example, there is a storm in the sea, do not enter the boat, it is dark in the corner, do not put your hand without looking, the car is speeding, cross the road slowly. The road is slippery, you will fall……. Our Mind gives us such cautionary instructions. So this kind of Fear is actually our friend which saves us from getting into trouble.
There is no reason to think too much about these small daily Fears. That Fear is natural. There are so many things that people Fear, they are an inevitable part of most people’s lives. After some time people are out of it. Not only do they come out, but they also proudly tell how they overcame a crisis. They do not even have a hint of Fear while saying this.
We have a solution to protect the entire human race from this Fear and that is Homoeopathic Medicines.
It is often possible to get rid of the Fear itself with Counseling and appropriate remedies. In Homoeopathy, these are very effective Medicines for such problems, which of course are not advisable to be taken without expert advice.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123, 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-