प्रेमात थोडं सांभाळून…… आणि होमिओपॅथी / Love Needs Caution… and Homeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneMay 9, 2026 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure marriage Problem Sex Problems Sexual Problems Sleep Disorders Uncategorized

प्रेमात थोडं सांभाळून…… आणि होमिओपॅथी

1975 मध्ये प्रदर्शित झालेला “जुली” हा एक चित्रपट. एक महाविद्यालयीन ज्युली नावाची मुलगी मित्राच्या प्रेमात पडते. हळूहळू प्रेमात आकंठ बुडते. भावनेच्या भरात त्यांचं प्रेम शारीरिक पातळी ही गाठतं आणि ज्युली लग्नाआधीच गरोदर राहते. ती गर्भपात करू शकत नाही शेवटी ती समाजापासून दूर पळून जाते. तेथे बाळाला जन्म देते. बाळाची रवानगी अनाथालयात होते. आणि जुली नाईलाजाने एकटी घरी परतते. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे तिला काही काळानंतर तिच्या मित्राची व घरच्यांची साथ मिळते आणि सर्व काही छान होत. त्याकाळी अत्यंत गाजलेला हा चित्रपट.

पन्नास वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट, खरंतर काळाच्या खूप पुढचा विषय घेऊन आला होता. त्याकाळी सर्वसाधारण मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात अशी घटना फरशी घडत नव्हती. आपल्यापासून खूप दूर आहे असं वाटणार हे प्रकरण अलीकडे मात्र आपल्या दारात येऊन पोहोचलं आहे, नव्हे काहींच्या घरांमध्येही आलं आहे. तारुण्य म्हणजे उत्साह, ऊर्जा, कुतूहल, बिनधास्तपणा, फारसा विचार न करता स्वतःला झोकून देणं. पण हीच तरुणाई कधी कधी मात्र होणाऱ्या परिणामांचा विचार न करता बेपर्वाहीने वागू शकते.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक तरुण स्वतःच्या मैत्रिणीला घेऊन दवाखान्यात आला होता. लग्नाआधीच गर्भधारणा झाल्याने त्या मुलीने वैद्यकीय सल्याशिवाय गर्भपातासाठीच्या गोळ्या घेतल्या होत्या.

  • गर्भारपणाचे किती महिने झाले आहेत?
  • गर्भपातासाठी कोणत्या गोळ्या किती प्रमाणात घ्यायच्या असतात?

याची काही माहिती तिला नव्हती. भीतीपोटी घरी कुणालाच याविषयी सांगितलं नव्हतं. गोळा घेतल्यानंतर तिच्या पोटात दुखू लागलं व रक्त स्त्राव होऊ लागला. तिला उभं राहण्याचं, बोलण्याचाही त्राणं राहिलं नाही. तिची अवस्था खूप गंभीर झाली. हे सगळं बघून तिचा मित्र खूप घाबरून गेला. तो घाईघाईने तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. गोळ्यांच्या चुकीच्या वापराने तिच्या गर्भाशयाला इजा पोहचली होती. पोटामध्ये खूप रक्तस्त्राव झाला होता. अगदी जीव घेणी परिस्थिती निर्माण झाली होती. नाईलाजाने शस्त्रक्रिया करून तिचे गर्भाशयच काढावं लागलं होतं

असुरक्षित लैंगिक संबंधामुळे गर्भधारणा झाल्यास अनेक मुली व स्त्रिया गर्भपाताचा निर्णय घेतात तर काही जणांना नाइलाजाने मातृत्व स्वीकारावं लागतं. गर्भपाताचा पर्याय निवडणाऱ्या भारतातील सर्वच वयोगटातल्या 60% स्त्री अजूनही अप्रशिक्षित व्यक्तींकडून गर्भपात करून घेतात.

कुटुंबीयांचा, समाजाचा दबाव, नाचक्कीची भीती व वैद्यकीय तज्ञ उपलब्ध नसणं, ही असुरक्षित गर्भपातामागची सर्वसामान्य कारणं. पण यामुळे काहीजणींना स्वतःचं जीव गमावा लागतो. तर अनेकजणींच्या शरीरावर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात.

शारीरिक व भावनिक प्रलोभनांना बळी पडणं आणि क्षणिक सुखासाठी शरीर संबंध ठेवणं ही तरुण वयातील असुरक्षित लैंगिक संबंधामागची महत्त्वाची कारणं. अनेकदा या मुलींना दुष्परिणामांची माहिती नसते, गर्भनिरोधकाच्या साह्याने ते दुष्परिणाम टाळता येतात हे माहीत नसतं. गर्भनिरोधक साधनांविषयीचं अज्ञान, त्यांच्या वापराबद्दल वाटणारी भीती व त्याविषयीचे गैरसमज समाजात अनेकदा आढळतात. म्हणूनच क्षणिक सुखासाठी धोकादायक लैंगिक वर्तन टाळणं नेहमीच योग्य. गर्भधारणा नको असल्यास व असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी गर्भनिरोधक साधनांचा वापर करायला हवा.

तरुण वयात वापरता येणाऱ्या गर्भनिरोधक साधनांविषयी माहिती असायला हवी. यातील पहिल्या प्रकारचे गर्भनिरोधक साधन म्हणजे ‘बॅरियर’ गर्भनिरोधक. या गर्भनिरोधकामुळे स्त्रीच्या योनीमार्गात शुक्राणूंना प्रवेश करण्यात अडथळा येणं म्हणजे कंडोम. बाळ नको असेल, तर प्रत्येक लैंगिक संबंधाच्या वेळी पुरुषांनी ते वापरायला हवे. कंडोमचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याच्यामुळे गर्भधारणेबरोबरच लैंगिक संबंधातून होणारा जंतूसंसर्गही टाळता येतो. कंडोमच्या अपयशाचा दर थोडा जास्त आहे, साधारणतः 10%. परंतु त्याचे महत्त्वाचे कारण आहे अनियमित व चुकीचा वापर.

गर्भधारणेसाठी दुसरे वापरले जाणारे साधन म्हणजे संप्रेरकयुक्त गर्भनिरोधक गोळ्या. यात इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॉल ही संप्रेरके असतात. यातील संप्रेरकांमुळे बीज निर्मितीची प्रक्रिया थांबते व गर्भ निर्मिती होत नाही. या गोळ्या फक्त शरीरसंबंधाच्या वेळी न घेता महिनाभर नियमितपणे घ्यायचे असतात. या गोळ्या अत्यंत कार्यक्षम असतात. यांचा अपयश दर हजारात एकापेक्षाही कमी असतो. यात असलेल्या संप्रेरकांमुळे स्त्रियांना त्रास होऊ शकतो. म्हणूनच गर्भनिरोधक गोळ्या वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यायला हव्यात. गर्भनिरोधक गोळ्यांप्रमाणेच संपप्रेरकयुक्त इंजेक्शन व इतर साधने गर्भनिरोधनासाठी वापरता येतात. अर्थात त्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

पहिले अपत्य होण्यापूर्वी ‘तांबी’ सारखी गर्भनिरोधक साधने क्वचितच वापरली जातात. ‘तांबी’ हे गर्भाशयात बसविण्याची दीर्घकालीन गर्भनिरोधक साधन आहे. ते तीन ते दहा वर्ष काम करतं. याचा अपयश दर 1% पेक्षाही कमी असतो. मात्र ‘तांबी’ मुळे क्वचित प्रसंगी मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव किंवा पोटदुखी होऊ शकते. तसेच जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ही थोडी जास्त असते.

‘इमर्जन्सी’ गर्भनिरोधकाचा वापर हल्ली वाढलेला दिसतो. असुरक्षित लैंगिकसंबंधानंतर ‘ इमर्जन्सी ‘ गर्भनिरोधक साधन वापरून गर्भधारणेची शक्यता कमी करण्यात येते. यासाठी बहुतेकदा संप्रेरकयुक्त गोळ्या वापरल्या जातात. मात्र यात संप्रेरकांचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. नियमितरुपी वापरल्या जाणाऱ्या  गर्भनिरोधक गोळ्यांपेक्षा याचा अपयश दरही थोडा जास्त असतो. म्हणून        ‘इमर्जन्सी’ गर्भनिरोधकांपेक्षा नियमितरुपी गर्भनिरोधके वापरणे संयुक्तिक ठरते. ‘इमर्जन्सी’ गर्भनिरोधनासाठी ‘तांबी’ किंवा संप्रेरकयुक्त गर्भाशयातील साधनही वापरता येते.

असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होणारा दुसरा धोका म्हणजे जननसंस्थेचा जंतूसंसर्ग. हा जंतूसंसर्ग अनेक प्रकारच्या जिवाणू,विषाणू व बुरशीमुळे होतो. जंतूसंसर्ग झाल्या स्त्रीच्या योनीमार्गातून नेहमी येणाऱ्या पारदर्शक स्त्रावाचा रंग हिरवा- पिवळा होतो. कधीकधी स्तराव घट्ट दह्यासारखा पांढरा होतो. त्याला दुर्गंधी येते. बाह्य जननसंस्थेवर खाज येते. आग होते व पुरळ येऊ लागते. पोटात व कमरेत दुखू लागते. जंतूसंसर्ग वाढल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. गर्भाशय, गर्भाशयनलिका व बिजांडकोषा सारख्या अंतर्जनन संस्थेच्या अवयवांना इजा पोचू शकते. जंतूसंसर्गामुळे गर्भाशय नलिका बंद झाल्यास पुढे वंदत्वाचा धोका उत्पन्न होतो.

होमिओपॅथिक औषध उपचारामुळे जननसंस्थेचा जंतुसंसर्ग पूर्णपणे बरा होतो. त्याचे दुष्परिणाम टाळता येतात आणि अंतर्जनन संस्थेचे अवयव सुरक्षित राहिल्याने वंध्यत्वाचा धोका उत्पन्न होत नाही.

‘ह्यूमन पॅपिलोमा’ या विषाणूचा संसर्ग झाल्यास काही वर्षानंतर गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याची भीती असते. एच. आय. व्ही. (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) च्या विषाणूमुळे एड्स सारखा गंभीर आजार होतो.लैंगिक संबंधातून हिपॅटायटीस, सिफिलिस सारखे जीव घेणे आजार उद्भवू शकतात.

जननसंस्थेचा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी असुरक्षित लैंगिक संबंध टाळायला हवा. एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर किंवा केवळ शारीरिक आकर्षणामुळे शारीरिक संबंध ठेवणे यासारख्या धोकादायक लैंगिक वर्तनापासून दूर राहिला हवे.
लैंगिक संबंधाच्या वेळी कंडोम वापरल्यास जंतुसंसर्गाचा धोका कमी होतो. जंतूसंसर्ग टाळण्यासाठी शरीर संबंधाच्या वेळेस स्त्री व पुरुषांनी जननसंस्थेची स्वच्छता ठेवायला हवी. जननसंस्थेच्या जंतूसंसर्गाची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घेऊन पुढील दुष्परिणाम टाळायला हवा.
अशा वेळेस स्त्री व पुरुष या दोघांनाही उपचार देणे जरुरी असते. हिपॅटायटीस व एचपीव्हीचे लसीकरण या विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका कमी करते.

काव्या माझ्या एका चांगल्या मित्राची मुलगी. अतिशय हुशार. एका आयटी कंपनीत नोकरी करते. सकाळी नऊ वाजता काम सुरू केले की, कधी संपेल याची खात्री नसते. परदेशातील ग्राहक वा सहकारी यांच्याबरोबर मीटिंग असेल तर ती रात्री उशिरापर्यंत चालू राहते. जेवायला, झोपायला मध्ये रात्र उलटून जाते. काव्याच्या या दिनचर्यामुळे मित्र फार चिंतेत आहे. वेळच्यावेळी जेवण नाही. घरूनच काम करायचं, त्यामुळे व्यायाम नाही,पुरेशी झोप नाही. त्यामुळे ती हल्ली सारखी आजारी पडते. आज डोकं दुखतंय. उद्या मान दुखते. कधी पित्त झाले. कधी लघवीच्या तक्रारी यासारख्या कुरबुरी सारख्या चालू असतात. काव्याची समस्या ही आजकालच्या तरुण मुलींची सर्वत्र आढळणारी समस्या आहे.

तारुण्य हे खरंतर शारीरिक तंदुरुस्तीचं वय. मात्र या वयात आरोग्याची नीट काळजी न घेतल्यास पुढील आयुष्यात अनेक व्याधी होऊ शकतात. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुद्धा जपायला हवं, जे होमिओपॅथिक औषधाने सहज शक्य आहे.
संतुलित आहार, नियमित व्यायाम व पुरेशी विश्रांती ही उत्तम आरोग्यासाठी त्रिसूत्री काम कायम आचरणात आणायला हवी. मानसिक समस्या जाणवत असल्यास समुपदेशन बरोबरच होमिओपॅथिक औषधाची जोड देणे आवश्यक आहे. व्यसनांपासून दूर राहायला हवे. या तरुण वयात मिळविलेले उत्तम आरोग्य पुढील आयुष्यासाठीची एक मौल्यवान ठेव आहे. पण हे होमिओपॅथिक उपचाराने आरोग्यदायी जीवन जगणे शक्य आहे.

 

डॉ अजय व. हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
मोबाईल- 7738667123 / 9404507723
रविवारी बंद  
आपला विश्वास – नैसर्गिक आरोग्य पुनर्स्थापनेची आमची जबाबदारी!

कृपया पुढील लेख वाचा  —

—————————————————————————————-

Love Needs Caution… and Homeopathy

 

In 1975, the film Julie was released. It told the story of a college girl named Julie who falls in love with a friend. Slowly, she becomes deeply immersed in that love. In the heat of emotions, their relationship crosses into the physical, and Julie becomes pregnant before marriage. Unable to go through with an abortion, she runs away from society, gives birth to the child, and places the baby in an orphanage. Eventually, she returns home alone. Later, as shown in the film, she receives the support of her family and her lover, and everything falls into place. The movie, much talked about at the time, was considered very bold and far ahead of its era.

Half a century ago, such incidents seemed distant and almost unimaginable in ordinary middle-class families. But today, these same situations are no longer rare—they have reached right into our own homes and neighborhoods.

Youth symbolizes enthusiasm, energy, curiosity, fearlessness, and the tendency to give oneself fully without much thought. But sometimes, this very recklessness leads to actions without considering the consequences.

A few years ago, a young man brought his girlfriend to a hospital. She had become pregnant before marriage and, out of fear, took abortion pills without medical advice. She had no knowledge of how far along the pregnancy was or the proper dosage of the pills. Afraid to tell anyone at home, she took the pills on her own. Soon after, she developed severe abdominal pain and heavy bleeding. She grew extremely weak, unable even to stand or speak. Panicked, her boyfriend rushed her to the hospital. By then, the misuse of pills had damaged her uterus. The internal bleeding was so severe that it became a life-threatening emergency, and doctors had no choice but to remove her uterus through surgery.

Unsafe sxual relations often lead to such situations. Many young women opt for abortion, while others, under pressure, are forced into unwanted motherhood. Shockingly, around 60% of abortions in India, across all age groups, are still performed by untrained individuals.

 

The reasons? Family and societal pressure, fear of disgrace, and lack of access to proper medical experts. Unfortunately, these unsafe abortions sometimes cost women their lives, and in many others, leave long-term physical and emotional scars.

Lack of awareness about contraception is another major factor. Young people often succumb to momentary temptations without realizing the risks involved. They are unaware that contraception can prevent both pregnancies and harmful consequences. Misconceptions, fear, and ignorance about contraceptives still prevail in society. That’s why avoiding risky sexual behavior for fleeting pleasure is always the safer choice. If pregnancy is not desired, contraceptive methods must be used to prevent both conception and its complications.

Young people should be well-informed about available contraceptive methods. The most basic are barrier contraceptives such as condoms. Condoms prevent sperm from entering the female reproductive tract. They should be used by men during every act of intercourse if pregnancy is to be avoided. Their biggest advantage is that, in addition to preventing pregnancy, they also reduce the risk of sexually transmitted infections (STIs). Their failure rate is about 10%, mostly due to irregular or improper use.

Another commonly used option is hormonal contraceptive pills, which contain estrogen and progesterone. These hormones suppress ovulation, thus preventing conception. Unlike condoms, these pills must be taken regularly, not just during intercourse. They are highly effective, with a failure rate of less than 1 in 1,000. However, they may cause side effects and should only be taken under medical supervision. Similar hormonal injections and devices are also available under professional guidance.

Intrauterine devices (IUDs), like copper-T, are long-term contraceptives placed inside the uterus, effective for 3 to 10 years, with less than 1% failure rate. However, they may cause side effects like heavier periods, cramps, or infections in rare cases.

Emergency contraception is now increasingly used after unprotected intercourse. While effective, these high-dose hormonal pills may cause more side effects than regular pills, and their failure rate is also higher. Hence, emergency contraception should not replace regular methods. IUDs or hormonal devices can also serve as emergency contraceptives if inserted promptly.

Another major risk of unsafe sexual relations is sexually transmitted infections (STIs). These may be caused by bacteria, viruses, or fungi. Symptoms include abnormal vaginal discharge (yellow, green, or curd-like white), foul odor, itching, burning, rashes, abdominal pain, or backache. If left untreated, infections can spread to the uterus, fallopian tubes, and ovaries, leading to infertility.

Homeopathic treatment can help cure such infections completely, prevent complications, and preserve reproductive health, thus reducing the risk of infertility.

Certain viral infections, such as Human Papillomavirus (HPV), may later lead to cervical cancer. HIV (Human Immunodeficiency Virus) causes AIDS, while others like hepatitis and syphilis are life-threatening illnesses also spread through unsafe sex.

To prevent infections, unsafe sex must be avoided. Engaging with multiple partners or indulging in relationships purely out of physical attraction increases risk. Using condoms during intercourse reduces the chances of infection. Maintaining genital hygiene is essential for both partners. At the first signs of infection, immediate medical attention is necessary, and both partners should receive treatment to prevent recurrence. Vaccinations against hepatitis and HPV also help reduce risks.

Now, let me share an example from everyday life. Kavya, the daughter of a close friend, is a bright young woman working in an IT company. Her workday starts at 9 a.m. and often extends late into the night due to international meetings. Meals and sleep get delayed, and working from home means no exercise. As a result, she often falls ill—headaches today, neck pain tomorrow, acidity another day, and sometimes urinary complaints.

Kavya’s lifestyle reflects the struggles of many young women today. Youth is meant to be the age of strength and fitness, but without proper care, it can sow the seeds of health issues later in life. Alongside physical health, mental well-being is equally important—and this is where homeopathy can play a valuable role.

With balanced nutrition, regular exercise, sufficient rest, and timely homeopathic support, young people can maintain good health. If emotional stress arises, counseling along with homeopathic remedies can help. Staying away from addictions is equally essential.

The good health gained in youth is a priceless investment for the future. And yes, with the help of homeopathy, living a healthy and fulfilling life is indeed possible.

 

Dr Ajay V. Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
🌐 www.chaitanyahomeocare.com
Mobile No. 7738667123/ 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-